Blood Hymns - 1

हरवलेल्या जहाजाचा कप्तान's picture
हरवलेल्या जहाजा... in जे न देखे रवी...
4 Jun 2012 - 5:06 am

ही माणसं एकत्र का रहातात?
कपल्स म्हणुन?
कुटुंब बनवुन?
शहरं वसवुन?
देश, धर्म??

पावलं घेऊन जेव्हा बाहेर पडलो,
तेव्हा जाणवलं,
जिथे जिथे पोकळी आहे,
तिथे कुंटणखाने निपजलेले
आदिम संस्कृतीला पर्याय म्हणुन?
कुणास ठाऊक पण,
पोकळीला पर्याय नव्हते
संदर्भ नव्हते
तिथे आतमध्ये खुप सोप्पंय
किंचाळू नका श्वास घ्या
धपापु नका हपापुन घ्या
पाऊस पाडा पिकं घ्या
एकबारी, दुबारी..कितीही..
एक स्तन वासनेचा
दुसरा स्तन मायेचा

बाहेर व्यवहार - अर्थहिन
आतले व्यवहार - अर्थपुर्ण?
तशात मोकळी दारं घेऊन
एक नाशवंत बाई
माझ्या पायथ्याशी येते
येळकोट येळकोट
स्तनाग्र दिठी,
स्नायुंची मिठी
मासावरच्या त्वचेसकट
थरारते मांडी

शल्याचे अर्थ खोडत,
मी इंद्रियं उतरवतो.
माझ्या आवंढ्यावर
सोलीव थंड जीभ घेत,
तुझी समग्र सृष्टी
दुभंगुन पडते,
माझ्या शरिरामध्ये....

स्पर्श चैतन्य वाहुन जातात.
मी तुझी इंद्रिय साठवुन ठेवतो.
पुढच्या दुष्काळासाठी.
एकेक कागदी होडी
निर्वासित मांडीसाठी...

कविता

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

4 Jun 2012 - 10:17 am | संजय क्षीरसागर

कोणता साहित्य प्रकार म्हणायचा हा? नक्की कोणत्या त्रासामुळे अशी निर्मिती होते?

नक्की कोणत्या त्रासामुळे अशी निर्मिती होते

निर्मिती नंतर आम्हाला होणार्‍या त्रासाच काय..? :crazy:

नक्की कोणत्या त्रासामुळे अशी निर्मिती होते

निर्मिती नंतर आम्हाला होणार्‍या त्रासाच काय..? :crazy:

हरवलेल्या जहाजाचा कप्तान's picture

4 Jun 2012 - 11:08 am | हरवलेल्या जहाजा...

ही कविता स्वतःच्या माणसापासुन राक्षस बनण्याच्या प्रक्रियेमधला संक्रमणकाळ आहे. कवीला दया, दु:ख समजतं परंतु वासना, त्याचं स्वत्व त्यावर अधिराज्य गाजवतं. शेवटाला स्वतःच्या संपत जाणार्‍या माणुसपणाची आठवण ठेवावी म्हणुन तो त्या नाशवंत बाई(वेश्येबद्दल) मनात निर्माण झालेली दयेची भावना मनात साठवू इच्छितो. दु:ख स्मजावुन घेऊन हेलावुन गेल्यावरही त्याच दु:खाचे कारण बनणे ही मानसिकदृष्ट्या भयंकर अस्वस्थ करनारी गोष्ट!!
हा नक्की कुठला साहीत्यप्रकार? मला माहीत नाही, वा मला त्याची गरज वाटत नाही. व्यक्त होणं मला जास्त महत्वाचं वाटतं. भळभळती वेदना कुठल्याही साच्याचा भाग बनु शकत नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Jun 2012 - 11:23 am | बिपिन कार्यकर्ते

सहसा कलाकारावर आपली कलाकृती समजवून देण्याची वेळ येऊ नये असं म्हणतात, किंवा त्याने / तिने तसं करू नये असंही म्हणतात. मात्र कविता हा प्रकार माझ्यासारख्या अभाग्याला नीटसा समजत नाहीच. विशेषतः अशी रूपकांच्या सहाय्याने बनलेली नवीन पद्धतीची कविता. त्यामुळे तुमच्यासारख्यांनी असा काही क्लू दिल्यास ते थोडेसे सहाय्यक ठरते. समजून घ्यायला दिशा सापडते.

तुमची ही कविता प्रथम वाचली तेव्ह ढ काही कळलं नव्हतं. आता परत प्रयत्न करेन.

तुमचे इथे स्वागत आणि अजून वाचायला उत्सुक आहेच. बाकी इथे नीरक्षीरविवेकबुद्धीने रहालच याची खात्री आहे. ;)

स्वानन्द's picture

5 Jun 2012 - 9:21 am | स्वानन्द

कविता आवडली. पुलेशु.

हरवलेल्या जहाजाचा कप्तान's picture

5 Jun 2012 - 1:56 pm | हरवलेल्या जहाजा...

धन्यवाद स्वानन्द.

हरवलेल्या जहाजाचा कप्तान's picture

4 Jun 2012 - 11:13 am | हरवलेल्या जहाजा...

मी इथे नवीन आहे. मला इथेले नियम वगैरे ठाऊक नाहीत. सुचना केल्यास उत्तम.

मी इथे नवीन आहे.

कोण म्हणतं असं? :p

मला इथेले नियम वगैरे ठाऊक नाहीत.

रुल्स आर मेड टू बी ब्रोकन :p

सुचना केल्यास उत्तम.

संपादक मंडळास संपर्क साधणे ;-)

प्रचेतस's picture

4 Jun 2012 - 11:20 am | प्रचेतस

जुना यकु येतोय वाट्टं परत.

यकु's picture

4 Jun 2012 - 11:22 am | यकु

;-)

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jun 2012 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार

हा अनुवाद वैग्रे आहे का ?

सहसा अशा वाचल्यावरती डॉळ्यातून आणि ऐकल्यावरती कानातून रक्त आणणार्‍या रचना अनुवादीत असतात म्हणून विचारतोय.

संजय क्षीरसागर's picture

4 Jun 2012 - 12:04 pm | संजय क्षीरसागर

लै भारी!

JAGOMOHANPYARE's picture

4 Jun 2012 - 1:00 pm | JAGOMOHANPYARE

हरवलेल्या जहाजाचा कप्तान..

असल्या कविता पाडण्यापेक्षा जहाजाचा शोध का घेत नाहिस?

हरवलेल्या जहाजाचा कप्तान's picture

4 Jun 2012 - 1:16 pm | हरवलेल्या जहाजा...

ही कविता हा शोधच आहे.

ही कविता हा शोधच आहे. >>>

असे आपले वैयक्तीक मत आहे .

हरवलेल्या जहाजाचा कप्तान's picture

4 Jun 2012 - 6:54 pm | हरवलेल्या जहाजा...

माझे लेखन वाचलेच पाहीजे किंवा तुम्ही याला शोध मानुन यात सामील झालेच पाहीजे असे कोणतेही दडपण मी आपणावर टाकलेले नाही.

माझे लेखन वाचलेच पाहीजे किंवा तुम्ही याला शोध मानुन यात सामील झालेच पाहीजे असे कोणतेही दडपण मी आपणावर टाकलेले नाही.

आपण कोण दड्पण टाकणारे.... ? ;)

माझे लेखन वाचलेच पाहीजे किंवा तुम्ही याला शोध मानुन यात सामील झालेच पाहीजे असे कोणतेही दडपण मी आपणावर टाकलेले नाही. >>>

टिका सहन होत नसेल तर , सार्वजनीक संस्थळावर जाहीर रित्या लिहू नये अशी आमची एक जालिम शत्रुपक्षात असलेली मैत्रीण म्हणायची ...असो ...तुम्हाला म्हणुन (स्पष्ट ) सांगतो ....तोरा दाखविण्यासारख लिहाल त्या दिवशी हा वाश्या 'सलाम' ठोकेल तुम्हाला.....पब्लीक बी च्यामायला भयताडच आहे ....उगा डायर्‍या लिहायच्या आणि मिजास दाखवायची लेखकाराव असल्याची ...

>>>आमची एक जालिम शत्रुपक्षात असलेली मैत्रीण म्हणायची

आमची एक
जालिम
शत्रुपक्षात असलेली
मैत्रीण

नक्की काय रे??????
तुमची?
की
जालिम?
की
शत्रु?
की
मैत्रिण?

बाकी कविता आम्हाला होत नसतेत त्यामुळं आमी त्याबद्दल काय बी बोलू शकत न्हाय! :)

संजय क्षीरसागर's picture

4 Jun 2012 - 1:23 pm | संजय क्षीरसागर

>ही कविता स्वतःच्या माणसापासुन राक्षस बनण्याच्या प्रक्रियेमधला संक्रमणकाळ आहे

= काय योगायोग आहे तुम्ही ओकसरांचा "काल भविष्याकडून भूतकालाकडे जात आहे" ही पोस्ट बघाच

>कवीला दया, दु:ख समजतं परंतु वासना, त्याचं स्वत्व त्यावर अधिराज्य गाजवतं

= वासानांच स्वत्व? क्या बात है!

>शेवटाला स्वतःच्या संपत जाणार्‍या माणुसपणाची आठवण ठेवावी म्हणुन तो त्या नाशवंत बाई(वेश्येबद्दल) मनात निर्माण झालेली दयेची भावना मनात साठवू इच्छितो

= तिला हे सांगा बरं का नाही तर तिला वाटायच काय वेड्यासारखं करतोय भवानीच्या टायमाला

>दु:ख स्मजावुन घेऊन हेलावुन गेल्यावरही त्याच दु:खाचे कारण बनणे ही मानसिकदृष्ट्या भयंकर अस्वस्थ करनारी गोष्ट!!

= इंटरवेनशन! इंटरवेनशन!!

>हा नक्की कुठला साहीत्यप्रकार? मला माहीत नाही, वा मला त्याची गरज वाटत नाही

= या वर्षीचं पुलित्झर पारितोषिक नक्की! फुल महाकाव्य येऊ द्या, भाषेची आयमाय करून टाका, कोण म्हणतो मराठीत पॉवर नाही? द्या दाखवून एकेकाला!

>व्यक्त होणं मला जास्त महत्वाचं वाटतं.

= इतरांचा विचार करावा की नाही याबद्दल काय वाटतं? का जाऊं द्या सगळे बाराच्या भावात? (त्या नाशवंत बाईंना मात्र अशा कविता वाचून दाखवू नका, त्या नर्वस झाल्या तर इतरांची खोटी होईल!)

> भळभळती वेदना कुठल्याही साच्याचा भाग बनु शकत नाही.

= यावर मानसोपचार होतो आणि सध्या डायरी हा सर्वोत्तम उपाय आहे!

हरवलेल्या जहाजाचा कप्तान's picture

4 Jun 2012 - 1:23 pm | हरवलेल्या जहाजा...

>इतरांचा विचार करावा की नाही याबद्दल काय वाटतं? का जाऊं द्या सगळे बाराच्या भावात?
= इतरांचा विचार करुन लेखन केलं तर नवं काही देता येईल का?
खरंतर मी शैली आणि आवड याचा विचार करत नाही आणि कुठलाही नवा ट्रेंड बनावा अशीही इच्छा नाहिये. विचार कच्च्या स्वरुपातच कागदावर उतरवायचे आणि ते तसेच प्रकाशित करायचे इतकेच करतोय सध्या.
'काल भविष्याकडून भूतकालाकडे जात आहे' या लेखाची लिंक मिळेल का?

संजय क्षीरसागर's picture

4 Jun 2012 - 1:34 pm | संजय क्षीरसागर

परा घे रे यांना साईडला आणि दोन गोष्टी समजावून सांग जरा, आपल्याला काय जमत नाहीये

ओक काकांचा लेख जनातलं मनातलं मध्ये असेल, तो डिट्टेवार वाचाच.
पण
>>>'काल भविष्याकडून भूतकालाकडे जात आहे'
हे वर -वर मिसलिडींग विधान आहे - भविष्यकालाकडून भूतकालाकडे जात आहे म्हणजे काय मानव समाज पुन्हा अश्मयुगात जाणार आणि ही सगळी चांगली हॉटेलं वगैरे नष्‍ट होऊन त्याला बकर्‍यांची शिकार करावी लागणार काय? भविष्यकालाकडून भूतकालाकडे म्हणजे नंगं राहून बकर्‍यांची शिकार केली जात होती त्या स्थितीपासून नंतर आजवर झालेलं पुन्हा एकदा रिपीट होणार काय?
असं होणार नाही. 'काल'ही संज्ञा सूर्य-पृथ्वीच्या परिवलन परिभ्रमण वगैरे भानगडींमुळे अस्तित्वात आली, मग भूत-भविष्‍य सोडा, 'काल' चक्रीय आहे - इट वील कीप रिव्हॉल्व्हींग फॉर इन्‍फीनिटी. हां या इन्फ‍िनिटीच्या छत्रछायेखाली मधल्या मध्ये पृथ्वीवरच्या जीवांचं त्यांच्या स्वकर्म-स्वधर्मानुसार जे काय व्हायचं ते होईल.
नाहीतर ओक काकांना लोक ते फक्त माणसाचा 'भूतकाळ' सांगतात वगैरे दुगाण्या झाडत असतातच, ते यामुळेच 'काल भविष्याकडून भूतकालाकडे जात आहे' ;-)

आता घ्या मजा

हरवलेल्या जहाजाचा कप्तान's picture

4 Jun 2012 - 6:36 pm | हरवलेल्या जहाजा...

संजयजी, तुमच्या त्या लेखावरच्या प्रतिक्रियेशी सहमत
याच विषयावर मागे एक चर्चा वाचली होती त्यातले काही मुद्दे इथे देतोय.
१) अ‍ॅरिस्टॉटल म्हणतो बदल हा विश्वाचा नियम आहे. बदल आहे म्हणून काळ आहे. विश्वातील प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते. आधीची स्थिति आणि नंतर यात बदल आहे आणि त्या दरम्यान काळ आहे. तो पुढे असे ही म्हणतो की ह्या बदलाचे निरीक्षण करणारा निरीक्षक असेल तोवरच काळ आहे. जेव्हा निरीक्षक नसेल तेव्हा काळाचे प्रयोजनच उरणार नाही. म्हणजे निरीक्षक नष्ट झाल्यावर विश्व आपल्या बदलत्या स्थितीनुसार कोणत्यातरी स्थितीत अस्तीत्वात असेलच असेल, पण निरीक्षक नसल्याने काळाचे प्रयोजन उरणार नाही. काळाची गरज निरीक्षकाला आहे.
२)माणसाला त्याच्या जगण्याची मर्यादा कळाल्यामुळेच काळ ही संकल्पना उदयाला आली. १०० वर्षाची आयुर्मर्यादा नसती आणि माणूस अमर असता तर काळाचे एवढे महत्त्व उरले नसते. अवकाशाला मर्यादा नाही.
३)मग वैस्विक स्तरावर सर्वांसाठी काळाचि अशी एकच व्याख्या करता येत नसली तरि, मानसिक स्तरावर प्रत्येकाची काळाची स्वतःची मोजमापे असतातच. व्यक्तीनिहाय अशा मानसिक काळाची मांडणी, गरज आणि अपेक्षा बदलतच असतात.मानसिक काळाच्या बाहेर येणे एवढे सोपे नाही. तसे करणे म्हणजे केंन्द्र सोडणे. म्हणजे वैयक्तिक अस्तित्व नाकारणेच..माझ्यानंतर सगळे असेल मी नसेन..मग ह्यात महत्त्वाचे कोण? मी की सगळे?
४)काळ हा निरीक्षकसापेक्ष असतो. काळ माहीत पडणे(भूतकालीन गोष्टी) आणि काळाचा अंदाज बांधणे (येणारा भविष्यकाळ बहुदा मृत्यूनंतर) यापेक्षा आपण जन्मल्यापासून मरेपर्यंतचा काळ महत्वाचा कारण तो अमर्यादित असतो. गटे म्हणतो 'every second has an infinite value.' काळाच्या मर्यादेबद्दल आपण केवळ अंदाज बांधू शकतो पण आपण काळाची मर्यादा कधीच अनुभवू शकत नाही. मृत्युनंतर काळ समजून घेणारी आणि आपल्या अस्तित्वाचा विस्तार जोखणारी आपली बुद्धी नष्ट होते. त्यामूळे science च्या दृष्टीने जरी काळाला मर्यादा आली तरी ती मर्यादा काहीकेल्या अनुभवता येणं अशक्य आहे. till death we all are infinite. तरी नसलेल्या मर्यादा आपण मान्य करत आयुष्य जगत रहातो.

हरवलेल्या जहाजाचा कप्तान's picture

4 Jun 2012 - 6:51 pm | हरवलेल्या जहाजा...

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ओकसरांच्या लेखात मानवी संस्कृतीच्या आदिमतेकडे होणार्‍या प्रवासाबद्दल म्हटलंय. परंतु मी इथे स्पष्ट करु इच्छितो की माझ्या प्रस्तुत कवितेचा या विषयाशी संबंध नाही. या 'काळ' विषयावर मी इतर लिखाण केले आहे ते इथे सुद्धा लिहेन सावकाश. थोडक्यात या कवितेत मनात दडलेल्या राक्षसाबद्दल आहे. 'माणुस आदिम होत जाताना राक्षसी, असंस्कृत वागत जाईल की नाही?' हा तसा वादाचा मुद्दा आहे. पण या कवितेत वर्तमान संस्कृतीतही आपल्यापुरते राक्षसी वागणे यबद्दल लिहिले आहे. हे राक्षसीपण भविष्यामध्ये माणसांबरोबर वाट्चाल करेल. फक्त जसजसा माणुस अधिकाधिक सुसंस्कृत होत जाईल तेवढाच तो हे स्वतःचे प्रतिरुप लपवुन ठेवण्याच्या नवनव्या क्लुप्त्या शिकेल.
हाच विषय तुम्हाला विजय तेंडुलकरांच्या 'सखाराम बाइंडर', 'गिधाडे' या नाटकात तसेच अनुराग कश्यपच्या 'पांच' व 'शैतान' या चित्रपटात पहाता येईल.

सदस्य भेटलाय, तस्मात त्याच्या संपर्कात राहा. मला बिभीत्स लेखन अजिबात आवडत नाही.