आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता शब्दहो, थांबा जरा...!
.................................शब्दहो, याना जरा...!.................................शब्दहो, याना जरा! मी गुंफतो वृतात गाणे!आजच्यापुरते तरी पाडू नका मजला उताणे!!मुक्त लिहतो नेहमी... वृतातही थोडे लिहू द्या!गूढ मात्रांची करामत एकदा मजला जमू द्या!एवढे ऐका जरा! मी विनवतो रे दीनवाणेसारखे माझ्यापुढे का कोडगे होऊन येता?आणि मज निःशब्दतेने का असा हा त्रास देता?वैर माझ्याशीच तुमचे काय आहे कोण जाणे!एरवी तुमची अशी आराधना करतो कुठे मी?`व्यक्त होताना तुम्ही या, ` हट्ट हा धरतो कुठे मी?आज मज अडवू नका पण रोजच्या सवयीप्रमाणे!द्या तुम्ही हा "केशवा"ला एक मौका आज या द्या...!हा निराळा-वेगळा आनंद त्याला ही मिळू द्या...!रोज मग आहेच त्याचे खरडणे लाचारवाणे !!- केशवसुमार.............................. गुंफणकाल ः २० जून २००८..............................
प्रतिक्रिया
20 Jun 2008 - 8:38 pm | चतुरंग
केशाचा वारु सुटला!! ;)
मस्त रे केसुशेठ, झकास पलटी!
चतुरंग
20 Jun 2008 - 8:39 pm | स्वाती दिनेश
शब्दांची विनवणी आवडली.
मूळ कवितेचे विडंबन एवढेच न राहता एक स्वतंत्र कविता म्हणूनही वाचायला आवडली.
स्वाती
21 Jun 2008 - 4:34 pm | प्राजु
मूळ कवितेचे विडंबन एवढेच न राहता एक स्वतंत्र कविता म्हणूनही वाचायला आवडली.
स्वातिशी सहमत आहे. अतिशय सुंदर काव्य आहे हे. अभिनंदन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Jun 2008 - 8:46 pm | अविनाश ओगले
छान विडंबन..
21 Jun 2008 - 4:18 am | अरुण मनोहर
शब्द तर तुमच्या पुढे मान झुकवून उभेच आहेत. पण शिवाय कवीता रंगली देखील आहे.
21 Jun 2008 - 7:22 am | विसोबा खेचर
द्या तुम्ही हा "केशवा"ला एक मौका आज या द्या...!
हा निराळा-वेगळा आनंद त्याला ही मिळू द्या...!
रोज मग आहेच त्याचे खरडणे लाचारवाणे !!
हे मस्त!
वा केशवशेठ! :)
तात्या.
21 Jun 2008 - 7:43 am | मिसळपाव
मुक्त लिहतो नेहमी... वृतातही थोडे लिहू द्या!
गूढ मात्रांची करामत एकदा मजला जमू द्या!
हे विशेष जमलंय!!
21 Jun 2008 - 12:19 pm | II राजे II (not verified)
द्या तुम्ही हा "केशवा"ला एक मौका आज या द्या...!
हा निराळा-वेगळा आनंद त्याला ही मिळू द्या...!
रोज मग आहेच त्याचे खरडणे लाचारवाणे !!
वा वा !!
विडंबन सम्राट वा... !! छान जमला आहे रंग !
राज जैन
माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?
21 Jun 2008 - 1:13 pm | अमोल केळकर
खुप छान
23 Jun 2008 - 12:17 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार