आमची हद्दपारी दिल्ली -चंदिगडला

मन's picture
मन in काथ्याकूट
4 Apr 2012 - 8:21 pm
गाभा: 

देवाचिये दादुलेपनाचा उबारा|
न साहावेचि साताहि सागरा||
भेणें वोसरूनि राजभरा |
दिधली द्वारावती ||
(अर्थः- देवाधिदेव भगवान श्रीकृष्ण ह्यांच्या तेजाने सातही सागर हैराण झाले व त्यांनी आपल्यातला काही भाग काढून कृष्णांस द्वारकानगरी दिली.) असे आद्य कवी नरिंद्र ह्यांना कृष्णाची स्तुती करताना म्हटलय.
बहुतेक आमचेही तेज आमच्या खड्डुस बॉस व सहकार्‍यांना सहन होत नसावे.मला उत्तर भारतात तडीपारीसाठी(डेप्युटेशनवर) पाठवायची म्हणूनच ह्यांनी व्यवस्था केली आहे.

मी नको नको म्हणत असतानाही बॉसनी शेवटी दिल्ली-चंदीगढचा प्रोजेक्ट(मोहिम) दिलाच. माझ्या अतुलनीय कौशल्यावर प्रसन्न होउन कंपनी मला थेट तिकडे पाठवते आहे. "दिल्ली अब दूर नही" अशी स्थिती खरोखर आली आहे.
ह्यापूर्वी पुण्याच्या पब्लिकपैकी उत्तर भारताच्या राजधानीच्या ठिकाणी आदरणीय श्री शिवाजीराव शाहाजीराव भोसले ह्यांचे व त्यानंतर दक्षिणेत कैक लढाया जिंकलेले सदाशिव(राव/भाउ) चिमाजी भट ह्यांचे जाणे झाले होते म्हणे.
पैकी पहिल्यास तिथले वातावरण अजिबात आवडले नाही, व त्या उर्मट लोकांना सुशासन काय असते हे दाखवण्यासाठी त्यांनी परत येउन इथे स्वतःचे स्वतंत्र राज्य उभारले.तर दुसरा असा काही गेला की परतलाच नाही.
ह्या सर्व प्रकारामुळे एकूणच मराठी मनांत स्वतःहून सतत दिल्लीला जाउन रहावे असे कधीच वाटले नाही.

ह्यापुढील सहाएक आठवडे माझे वास्तव्य दिल्लीला असेल्.त्यापुढील वीसेक आठवडे मी चंदीगडला असेन्.मला आता तुम्ही जालिय मित्र, हितचिंतक ह्यांची मदत लागणार आहे. फुकटात सल्ले हवे आहेत.
शंका :-
१.राहण्याची व्यवस्था कंपनीनं केलीए गुडगावला. आता गुडगावला राहायचं म्हणजे तिथलं एकूणच वातावरण्/संस्कृती कशी आहे, ह्याबद्दल सल्ला हवाय(बहुतेकांनी सल्ला दिलाय की तिथे उगी कुणाशी डोके लावत बसू नकोस म्हणून. कधीही घोडा/चाकू/कृपाण वगैरेचे दर्शन होउ शकते म्हणे.)

२.संपूर्ण NCR(दिल्ली+नवी दिल्ली+नोयडा+गुरगाव) मधली आवर्जून जावीत अशी खादाडीची ठिकाणं कुठली?

३.दिल्लीत पाहण्यासारखे काय आहे?

४.तिथली अनवट ठिकाणं कुठली?(जसं पुणे म्हटल्यावर शनिवारवाडा,शिंदे छत्री सारेच सांगतात, पण भुलेश्वर्,बनेश्वर ही ठिकाणंही आवर्जून जावीत अशी आहेत,पण कमी लोकांस ठाउक आहेत.)

५.पूर्वी अप्पूघर होते, अजूनही सुरु आहे काय? नसेल तर अजून कुठले adventure sports आहेत काय?(कोकणात/सह्याद्रीत बर्‍याच ठिकाणी बंजी जम्पिंग्,पॅराग्लायडिंग वगैरे सुरु आहे तसे काही)

६.सध्या कोण कोण इथले जालवासी तिथे आहेत? ह्यापूर्वी कुणाचं वास्तव्य होतं काय?

७.दिल्लीत राहिल्यावर दोनेक दिवसाची वीकांतास सुट्टी काढली तर आसपास जाण्यासारखं काय काय आहे? जसं पुण्यात दोन्-तीन दिवसांची सुट्टी काढली की जाण्यासारखं म्हणजे गोवा. तसच काहिसं.

८.देहरादून्/मसूरी,चार धामांपैकी काही धाम ह्यापैकी कुठेही दिल्लीहून जाणे सोपे आहे की चंदीगडहून?

९.अ‍ॅग्रो टुरिझम असे काही पंजाब्-हरयाणा-दिल्ली पट्ट्यात आहे का? कोणते ठिकाण आहे?
खास त्या भूभागात म्हणवली जाणारी सुपीक जमीन, भल्ल्या मोठ्ठ्या नद्या,भरपूर दहि-दूध -लोणी-तूप्,फळे-भाजीपाला ह्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर कुठे जावे? म्हणजे एखाद्या ठिकाणी खास शेतात दोन्-चार दिवस रहायचे सोय आहे का?

१०.मोबाइलचे काय करु? सध्या माझ्याकडे एअरटेल पोस्टपेड आहे. तिथे नवीन कार्ड घ्यावे काय? कोणते घ्यावे? आहे त्या एअरटेलचे काय करावे? एखादी भारी स्किम ठाउक आहे का?

११.दोनेक दिवसात मी निघेन.पण २६एप्रिलला नागपूरला मित्राच्या लग्नासाठी जाय्चे आहे. त्यासाठी दिल्ली-नागपूर व नागपूर्-दिल्ली असे विमान तिकिट काढावे म्हणतोय.
कुठले तिकिट काढणे इष्ट होइल? जिथे तिकिट काढल्याने रोख डिस्काउंट किंवा इतर एखादे कूपन मिळते अशी एखादी वेबसाइट आहे काय ?(प्रीपेड मोबाइल आम्ही एका वेबसाइटद्वारे चार्ज केला तर चार्ज जितक्याचा केला, तितक्याचे आम्हाला मॅक डी चे कूपन्स मिळतात. तसे काही आहे का?)

१२. तिकडे चाललोच आहे तर एवढ्या दूर जाणे होतच आहे तर अजून काय काय करणे शक्य आहे? (तुम्ही अयदी द्या, सगळ्या गोष्टी नाही करता येणार ह्याची कल्पना आहे. पण दिलेल्या यादीपैकी सर्वात आवडलेल्या/सोयीस्कर गोष्टी तरी केल्या जातीलच. तेव्हा यादी लांबलचक होइल, ह्याची चिंता नको.

१३. मुळात जाणे टाळायचे असेल तर बॉसवर भानामती वगैरे करून त्याच्याकडून इथलीच असाइनमेंट घेण्यासाठी एखादा खात्रीशीर मांत्रिक वगैरे आहे काय? उपाय न झाल्यास तो पैसे परत देइल काय?

१४.खन्ना,बात्रा,लोधी.सोधी,पहवा,सिंघानिया,चोप्रा,कपूर्,बन्सल,कक्कड, तन्नेजा,रहेजा,चौहान,वासन ही नावे व दिल्ली-पंजाब्-हरयाणा ह्यांचे कल्चर (संस्कृतिक वातावरण) म्हणजे सध्या बॉलीवूड मध्ये दाखवले जाणवले धत्तड्-तत्तड,पोषाखी ,भरजरी कल्चरच ना?

--मनोबा

प्रतिक्रिया

तु चुकूनही दिल्लीला जाऊ नये असा सल्ला मी तुला देईन ! ;-)

स्मिता.'s picture

4 Apr 2012 - 8:40 pm | स्मिता.

मनोबा, प्रश्नपत्रिका वाचूनच दरद्रून घाम फुटला आहे. किती मोठी आणि अवघड प्रश्नपत्रिका काढलीत राव! ;)

असो. गमतीचा भाग सोडा, मला दिल्ली-चंढिगडबद्दल काहिही माहिती नाही. पण काही उत्तर भारतीय लोकांकडून चंढिगडबाबत चांगले ऐकून आहे. त्यामुळे जे टळूच शकत नाही त्याबद्दल नकारात्मक भूमिका न घेता सकारात्मक विचार करून (प्रश्नपत्रिका वाचून तसेच विचार दिसत आहेत) पुढचे काही महिने खा, प्या आणि ऐश करा.

सध्या माझी नणंद चंदीगढला राहते आणि भाऊ गुडगावला राहतो.
त्यांच्यापैकी कोणालाही उगीच कोणाशी डोके लावायला वेळ मिळत नसल्याने (शंका क्र. १ नुसार) चाकू/घोडा इ. गोष्टी दिसल्या नाहीयेत अजून तरी. गुडगावात सगळ्या बिल्डिंगी आणि मॉल्स (आणि बरीच माकडे) दिसल्याचे आठवते. खाण्याची ठिकाणे अतोनात असावीत. अर्थात माझ्या संपूर्ण तीन दिवसाच्या वास्त्यव्यात जे दिसले/दाखवले ते हे आहे. तीन दिवसातला अर्धा वेळ जेटलॅगमुळे झोपेत गेला.
आडनावांच्या बाबतीत म्हणाल तर (शंका क्र. १४) माझा भाऊ त्यावेळी रहायचा तिथून कंपन्या जवळ असल्याने सगळे (खन्ना आणि कपूरांच्या दृष्टीने) परराज्यीय लोक होते. उदाहरणादाखल आडनावे येणेप्रमाणे, कुलकर्णी, देशपांडे, पाटील, चव्हाण, श्रोत्री, दामले, गायकवाड इ. होती हे आवर्जून नमूद करते आणि गप्प बसते. ;)

पैसा's picture

4 Apr 2012 - 9:36 pm | पैसा

मनोबा, जे टाळू शकत नाही ते एंजॉय करा! दिल्लीतलं म्युझियम, पुराना किला वगैरे बघून या. विजूभाऊ हल्लीच गेले होते. त्याना जास्त विचारा.

मी काही वर्षांपूर्वी गेले होते तेव्हा स्वस्त आणि मस्त भरपूर खल्लेलं आठवतंय. गल्लीबोळातलं कळकट हॉटेल शोधून आत शिरा. तू शाकाहारी अहेस ना, चविष्ट पालक पनीर आणि मक्के दी रोटी आणि सरसों दा साग कितीही खाल्लास तरी कंटाळा यायचा नाही. बहुतेक ठिकाणी लस्सी चांगली मिळते.

आणि आसपास बघायला तर खूप काही आहे. २ महिने कसे गेले कळणार पण नाही. लेख आणि फोटो विसरायचे नाहीत!

आणि हो, तू १२ तास असणार ऑफिसात, मग भांडायची वेळच कशाला येतेय कोणाशी?

इरसालांना व्यनी करा. ते देहल्ली बद्दल अधिक माहिती देउ शकतील. :)

+१

इरसालांना व्यनी करा..

अन्या दातार's picture

4 Apr 2012 - 9:59 pm | अन्या दातार

आपल्या सगळ्यातच हा सिंदबाद असतोच. जितके लहान वय तितका तुमच्यात सिंदबाद जास्त. एकाच ठिकाणचं स्थिरत्व त्याला जडात्व वाटतं, कंटाळवाणं वाटतं. नाही ती संकटं अंगावर ओढवून घ्यायची आणि मग स्वतःच लढून ती सोडवायची आणि वर ह्यानं खुश, उत्तेजित, रोमांचित होत पुढल्या संकटात घुसायचं एवढच त्याला समजतं.

हे फक्त पुण्यातल्या पुण्यात हिंडतानाच्च अ‍ॅप्लिकेबल आहे काय?? ;)

संदर्भ!

नाही ती संकटं अंगावर ओढवून घ्यायची आणि मग स्वतःच लढून ती सोडवायची आणि वर ह्यानं खुश, उत्तेजित, रोमांचित होत पुढल्या संकटात घुसायचं एवढच त्याला समजतं. - मा. अन्या दातारजी, पुण्यातल्या रस्त्यावर पहिल्या संकटातुन लढुन बाहेर पडायची संधी असते, तिथं घोडे, कृपाणं अन अजुन काय काय एक चान्स तर नको, उत्तेजित रोमांचित व्हायला.

अवांतर - सदरील वाक्याचा मुळ लेखकाने सांगितलेला दुसरा अर्थ जाहीर रित्या विचारु नये, आम्ही प्रतिसाद उडवले जावेत म्हणुन देत नाही.

मन१'s picture

5 Apr 2012 - 9:35 am | मन१

मी कधी सांगितला वेगळा अर्थ?

मन१'s picture

5 Apr 2012 - 9:33 am | मन१

तक्रार फक्त दिल्लीला जाण्याबद्दल नाहीये. ज्या घिसाडघाइने एकाएकी पाठवायचे ठरले आणि त्यात इथली कित्येक कामे अर्धवट सोडून जावे लागताहेत त्याने जीव कावलेला होता; वैतागलो होतो.
हां, आता जायचच असेल तर जमेल तितकी धमाल करावी , चार ठिकाणं पहावीत असा उद्देश आहे.

चार ठिकाणं पहावीत असा उद्देश आहे. - ठिकाणं की स्थळं ?

क्लिंटन's picture

4 Apr 2012 - 10:40 pm | क्लिंटन

दोनेक वर्षांपूर्वी मी गुरगावमध्ये काही काळ होतो. गुरगाव शहर तसे बरेच मोठे आहे पण सार्वजनिक वाहतुकीची बोंब आहे. मी राहत होतो त्यावेळी मेट्रोची स्टेशने तयार होती पण गुरगावात मेट्रो पोहोचलेली नव्हती. आणि आज जरी पोहोचली असली तरी स्टेशनापासून शहरात कुठेही जाणे तितकेसे सोपे नाही. सायकल रिक्षा आहेत पण त्या खूप महाग आहेत. गुरगावमध्ये गोल्फ कोर्स रोड नावाचा ७-८ किलोमीटर लांब रस्ता आहे. त्या रस्त्यालगतच अनेक कंपन्या तर आहेतच त्याचबरोबर उंच टॉवर्सचे साम्राज्यही आहे. गुरगावमधील रस्त्यांवर खड्डे जास्त प्रमाणावर वाटले.

अजून एक महत्वाचे सांगायचे म्हणजे गुरगावमध्ये डी.एल.एफ कंपनीने खूपच मोठे साम्राज्य उभे केले आहे. त्यासाठी कंपनीने स्थानिकांकडून जमिनी विकत घेतल्या आणि त्या जमिनींचे मालक रातोरात कोट्याधीश झाले. अशा नवश्रीमंत लोकांच्या "हरियाणवी" attitude चा आपल्यासारख्यांना त्रास होऊ शकतो.तेव्हा ही गोष्टही जरूर लक्षात ठेवा.

>>>अशा नवश्रीमंत लोकांच्या "हरियाणवी" attitude चा आपल्यासारख्यांना त्रास होऊ शकतो.

तिकडे पण गुंठामंत्री आहेत म्हणायचे.. :-)

हो हो. हेच म्हणायचे आहे. एकदा अर्धा तास काय तो पाऊस झाला आणि रस्त्यांनी मानच टाकली.

जयंत कुलकर्णी's picture

5 Apr 2012 - 6:27 am | जयंत कुलकर्णी

एखाद्या शनिवार्/रविवारी पानिपतला जरूर जाउन या.
या ठिकाणी एक आंब्याचे छोटे झाड होते ते रक्त उडून उडून वाळल्यावर काळे पडले म्हणून या जागेला काला आम म्हणतात.

या ठिकाणी एक आंब्याचे छोटे झाड होते ते रक्त उडून उडून वाळल्यावर काळे पडले म्हणून या जागेला काला आम म्हणतात.

जयंतकाकांचे लेख, प्रेतं फार ! हे जयंतकाकांच्या प्रतिक्रियेला लागू झालं ब्वॉ ;-)

प्रतिक्रिया आणी सल्लासुध्हा.

धन्यु टू गणपा आणी गवी

(पाण्यात राहुन माश्याशी मैत्री असणारा )
(हरयाणे मे रह्के जाटोसे दोस्ती रखनेवाला) इरसाल

हरिद्वारला एकदा जरुर जाऊन या हो.. होडन सावर पिऊन..

सरळ विचारलं असतं तर सांगितलं नसतं काय कुणी?????

बाकी, शिवथरघळच्या ट्रीपसाठी मनोबा नं काढलेली क्वेश्चनीयर ऐकलीये हो मी....! मीच तो मीच तो! :)

मन्या, पानपतासाठी ;) शुभेच्छा!

प्रीत-मोहर's picture

5 Apr 2012 - 10:23 am | प्रीत-मोहर

अभिनंदन मनोबा :)

मी-सौरभ's picture

5 Apr 2012 - 10:33 am | मी-सौरभ

हिंदी बोलताना प्रत्येकाला आप संबोधा,

लवकरात लवकर स्वतःचा एक कंपू (२-३ लोकल, २-३ बरेच दिवस तिथे राहणारे, ४-५ तुमच्यासारखे नवखे) तयार करा, मग सुखी रहाल.

पंजाबी पोरींच्या नादी लागू नका. (थोडा अगोचर उपदेश आहे पण लक्षात ठेवा)

(बाकी हे मराठी माणसाच वैशिष्ट्य्च की तिथे न गेलेलेच जास्त लोक सल्ला देतायत अन असलेले वाट बघायला लावतायत ;))

इरसाल's picture

5 Apr 2012 - 11:56 am | इरसाल

शालजोडीतला दिला काय ?

मी-सौरभ's picture

5 Apr 2012 - 6:24 pm | मी-सौरभ

तसं तर तसं समजा ईरसाल भौ पण वैयक्तिक घेऊ नका. :)

इरसाल's picture

5 Apr 2012 - 6:40 pm | इरसाल

असु द्या तमाखु मळा वाइच.

मी-सौरभ's picture

5 Apr 2012 - 6:48 pm | मी-सौरभ

ही घ्या तंबाकू ;)

सूड's picture

5 Apr 2012 - 10:43 am | सूड

जेब्बात !! शुभेच्छा !!

( प्रश्नावलीचे आश्चर्य न वाटलेला) सूड

>>>पंजाबी पोरींच्या नादी लागू नका.

यात नेमका काय धोका आहे ते स्पष्‍ट करावे.
खरडवहीच्याही वापराचेही स्वागत आहे. :)

(उगी आपला उस्तुक ) यक्कू

चिरोटा's picture

5 Apr 2012 - 10:59 am | चिरोटा

यात नेमका काय धोका आहे ते स्पष्‍ट करावे

एका पंजाबी मित्राच्या सांगण्यानुसार पंजाबी स्त्रिया फॅशन,स्टाईल मारण्यासाठी नवर्‍याला कर्ज काढायलाही भाग पाडतात.भाजी आणण्यासाठी सॅन्डल्चा एक जोड, मॉल मध्ये फिरण्यासाठी दुसरा,कामाला जाण्यासाठी तिसरा,माहेरी जाण्यासाठी चौथा जोड असा प्रकार असतो.

मी-सौरभ's picture

5 Apr 2012 - 11:57 am | मी-सौरभ

हे सगळं तर लग्नानंतर; लग्नाआधी सुद्धा त्या हे सर्व करतात असे ऐकून आहे.
तुमचा हा (पैसा) फार वर आला असेल तर वाटून टाका (रेफः तरुण तुर्क म्हातारे अर्क)
पण पोरींवर उडवू नका ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Apr 2012 - 11:31 am | विश्वनाथ मेहेंदळे

लग्नाआधी सुद्धा त्या हे सर्व करतात असे ऐकून आहे

ह्या "हे" मध्ये नक्की काय काय मोडते ? ;-)

अवांतर:- दिल्ली ला जायला पाहिजे बुवा एकदा (तरी) !!!!

चंबा मुतनाळ's picture

6 Apr 2012 - 8:50 pm | चंबा मुतनाळ

आयला, नुसत्या सँडलचाच खर्च? मग स्वस्त आणी मस्त्त, सगळ्यानाच!!

कपिल काळे's picture

5 Apr 2012 - 11:20 am | कपिल काळे

बेकार वातावरण आहे. रात्री ८ नंतर एकटे फिरू नका.

पुरानी दिल्ली - पहाड गंजभागात पुस्तक खाउ, खाउ किराणा वगैरे होल्सेल मार्केट आहे. डुप्लिकेट पुस्तके मिळतात. म्हणजे अनॉफिशयली छापलेली. पण त्या रस्त्यावरच्या दुकान्दारांशी जर बार्गेन कराय्ला तोंड उघडले तर पुस्तक खरेदी करायलाच लागेल. तिथ्ल्या गल्ल्यासुद्धा भारी बघण्यासारख्या आहेत.
चांदनी चौकातील पंजाबी घसीटारामची मिठाई खाच. कॅनॉट प्लेस मार्केटला विंडो शॉपिंग करायला हरकत नाही. तिथेच खाली पालिका बझार मध्ये खरेदी करा. इथे पण बार्गेन केले तर खरेदी कराय्ला हवी. नाहीतर !!!!

बिर्ला मंदिर, लोट्स टेंपल अवश्य पहा.
दिल्ली मेट्रो छान आहे. भरपूर फिरायला स्वस्तात हरकत नाही.

नोइडा, गाझियाबाद हा एरिया रात्री फिरण्यास वर्ज्य समजावा. ते पुणे नसून उत्तर प्रदेश आहे हे ध्यानात ठेवावे.!!

दिल्लीत तुम्हाला रस्त्याकडेला गटाराच्यावर फरश्या टाकून चालवलेल्या टपर्‍या सापडतील किंवा मग हाय एंड रेस्तरा.. मधली कॅटेगरी नाही.

नियम मोडणे, विनातिकिट प्रवास ( बस मधून, मेट्रोत प्रवेशच नाही म्हणून तिकिट झक मारत घेतात! ) बसमध्ये, स्टॉपवर, बाजारात मुलींना उद्देशून अचकट विचकट बोलणे अगदी कॉमन . शेरेबाजी ऐकून गोंध्ळून जाल. आपल्याला सवय नसते महाराष्ट्रात अश्या शेरेबाजीची.

लोक एकदम चमको असतात दिल्लीतील.बंगल्यांना बाहेरच्या भिंतींना टाइल्स लावलेल्या पहायच्याअसतील तर दिल्लीतच दिसतील. हापिसातला चपरासी सुद्धा भारीपैकी ब्लेझर घालून आप्ल्याला कॉम्लेक्स देतो. हापिसात भयंकर इगोइस्टीक लोक सापडतील. चेहर्‍यावर कमालीची मग्रुरी, माज, आणि सगळ्या जगाला तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती दिसेल. बोलताना हातातील कड्याचा आवाज टेबलावर करत बोलण्याची लकब सारखीच. तुम्ही बॉस म्हणून जात असाल तर मजा आहे.
जी -हुजरे गिरी करण्यात दिल्लीकरांचा हात कोणी धरु शकत नाही. मी दिल्लीत रिसोर्स आणि बॉस अश्या दोन्ही भूमिकांचा अनुभव घेतला आहे

सहा अधिक वीस म्हणजे सव्वीस आठव्ड्यांनी भेण्चोद हा शब्द तुमच्या बोलण्यात प्रत्येक तीन शब्दांनतर येइलच!

हिरव्या/ निळ्या / पिवळ्या ड्रेसला मॅचिंग म्हणून त्याच कलरचे लिपस्टीक लावलेल्या बायका दिसल्या तर मान वळवून बघत बसून नका. कारण असे कितीवेळा बघणार ?मान लचकायची !!

दोन- तीन वजदार पंजाब्यांना सायकल रिक्षात घेउन जाणारा हड्कुळा बिहारी तुम्हाला पुरानी दिल्लीत दिसेल.

दिल्ली म्हणजे, पंजाबी, हरियाणावी, राजस्थानी, उत्तर प्रदेशी संस्कृतीची खिचडी आहे. एकंदरीत सगळ्या प्रकारचे ठग तुम्हाला भेटतील. सावध रहा.

दिल्लीहून सिमला, हरिद्वार, चंदिगड जवळ आहेत. चंदिगडला रॉक गार्डन मस्ट सी आय्टेम आहे. चंदिगड बांधून राहिलेल्या टाकाउ बांधकाम साहित्यातून उभारली आहे.

प्रीत-मोहर's picture

5 Apr 2012 - 11:47 am | प्रीत-मोहर

चला !!! म्हणजे पुणे ३० मधले लोकांना हुश्श्य करायला हरकत नाही म्हणायची

गणामास्तर's picture

5 Apr 2012 - 12:30 pm | गणामास्तर

अगदी अगदी....!! मी अनुभवलेल्या दिल्लीला एकदम चपखल बसणारा प्रतिसाद.
बाकी अजून काही किस्से सांगण्या सारखे आहेत, पण इथे नको.

(हरिद्वार ला जाऊन होडन सावर न पिलेला :() गणामास्तर

रेवती's picture

5 Apr 2012 - 8:48 pm | रेवती

बाकी अजून काही किस्से सांगण्या सारखे आहेत, पण इथे नको.
(हरिद्वार ला जाऊन होडन सावर न पिलेला ) गणामास्तर

हे सोडून बाकी सगळ्याशी सहमत.

गणामास्तर's picture

6 Apr 2012 - 10:17 am | गणामास्तर

आज्जे प्रतिसाद कळाला नाही, जरा इस्काटून सांगता काय?

रेवती's picture

6 Apr 2012 - 5:41 pm | रेवती

काय हे मास्तर.
अगदी अगदी....!! मी अनुभवलेल्या दिल्लीला एकदम चपखल बसणारा प्रतिसाद.
एवढ्या म्हणण्याशीच सहमत असा अर्थ आहे.;)

वरच्या प्रतिसादातून दिल्लीकरांबद्दलचे असे चित्र उभे रहाते की ते सगळ्या दुर्गुणांचे माहेरघरच असावेत.
मी कधी दिल्लीला गेलेलो नाहीय. पण दिल्लीच्या लोकांशी व्यवसायाच्या निमित्ताने व्यवहार झालेला आहे. विशेष म्हणजे सगळा विश्वासाचा मामला. मी असाइनमेंट पूर्ण करुन दिल्यानंतर त्या लोकांचे पत्ते आणि फोन नंबरशिवाय माझ्याकडे काहीही नसायचे. पण फसवणूक कधी झाली नाही.

मला भेटलेले लोक बोलायला अदबशीर होते. नावानंतर आणि बोलताना मध्‍ये मध्‍ये 'जी' लावायला चुकूनही चुकले नाहीत. पेमेंटच्या बाबतीत तर कधीही चुकारपणा केला नाही.
रेट ठरला म्हणजे ठरला, आणि पेमेंट डिपॉझिट झालेलं सांगितलं असेल त्या दिवशीच ते झालेलं असायचं.
उलट काही वेळा माझ्या आळसामुळे काही लोकांचा माझ्याकडूनच छळ झाला. त्यांचे आर्थिक नुकसानही झाले. त्यानंतर फोनवर बोलत असूनही त्यांनी कधी शिवीगाळ किंवा वावगा स्वर काढला नाही.
एकदा मला असाइनमेंट देऊन तोंडघशी पडल्यानंतरही त्यांनी पुन्हा पुर्ववत कामे दिली.
ते काही पूर्णपणे व्यावसायिक लोक नव्हते. एक एजन्सीवाला तर स्वत:ची रेल्वे मंत्रालयातील नोकरी सांभाळून ट्रान्सलेशनची एजन्सी चालवत होता.

किमान मी तरी दिल्लीवाल्यांच्या बाबतीत भाग्यवान आहे.

कपिल काळे's picture

5 Apr 2012 - 12:22 pm | कपिल काळे

भाग्यवान आहात यक्कु. वर्च्युअल / नेट वेव्हारात तुम्हाला चक्क दिल्लीकरांचा चांगला अनुभव आलाय! त्यांचा त्यात भरपूर फयदा होत असणार !!

मी कधी दिल्लीला गेलेलो नाहीय.----

म्हणूनच. एकदा जावून अनुभवा..

गुडगावला सगळ्यात सावध रहायचे ते हरियाना पोलिसांपासून...
तसे मस्त असतात. त्यांच्याशी पंगा घेऊ नका.. ते म्हणतील ती पूर्व दिशा असते. त्यांना उपरोध वगैरे कळत नाही त्यामुळे त्यांच्याशी कामापुरतं बोलायचं. पण तरीही पत्ता शोधणॅ अशा कामांसाठी हरियाणवी रिक्षावाल्यांपेक्षा पोलीस बरे..

खायला प्यायला उत्तरभारतात चंगळ आहे. गुडगावमधे तर अनेक ठिकाणी ढाबे दिसतील किंवा पराठ्याच्या हातगाड्या. अपेयपानाची सोय रात्री कितीही वाजता होऊ शकते. दुकानदार शुद्धीत असायला हवा फक्त. पण रात्री दोन आडीचपर्यंत चांगले जेवण मिळेल.

सरसकट पंजाबी उर्मट नसतात पण तरीही लाईफस्टाईल चकाचक असते. एखाद्याशी दोस्ती झालीच तर नको म्हणेस्तोवर पाहुणचार होईल. पण व्यवहाराच्या भानगडीत पडू नयेअसते.

मेरु टॅक्सी सर्व्हिस चांगली आहे.. ००-११-४१४१४१४१

jaypal's picture

5 Apr 2012 - 11:49 am | jaypal

मिपाकरांनी बरेच सल्ले दिले आहेत तेव्हा मनोबा निर्धास्त होउन जा. यश तुमचेच आहे खात्री बाळगा.
पुढिल वाटचालीस आणि वास्तव्यास खुप खुप शुभेच्छा.
ईथे टिचकी मारा ;-)

मन१'s picture

5 Apr 2012 - 12:52 pm | मन१

@यकु;- सल्ल्याबद्द्ल भार.
@स्मिता :- हो. सकारात्मकच राहिन.(न राहून सांगतो कुणाला ;) )
@रेवती :- हम्म. गाठिन मह्णतो इजुभौंना
@पैसा:- हो. हापिसातच इतके राहणे होइल की बाहेर जायला जमायची शक्यता कमीच दिसते. पण कुनी साम्गावं, एखाद्या अवचित दुपारी,सुट्टीच्या दिवशी निघालो आपण भटकायला असही होइलच की.

@अन्या आणि ५०फक्त :- वरतीच प्रतिसादलोय.

@ गणपा, गवि, इरसाल :- ओ इरसाल भौ, शेवटी कशाला म्हणून देताय प्रतिसाद. द्या की झरझर टिप्स.
@क्लिंटन :- होय. attitude बद्दल ऐकून आहे. शक्य्तोवर अध्यात ना मध्यात असे करत सरळ आपल्या रस्त्यास जात रहावे असाच सल्ला बर्‍अयच जणांनी दिलाय.

@ जयंतकाका:- पानिपत जाणे तर must आहे. जाणे होणारच आहे.

@गवि:- होडन सावर म्हणजे रे काय भाउ?मद्य की भांग की अजून काही?
@प्यारे :- घ्या ....अजून मजा घ्या.
@प्रिमो :- थ्यांक्स.
@मी सौ रभ :- आप सही फर्मा रहे है :)

@कपिल, गणामास्तर :- तुम्ही सांगताय त्याच धर्तीवरचं माझ्याही ऐकणयत आहे.

@एम जी :- नंबर कामाचा आहे. अजूनही असले जितके कामाचे नम्बर असतील तेवढे द्या धाडून.

@ जयपाल :- आभार. सध्या दुवा इथून उघडत नाही हापिसातून.

झालं हाभार प्रदर्शन!
उठायचं का आता पब्लिकने या धाग्यासमोरुन ?
एवढी प्रश्नावली टाकलीय तर दम खा की जरा.

मन१'s picture

5 Apr 2012 - 1:01 pm | मन१

नाही नाही हो.
एवढ्यात आवरतं नका घेउ हो.
ऐक्का हो ऐक्का...
मायबाप मिपाकरह्हो, दोस्तहो, रसिकहो सढळ हस्ते टंकित करा माहिती. द्याल तितकी कमीच आहे.
एवढ्यात थांबू नका हो. माहिती देणयर्‍अयस लक्ष लक्ष आभारांचा पुरस्कार दिला जाइल होsssssssssssss
डम डम डम......

एम.जी.'s picture

5 Apr 2012 - 1:28 pm | एम.जी.

@एम जी :- नंबर कामाचा आहे. अजूनही असले जितके कामाचे नम्बर असतील तेवढे द्या धाडून

काय नाय तर १०० आहेच....

प्रास's picture

5 Apr 2012 - 3:06 pm | प्रास

हे जे मी बघतोय तेच सगळेजण बघतायत? :-o

गडी ठीकाणावर आहे का? ;-)

चिगो's picture

5 Apr 2012 - 1:30 pm | चिगो

दिल्लीत जाताच आहत, तर शुभेच्छा.. शक्यतो मेट्रोनी प्रवास करा, कारण आता बहुतेक ठिकाणी जायला ती उपलब्ध आहे.. ऑटो/टॅक्सी वाल्यांच्या नादी लागलात जास्त तर "दिल्ली का ठग" ह्यावर प्रथमपुरुषी अनुभव सांगु शकाल दुसर्‍यांना .. ;-)

पुरानी दिल्ली/ चांदनी चौक भागात खायला प्यायला आणि खरेदी करायलाही भरपुर जागा आहेत.. कुठे खायचं ते आपल्या पाचनशक्तीवर ठरवा आणि हो, पाणी जरा सांभाळून प्यावे. बाटलीबंद वापराल तर चांगले. तरीही ते रस्त्याकाठी "थंडा पानी ५० पैसे"वालं एकदा तरी प्याच.. ;-) इथून पुढे एका रस्त्यावर पुस्तक बाजार लागतो बराच मोठा (नाव आठवत नाहीये)..

पालिका बझार, करोल बाग, गफ्फार मार्केट इथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची चांगली व्हरायटी मिळते, पण खरेदी जरा सांभाळून आणि सावधपणे.. वर यकु म्हणालेत त्याप्रमाणे लाँग टर्म व्यवहारात दिल्लीवाले गोडगुलाबीने वागतात. पण एकदाच्या खरेदीत फटका द्यायलापण तिथले दलाल, विक्रेते मागेपुढे पाहत नाहीत..

रोडसाईड कपडे आणि इतर शॉपिंग करीता जनपथ आणि सरोजिनी मार्केट बेष्ट.. दिल्ली हाटला भेट देता आली तर बघा..

पुराना किल्ला, हुमायूंन मकबरा, जामा मस्जिद ह्यांना भेट द्या.. लाल किल्ला, कुतूब मिनार तर फेमस आहेतच.. एखाद दिवशी शांतपणे सचिवालयला मेट्रोनी उतरुन राष्ट्रपती भवन, संसद आणि इंडीया गेट भटका.. गुडगावला मॉल्सच्या चकाचौंधच्या मागे झोपडपट्ट्या आणि बकाल वस्तीही आहे, सो बी केअरफुल..

चंदीगडवरुन शिमला जवळ पडतं.. मसुरी दिल्लीवरुन जवळ आहे. रात्रीची देहरादुन स्पेशल पकडलीत तर रात्री अकराला असे निघुन सकाळी-सकाळी मसुरीला पोहचू शकाल..

थोडं सावधपणे, जास्त अ‍ॅडव्हेचरीझ्म न करता दिल्ली मस्तपैकी एंजॉय करता येते.. आणि हसून, प्रेमाने बोललात तर कुठेही चांगलाच रिस्पॉन्स मिळतो हो.. खाओ, पिओ, ऐश करो.. मजा करा आणि मग आमच्याशी शेयर करा..

इरसाल's picture

5 Apr 2012 - 1:56 pm | इरसाल

कोणताही किंतु मनात न बाळगता या. मी आहेच गुरुग्रामात म्हणजेच गुडगावात.
प्रथम तर वरील काही प्रतिसाद वाचुन मला गुडगावाची भिती वाटायला लागली आहे. असो. काही प्रतिसाद ऐकून मत बनवलेले किंवा ५/१० वर्षापुर्वी लागु पडतील असे आहेत.
तुम्ही तुमची चौकट दाखवलीत तर ते तुम्हाला ग्यालरी दाखवतील. म्हन्जे तुम्ही स्मित हास्य करा ते मन मोकळे हसुन तुमचे होतील.
आता तुमचे मुद्दे......
१.राहण्याची व्यवस्था कंपनीनं केलीए गुडगावला. आता गुडगावला राहायचं म्हणजे तिथलं एकूणच वातावरण्/संस्कृती कशी आहे, ह्याबद्दल सल्ला हवाय(बहुतेकांनी सल्ला दिलाय की तिथे उगी कुणाशी डोके लावत बसू नकोस म्हणून. कधीही घोडा/चाकू/कृपाण वगैरेचे दर्शन होउ शकते म्हणे.)
जर कंपनीने रहायची व्यवस्था केलीय तर अतिउत्तम आहे. एरिया सांगाल तर अधिक बरे होइल. संस्कृती म्हणाल तर सगळी सरमिसळ आहे. अंदाजाने ५००/६०० मराठी कुटुंबे आहेत गुडगावात. डोके लावायचे म्हणजे दोन्ही बाजुने एक पराठा शेकेल इतकी उष्णता निर्माण होवून( भें...., मा....., भे. के.. वैगरे ची आहुती पडुन) जो तो आपापल्या वाटेला, क्वचित मारामारी घडते.

२.संपूर्ण NCR(दिल्ली+नवी दिल्ल ी+नोयडा+गुरगाव) मधली आवर्जून जावीत अशी खादाडीची ठिकाणं कुठली?
"खाण्यासाठी जन्म आपुला" ह्या तत्त्वावर इथे लोक वावरतात.
दिल्ली : करीम्स ... जामा मस्जिद गेट नं. १ समोरच्या गल्लीत.... शा. मां. दोन्ही अति उत्तम वाजवी किंमत
राजेंद्रदा ढाबा ... हौज खास... तंदुरी साठी प्रसिध्ह, खास करुन पार्सल अशी तंदुरी दुसरीकडे कुठे मिळणार नाही.
मोती महल.... दिल्लीत खुप आहेत..... ह्यांच्याबद्दल काय बोलावे....उत्कृष्ट
चांदनी चौक....पराठेवाली गली....काही टिपीकल दुकानात ३५ प्रकारचे पराठे मिळतात, तिकडेच घंटेवाला हलवाइ आहे.
आणी हो तिथल्या शीशगंजवाल्या गुरुद्वारामधे जायला विसरु नका, खासकरुन कडाह प्रसाद साठी.
गुडगांव.
सुरुवात हल्दीरामपासून...... शाकाहारींसाठी उत्तम.
सेम बिकानेरवाला,
साउथ इंडियन हवे नैवेद्दम उत्तम, किंवा मग सागररत्न .... अजुन चव टिकवुन आहेत.
बाजुलाच पिंड बलुची......मधे घुसताच पंजाबातल्या गावात घुसलो की काय असा संशय लाजमी. अजुनही पितळी मोठ्या ग्लासात पाणी, लस्सि किंवा तत्सम पदार्थ देतात. थोडे महाग आहे आणी सध्या चवही ढासळलीय.
सेक.१५ ढाबा राज महल......मस्त मस्त मस्त........मित्रमंडळींच आवडतं ठिकाण
मदनपुरी गुडगाव हरीओम रसोइ.......शाकाहारींसाठी स्वर्ग.
इतके बास कि खाली सरकु.....राजस्थानकडे......
अरे हो चंदिगढ रस्त्यावर कुरुषेत्र जवळ "हवेली" मस्ट
३.दिललीत पाहणयासारखे काय आहे?
कुतुबमिनार, लोटस टेंपल, हुमायुंचा मकबरा, जामा मस्जिद, लाल किल्ला,संसद भवन, राष्ट्रपती भवन, इंडिया गेट,अक्षरधाम मंदिर्,खूनी दरवाजा, पालिका बाजार, गफार खान मार्केट, सरोजिनी नगर मार्केट, नेहरु प्लेस इ. इ.

४.तिथली अनवट ठिकाणं कुठली?(जसं पुणे म्हटल्यावर शनिवारवाडा,शिंदे छत्री सारेच सांगतात, पण भुलेश्वर्,बनेश्वर ही ठिकाणंही आवर्जून जावीत अशी आहेत,पण कमी लोकांस ठाउक आहेत.)
वरील उत्तर लागु.
५.पूर्वी अप्पूघर होते, अजूनही सुरु आहे काय? नसेल तर अजून कुठले adventure sports आहेत काय?(कोकणात/सह्याद्रीत बर्‍याच ठिकाणी बंजी जम्पिंग्,पॅराग्लायडिंग वगैरे सुरु आहे तसे काही)
अप्पुघर मधे बंद केले होते.कायम साठी....पण स्टे आला होता सध्याच माहीत नाही.हरी द्वार ऋषीकेश मधे बंजी जम्पिंग्,पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग करायला मिळेल.

६.सध्या कोण कोण इथले जालवासी तिथे आहेत? ह्यापूर्वी कुणाचं वास्तव्य होतं काय?
मी हाय ना ;)

७.दिल्लीत राहिल्यावर दोनेक दिवसाची वीकांतास सुट्टी काढली तर आसपास जाण्यासारखं काय काय आहे? जसं पुण्यात दोन्-तीन दिवसांची सुट्टी काढली की जाण्यासारखं म्हणजे गोवा. तसच काहिसं.
वक्के. २ दिवस सुट्टी घ्या ... आगरा, मथुरा, जैपुर, हरीद्वार, ऋषीकेश, कुरुषेत्र, अमृतसर मधे सुवर्ण मंदिर किंवा जालीयांवाला बाग(एथे अमृतसरी नान खाणे आणी अमृतसरी पापड खरेदी विसरु नये) किंवा ३ दि वस सुट्टी असेल तर "जै माता दी" वैष्णोदेवी, तिथेच जम्मुला रघुनाथ टेंपल (३३ कोटी देव एकाच ठिकाणी भेटतील )

८.देहरादून्/मसूरी,चार धामांपैकी काही धाम ह्यापैकी कुठेही दिल्लीहून जाणे सोपे आहे की चंदीगडहून?
दोन्ही कडुन सारखेच पडतील.

९.अ‍ॅग्रो टुरिझम असे काही पंजाब्-हरयाणा-दिल्ली पट्ट्यात आहे का? कोणते ठिकाण आहे?
खास त्या भूभागात म्हणवली जाणारी सुपीक जमीन, भल्ल्या मोठ्ठ्या नद्या,भरपूर दहि-दूध -लोणी-तूप्,फळे-भाजीपाला ह्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर कुठे जावे? म्हणजे एखाद्या ठिकाणी खास शेतात दोन्-चार दिवस रहायचे सोय आहे का?
पूर्ण हरयाणा-पंजाब शेतीवाला प्रदेश पण आताश्या कंपन्यांमुळे कमी होतोय. पण अजुनही गावाकडे शेतीवरच भर, हिसार, कुरुषेत्र, कैथल, जींद वगैरे कडे जावु शकतो. शेतात रहायचे माहीत नाही.
१०.मोबाइलचे काय करु? सध्या माझ्याकडे एअरटेल पोस्टपेड आहे. तिथे नवीन कार्ड घ्यावे काय? कोणते घ्यावे? आहे त्या एअरटेलचे काय करावे? एखादी भारी स्किम ठाउक आहे का?
सध्या तिकडचा घेवुन या. नवा नं. घेइपर्यत. इकडे व्होडाफोन्चे नेटवर्क छान आहे.(माझा आयडिया आहे उगाच गैरसमज नको) १२५ रु. प्रिपेड मधे १०८ रु. चा टॉकटाइम .
११.दोनेक दिवसात मी निघेन.पण २६एप्रिलला नागपूरला मित्राच्या लग्नासाठी जाय्चे आहे. त्यासाठी दिल्ली-नागपूर व नागपूर्-दिल्ली असे विमान तिकिट काढावे म्हणतोय.
कुठले तिकिट काढणे इष्ट होइल? जिथे तिकिट काढल्याने रोख डिस्काउंट किंवा इतर एखादे कूपन मिळते अशी एखादी वेबसाइट आहे काय ?(प्रीपेड मोबाइल आम्ही एका वेबसाइटद्वारे चार्ज केला तर चार्ज जितक्याचा केला, तितक्याचे आम्हाला मॅक डी चे कूपन्स मिळतात. तसे काही आहे का?)
गोआयबिबो बघा,
१२. तिकडे चाललोच आहे तर एवढ्या दूर जाणे होतच आहे तर अजून काय काय करणे शक्य आहे? (तुम्ही अयदी द्या, सगळ्या गोष्टी नाही करता येणार ह्याची कल्पना आहे. पण दिलेल्या यादीपैकी सर्वात आवडलेल्या/सोयीस्कर गोष्टी तरी केल्या जातीलच. तेव्हा यादी लांबलचक होइल, ह्याची चिंता नको.
मला भेटा.;)
१३. मुळात जाणे टाळायचे असेल तर बॉसवर भानामती वगैरे करून त्याच्याकडून इथलीच असाइनमेंट घेण्यासाठी एखादा खात्रीशीर मांत्रिक वगैरे आहे काय? उपाय न झाल्यास तो पैसे परत देइल काय?
अनुभवी मिपाकर सांगतीलच.
१४.खन्ना,बात्रा,लोधी.सोधी,पहवा,सिंघानिया,चोप्रा,कपूर्,बन्सल,कक्कड, तन्नेजा,रहेजा,चौहान,वासन ही नावे व दिल्ली-पंजाब्-हरयाणा ह्यांचे कल्चर (संस्कृतिक वातावरण) म्हणजे सध्या बॉलीवूड मध्ये दाखवले जाणवले धत्तड्-तत्तड,पोषाखी ,भरजरी कल्चरच ना?
हो अगदी अगदी, जर चानस मिळाला तर एखाद्या लग्नात घेवून जाइन म्हणतो......

सल्ला : गुडगावातुन दिल्लीला जायला शक्यतो मेट्रो वापरा डोक्याला कमी ताप आणी खिसा कमी हलका होइल.मेट्रो जवळ जवळ सगळ्या एतिहासिक जागा जोडते. फक्त मेट्रो स्टेशनला जायला जी ऑटो/सायकलरिक्शा कराल त्याच्याशी मजबूत घासाघीस करा. सायकलरिक्शावाल्यशी सुरुवातीला तुमचे कोमल मन धाजावणार नाही, एवढ्या उन्हात ओढतोय, बिच्चारा ,किती लांब घेवून आलो असे विचार येतील पण ते ५/६ दिवस टिकतील.नंतर त्यांचे उपद्व्याप पाहुन त्याच्यात बसता बसता विचार कराल कि ह्याचे कंबरडे कसे मोडु.
दिल्लि एयर्पोटवरुन सरळ तिथे असलेल्या दिल्ली पोलीस प्रिपेड बूथ्वर जावून ट्याक्सी बूक करा. बाकीचे लूट आहेत.

दमलो हो बाकीचे नंतर चालेल काय ?

मन१'s picture

5 Apr 2012 - 2:15 pm | मन१

ह्याला म्हणतात प्रतिसाद.
रेखा जसं अमिताभ(त्याचं नाव न घेताही) बद्दल न थकता बोलते, द्रविड जसा न थकता सगळय गोलम्दाजांचे घामटे निघेपर्यंत धीराने उभा ठाकतो तसा हा सविस्तर प्रतिसाद.
प्रथम तर वरील काही प्रतिसाद वाचुन मला गुडगावाची भिती वाटायला लागली आहे.
:)
अजूनही येउ द्यात्.आम्ही वाचतोय. भविष्यातही जे येतील त्यांच्या कामालाच येइल ही माहिती.

इरसाल's picture

5 Apr 2012 - 2:31 pm | इरसाल

एवढा कसा काय टायपलो मलाच माहीती.

अहो गवी, तेव्हडी टंच्निका देता काय दोन दिवस मोठा प्रतिसाद टायपेन म्हणतो. ;)

विश्वास सार्थ ठरवलास मित्रा. :)

(खालचा नैवेद्य पावलेला) - गणपती ;)

प्रज्ञा साठे's picture

5 Apr 2012 - 3:54 pm | प्रज्ञा साठे

गुरगाव मध्ये मराठी कुटुंबे आहेत त्यांचे काही मंड ळ आहे का? आपण गुरगाव कुठे?

इरसाल's picture

5 Apr 2012 - 4:41 pm | इरसाल

सह्याद्री गणेश मंडळ,डीएलेफ गणेश मंडळ. इ.इ. काही साउथ वाले ही गणपती बसवतात.
पुराव्यानिशी शाबित करीन.......मागेच एका गणपतीला दुसर्या गणपतीचे फोटो व तमाशाचे ;) व्हिडो धाडले होते.

असो पहिल्याच फो टोत गर्दी कमी वाटत असेल तर त्याला कारणे मागे ८ वा. चालु झालेला सां. कार्यक्रम( (तमाशाचा) म्हणजेच हे सिध्ह होते की त माशा आपली संस्कृती आहे.)





चिगो's picture

5 Apr 2012 - 4:06 pm | चिगो

एवढ्या सविस्तर प्रतिसादानंतर काय बोलणार? खतरनाक..

.>>हरी द्वार ऋषीकेश मधे बंजी जम्पिंग्,पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग करायला मिळेल.

पॅराग्लायडींग माहीत नाही, पण पॅरासेलिंग करता येतं.. रिव्हर राफ्टींग मस्तच.. ऋषीकेशवाला स्ट्रेच हा सर्वोत्तम रिव्हरराफ्टींग रुट्सपैकी एक मानला जातो.. ऋषीकेशपासून जवळच बंजी जम्पिंग आणि फ्लाईंग फॉक्स करता येतं.. आधीच अंदाज घ्या, झेपेल का नाही ह्याचा.. पैसे परत होत नाहीत. ;-)

(रिव्हर राफ्टींग, पॅरासेलिंग, बंजी जम्पिंग आणि फ्लाईंग फॉक्स अनुभवलेला) चिगो..

Avail 10% Discount on basefare of flight tickets booked on www.goindigo.in, use promocode FLYHDFC1 to avail the discount. Offer valid till 15th May 2012.

फोनव.

अमृत's picture

5 Apr 2012 - 2:13 pm | अमृत

सकाळ संध्याकाळ म्हणजे डोक्यातील गुढघ्यात येईल :-) तिकडे उत्तरेत म्हणे सगळ्यांची गुढघ्यातच असते :-) संवाद साधणे सोपे होईल हो... :-)
स्वसंरक्षणाचे धडे घ्या सर्वत्र कामी पडतील...
चिक्कार शिव्या (येत नसल्यास) शिका.. वाक्याची सुरवात व शेवट शिव्यांनीच व्हायला हवा... आणि हो त्या ऐकून घ्यायची तयारी ठेवा... उगाच सगळ्यांना बदलायचा प्रयत्न करू नका... पण तुम्ही बदलणार याची हमी आम्ही देतो :-)
हे सर्व ज्ञान आमच्या प.प्रि. रूममेटससोबतच्या अनुभवांवर आधारीत आहे.

अमृत

टिप : हलकेच घ्या :-) उत्तरेची मोहीम फत्ते करण्यासाठी शुभेच्छा

मन१'s picture

5 Apr 2012 - 2:46 pm | मन१

आम्हाला विमानाने दिल्लीला पाटह्वणयत येतय.
डोमेस्टिक विमान प्रवासात विमान चढताना आणि उतरताना अक्षरशः छळ होतो.
भयानक कान दुखतात. नंतर कित्येक घंटे डोके दुखते, सुन्न झालेले असते.
frequesnt fliers मंडळींपैकी कुनी काही मदत करु शकेल काय?

मोदक's picture

5 Apr 2012 - 5:34 pm | मोदक

१) कानात कापसाचे बोळे घाल..
२) भरपूर पाणी पी.
३) बहुदा कानात दडा बसतो Earwax मुळे.. ( हे Earwax ऐकायला छान वाटते. "कानातील घाण" म्हणजे एकदम डाऊनमार्केट!) ENT कडे जा आणी कानातली घाण असे त्याला मोठ्याने आणि स्पष्ट सांग.. नाहीतर भलताच प्रकार व्हायचा...!!
४) इमर्जन्सी दरवाजा जवळ बसू नको.. हवाई सुंदरी दुनीयेला सुचना देवून झाल्यावर तिथल्या व्यक्तीला पेश्शल सूचना देते.
५) शक्यतो C आणि D Row च्या खुर्च्या बघ.. भरपूर लेगस्पेस मिळतो. खिडकीकडेला बसणे हे फक्त विमान चढताना आणी उतरतानाचे आकर्षण.. विमान हवेत असताना गादी कारखान्यात गेल्यावर दिसतो तसा सगळा कापूसच कापूस दिसतो.
६) विमान पुढे कुठे जाणार आहे ते पण बघ.. विमान जर पुढे हिमालयातील एखाद्या खेड्यात जाणार असेल आमच्यासारखे ट्रेकर विचीत्र ब्यागांसकट आणी काही प्रवासी काहीही वस्तू घेवून बघायची तयारी ठेव. (माझ्या एका मित्राला "लुकला" एअरपोर्टला जायचे होते.. पॅसेंजर कंपार्टमेंट मध्ये माणसांसकट कोंबड्या आणी बकर्‍यापण होत्या तसेच घराच्या छपराचे पत्रेपण होते.)

मृत्युन्जय's picture

5 Apr 2012 - 9:07 pm | मृत्युन्जय

चिंगम खाणे हा सर्वात उत्तम उपाय. कान दुखत नाहीत. :)

एयर इंडियात असशील आणि फुकट चॉकोलेट्स वाटली तर न लाजता भरपुर घे. चघळत बैस. कान दुखणार नाहित.

कापसाचे बोळे फार उपयोगी पडत नाहीत. पण ते आणि चिंगम असा दुहेरी मारा अतिशय परिणामकारक.

आणि हो इन फ्लाइट एंटरटेनमेंट असेल तर चित्रपट बघत बस. हेडफोन कानात घातल्याने आणि वर चिंगम चघळल्यानेदेखील त्रास होणार नाही

सुनिल पाटकर's picture

5 Apr 2012 - 3:13 pm | सुनिल पाटकर

दिल्ली पेक्षा चंदिगड उत्तम...वेल प्लँन्ड शहर आहे राँक गार्डन आवर्जून पहा..पिन्जोर गार्डन ,रोझ गार्डन चांगले आहे.दिल्लीत हुमायूं मकबरा,लाल किल्ला,पुराना किल्ला ,कुतुबमिनार,अक्षरधाम.आझाद हिंद ग्राम,बिर्ला,गार्डन आँफ फाईव्ह सेन्सेस, मंदिर,राजघाट......दिल्ली जवळ वृंदावन ,मथुरा ,आग्रा,हरिद्वार,सारिस्का वाईल्ड लाईफ
.देहरादून् -मसूरी,चार धामांपैकी काही धाम चंदीगडहून जवळ.

Delhi being a strange city where girls are either named Pooja or Neha, they are DTM (Dehati Turn Model). where it’s cold in March, where spoiled brats play loud music in cars, and where everyone is out to steal your stuff.

;-)

प्राध्यापक's picture

5 Apr 2012 - 6:02 pm | प्राध्यापक

आम्ही नाहि हो गेलो कधी दिल्ली ला ,पण मनोबा पानीपतावर नक्की जाउन या.चिमुट भर तीथली माति कपाळाला लावा,आणी चीमुट भर आम्हालाहि घेउन या,तुम्चे वास्तव्य सुखकर होवो.

लग्न ठरलेली मुलगी जशी 'सासर कसं असेल, माझ्याशी सगळे कसं वागतील, सासुरवास तर सहन करावा लागणार नाही ना, अशा शंकांनी आधीच काळजी करत बसते, तसं झालंय का मनोबा तुझं? :)
काळजी करु नकोस. इरसालच्या रुपाने आपलं माहेरचं माणूस आहे तिथं.
मराठी माणसानं बाहेरच्या राज्यात एकमेकांशी फटकून राह्यचं नाही आणि कामाशी मतलब ठेवायचा एवढं धोरण पाळलं, की चिक्कार होतं.

(अवांतर - मागे बिहारी लोकांना मुंबईत धोपटल्याच्या बातम्या तिकडील वर्तमानपत्रांत फारच ब्लोन अप प्रसिद्ध झाल्या. त्या काळात माझा एक मित्र आयटी ट्रेनिंग देण्यासाठी पुण्यातून तिकडे गेला होता. तो महाराष्ट्रातून आलाय कळल्यावर आख्खी बॅच खुन्नसने बघायला लागली. इंट्रोड्रक्शनमध्येच मुलांनी संतप्तपणे 'तुमच्या राज्यात काय चाललंय?' असे प्रश्न विचारायला सुरवात केली. त्यावर आमच्या मित्राने रोखठोक बजावले, 'ट्रेनिंगमध्ये आयटीखेरीज बाकी चर्चा होणार नाही. ज्यांना अफवांवर प्रश्न विचारुन टाईमपास करायचा असेल त्यांच्यासाठी रिसेसमधली केवळ पाच मिनिटे मी देऊ शकेन. पण पुन्हा हा विषय निघणार नाही. चार दिवसांत तुम्ही वेळ वाया घालवलात तर जबाबदारी तुमची असेल.'

रिसेसमध्ये त्याने एकच प्रश्न विचारला, ' तथाकथित मारहाण प्रत्य़क्ष डोळ्यांनी बघणारे तुमच्यात कुणी आहेत का? किंवा कुणाचे नातलग मुंबईहून जीवाच्या भीतीने पळून आलेत का?' यावर अर्थातच सर्वांचे उत्तर नकारार्थी होते. मग माझा मित्र म्हणाला, 'आम्हीही आमच्या राज्यात राहून अशा अफवा हिंदी चॅनलवर पाहिल्या आणि आमच्या परप्रांतीय मित्रांबरोबर त्यांची मनसोक्त टवाळीही केली.' त्यानंतर वातावरण एकदम नॉर्मल.
(तेव्हा काय, अपने कामसे मतलब रखनेका. छे महिने के बाद वापस आनेका. अपनेको चंडीगड की जागीर नै मिली है. काय को टेन्शन लेने का?)

तिकडचे लोक अगदी चकाकच राहतात याच्याशी हजारदा सहमत.
माझी वहिनी ही टिपिकल महाराष्ट्रीय वातावरणात (म्हणजे वरणभात) वाढलेली असूनही गेल्या ४ वर्षात तिच्या पेहेरावात अमूलाग्र बदल झालाय. एक दिल्लीकर मैत्रिण (कपूर) भारतभेटीनंतर आली तेंव्हा ८ ते १० हजाराला एक असे चार पाच कपडे (इतर साधे वेगळे) घेऊन आली. पन्नास हजार रूपये असे खर्च केलेले पाहून "जरा जास्तच वाटतात ना" यावर ती म्हणाली की ही 'इन्व्हेस्टमेंट' आहे. त्यात कसली डोंबलाची इन्व्हेस्टमेंट ते अजूनही समजले नाही. एका पार्टीला घातलेला कपडा पुन्हा घालायचा नसेल तर हे भलतच महाग प्रकरण वाटलं. माझी नंणंद एकेक किस्से सांगते चंदीगडातल्या बायकांचे की नुसतं ऐकत रहावं. घरची गरीबी असली तरी दारापुढे कार हवीच असे विचार असतात.
दुकानात जाऊन एकच कपडा घेऊन येणे हा तर अपमान (स्वत:चा). मी नवा शिवलेला कॉटनचा कपडा घातला तर एका दिल्लीकर मैत्रिणीची आई मला म्हणाली "आजकाल तू अशी का राहतेस? सिल्कचे कपडे का घालत नाहीस?" त्यांना सांगितलं की मी आधीही अशीच रहात होते हे नविन नाही. ;) एका बावा आडनावाच्या मैत्रिणीने तिची खरेदी दाखवून माझे डोळे पांढरे केले होते.

पुण्याचे वटवाघूळ's picture

6 Apr 2012 - 8:19 am | पुण्याचे वटवाघूळ

मनराव,

दिल्ली शहर माझे अत्यंत आवडते आहे आणि विशेषतः तिथली मेट्रो. दिल्ली मेट्रोवरील युट्यूबावरील http://www.youtube.com/watch?v=V9VO5lShb1A हे गाणे नक्कीच बघा. तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे म्हणून मुद्दामून देत आहे.

चित्रगुप्त's picture

6 Apr 2012 - 8:31 am | चित्रगुप्त

तुम्हाला नेमके काय आवडेल हे ठाऊक नाही, तरी काही जागा अश्या:
१. पुराना किल्ला
२. या किल्ल्याजवळच असलेले 'क्राफ्ट्स म्युझियम (दोन्ही जागा शांत, रमणीय, झाडे, हिरवळ.. म्युझियम मध्ये उत्तम दर्जाच्या हस्तकलेच्या वस्तु प्रदर्शित आहेत, आणि विकतही घेता येतात).
३. जनपथ वरील 'कोटेज एम्पोरीयम' वस्तू महाग, पण बघण्यासाठी उत्तम जागा.
४. दिल्ली हाट : (इथे चिपळूणकर यांनी चालवलेल्या महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांच्या दुकानात भाकरी पासून पुरणपोळी पर्यन्त सर्व पदार्थ मिळतात).
५. लोधी गार्डन व जवळच असलेले हॅबिटाट सेंटर.
६. खरेदीसाठे सरोजिनिनगर मार्केटही चांगले, परन्तु दिल्लीत सगळीकडे अविश्वसनीय एवढी घासाघीस आवश्यक. अर्ध्यापेक्षाही कमी किमतीत वस्तू मागावी. विक्रेत्याने अपमान केला तरी निर्ढावल्याप्रमाणे घासाघीस करावी. (आधी जेंव्हा काहीच घ्यायचे नसेल तेंव्हा मुद्दाम बाजारात जाउन कमाल घासाघीस किती करता येते ते बघावे, म्हणजे कल्पना येते) मोठमोठ्या शोरूम्स मध्ये पण जरा सभ्य तर्हेने घासाघीस चालते.
७. तुम्हाला जर प्राचीन अवषेश, मंदिरे, इमारती बघण्याची आवड असेल तर 'शेखावटी' प्रदेशात जावे. (काही गावांची नावे: मंडावा, सिस्लोद, अलसीसर-मलसिसर, चुरु, पिलानी इ.) गुडगाव पासून साधारण पणे २०० कि.मि. असेल. बरीचशी लहान लहान खेडी, भव्य हवेल्या, त्यावर सर्वत्र चित्रकला, किल्ले, छत्र्या, इ. बघण्यासारखी आहेत. किमान एक रात्र मुक्काम करून फिरावे. रस्ते उत्तम आहेत.

आत्मशून्य's picture

6 Apr 2012 - 3:48 pm | आत्मशून्य

हॅहॅहॅ :)

मन (भाउ) जावा, जिवाची दिल्ली करा किंव्हा आणखीही काही करा ;) , पण मस्त मजा करुन या. मनापासुन शुभेच्छा. जाण्यापुर्वी हा चित्रपट बघा अंदाज येइलच काय करायचं ह्याचा http://www.imdb.com/title/tt1370429/

मी काय म्हणते, मनसाहेबांना एजंट विनोद आणि ब्लड मनी हे दोन्ही वाईट चित्रपट एकाच दिवशी दाखवावेत आणि दिल्लीला पाठवावं. त्यानंतर घडणारी प्रत्येक गोष्ट चांगलीच वाटेल.;)