उमज

स्पंदना's picture
स्पंदना in जे न देखे रवी...
10 Apr 2012 - 5:08 am

प्रेरणा:-http://www.misalpav.com/node/21293

मिथकांचे रचुनी भांडार, दिवाभितांचे सोपस्कार
स्त्री होउन मी पुन्हा वाचते, भेद तव कथेचा वारंवार

शापित जीवन सदा सर्वदा, राजयोग जरी दिसे दर्शना
तळमळ सारी उरात लपवी , माता कुंती पांडव जोजवी

बालिका तू कोवळी , बळी तू कुण्या एका जोगड्याची
जन्म अभागी पुत्राचा अन मिथक प्रसवली मंत्रांची

कलंकित त्वा मग जोड कोठली सामर्थ्यवान पुरुषाची
म्हणुनच मग विवाह योगी ...पंडु...ज्या गरज भासे मंत्रांची

दिसतो मज अत्याचार ठायी ठायी तव जीवनी
कुस्करलेले बालपण अन तहानलेल्या तारुण्यी

त्यागुनी सारे राजवैभव पतीसह तू वनवासी
राखाया मग राज्य हक्क तू पुन्हा पुन्हा..पुन्हा बळी जाशी

ठसठसणारी जखम उरीची , पोक्त मलाही जाणवते
कुंती तव साम्राज्ञीपणाचे दारिद्र्य मला बघ खंतवते.

कविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

10 Apr 2012 - 9:01 am | प्रचेतस

कविता आवडली.
कुंतीचे व्यक्तिचित्रण पद्यरूपात व्यवस्थित उतरवले गेले आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 Apr 2012 - 1:12 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर रचना.
हि कविता वाचुन आमचीच हि कविता आठवली.

सुहास..'s picture

12 Apr 2012 - 1:50 am | सुहास..

क्या बात !!