सुख टाळी द्यायला सरसावते
आणि त्याच वेळी जपायचे असतात मला हातवरचे फोड
चाके लाऊन किल्ली देउन तयार असते माझे मन
एका लाँग ड्राईव्ह करता
आणि काही केल्या बंद होत नाहीत ह्या खिडक्या
ही दारे, घरातले दिवे आणि पत्रासाठीच्या फटीतुन
ओतत रहातात थकलेली बिले...
उपसत रहातो मी घर थोडे पाय टेकवण्यासाठी
मन शोधत रहाते फट माझ्या कर्दळ-कातडी मधे
एक उंची वाइन सरकवतो घशात लाच म्हणुन कदाचीत लाचार म्हणुन देखील
पण लय संपलेल्या क्षणाशी मन उभे असते
सुन्न विकल...
निसर्गाने दिलेली नखे घासत, रंगवत.
सुखाचे मुखवटे जगोजाग सजवतात भिंती कोपरे
आणि वेश्येसारखे माझे मन सरावने
चाके लाऊन किल्ली देउन तयार पुन्हा एका लाँग ड्राइव्हसाठी
प्रतिक्रिया
13 Apr 2012 - 2:47 am | मुक्त विहारि
सुख टाळी द्यायला सरसावते
आणि त्याच वेळी जपायचे असतात मला हातवरचे फोड
चाके लाऊन किल्ली देउन तयार असते माझे मन
एका लाँग ड्राईव्ह करता
ह्या कडव्यात कवीने मस्त कुट टाकले आहे... हे कुट सोडवले तर पुढचा प्रवास थोडा सोपा आहे...
सुख = नविन मित्र / नविन मैत्रिण
हातावरचे फोड = जुन्या स्नेहाने दिलेला दगा...
आणि काही केल्या बंद होत नाहीत ह्या खिडक्या
ही दारे, घरातले दिवे आणि पत्रासाठीच्या फटीतुन
ओतत रहातात थकलेली बिले...
इथे कवी म्हणतो की नविन स्नेही मी आता अॅड करु शकत नाही...कारण जुने अजुन हवे आहेत...
उपसत रहातो मी घर थोडे पाय टेकवण्यासाठी
मन शोधत रहाते फट माझ्या कर्दळ-कातडी मधे
बघा आता इथे ह्याने अजुन थोडा क्लु दिला आहे....कुठेच जागा नाही आहे...सगळी जागा भरलेली आहे...(अजुन नाही समजले?)..
एक उंची वाइन सरकवतो घशात लाच म्हणुन कदाचीत लाचार म्हणुन देखील
पण लय संपलेल्या क्षणाशी मन उभे असते
सुन्न विकल...
निसर्गाने दिलेली नखे घासत, रंगवत.
उंची वाइन = परदेशी गोष्ट
निसर्गाने दिलेली नखे घासत, रंगवत = भारतातिल गोष्ट
आता तरी काही समजले?....की अजुन नाही?....
सुखाचे मुखवटे जगोजाग सजवतात भिंती कोपरे
आणि वेश्येसारखे माझे मन सरावने
चाके लाऊन किल्ली देउन तयार पुन्हा एका लाँग ड्राइव्हसाठी.
वेश्येसारखे माझे मन = हिला कसे अनेक नवरे असतात्...तस्सेच...
अजुन नाही ना समजले....
बघा ह्या कवी कडे एक मोबाईल आहे, ज्याची मेमरी फुल्ल झाली आहे...त्याला आता एक नविन सुंदर मैत्रीण मिळाली आहे..पण तिच्या साठी तो आधीच्या मैत्रीणी पण सोडायला तयार नाही...(हा हव्यास नसुन प्रेम आहे असे समजा)...आणि नेमके ह्याच्या कडे भारतिय मोबाईल आहे....पण अशाने काही कवी हार मानत नाही...तर मग तो ड्युएल सीम वाला परदेशी मोबाईल घेतो (बघा वेश्या म्हणजे ड्युएल सीम वाला मोबाईल्...किती ना समर्पक उपमा ...आपल्या खूप आवडली) आणि मग तिला अॅड करतो.....आणि मग त्यात भरपुर टॉक टाईम टाकुन तिच्या बरोबर गप्पा मारतो...
आणि हो , पेशवा साहेब अजुन येवु द्या हो अशी कोडी....ज्याम मजा येत आहे....
13 Apr 2012 - 1:46 pm | अन्या दातार
पेशवा हा तुमचा डु आयडी आहे का हो??
14 Apr 2012 - 9:51 am | मुक्त विहारि
नाही
नाही
नाही
त्रिवार नाही...
14 Apr 2012 - 4:02 pm | रमताराम
अन्या अरे बरेचदा संस्थळांवरून माणसे जोडीजोडीने स्थलांतर करतात. तसे काहीसे असावे. डायलेक्टिक्स ठाऊक आहे का तुला?
13 Apr 2012 - 11:41 am | अभिष्टा
आवडली :-)
13 Apr 2012 - 11:50 am | परिकथेतील राजकुमार
प्रजननक्षमता म्हणायची का काय !
13 Apr 2012 - 12:13 pm | कवितानागेश
ढॅण ट ढॅण!!
ढिश चिक ढिश चिक ढिश चिक................
13 Apr 2012 - 12:53 pm | यकु
अच्छा!
हा लॉंग ड्राइव्हला निघाल्यानंतर येणारा आवाज आहे का ?
13 Apr 2012 - 1:49 pm | स्पा
अप्रतिम
अफाट
घ्या लाँग ड्राइव ला उपयोगी पडतील
भूक लागली तर असू द्या शेजारी
13 Apr 2012 - 2:04 pm | परिकथेतील राजकुमार
स्पावडू तू मला समजलेल्या जिलब्या.. असा एक धागा काढत नाहीस ?
प्लिज प्लिज प्लिज...
आणि मग यक्कु त्याचे रसग्रहण करणारा धागा काढेल.
13 Apr 2012 - 2:08 pm | स्पा
स्पावडू तू मला समजलेल्या जिलब्या.. असा एक धागा काढत नाहीस
आम्ह्चा संग्रह वाढतच आहे हो... अशा ठराविक जिलब्या निवडण म्हणजे सागरातून मोती शोधण्यासारख आहे हे... ;)
13 Apr 2012 - 2:19 pm | यकु
>>आणि मग यक्कु त्याचे रसग्रहण करणारा धागा काढेल.
--- छे हो! मागेच एकदा तुमच्या विनंतीवरुन रसग्रहण केले तर आमची 'रसास्वादाची प्रक्रिया' आणि 'विचारसरणी' उघडी पडली.. :p
अर्थात आम्ही नेहमीच इथे उघडे हिंडत असल्याने त्याचे आम्हाला काहीच वाटले नाही :)
इथे तर हा मन्या फेणेच्या जिलब्या! उगाच त्या जिलब्यांतील रसाने हात चिकट व्हायचे च्यामारी ;-)
13 Apr 2012 - 2:24 pm | मूकवाचक
बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्रीहट्ट कुणाला चुकले आहेत?
नवी नुकतीच पटलेली गर्भश्रीमंत मैत्रिण लाँग ड्राईव्ह साठी हट्ट धरून बसली आहे, सुख टाळी द्यायला सरसावले आहे आणि कविला 'डिच' मारून गेलेल्या जुन्या लिव्ह-इन मैत्रिणीच्या आठवणी हातावरच्या फोडासारख्या घायाळ करत आहेत. तिच्या हट्टाखातर घेतलेल्या मायक्रोवेव्ह, एलसीडी टीव्ही आणि काय काय यांचे मासिक हप्ते भरलेले नाहीत. थकलेल्या बिलांनी घर इतके भरले आहे, की पाय ठेवायला जागा नाही. तरीही नकली कागदपत्रे पुरवून हप्त्याने अलिशान कार घेतलेली आहे. जुनाट, सनातनी विचारांचा पगडा पूर्णपणे गेलेला नसल्याने मन सुन्न झाले आहे. पण त्यावर जिद्दीने मात करून पुरोगामी, आधुनिक विचारांचा कट्टर इहवादी कवि थकलेल्या बिलांच्या ढिगातून नेटाने वाट काढत फ्रीजपर्यंत पोचतो, आणि एक उंची वाईन घशाखाली ओतून नव्या मैत्रिणीला खुश करण्यासाठी तयार होतो.
या वागण्याला तिने किमान एलसीडी टीव्हीचे उरलेले हप्ते फेडावे या आशेने केलेली लाचारी म्हणा की समानतेच्या युगात मैत्रिणीला खुष करून पदरात काही पडते का हे बघताना त्रास होउ नये यासाठी बुरसट मनाला दिलेली लाच म्हणा! शेवटी मेट्रोसेक्शुअल असलेला कवि रंगरंगोटी करून नव्या मैत्रिणीला खुश करण्यासाठी तयार होतो, पण या सगळ्या प्रकारात आपली पातळी कुठवर घसरली याची 'वेश्या' या शब्दात प्रामाणिकपणे कबुलीही देतो. इतकी सरळसोट, वास्तवदर्शी आणि बोधप्रद कविता आहे ही!
13 Apr 2012 - 2:59 pm | मुक्त विहारि
असा पण अर्थ निघु शकतो.....
कॅलिडोस्कोपिक कविता म्हणायला लागेल की मग
13 Apr 2012 - 3:09 pm | परिकथेतील राजकुमार
जिलबीफाडू रसग्रहण आहे.
13 Apr 2012 - 5:14 pm | अत्रुप्त आत्मा
@पण या सगळ्या प्रकारात आपली पातळी कुठवर घसरली याची 'वेश्या' या शब्दात प्रामाणिकपणे कबुलीही देतो. इतकी सरळसोट, वास्तवदर्शी आणि बोधप्रद कविता आहे ही!>>>
13 Apr 2012 - 5:17 pm | अमृत
:-)
अमृत
15 Apr 2012 - 12:23 am | सुहास झेले
ठ्ठो !!
13 Apr 2012 - 2:51 pm | कवितानागेश
13 Apr 2012 - 5:15 pm | अमृत
आपणाला कही समजलीच नाय तरीपण कॉलींग अ.आ. .... कॉलींग वल्ली.... ही ज्ञानी मंडळी सोपं करून समजावतील अशी आशा आहे...
अमृत
13 Apr 2012 - 5:29 pm | प्रचेतस
कॉलिंग चौराकाका म्हणा हो.
रसग्रहण करण्यात फार पटाईत आहेत ते.
14 Apr 2012 - 8:37 pm | अत्रुप्त आत्मा
@कॉलिंग चौराकाका म्हणा हो.
रसग्रहण करण्यात फार पटाईत आहेत ते.>>> पूर्ण अनुमोदन ;-)
16 Apr 2012 - 1:06 am | मोदक
अनुमोदनास अनुमोदन. :-)
15 Apr 2012 - 5:29 am | चित्रगुप्त
सुख टाळी द्यायला सरसावते
.... कवी अध्यात्मिक सुखात, समाधीअवस्थेत रममाण होउ घातला आहे, त्याची ब्रम्हानंदी टाळी लागत आहे...
आणि त्याच वेळी जपायचे असतात मला हातवरचे फोड
....परन्तु त्याला आपले शरीरही जपायचे आहे... (नाहीतर कुणी अन्य आत्मा त्या शरीरात परकाया प्रवेश करेल, ही भिती आहे)....
चाके लाऊन किल्ली देउन तयार असते माझे मन
एका लाँग ड्राईव्ह करता
.... जप, ध्यान यासाठी मनाची तयारी पूर्ण झालेली आहे खरी, पण...
आणि काही केल्या बंद होत नाहीत ह्या खिडक्या
ही दारे, घरातले दिवे आणि पत्रासाठीच्या फटीतुन
ओतत रहातात थकलेली बिले...
... बाह्य संवेदना, आवाज, प्रकाश, आर्थिक विवंचना/विचार यामुळे मन एकाग्र होत नाहिये....
उपसत रहातो मी घर थोडे पाय टेकवण्यासाठी
मन शोधत रहाते फट माझ्या कर्दळ-कातडी मधे
.....तरीसुद्धा ध्यान लावण्याचा प्रयत्न जारी आहे....
एक उंची वाइन सरकवतो घशात लाच म्हणुन कदाचीत लाचार म्हणुन देखील
....कुणी थोर संत, स्वामी वा देवाचे स्मरण करून बघतो, मनाच्या जंजाळातून सुटका मिळावी म्हणून...
पण लय संपलेल्या क्षणाशी मन उभे असते
सुन्न विकल...
निसर्गाने दिलेली नखे घासत, रंगवत.
......... तरिही मनाच्या नैसर्गिक मर्यादा ओलांडता येत नाहीत....
सुखाचे मुखवटे जगोजाग सजवतात भिंती कोपरे
आणि वेश्येसारखे माझे मन सरावने
चाके लाऊन किल्ली देउन तयार पुन्हा एका लाँग ड्राइव्हसाठी
......... मग संतांच्या, स्वामी,देवांच्या चित्रांमधून बघितलेली रुपे स्मरत, पुन्हा लागते मन ध्यानाच्या खटाटोपास...