आनंदास मुकतो मतलबी दुष्ट चेहर्‍यांच ऐकुन.

निश's picture
निश in जे न देखे रवी...
8 May 2012 - 2:33 pm

कळायलाच हव्या काही गोष्टी
पण त्या कधी कळतच नाहीत.
कळल्या अस वाटतानाच ,
खरच त्या कधीही उलगडतच नाहीत.

खुप पैसा कमावुनही अजुन अजुन पाहीजे हा हव्यास का केला जाई ?
टाळुवरच लोणी ओरबाडायची इथे ज्याला त्याला सतत घाई.

बहुतेक खरा आंनदही विकत असावा बाजाभावात.
म्हणुनच टाळुवरच लोणी खाउनही आनंदापेक्षा
दु:खी चेहरेच दिसतात प्रत्येक शहर व गावा गावात.

खरा आनंद असतो मनाच्या उदारतेवर टिकुन
दुसर्‍यांच्या आनंदात स्वताचा आनंद मानुन.
पण आपण आनंदास बसतो घालवुन
अवती भोवतीच्या मतलबी दुष्ट चेहर्‍यांच ऐकुन.

आनंदास मुकतो मतलबी दुष्ट चेहर्‍यांच ऐकुन.

कविता

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 May 2012 - 5:40 pm | मुक्त विहारि

विशेषतः

"टाळुवरच लोणी ओरबाडायची इथे ज्याला त्याला सतत घाई."

हे फारच भावले..

मुक्त विहारि साहेब, तुमचे मनापासुन आभार

स्पा's picture

9 May 2012 - 3:16 pm | स्पा

निश साहेब.. तुमचा अजून एक मास्टरपीस...
खूपच सुंदर
स्पिचलेस

धन्यवाद

चौकटराजा's picture

9 May 2012 - 3:19 pm | चौकटराजा

द मोर यु आर रिच द मोर यू आर ग्रीडी !

>>आनंदास मुकतो मतलबी दुष्ट चेहर्‍यांच ऐकुन
-- कोण हे लोक? हा मन्या तर नाही ना? याचा चेहेरा दुष्‍ट आहे, पण हा मतलबी नाही. हा जर असला हाणतोच बघा ह्याला तिथं येऊन.
बिलकुल कुणाचं काही ऐकू नका आणि आनंद घ्‍या.
तुम्ही आपले सारखे सारखे सगळ्यांना साहेब म्हणत रहाता मग सगळं फसतं.

मन्या फेणे साहेब, चौकट राजा साहेब व यकु साहेब तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार.

यकु साहेब, अहो इथे तुम्हि, मन्या फेणे साहेब, चौकट राजा साहेब व सगळे सभासद मिपावरचे हे सगळे अतिशय चांगले व मनाने अतिशय दिलदार लोक आहात. ज्याला परीस म्हणतो ज्याच्या सहवासात आल्यावर लोखंडाचही सोन होत. ते परी स तुम्हि सगळे आहात.

साहेब खर तर म्हणण्या मागच कारण की प्रत्येक जण हा कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात पारंगत असतो. त्याच काम व त्याच knowledge हे त्या त्या क्षेत्रात अतिशय अफाट असत. म्हणजे एकप्रकारे ते त्यांच्या क्षेत्रात साहेबच असतात म्हणुन साहेब म्हणतो मी सगळ्याना. साहेब ह्या शब्ब्दातुन मला त्यांच्या knowledge ला सलाम करायच असत. म्हणुन साहेब म्हणतो मी.

चौकटराजा's picture

9 May 2012 - 4:11 pm | चौकटराजा

निशा लेका, लोकांच्या पार लक्षात येईल एवढा मान ठेवू नको. सगळयांचेच पाय मातीचे आहेत रे !
आपला मातीचे पाय असलेला ( परिसाचे नव्हे) चौ रा
अवांतर - आमचे वैशिष्टय असेल तर एवढेच की आमच्या पायाची माती आम्ही दुसर्‍याच्या अंगाला फासत नाही. वयाने लहान असला तरी लायकीने मोठा असेल तर त्याच्या पायाची माती आमच्या माथी लावतो.

चौकटराजा साहेब, मातीतुनच तर सोन व परीसही जन्माला येत.

मातीचे पाय असण हे तर खर तर विद्वान असल्याच लक्षण आहे.

कदाचित माती तुनच माता हा शब्ब्द आला असावा कारण माती व माता ह्या दोहोंचेही काम एकच जन्म देणे व संगोपन करणे.

हल्ली च्या दिवसात जेव्हा मुल व तरुण हे चुकीच्या गोष्टींच अंधानुकरण करत असताना माझ्या सारख्याने विद्वान माणसाना मान देण हेच उचित आहे.

>>> वयाने लहान असला तरी लायकीने मोठा असेल तर त्याच्या पायाची माती आमच्या माथी लावतो.
---- समस्त लायक लोकांनी चौरांकडे पायधूळ पॅक करुन पाठविण्याचे करावे.

(नालायक ) यक्कू ;-)

निश साहेब हा केवळ तुमचा मोठे पणा झाला

यकु's picture

9 May 2012 - 4:35 pm | यकु

मोठेपणा आणि अतिशय ;-) भोळेपणा.

मन्या फेणे साहेब, माझा मोठे पणा आहे की नाही मला माहीत नाही पण वजनाने मी नक्कीच मोठा आहे हे मला माहीत आहे .

१०५ किलो वजनाचा बेबी एलिफंट मी नक्कीच आहे. हा हा हा.

कवितानागेश's picture

10 May 2012 - 2:00 pm | कवितानागेश

ड्वाले पानावले!!
'श्यामची आई' वगरै शिणेमे बघत असल्याचा भास झाला.
असो. मी काही फार वेळ भासात मग्न रहाणार नाही! :)

बाकी '१०५ किलो वजनाचा बेबी एलिफंट मी नक्कीच आहे.' ही लाईट्वेट मन्याला धमकी आहे का? ;)

लीमाउजेट जी,नाही हो ही धमकी नाहीं.
आणि तुम्हाला साने गुरुजींच साहित्य वाचायच असेल तर saneguruhi.net ह्या साईट वर वाचता येईल.
कदाचित आजच्या भरकटणार्‍या जगाला योग्य दिशा दाखवण्या साठी श्यामच्या आईची च जास्त गरज असावी.
तुम्हालाही तसच वाटत का लीमा उजेट madam.

भरकटणार्‍या जगाला योग्य दिशा दाखवण्यासाठी किंवा कसे यावर मला मत देता येत नाहीये. पण श्यामची आई हे नितांतसुंदर पुस्तक आहे. त्यातला काळ कालबाह्य झाला तरीही त्या काळाच्या संदर्भात किंवा संदर्भ न घेताही अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. कोणत्याही आईबापांनी आजही एक प्रत आपल्या पोरासाठी घ्यावीच. मध्यंतरी कोणत्यातरी संमेलन किंवा प्रदर्शनात सर्वात जास्त विक्री झालेलं पुस्तक श्यामची आई आहे असं वाचलं आणि खरोखर मनातून बरं वाटलं.

हे सर्व मी लहानपणापासून श्यामच्या आईची पारायणे करुन म्हणतो आहे. ऐकीव मतांवर किंवा त्याच्या सर्वत्र वर्णिल्या जाणार्‍या गोड गुणगानावरुन नव्हे.

गवि साहेब, अतिशय योग्य बोललात.

श्यामची आई हे अतिशय नितांत सुंदर पुस्तक आहे. मी पण त्याची पारायण केली आहेत. आजही श्यामची आई पुस्तक संच माझ्या घरी आहे.

प्रचेतस's picture

10 May 2012 - 3:51 pm | प्रचेतस

आजही श्यामची आई पुस्तक संच माझ्या घरी आहे.

ते एकच पुस्तक आहे निश भाऊ.

तुला साने गुरुजींचा पुस्तक संच असे म्हणायचे आहे काय?

वल्ली साहेब, श्यामची आई पुस्तक संच च म्हणायच आहे मला.

माझ्या कडे आहे ती ए़कुण ३ पुस्तक रुपात आहेत म्हणुन पुस्तक संच म्हटल मी.

प्रचेतस's picture

10 May 2012 - 3:57 pm | प्रचेतस

ओक्के.