माणुस म्हणुन जगुक बघण्या
त्याकाही आता पैसे पडतत.
आजार पळवुक लावुक
घर विकुक बघतत.
पोराचा शिक्षाण करुचा झाला
तर शिक्षाण नको पण देणगी आवारा मारे, म्हणुक लावतत.
नोकरी करुक जाता
हरामखोर लाच मागतत.
जिवन जगण्या सोपा नाय
देवाक आपली काळजी आसा.
जिवन जगुन थकल्यावर
आराम सरणाचो त्यानेच दिलेलो असा..
जिवन जगुन थकल्यावर
आराम सरणाचो त्यानेच दिलेलो असा..
प्रतिक्रिया
19 Apr 2012 - 2:02 pm | गवि
कविता उत्तम आहे, कोंकणातली भाषा वाचताना बरं वाटत होतं.
पण का बरे इतके निराश झाला आहात?
19 Apr 2012 - 2:24 pm | निश
गवि साहेब,आपले आभार आणि..
मी निराश अजिबात नाही आहे. उलट मी मस्त आनंदात जगतो. आई वडील रुपी प्रत्यक्ष घरात दोन देव सदैव पाठीशी असताना मी निराश कशाला होऊ.
खर तर जे घडताना दिसल ते मांडायचा प्रयत्न केला आहे.
काल मुंबईत रेल्वे बंद होती तेव्हा घरी व ऑफीसला जायला निघालेल्या लोकांना रीक्षा वाले ज्या प्रकारे लुबाडत होते मग तो गरीब माणुस असला तरी त्याच्याकडुन ते वाटेल तसे पैसे घेत होते त्याला हव्या त्या ठीकाणावर सोडण्यासाठी तेव्हा ही कविता सुचली.
एका माणसाला त्याच्या आप्ताला एका रुगणालयात बघायला जायच होत घोडबंदर ठाणे येथे तेव्हा त्याला रीक्षावाल्याने २५० रुपये सांगितले ठाणे स्टेशन पासुन आणि त्या माणसाकडे तेवढे रुपये नव्हते व ठाणे स्टेशन ते घोडबंदर रीक्षाचे साधारण पणे ७० ते ८० रुपये होतात. ती रीक्षा वाल्याची अरेरावी बघुन ही कविता सुचली.
19 Apr 2012 - 2:27 pm | गवि
खरंय. आज ज्या काही थोड्या लोकल सुरु आहेत त्यांना इतकी तुफान गर्दी झाली आहे की लोक भीतीदायकरित्या बाहेर लटकून प्रवास करताहेत. आज असे लटकलेले दोन लोक मुलुंडच्या पोलला धडकून मरण पावले.
जिवावर उदार होऊनही कामाला हजर राहिलंच पाहिजे याचं प्रेशर जबरदस्त आहे.
19 Apr 2012 - 2:35 pm | निश
गवि साहेब, गेले दोन दिवस अतिशय वाईट स्थिती आहे प्रवासाची.
19 Apr 2012 - 3:45 pm | चौकटराजा
@गवि
पाडगावकरांच्या म्हणयानुसार कविता दोन प्रकारच्या. स्वानुभवाच्या व परकाया प्रवेशाच्या. त्यामुळे कवि कोणाचेही मनोगत वा व्यथा मांडू शकतो. बाकी माझ्यासारखे एखादी थीम पुरवू शकतात पण खरा अगदी खरोखरचा कवि जन्मालाच यावा लागतो.
@ निशूलाल
आपण मध्यमवर्गीय माणसं सगळ्यालाच घाबरतो, उदा ,रिक्शावाला, आपल्या सोसायटीतील हलकट माणूस इतके काय मंडईतल्या भाजीवाल्याशी देखील पंगा घेउन चालत नाही. यावर " सलाम " सारखी कविता करशील काय ?
19 Apr 2012 - 4:04 pm | निश
चौकटराजा साहेब, सलाम सारखी कविता करायचा प्रयत्न करतो पण सलाम म्हणजे अस्सल सोन आहे .
राम गणेश गडकरी हे म्हणायचे की खरा कवी स्वर्गात रहातो व खोटा कवीला स्वर्ग दोन बोट उरलेला असतो.
सलाम सारखी कविता लिहिणारे खरे अस्सल कवी आहेत व मी जो कवी आहे तो खोटा कवी म्हणता येइल.
तरीही नक्कीच प्रयत्न करिन आपला आर्शिवाद असावा.