काल काही तांबटचे फोटो मिळाले. ह सहसा बाहेर येत नाही व ओरडतांना मानेची फार मस्त हालचाल करतो. तांबट टाके भांड्यावर टाके मारताना ज्या तालात आवाज येतो तसा काहिसा याचा आवाज आहे....
खरे म्हटले तर गेले १०/१५ दिवस मी यांची हालचाल बघत होतो व त्यांच्या मागावर होतो. पण या फोटोच्यावेळी म्हणाल तर मी एक्म्दरीत ३ तास वाया ( ?) घालवले असतील :-)
वाया ( ?) घालवले असे लिहु / म्हणु नका. फोटो असो किंवा हिमलय चढाई असो हौसेला मोल नसतं.
( पिक्सल काहीश्या फाटल्या सारख्या जाणवतात ते वगळता)फोटो क्र. ३ आवड्ला.
आजकाल शहरात तर पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत (कावळे आणि कबुतरंच जास्त दिसतात. पोपट, दयाळ, साळुंखी आणि आता चिमण्यांची पण संख्या रोडावतेय). तुम्हाला हा तांबट कुठे दिसला?
झकास! मी पक्षी प्रेमी नाही, पण ४ वर्षापूर्वी मुंबईच्या उपनगरात रहायला गेल्यावर. पोपट, बुलबुल, दयाळ, साळुंखी आणि खारुताई यांची फार जवळून ओळख झाली. कारण हे सगळे पाहुणे आमच्या खिडकीतून दिसतात. मुंबईत ते दुर्मिळ! शिवाय बर्याच वेळा पहिलंय, कावळे अशा पक्षांना झाडावरून हुसकून लावताना. (चु.भु.द्या.घ्या.) कावळा आणि कबुतर मात्र माणसांना फारशी घाबरत नाहीत, कावळा थेट हातातून चपातीचा तुकडा पण घेऊन जातो. दुधाच्या साईसाठी तर कावळे फार झोंबाझोंबी करतात. खिडकीत ठेवलेले तांदुळ टिपताना, चिऊताई आपापसातच जास्त भांडतात असं वाटतं. (खिडकीत येणार्या-दिसणार्या पक्षांच्या निरिक्षणावरून केलेले अनुमान)
तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात (अगदी टाटा बिर्ला पेक्षाही). तुमचा "मैत्र!" लेख आवडला! पुण्यात राहता का तुम्ही? कदाचित, म्हणून तुमचा परिसर पक्षीसमृद्ध असावा?
अजून काही.... 24 May 2012 - 10:07 am | जयंत कुलकर्णी
स्वाक्षरी-अंकित चित्रे जशी वज्रचुडेमंडित सौभाग्यवतीची आठवण करून देतात,
तशी ही अप्रक्रियित प्रकाशचित्रे रानात फिरणार्या निरागस अवखळ लंकेच्या पार्वतीची आठवण करून देतात.
तरीही मुग्ध प्रफुल्लित अप्रक्रियित प्रकाशचित्रांवर मन का जडते ते समजत नाही !
सारीच प्रकाशचित्रे सुंदर असली. तरी ही अधिक भावली, हे सांगण्याकरताच हा प्रतिसाद देत आहे!
आहाहा
फटू छान आहेत.
चतुर चा फोटो पाहुन लहानपणी च्या खेळाची आठ्वण झाली.
हात मारुन गवतात फिरणारे चतुर आणी चतुर वर्गातिल सुई हा जीव पकडायचा आणी त्याच्या पायाला सुत बांधुन सोडुन द्यायचे.पण ते गवतात फिरत असताना त्यांच्या मागे मागे दबकत दबकत जाउन पकड्ण्यात वेगळीच मजा होती. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
प्रतिक्रिया
22 May 2012 - 4:21 pm | संजय क्षीरसागर
फोटो आवडले!
22 May 2012 - 4:44 pm | अत्रुप्त आत्मा
मस्त :-)
22 May 2012 - 5:01 pm | विजय_आंग्रे
अरे व्वा मिशीवाला पक्षी, छान आहेत सर्व प्रकाशचित्रे..! :smile:
22 May 2012 - 5:58 pm | पिंगू
भारीच आहे तांबट.. बाकी हे फोटो काढायला किती प्रतिक्षा केली हो काका तुम्ही?
- पिंगू
22 May 2012 - 7:25 pm | जयंत कुलकर्णी
खरे म्हटले तर गेले १०/१५ दिवस मी यांची हालचाल बघत होतो व त्यांच्या मागावर होतो. पण या फोटोच्यावेळी म्हणाल तर मी एक्म्दरीत ३ तास वाया ( ?) घालवले असतील :-)
22 May 2012 - 7:38 pm | jaypal
वाया ( ?) घालवले असे लिहु / म्हणु नका. फोटो असो किंवा हिमलय चढाई असो हौसेला मोल नसतं.
( पिक्सल काहीश्या फाटल्या सारख्या जाणवतात ते वगळता)फोटो क्र. ३ आवड्ला.
22 May 2012 - 6:07 pm | प्रचेतस
छानच. :)
22 May 2012 - 7:18 pm | स्वानन्द
मस्त.
अवांतरः ये चतुर यहा क्या कर रही है?
23 May 2012 - 11:25 pm | सुधीर
आजकाल शहरात तर पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत (कावळे आणि कबुतरंच जास्त दिसतात. पोपट, दयाळ, साळुंखी आणि आता चिमण्यांची पण संख्या रोडावतेय). तुम्हाला हा तांबट कुठे दिसला?
24 May 2012 - 9:38 am | जयंत कुलकर्णी
आम्ही नशीबवान आहोत दुसरे काय !
हे वाचा...
24 May 2012 - 11:07 am | सुधीर
झकास! मी पक्षी प्रेमी नाही, पण ४ वर्षापूर्वी मुंबईच्या उपनगरात रहायला गेल्यावर. पोपट, बुलबुल, दयाळ, साळुंखी आणि खारुताई यांची फार जवळून ओळख झाली. कारण हे सगळे पाहुणे आमच्या खिडकीतून दिसतात. मुंबईत ते दुर्मिळ! शिवाय बर्याच वेळा पहिलंय, कावळे अशा पक्षांना झाडावरून हुसकून लावताना. (चु.भु.द्या.घ्या.) कावळा आणि कबुतर मात्र माणसांना फारशी घाबरत नाहीत, कावळा थेट हातातून चपातीचा तुकडा पण घेऊन जातो. दुधाच्या साईसाठी तर कावळे फार झोंबाझोंबी करतात. खिडकीत ठेवलेले तांदुळ टिपताना, चिऊताई आपापसातच जास्त भांडतात असं वाटतं. (खिडकीत येणार्या-दिसणार्या पक्षांच्या निरिक्षणावरून केलेले अनुमान)
तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात (अगदी टाटा बिर्ला पेक्षाही). तुमचा "मैत्र!" लेख आवडला! पुण्यात राहता का तुम्ही? कदाचित, म्हणून तुमचा परिसर पक्षीसमृद्ध असावा?
24 May 2012 - 10:07 am | जयंत कुलकर्णी
अजून काही....

24 May 2012 - 10:30 am | स्वानन्द
पहिली चिमणी हे कळलं. बाकीचे पक्षी बागेत बर्याचदा दिसतात. पण त्यांचे नाव नाही माहीत
24 May 2012 - 10:50 am | जयंत कुलकर्णी
चिमणी
ब्राह्मणी मैना
टीट
दयाळ
27 May 2012 - 10:23 am | नरेंद्र गोळे
स्वाक्षरी-अंकित चित्रे जशी वज्रचुडेमंडित सौभाग्यवतीची आठवण करून देतात,
तशी ही अप्रक्रियित प्रकाशचित्रे रानात फिरणार्या निरागस अवखळ लंकेच्या पार्वतीची आठवण करून देतात.
तरीही मुग्ध प्रफुल्लित अप्रक्रियित प्रकाशचित्रांवर मन का जडते ते समजत नाही !
सारीच प्रकाशचित्रे सुंदर असली. तरी ही अधिक भावली, हे सांगण्याकरताच हा प्रतिसाद देत आहे!
24 May 2012 - 10:09 am | मदनबाण
सुंदर आहेत सर्व फोटो... :)
(पाखरु निरिक्षक) ;)
24 May 2012 - 10:28 am | जागु
वा सगळे फोटो खुप सुंदर आहेत. तांबट फोटो द्यायला थांबला हे नशीब. मी एक दोन वेळा प्रयत्न केला पण फोटो काढण्या आधीच साहेब पळतात.
24 May 2012 - 11:08 am | ऋषिकेश
तांबट वड, उंबर अश्या छोटी उग्र फळे असणार्या झाडांवर हमखास आढळतात. अगदी मुंबईतही!
फोटो छान आला आहे
24 May 2012 - 1:26 pm | कान्होबा
आहाहा
फटू छान आहेत.
चतुर चा फोटो पाहुन लहानपणी च्या खेळाची आठ्वण झाली.
हात मारुन गवतात फिरणारे चतुर आणी चतुर वर्गातिल सुई हा जीव पकडायचा आणी त्याच्या पायाला सुत बांधुन सोडुन द्यायचे.पण ते गवतात फिरत असताना त्यांच्या मागे मागे दबकत दबकत जाउन पकड्ण्यात वेगळीच मजा होती. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
24 May 2012 - 3:09 pm | जागु
हे आमच्याकडचे पक्षी

नाव सांगायला नको.
हळद्या.

पाणकोंबडी

दयाळ

खंड्या

अजुन बरेच आहेत. सावकाश टाकेन.
24 May 2012 - 3:30 pm | मोहनराव
मस्त आहेत फोटु..
24 May 2012 - 3:39 pm | जयंत कुलकर्णी
मला एक हळद्याचा फोटो काधायचा आहे.... बघूया केव्हा जमते आहे ते.
फोटो छान !
24 May 2012 - 10:26 pm | शैलेन्द्र
हळद्या म्हणजे युरेशियन ओरीओल का?