महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा

नाना चेंगट's picture
नाना चेंगट in काथ्याकूट
1 May 2012 - 12:44 pm
गाभा: 

राम राम

सर्वांना १ मे महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा !! :)

सर्व काही ठीक चालू आहे ना मंडळी?

प्रतिक्रिया

कुंदन's picture

1 May 2012 - 12:48 pm | कुंदन

नान्या, आलास हिमालयातुन परत....

परिकथेतील राजकुमार's picture

1 May 2012 - 12:55 pm | परिकथेतील राजकुमार

डार्लिग इज बॅक !

आय लव्ह यू.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 May 2012 - 1:14 pm | बिपिन कार्यकर्ते

संपूर्ण सहमत!

(पण हा नक्की नान्याच आहे का? की तोतया?) :(

परिकथेतील राजकुमार's picture

1 May 2012 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार

हा आपला भिकारचोट नान्याच आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 May 2012 - 1:17 pm | बिपिन कार्यकर्ते

कशावरून?

परिकथेतील राजकुमार's picture

1 May 2012 - 1:22 pm | परिकथेतील राजकुमार

आजकाल मिपावर येवढे घाबरत घाबरत आणि वरण भात लिंबू लिखाण करणारे दुसरे कोण आहे?

बिपिन कार्यकर्ते's picture

1 May 2012 - 1:26 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

पिवळा डांबिस's picture

3 May 2012 - 12:21 am | पिवळा डांबिस

आजकाल मिपावर येवढे घाबरत घाबरत आणि वरण भात लिंबू लिखाण करणारे दुसरे कोण आहे?
याला म्हणतात 'घरचा अहेर'!!!
:)
बाकी परत आलास नाना? बरं केलंस!!
तुला मिस केलं आम्ही!!

आणि हो!
सर्व मिपाकरांना महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा!!!

विनायक प्रभू's picture

1 May 2012 - 2:25 pm | विनायक प्रभू

१+ प.रा.
(वरण भात लिंबू ही फ्कत सुरुवात आहे)
ह्याला काय ओळखत नाय काय?
इट्स ओन्ली मॅटर ऑफ टाइम.

नानासाहेब हे पूर्वीचे ‍अवलिया आहेत काय?

महाराष्ट्र दिनानिमित्त त्या १०६ हुतात्म्यांना विनम्र अभिवादन...१०६ हुतातम्यांची नावे माहित असल्यास इत्थे उधृत करावीत ही नम्र विनंती..

अँग्री बर्ड's picture

1 May 2012 - 1:38 pm | अँग्री बर्ड

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे

१] सिताराम बनाजी पवार २] जोसेफ डेव्हिड पेजारकर ३] चिमणलाल डी. शेठ ४] भास्कर नारायण कामतेकर ५] रामचंद्र सेवाराम ६] शंकर खोटे ७] धर्माजी गंगाराम नागवेकर ८] रामचंद्र लक्ष्मण जाधव ९] के. जे. झेवियर १०] पी. एस. जॉन ११] शरद जी. वाणी १२] वेदीसिंग १३] रामचंद्र भाटीया १४] गंगाराम गुणाजी १५] गजानन ऊर्फ बंडू गोखले १६] निवृत्ती विठोबा मोरे
१७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर १८] बालप्पा मुतण्णा कामाठी १९] धोंडू लक्ष्मण पारडूले २०] भाऊ सखाराम कदम २१] यशवंत बाबाजी भगत २२] गोविंद बाबूराव जोगल २३] पांडूरंग धोंडू धाडवे २४] गोपाळ चिमाजी कोरडे २५] पांडूरंग बाबाजी जाधव २६] बाबू हरी दाते २७] अनुप माहावीर २८] विनायक पांचाळ २९] सिताराम गणपत म्हादे ३०] सुभाष भिवा बोरकर
३१] गणपत रामा तानकर ३२] सिताराम गयादीन ३३] गोरखनाथ रावजी जगताप ३४] महमद अली ३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे ३६] देवाजी सखाराम पाटील ३७] शामलाल जेठानंद
३८] सदाशिव महादेव भोसले ३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे ४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर ४१] भिकाजी बाबू बांबरकर ४२] सखाराम श्रीपत ढमाले ४३] नरेंद्र नारायण प्रधान ४४] शंकर गोपाल कुष्टे
४५] दत्ताराम कृष्णा सावंत ४६] बबन बापू भरगुडे ४७] विष्णू सखाराम बने ४८] सिताराम धोंडू राडये ४९] तुकाराम धोंडू शिंदे ५०] विठ्ठल गंगाराम मोरे ५१] रामा लखन विंदा ५२] एडवीन आमब्रोझ साळवी ५३] बाबा महादू सावंत ५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर ५५] विठ्ठल दौलत साळुंखे ५६] रामनाथ पांडूरंग अमृते ५७] परशुराम अंबाजी देसाई ५८] घनश्याम बाबू कोलार
५९] धोंडू रामकृष्ण सुतार ६०] मुनीमजी बलदेव पांडे ६१] मारुती विठोबा म्हस्के ६२] भाऊ कोंडीबा भास्कर ६३] धोंडो राघो पुजारी ६४] ह्रुदयसिंग दारजेसिंग ६५] पांडू माहादू अवरीरकर ६६] शंकर विठोबा राणे ६७] विजयकुमार सदाशिव भडेकर ६८] कृष्णाजी गणू शिंदे ६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले ७०] धोंडू भागू जाधव ७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे ७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर
७३] करपैया किरमल देवेंद्र ७४] चुलाराम मुंबराज ७५] बालमोहन ७६] अनंता ७७] गंगाराम विष्णू गुरव ७८] रत्नु गोंदिवरे ७९] सय्यद कासम ८०] भिकाजी दाजी ८१] अनंत गोलतकर ८२] किसन वीरकर ८३] सुखलाल रामलाल बंसकर ८४] पांडूरंग विष्णू वाळके ८५] फुलवरी मगरु ८६] गुलाब कृष्णा खवळे ८७] बाबूराव देवदास पाटील ८८] लक्ष्मण नरहरी थोरात ८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
९०] गणपत रामा भुते ९१] मुनशी वझीऱअली ९२] दौलतराम मथुरादास ९३] विठ्ठल नारायण चव्हाण ९४] देवजी शिवन राठोड ९५] रावजीभाई डोसाभाई पटेल ९६] होरमसजी करसेटजी ९७] गिरधर हेमचंद लोहार ९८] सत्तू खंडू वाईकर ९९] गणपत श्रीधर जोशी १००] माधव राजाराम तुरे(बेलदार) १०१] मारुती बेन्नाळकर १०२] मधूकर बापू बांदेकर १०३] लक्ष्मण गोविंद गावडे १०४] महादेव बारीगडी १०५] कमलाबाई मोहिते १०६] सिताराम दुलाजी घाडीगांवकर

अवांतर : ( आज मिपावर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा हिरव्या रंगात दिल्यात बरे. )

अव्यक्त's picture

1 May 2012 - 1:46 pm | अव्यक्त

आपल्या उत्कट आणि तात्काळ प्रतिसादाबद्दल ऋणी आहे...आपल्यामुळे माझ्यासारख्या असंख्य मी पा वाचकांना आजच्या सुदिनी ह्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण घडले तरी आजचा दिस सार्थकी लागेल...१०६ हुतात्म्यांना सद्गती व मोक्ष लाभो हीच ईशचरणी विनंती...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 May 2012 - 2:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मुंबईत हुतात्मा चौकात (ज्याला मुंबईकर अत्यंत निर्लज्जपणे फ्लोरा फौंटन म्हणतात ना, तो चौक) ही सर्व नावे कोरून ठेवली आहेत. तिथे कधी गेलो की एकदा ती वाचून येतो..

सहज's picture

1 May 2012 - 2:34 pm | सहज

१८६० पासुन तो भाग फ्लोरा फाउंटन म्हणुन ओळखला जातो, १९६० पासुन हुतात्मा चौक. फोटोत दोन्ही दिसत आहेत. नावावरुन भांडणारी इतर लोक व शहरे असताना जाउ द्या ना मुंबईकरांना प्रगती करु दे.. ;-)

म्हाराष्ट्र डेच्या बरोबरच सर्व मजुरांनाही आजच्या स्पेश्शल डेच्या शुभेच्छा.
(हमाल) गणा.

अमोल केळकर's picture

1 May 2012 - 2:50 pm | अमोल केळकर

त्याच बरोबर ज्या राज्याचा विकास बघायला आमचे मराठी नेते वारंवार तिथे जाताता त्या ' गुजरात राज्याला ' गुजरात दिनाच्या ' शुभेच्छा :)

अमोल केळकर

पैसा's picture

1 May 2012 - 2:35 pm | पैसा

सर्वाना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
१०६ हुतात्म्यांची आठवण काढल्याबद्दल अव्यक्त आणि रोहित याना धन्यवाद.
कामगार दिनाच्या सर्व कामगाराना शुभेच्छा!

महाराष्ट्र दिनाच्या मन्गलमय शुभेच्छा! :)

कवितानागेश's picture

3 May 2012 - 12:39 pm | कवितानागेश

शुभेच्छांबद्दल धन्यवाद! ;)