खरच मी लढणार...

निश's picture
निश in जे न देखे रवी...
26 Apr 2012 - 4:09 pm

खरच मी लढणार
माणसातल्या राक्षसाला माणुसकी शिकवणार .

खरच मी लढणार..

सत्तेतल्या गुंडाबरोबर.
आया बहीणींवर अत्याचार करणार्‍या जनावरांबरोबर.

जनतेचे सेवक असताना त्यांचेच भक्षक होऊन
रक्तपिपासु गिधाड झालेल्या नोकरशहांबरोबर.

रुग्ण बरा होण्या ऐवजी
त्याच्या कडुन पैसे लुटणार्‍या डॉक्टररुपी दरवडेखोरांबरोबर.

भर रस्त्यात एका निरपराध मुलीवर वासनांध प्रेमापोटी चाकुचे वार करणार्‍या नराधमाबरोबर
आणि त्या मुलीच्या वाचवा वाचवा अश्या किंकाळ्या ऐकुनही मदतीस न जाणार्‍या षंढ समाजाबरोबर .

संपाच्या नावावर जनतेस वेठीस धरणार्‍या
कामगार संघटनेंच्या नेत्यांबरोबर.

प्रवाश्यांच्या आगतिकतेचा फायदा उचलुन
भरमसाठ भाडे आकारणार्‍या रिक्षा वाल्यांबरोबर

स्वताच्या भारत मातेच रक्षण करण्या ऐवजी
लाचरुपी हत्याराने तिला पोखरणार्‍या हुकुमशहांबरोबर

खरच मी लढ लढ लढणार
लढताना मरण तर राहुद्याच पण जिंकुनच येणार.

माणसातल्या राक्षसाला नक्कीच माणुसकी शिकवणार
त्याला माणसातला देव बनवणार
त्याला माणसातला देव बनवणार .

कविता

प्रतिक्रिया

सुंदर कविता निश..
तुमच्या कविता खरच वाचनीय असतात

प्रचेतस's picture

26 Apr 2012 - 4:21 pm | प्रचेतस

असेच म्हणतो.
ज्वलंत सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणार्‍या तुमच्या कविता खरेच स्पृहणीय आहेत.

मुक्त विहारि's picture

26 Apr 2012 - 4:22 pm | मुक्त विहारि

सगळी कविताच उत्तम, पण सगळ्यात जास्त मनाला भिडले ते...

"रुग्ण बरा होण्या ऐवजी त्याच्या कडुन पैसे लुटणार्‍या डॉक्टररुपी दरवडेखोरांबरोबर"

कारण आजच बातमी वाचली की, पैसे नाहित म्हणून, एका गर्भवती अपघातग्रस्त बाईवर उपचार केले नाहित...

(मूळ लिंक ....http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12878778.cms)

निश's picture

26 Apr 2012 - 5:54 pm | निश

मन्या फेणे साहेब, वल्ली साहेब, मुक्त विहारि साहेब
तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार.

चौकटराजा's picture

26 Apr 2012 - 6:27 pm | चौकटराजा

निशा ,कवितेत खिन्न करीत भन्नाट सुटलाहेस वादळासारखा. भौ, दुदैव असे माणूस दिवसेंदिवस सुधारत चालला आहे का बिघडत ? रक्तरंजित
लढाया संपल्या अन प्रॉक्सी वॉर चालू झाली. दु: शासन पुन्हा पुन्हा जन्म घेताहेत वेगवेगळी रूपे घेऊन !

चौकटराजा साहेब, तुमचा प्रतिसाद अप्रतिम आहे.

दु: शासन पुन्हा पुन्हा जन्म घेताहेत वेगवेगळी रूपे घेऊन

हे तुमच वाक्य जबरदस्त. मेंदुतिल विचार प्रक्रियेवर दणदणित आघात करणार आहे.

मला जे कवितेत सांगायच होत ते तुम्ही ह्या एका वाक्यात सांगितले आहात.

माका तुमका नमस्कार करुचो आसा.
माझो नमस्कार तुम्ही वाइ़ज गोड मानुन घ्यावा, चौकटराजा साहेबानु.

चित्रगुप्त's picture

26 Apr 2012 - 7:08 pm | चित्रगुप्त

छान कविता, आणि तुमच्या लढाईसाठी शुभकामना.

अमितसांगली's picture

28 Apr 2012 - 9:12 am | अमितसांगली

माणसातल्या राक्षसाला नक्कीच माणुसकी शिकवणार
त्याला माणसातला देव बनवणार........निशब्द