श्री. चंद्रकांत गोखले यांना विनम्र श्रध्दांजली !!

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जनातलं, मनातलं
20 Jun 2008 - 10:25 am

मराठी चित्रपट/ नाट्यसृष्टीतील जेष्ठ अभिनेते श्री. चंद्रकांत गोखले यांचे आज सकाळी पुणे येथे निधन झाल्याची बातमी आत्ताच वाचली.

या थोर कलाकारास मि.पा. परिवारातर्फे विनम्र श्रध्दांजली !!

समाज

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

20 Jun 2008 - 10:30 am | धमाल मुलगा

अरेरे...

एक जुना-जाणता कलाकार हरपला.
त्यांची वेगळ्या शैलीतली खास संवादफेक आणि शांतशा दिसणार्‍या चेहर्‍यावरचे करारी डोळे ही माझ्या दृष्टीनं त्यांची शक्तिस्थानं !

विनम्र श्रध्दांजली!

यशोधरा's picture

20 Jun 2008 - 10:31 am | यशोधरा

विनम्र श्रध्दांजली

विजुभाऊ's picture

20 Jun 2008 - 10:44 am | विजुभाऊ

अभिनयातील सहजत हा त्यांचा स्थायीभाव. शरीरयष्टी आवाज या पैकी काही नसतानासुद्धा त्यांचा खणखणीत अभिनय...अगदी चित्रपटात / सीरियल मधे सुद्धा
त्यांच्या भुमिका हा अभिनायाचा वस्तुपाठ ठरावा
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

II राजे II's picture

20 Jun 2008 - 10:52 am | II राजे II (not verified)

मला ह्यांचे नाव घेतली की हे गीत आठवते --> "देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा"
विनम्र श्रध्दांजली!

राज जैन
माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

मनस्वी's picture

20 Jun 2008 - 10:53 am | मनस्वी

शेवटचं वळू मध्ये पाहिलं त्यांना.
मागच्या आठवड्यात त्यांचं आत्मचरित्र ओझरतं डोळ्याखालून गेलं.

ह्या गुणी कलाकारास विनम्र श्रद्धांजली.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसुनाना's picture

20 Jun 2008 - 11:28 am | विसुनाना

अभिनय करत आहे असे वाटू नये इतका सहज अभिनय करणारा आणि तरीही प्रत्येक भूमिकेवर आपला ठसा उमटवणारा गुणी कलावंत.
विनम्र श्रद्धांजली.

सुमीत भातखंडे's picture

20 Jun 2008 - 11:46 am | सुमीत भातखंडे

नटसम्राट मध्ये काम केलेल्या ५-६ नटसम्राटांपैकीच तेही एक होते.
मध्यन्तरी सह्याद्रीवर दिलेल्या एका मुलाखतीत याच नाटकातील एक स्वगत त्यानी साभिनय
म्हणून दाखवले.
एकतर या वयात सुद्धा शब्दन शब्द त्याना मुखोद्गत होता.
आणि चेहर्यावरची intensity ही तितकीच जबरा.
जयवन्त दळवी लिखीत "बॅरिस्टर " नाटकात त्यानी केलेली भूमिकाही तितकीच गाजली.
त्यान्ची कुठ्लीच नाटकं पाहण्याचं भाग्य लाभलं नाही.
त्यान्चं आत्मचरित्र मात्र वाचलेलं आहे.
संगीत नाटकात गायक नट म्हणून काम करत असताना त्या अभिनयात त्याना स्वतःलाच जाणवणारी क्रुत्रीमता, आणि त्यामूळेच त्याकाळची टिपीकल अभिनयाची स्टाईल सोडून
जास्तीत जास्त अक्रुत्रीम अभिनय करण्याचा त्यान्चा अट्टाहास ग्रेटच.
या अभिनय सम्राटाला भावपूर्ण श्रद्धान्जली.

केशवसुमार's picture

20 Jun 2008 - 3:39 pm | केशवसुमार

श्री. चंद्रकांत गोखले यांना विनम्र श्रध्दांजली !!
पुरुष नाटकात त्यांचे मास्तरांचे काम पाहिले होते..अकृत्रिम अभिनयाचे अस्सल उदाहरण होते .. त्यात त्यांनी रंगवलेली अगतिकत, हतबल बाप /मास्तर लाजवाब होता..
देव त्यांच्या आत्माला शांती देवो!
(दु:खी)केशवसुमार

चतुरंग's picture

20 Jun 2008 - 5:20 pm | चतुरंग

पुरुष नाटकात नाना पाटेकरच्या, आंगावर येणार्‍या भूमिकेच्या तोडीसतोड मास्तर समोर उभा केला होता तो चंद्रकांत गोखले यांनी.
संयत अभिनयाचे आदर्श उदाहरण.

सिनेमातही कितीही छोटी भूमिका असली तरी ते जाताजाता स्वतःचा वेगळा ठसा उमटवत.
एकेक जुने-जाणते रत्न असे काळाच्या शरण जाऊ लागले की मनात कालवाकालव होते!
चंद्रकांत गोखले ह्यांना विनम्र श्रद्धांजली.

(अवांतर - मागे एकदा कोथरुडला कुठल्याशा हॉटेलात गेलो असता त्यांच्या कुटुंबियांसमवेत ते तिथे आले होते. नेहेमीच्या धोतर, कोट, टोपी वेषातला इतका साधा माणूस की प्रथम ते तेच आहेत ह्यावर विश्वास बसेना. अतिशय नम्र, अकृत्रिम वागणे. ज्या लोकांना ते ओळखू आले ती मंडळी वळून वळून बघत होती पण त्यांच्या वागण्यातला सहजपणा तसाच होता.)

चतुरंग

कावळा's picture

20 Jun 2008 - 3:51 pm | कावळा

वाचून वाईट वाटले.

शेवटचे गणप्या गावडे मध्ये पाहीले होते

विकीपियु's picture

20 Jun 2008 - 5:36 pm | विकीपियु

:( अभिनयाचा दीपस्तभ हरपला.

मराटीतील प्रुथ्वीराज कपुर.... अभिनयाचा पितामह गेला...

विकास शिरपुरकर

वरदा's picture

20 Jun 2008 - 7:27 pm | वरदा

विनम्र श्रद्धांजली!

विकास's picture

20 Jun 2008 - 7:59 pm | विकास

विनम्र श्रद्धांजली!

म.टा. मधे आत्ता वाचल्याप्रमाणे :

एकदा नाना पाटेकर म्हणाले होते की, "ज्याचे वडील चंदकांत गोखले आहेत त्याने उत्तम अभिनय करावा याचे मला आश्चर्य वाटत नाही."
...
' पुरुष ' मधली नायिकेच्या गांधीवादी बापाची त्यांची भूमिकाही सुन्न करून गेली. कलावंत म्हणून गोखले थोर आहेतच , पण त्यांच्या आत एक नितळ माणूस दडलेला आहे. गोखलेंचा फारसा कुणाला ठाऊक नसलेला एक मोठा गुण म्हणजे त्यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा. गेली अनेक वर्षे ते आपल्या मिळकतीतून एक मोठी रक्कम ते सीमेवर लढणा-या जवानांच्या साह्यार्थ देत असतात.

कारगिल युध्दाच्या वेळीही जवानांना त्यांनी गाजावाजा न करता मोठी मदत केली. आयुष्यभर अत्यंत साधेपणाने व नि:स्पृह वृत्तीने राहिलेल्या या माणसापासून सर्वच कलावंतांना खूप काही शिकण्यासारखे आहे...

भाग्यश्री's picture

20 Jun 2008 - 11:11 pm | भाग्यश्री

अरे खूप वाईट झालं!! शेवटी शेवटी त्यांची परिस्थिती खूप हलाखीची होती की काय कोण जाणे!
कोथरूडला माझ्या मैत्रिणीकडे मी जायचे तेव्हा ते एका दुकानासमोर खुर्ची टाकून चहा पीत बसलेले असायचे,आणि समोरची रहदारी बघत बसायचे.... रोज!! त्यांना रोज पाहून पाहून ओळखीचे झाले होते अगदी! हसायचे देखील ओळखीचं.. पण पहील्यंदा त्याना तसं पाहून बसलेला धक्का फार मोठा होता!!

http://bhagyashreee.blogspot.com/

शितल's picture

20 Jun 2008 - 11:43 pm | शितल

माझी ही त्याना आदराजली
खुप गुणी कलाकार असाच उल्लेख करावा लागेल.

भडकमकर मास्तर's picture

21 Jun 2008 - 12:18 am | भडकमकर मास्तर

आमच्या संस्थेने केलेले बॅरिस्टर नाटक पाहायला आले होते ते...
ते पाहताना त्यांच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या असाव्यात... पहिला अंक संपल्यानंतर त्यांना अश्रू आले होते....
नाटक झाल्यानंतर त्यांनी पुष्कळ चांगल्या सूचना केल्या होत्या...
त्यांना माझी श्रद्धांजली....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/