म्हणे "वनसृष्टी" ईश्वराला
केलास तूं दुजा भाव
देवूनी वाचा अन
चाल "जीवसृष्टीला"
हंसला ईश्वर मनांत अपुल्या
म्हणे तो "वनसृष्टीला"
पस्तावलो मी वाटते मला
देऊन ते "जीवसृष्टीला"
एका बिजा पोटी तरुं कोटी
जन्म घेती सुमनें फळें
परी
वाचाळ होवूनी
केली "मानवानें"
सदैव भांडणे
दूर जावूनी विसरला
हा "मानव" अपुली मुळे
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com