<<बिन-पाण्याची दाढी>>

सुहास..'s picture
सुहास.. in जे न देखे रवी...
16 Apr 2012 - 5:01 pm

प्रेरणा : http://misalpav.com/node/21389

"तुझ्या हाती ब्लेड आहे"
खुंट, खुंटच राहतात,
तेव्हा वेदना वळावते,
घोटतात नाजूक गालही!

चेहरा जळत असला,
तरी गळा रक्ताळलेला असतो- वरचा!!
फक्त असे केश उमलत जाऊन,
'फेस' मुळातुन सुरकुतू नये,
इतकंच जपतोय..

शेवटी,
बिन-पाण्याची ही 'दाढी
जितकी नीटनेटकी
तितकाच आयुष्याला
गोरेपणा....!!

-डहाणु

रौद्ररसनाट्य

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

16 Apr 2012 - 5:20 pm | प्यारे१

थंड पेयाची अ‍ॅडिशन घालावीच लागते,
कधी ना कधी कळतेपणानं,
मळमळत्या चवीवर ऊतारा म्हणून |
(बजेट वाढल्यानं होणारं दु:ख)

कापताना खिशाला, त्याला होणार्‍या जखमा
झाकून ठेवणं सोपं नाहिये,
चेहरा कोरा ठेवून |
(एक्स्पर्टीज नाही अजून)

छटाकभराच्या पुर्चुंडीतला चखणा,
सांभाळलाय तरीहि,
बिड्या विझतातच अजूनहि |
(मल्टीटास्कींग जमत नै)

जमेल ,
आयुष्यात ऊरलेल्या ,
हे हि जमेल , कधीतरी

- रात्रप्यारा ;)

पहाटवारा's picture

16 Apr 2012 - 5:39 pm | पहाटवारा

मस्त जमलेय .. हो पी-१ !
प्रतीक्रियांच्या पण पावत्या विडंबन-पुस्तिकेतूनच फाडतात बॉ मिपावर आजकाल ..

पैसा's picture

16 Apr 2012 - 7:17 pm | पैसा

=)) =)) =)) =))

स्पंदना's picture

17 Apr 2012 - 5:43 pm | स्पंदना

तुम्ही दोघे....

__/\__