टाकावुतून टिकावू ----

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in कलादालन
8 May 2012 - 2:35 pm

माझ्या मुलीच्या जुन्या स्कर्टचे तयार केलेले पिलो कव्हर व लोड कव्हर ..

हे पहा -

p1

p2

राहणी

प्रतिक्रिया

नाना चेंगट's picture

8 May 2012 - 3:58 pm | नाना चेंगट

पुढचा धागा त्या पिलो कव्हरचे पडदे
त्या पुढचा धागा त्या पडद्यांचे हातपुसणे
त्या पुढचा धागा त्या हातपुसण्यांचे पायपुसणे
त्या पुढचा...

कुंदन's picture

8 May 2012 - 6:42 pm | कुंदन

नान्या , तुझ्या बोटाला काही हाड ?
परत हिमालयात जायचेय जा तुला ?

मोदक's picture

9 May 2012 - 1:25 am | मोदक

__/\__ :-D

चटोरी वैशू's picture

8 May 2012 - 4:04 pm | चटोरी वैशू

कल्पना मस्त आहे... करायला काहि हरकत नाही...

सानिकास्वप्निल's picture

8 May 2012 - 5:14 pm | सानिकास्वप्निल

छान कल्पना
आवडले ताई :)

पैसा's picture

8 May 2012 - 6:37 pm | पैसा

असे कितीतरी कपडे न वापरलेले घरात पडलेले असतात. त्यांचा वापर होतो आणि स्वत: काहीतरी केल्याचं समाधान.

Pearl's picture

8 May 2012 - 6:57 pm | Pearl

कल्पना मस्त आहे.
खरं तर असा स्वतंत्र धागाच निघायला पाहिजे ;-) कितीतरी नवीन कल्पना समोर येतील.
अवांतर होणार नसेल तर याच धाग्यावर इतरांनी 'टाकावुतून टिकावू' केलेल्या गोष्टी शेअर केल्या तर चालेल का?/ना? निवेदिता ताई :-)

बाकी तू छान शिवले आहेस पिलो कव्हर्स. मस्त.

रेवती's picture

8 May 2012 - 7:32 pm | रेवती

छान दिसतायत.

निवेदिता-ताई's picture

8 May 2012 - 9:49 pm | निवेदिता-ताई

याच धाग्यावर इतरांनी 'टाकावुतून टिकावू' केलेल्या गोष्टी शेअर केल्या तर चालेल का?/ना? निवेदिता ताई >>>>>>
न चालायला काय झाले...पळेल....

सॉरी निवेदिता ताई. मी सध्या एक टिकाऊ गोष्ट केलिये पण त्याचे फोटू देऊ शकत नाही.
लाडवाचा पाक जरा जास्त घट्ट झाल्याने लाडू पाचेक दिवसात खराब होऊन टाकाऊ होण्याऐवजी जरा टिकाऊ झालेत.;) शिवाय खाण्यास जरा वेळ लागतो, लाडू हातात जास्तवेळ टिकतो त्याअर्थीही ते टिकाऊ झालेत.

निवेदिता-ताई's picture

9 May 2012 - 7:11 am | निवेदिता-ताई

हातोडा देवू का????.......... ;)

तरीच रंगाशेट आडकित्याने लाडु कातरताना दिसले काल स्वप्नात. ;)

हॅ हॅ..

पत्नी आपल्या पतीला "कतरी लाडू की तुकडा लाडू देऊ?" असं विचारते आहे असं दृष्य डोळ्यासमोर आलं..

प्रास's picture

10 May 2012 - 8:22 pm | प्रास

हॅ हॅ हॅ! लई भारी गवि....!

फक्त 'पती आपल्या पत्नीला विचारतोय' असा बदल करावा म्हणतो.... ;-)

रेवती's picture

10 May 2012 - 8:32 pm | रेवती

हा हा हा. समजले हो.

डॉ. आणि गवी.. दोघेही कहर आहात.. :-D

रेवती's picture

10 May 2012 - 8:14 pm | रेवती

आडकित्त्याने?
हा हा हा.

मदनबाण's picture

8 May 2012 - 9:55 pm | मदनबाण

मस्त... :)

खूपच छान दिसत आहे.. बाकी माझे सदरे इतके रंगीबेरंगी नसल्याने माझे कपडे बोहारणीलाच दिले जातात.. ;)

- पिंगू

निवेदिता-ताई's picture

11 May 2012 - 8:44 am | निवेदिता-ताई

आणी सदर्याचे एवढे कापडही जास्त नसते....बरय बोहारणीलाच दिले जातात.

एखादी वस्तू तरी येते त्यामुळे.. ;)

जयवी's picture

9 May 2012 - 2:24 pm | जयवी

खूपच मस्त दिसताहेत :)