स्वप्नांचे..

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
18 Jun 2012 - 7:18 pm

भेटीला ये नकोच देऊ कारण स्वप्नांचे
उगाच होते सत्याशी मग भांडण स्वप्नांचे

नशेमधे असतानाही मी बरळलोच नाही
कल्पनेस बहुतेक असावे कुंपण स्वप्नांचे

हलक्याफुलक्या स्वप्नांचा तो काळ कुठे गेला
ओझे का वाटावे आता मण मण स्वप्नांचे

चटई निर्देशांक तयांच्या आयुष्याला द्या
तुमच्यासाठी तुटले ज्यांचे अंगण स्वप्नांचे

मेल्यानंतर हाल न झाले असते आत्म्यांचे
जर का करता आले असते तर्पण स्वप्नांचे

माझ्यासाठी उल्का कुठली निखळलीच नाही
रिते तरीही पहाटेस तारांगण स्वप्नांचे

- उपटसुंभ

गझल

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

18 Jun 2012 - 7:25 pm | मेघवेडा

छान! कुंपण ए१. "ओझे का वाटावे आता मण मण स्वप्नांचे" ही ओळ आवडली. :)

रेखीव झाली आहे गझल. :)

गणेशा's picture

18 Jun 2012 - 7:38 pm | गणेशा

माझ्यासाठी उल्का कुठली निखळलीच नाही
रिते तरीही पहाटेस तारांगण स्वप्नांचे

मस्त शेर

अरुण मनोहर's picture

20 Jun 2012 - 8:59 am | अरुण मनोहर

मेल्यानंतर हाल न झाले असते आत्म्यांचे
जर का करता आले असते तर्पण स्वप्नांचे