बाग - गझल!

suralesandip's picture
suralesandip in जे न देखे रवी...
17 Jun 2008 - 12:17 am

फ़ूलही कसे सलते उरात आहे?
वादळे कशी या अंतरात आहे?

वाट संपता माझा प्रवास होतो
पावले कशी वेड्या भरात आहे?

चुकवून रस्ते निघुन मरण गेले
वेदना अशा माझ्या घरात आहे

सोसतो असा आजकाल मज मी
आसवे बरी साध्या दरात आहे

वाळवंट रे हे बाग का खुलावी?
मेघ त्या कितीसे अंबरात आहे?

चांदणे ढळाले एकटा पुन्हा मी
काजळी कशी ही चांदरात आहे?

--शब्द्सखा! (संदीप सुरळे)

गझल

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

17 Jun 2008 - 3:45 am | बेसनलाडू

साहेब,तुमची आधीची रुदाली ही गझल व आताची ही गझल वाचल्यावर तुम्हांला गझलेचे तंत्र अवगत आहे,पण मंत्र अवगत व्हायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करीत रहा,असे सांगावेसे वाटते.शुभेच्छा.
(शुभेच्छुक)बेसनलाडू

suralesandip's picture

17 Jun 2008 - 9:29 pm | suralesandip

बेसनलाडू गझल प्रांतात मी नवीन आहे..आत्ताच सुरुवात केली असे म्हणेल.
सुरवात तर केली आहे. अजुन लिहायचं आहे.

आपले असे नितळ प्रतिसाद महत्वाचे!