नियती

हरवलेल्या जहाजाचा कप्तान's picture
हरवलेल्या जहाजा... in जे न देखे रवी...
5 Jun 2012 - 1:55 pm

कधी कधी,
सैरभैर, प्रश्नांकित होऊन,
शरिर स्वतःला हरवुन बसतं
गर्दीत लहान मुलासारखं

आणि कधी आपण
मनाला हरवु देतो
कधीकधी वेगळं जगता यावं
म्हणुनसुद्धा....

पण नियती कधीच
हरवुन बसत नाही स्वतःला
ती आंधळ्या डोळ्यांनी
नी बांधलेल्या हाताने
धापा टाकत,
मूकपणे चालत रहाते.

तिच्यात
सापळ्याआड धडधडणारं
असं काहीच नसतं.
कुण्याच्याही स्पर्शाने
उभे रहाणारे किंवा सुटणारे
प्रश्न नसतात.

भंगणारी आकांक्षा,
फाटलेलं ह्र्दय
शोकाचे सुर
पश्चातापाचे निश्वास
जखमा आणि सारं काही
असतं शवपेटीत बंद.

आणि चालताना सोबत असते फक्त
एक न संपणारी शवयात्रा

कविता

प्रतिक्रिया

हरवलेल्या जहाजा... साहेब, कविता उत्तम आहे.
थोडी वेगळया धाटणीची आहे पण कविता नक्कीच उत्तम आहे.

पण नियती कधीच
हरवुन बसत नाही स्वतःला
ती आंधळ्या डोळ्यांनी
नी बांधलेल्या हाताने
धापा टाकत,
मूकपणे चालत रहाते.

ह्या तुमच्या ओ़ळी हल्लीच्या समाजातील चालणार्‍या वाईट गोष्टी बघितल्या तर नियती किंवा दैव तसच चालत असाव अस म्हणावस वाटत.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jun 2012 - 2:14 pm | परिकथेतील राजकुमार

कधी कधी,
टूकार भिकार कविता वाचून
डोकं स्वतःला हरवुन बसतं
जहाजा ऐवजी कप्तान का नाही हरवला असं वाटतं..

धापा टाकत,
मूकपणे चालत रहाते.

आणि

तिच्यात
सापळ्याआड धडधडणारं
असं काहीच नसतं

धापा टाकणे ही क्रियादेखील सापळ्याआड धडधडणारं हृदय अस्तित्वात असल्याचीच इनडायरेक्ट खूण आहे. ती उपमा टाळून जिवंतपणाचा अभाव पूर्ण झाला असता..

..पण रचना आवडली.

हरवलेल्या जहाजाचा कप्तान's picture

5 Jun 2012 - 2:28 pm | हरवलेल्या जहाजा...

होय, बरोबर आहे तुमचं. माझ्या ध्यानात आलं नव्हतं. खुप धन्यवाद

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Jun 2012 - 3:17 pm | बिपिन कार्यकर्ते

ही कविता समजली आणि आवडलीही. छानच. धन्यवाद.