✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आमची हद्दपारी दिल्ली -चंदिगडला

म
मन यांनी
Wed, 04/04/2012 - 20:21  ·  लेख
लेख
देवाचिये दादुलेपनाचा उबारा| न साहावेचि साताहि सागरा|| भेणें वोसरूनि राजभरा | दिधली द्वारावती || (अर्थः- देवाधिदेव भगवान श्रीकृष्ण ह्यांच्या तेजाने सातही सागर हैराण झाले व त्यांनी आपल्यातला काही भाग काढून कृष्णांस द्वारकानगरी दिली.) असे आद्य कवी नरिंद्र ह्यांना कृष्णाची स्तुती करताना म्हटलय. बहुतेक आमचेही तेज आमच्या खड्डुस बॉस व सहकार्‍यांना सहन होत नसावे.मला उत्तर भारतात तडीपारीसाठी(डेप्युटेशनवर) पाठवायची म्हणूनच ह्यांनी व्यवस्था केली आहे. मी नको नको म्हणत असतानाही बॉसनी शेवटी दिल्ली-चंदीगढचा प्रोजेक्ट(मोहिम) दिलाच. माझ्या अतुलनीय कौशल्यावर प्रसन्न होउन कंपनी मला थेट तिकडे पाठवते आहे. "दिल्ली अब दूर नही" अशी स्थिती खरोखर आली आहे. ह्यापूर्वी पुण्याच्या पब्लिकपैकी उत्तर भारताच्या राजधानीच्या ठिकाणी आदरणीय श्री शिवाजीराव शाहाजीराव भोसले ह्यांचे व त्यानंतर दक्षिणेत कैक लढाया जिंकलेले सदाशिव(राव/भाउ) चिमाजी भट ह्यांचे जाणे झाले होते म्हणे. पैकी पहिल्यास तिथले वातावरण अजिबात आवडले नाही, व त्या उर्मट लोकांना सुशासन काय असते हे दाखवण्यासाठी त्यांनी परत येउन इथे स्वतःचे स्वतंत्र राज्य उभारले.तर दुसरा असा काही गेला की परतलाच नाही. ह्या सर्व प्रकारामुळे एकूणच मराठी मनांत स्वतःहून सतत दिल्लीला जाउन रहावे असे कधीच वाटले नाही. ह्यापुढील सहाएक आठवडे माझे वास्तव्य दिल्लीला असेल्.त्यापुढील वीसेक आठवडे मी चंदीगडला असेन्.मला आता तुम्ही जालिय मित्र, हितचिंतक ह्यांची मदत लागणार आहे. फुकटात सल्ले हवे आहेत. शंका :- १.राहण्याची व्यवस्था कंपनीनं केलीए गुडगावला. आता गुडगावला राहायचं म्हणजे तिथलं एकूणच वातावरण्/संस्कृती कशी आहे, ह्याबद्दल सल्ला हवाय(बहुतेकांनी सल्ला दिलाय की तिथे उगी कुणाशी डोके लावत बसू नकोस म्हणून. कधीही घोडा/चाकू/कृपाण वगैरेचे दर्शन होउ शकते म्हणे.) २.संपूर्ण NCR(दिल्ली+नवी दिल्ली+नोयडा+गुरगाव) मधली आवर्जून जावीत अशी खादाडीची ठिकाणं कुठली? ३.दिल्लीत पाहण्यासारखे काय आहे? ४.तिथली अनवट ठिकाणं कुठली?(जसं पुणे म्हटल्यावर शनिवारवाडा,शिंदे छत्री सारेच सांगतात, पण भुलेश्वर्,बनेश्वर ही ठिकाणंही आवर्जून जावीत अशी आहेत,पण कमी लोकांस ठाउक आहेत.) ५.पूर्वी अप्पूघर होते, अजूनही सुरु आहे काय? नसेल तर अजून कुठले adventure sports आहेत काय?(कोकणात/सह्याद्रीत बर्‍याच ठिकाणी बंजी जम्पिंग्,पॅराग्लायडिंग वगैरे सुरु आहे तसे काही) ६.सध्या कोण कोण इथले जालवासी तिथे आहेत? ह्यापूर्वी कुणाचं वास्तव्य होतं काय? ७.दिल्लीत राहिल्यावर दोनेक दिवसाची वीकांतास सुट्टी काढली तर आसपास जाण्यासारखं काय काय आहे? जसं पुण्यात दोन्-तीन दिवसांची सुट्टी काढली की जाण्यासारखं म्हणजे गोवा. तसच काहिसं. ८.देहरादून्/मसूरी,चार धामांपैकी काही धाम ह्यापैकी कुठेही दिल्लीहून जाणे सोपे आहे की चंदीगडहून? ९.अ‍ॅग्रो टुरिझम असे काही पंजाब्-हरयाणा-दिल्ली पट्ट्यात आहे का? कोणते ठिकाण आहे? खास त्या भूभागात म्हणवली जाणारी सुपीक जमीन, भल्ल्या मोठ्ठ्या नद्या,भरपूर दहि-दूध -लोणी-तूप्,फळे-भाजीपाला ह्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर कुठे जावे? म्हणजे एखाद्या ठिकाणी खास शेतात दोन्-चार दिवस रहायचे सोय आहे का? १०.मोबाइलचे काय करु? सध्या माझ्याकडे एअरटेल पोस्टपेड आहे. तिथे नवीन कार्ड घ्यावे काय? कोणते घ्यावे? आहे त्या एअरटेलचे काय करावे? एखादी भारी स्किम ठाउक आहे का? ११.दोनेक दिवसात मी निघेन.पण २६एप्रिलला नागपूरला मित्राच्या लग्नासाठी जाय्चे आहे. त्यासाठी दिल्ली-नागपूर व नागपूर्-दिल्ली असे विमान तिकिट काढावे म्हणतोय. कुठले तिकिट काढणे इष्ट होइल? जिथे तिकिट काढल्याने रोख डिस्काउंट किंवा इतर एखादे कूपन मिळते अशी एखादी वेबसाइट आहे काय ?(प्रीपेड मोबाइल आम्ही एका वेबसाइटद्वारे चार्ज केला तर चार्ज जितक्याचा केला, तितक्याचे आम्हाला मॅक डी चे कूपन्स मिळतात. तसे काही आहे का?) १२. तिकडे चाललोच आहे तर एवढ्या दूर जाणे होतच आहे तर अजून काय काय करणे शक्य आहे? (तुम्ही अयदी द्या, सगळ्या गोष्टी नाही करता येणार ह्याची कल्पना आहे. पण दिलेल्या यादीपैकी सर्वात आवडलेल्या/सोयीस्कर गोष्टी तरी केल्या जातीलच. तेव्हा यादी लांबलचक होइल, ह्याची चिंता नको. १३. मुळात जाणे टाळायचे असेल तर बॉसवर भानामती वगैरे करून त्याच्याकडून इथलीच असाइनमेंट घेण्यासाठी एखादा खात्रीशीर मांत्रिक वगैरे आहे काय? उपाय न झाल्यास तो पैसे परत देइल काय? १४.खन्ना,बात्रा,लोधी.सोधी,पहवा,सिंघानिया,चोप्रा,कपूर्,बन्सल,कक्कड, तन्नेजा,रहेजा,चौहान,वासन ही नावे व दिल्ली-पंजाब्-हरयाणा ह्यांचे कल्चर (संस्कृतिक वातावरण) म्हणजे सध्या बॉलीवूड मध्ये दाखवले जाणवले धत्तड्-तत्तड,पोषाखी ,भरजरी कल्चरच ना? --मनोबा
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17302 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

विश्वास सार्थ ठरवलास मित्रा.

गणपा
गुरुवार, 04/05/2012 - 17:51 नवीन
विश्वास सार्थ ठरवलास मित्रा. :) (खालचा नैवेद्य पावलेला) - गणपती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

गुरगाव मध्ये मराठी कुटुंबे

प्रज्ञा साठे
गुरुवार, 04/05/2012 - 15:54 नवीन
गुरगाव मध्ये मराठी कुटुंबे आहेत त्यांचे काही मंड ळ आहे का? आपण गुरगाव कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

हो हो आहेत की

इरसाल
गुरुवार, 04/05/2012 - 16:41 नवीन
सह्याद्री गणेश मंडळ,डीएलेफ गणेश मंडळ. इ.इ. काही साउथ वाले ही गणपती बसवतात. पुराव्यानिशी शाबित करीन.......मागेच एका गणपतीला दुसर्या गणपतीचे फोटो व तमाशाचे ;) व्हिडो धाडले होते. असो पहिल्याच फो टोत गर्दी कमी वाटत असेल तर त्याला कारणे मागे ८ वा. चालु झालेला सां. कार्यक्रम( (तमाशाचा) म्हणजेच हे सिध्ह होते की त माशा आपली संस्कृती आहे.) Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रज्ञा साठे

सविस्तर..

चिगो
गुरुवार, 04/05/2012 - 16:06 नवीन
एवढ्या सविस्तर प्रतिसादानंतर काय बोलणार? खतरनाक.. .>>हरी द्वार ऋषीकेश मधे बंजी जम्पिंग्,पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग करायला मिळेल. पॅराग्लायडींग माहीत नाही, पण पॅरासेलिंग करता येतं.. रिव्हर राफ्टींग मस्तच.. ऋषीकेशवाला स्ट्रेच हा सर्वोत्तम रिव्हरराफ्टींग रुट्सपैकी एक मानला जातो.. ऋषीकेशपासून जवळच बंजी जम्पिंग आणि फ्लाईंग फॉक्स करता येतं.. आधीच अंदाज घ्या, झेपेल का नाही ह्याचा.. पैसे परत होत नाहीत. ;-) (रिव्हर राफ्टींग, पॅरासेलिंग, बंजी जम्पिंग आणि फ्लाईंग फॉक्स अनुभवलेला) चिगो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

विमानप्रवासासाठी डिस्काऊंट हवे आहे का..?

मोदक
गुरुवार, 04/05/2012 - 14:06 नवीन
Avail 10% Discount on basefare of flight tickets booked on www.goindigo.in, use promocode FLYHDFC1 to avail the discount. Offer valid till 15th May 2012. फोनव.
  • Log in or register to post comments

उड्या मारा

अमृत
गुरुवार, 04/05/2012 - 14:13 नवीन
सकाळ संध्याकाळ म्हणजे डोक्यातील गुढघ्यात येईल :-) तिकडे उत्तरेत म्हणे सगळ्यांची गुढघ्यातच असते :-) संवाद साधणे सोपे होईल हो... :-) स्वसंरक्षणाचे धडे घ्या सर्वत्र कामी पडतील... चिक्कार शिव्या (येत नसल्यास) शिका.. वाक्याची सुरवात व शेवट शिव्यांनीच व्हायला हवा... आणि हो त्या ऐकून घ्यायची तयारी ठेवा... उगाच सगळ्यांना बदलायचा प्रयत्न करू नका... पण तुम्ही बदलणार याची हमी आम्ही देतो :-) हे सर्व ज्ञान आमच्या प.प्रि. रूममेटससोबतच्या अनुभवांवर आधारीत आहे. अमृत टिप : हलकेच घ्या :-) उत्तरेची मोहीम फत्ते करण्यासाठी शुभेच्छा
  • Log in or register to post comments

अरे हेही जरा संगा....

मन१
गुरुवार, 04/05/2012 - 14:46 नवीन
आम्हाला विमानाने दिल्लीला पाटह्वणयत येतय. डोमेस्टिक विमान प्रवासात विमान चढताना आणि उतरताना अक्षरशः छळ होतो. भयानक कान दुखतात. नंतर कित्येक घंटे डोके दुखते, सुन्न झालेले असते. frequesnt fliers मंडळींपैकी कुनी काही मदत करु शकेल काय?
  • Log in or register to post comments

कापसाचे बोळे घाल..

मोदक
गुरुवार, 04/05/2012 - 17:34 नवीन
१) कानात कापसाचे बोळे घाल.. २) भरपूर पाणी पी. ३) बहुदा कानात दडा बसतो Earwax मुळे.. ( हे Earwax ऐकायला छान वाटते. "कानातील घाण" म्हणजे एकदम डाऊनमार्केट!) ENT कडे जा आणी कानातली घाण असे त्याला मोठ्याने आणि स्पष्ट सांग.. नाहीतर भलताच प्रकार व्हायचा...!! ४) इमर्जन्सी दरवाजा जवळ बसू नको.. हवाई सुंदरी दुनीयेला सुचना देवून झाल्यावर तिथल्या व्यक्तीला पेश्शल सूचना देते. ५) शक्यतो C आणि D Row च्या खुर्च्या बघ.. भरपूर लेगस्पेस मिळतो. खिडकीकडेला बसणे हे फक्त विमान चढताना आणी उतरतानाचे आकर्षण.. विमान हवेत असताना गादी कारखान्यात गेल्यावर दिसतो तसा सगळा कापूसच कापूस दिसतो. ६) विमान पुढे कुठे जाणार आहे ते पण बघ.. विमान जर पुढे हिमालयातील एखाद्या खेड्यात जाणार असेल आमच्यासारखे ट्रेकर विचीत्र ब्यागांसकट आणी काही प्रवासी काहीही वस्तू घेवून बघायची तयारी ठेव. (माझ्या एका मित्राला "लुकला" एअरपोर्टला जायचे होते.. पॅसेंजर कंपार्टमेंट मध्ये माणसांसकट कोंबड्या आणी बकर्‍यापण होत्या तसेच घराच्या छपराचे पत्रेपण होते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

चिंगम खाणे हा सर्वात उत्तम

मृत्युन्जय
गुरुवार, 04/05/2012 - 21:07 नवीन
चिंगम खाणे हा सर्वात उत्तम उपाय. कान दुखत नाहीत. :) एयर इंडियात असशील आणि फुकट चॉकोलेट्स वाटली तर न लाजता भरपुर घे. चघळत बैस. कान दुखणार नाहित. कापसाचे बोळे फार उपयोगी पडत नाहीत. पण ते आणि चिंगम असा दुहेरी मारा अतिशय परिणामकारक. आणि हो इन फ्लाइट एंटरटेनमेंट असेल तर चित्रपट बघत बस. हेडफोन कानात घातल्याने आणि वर चिंगम चघळल्यानेदेखील त्रास होणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

मस्त

सुनिल पाटकर
गुरुवार, 04/05/2012 - 15:13 नवीन
दिल्ली पेक्षा चंदिगड उत्तम...वेल प्लँन्ड शहर आहे राँक गार्डन आवर्जून पहा..पिन्जोर गार्डन ,रोझ गार्डन चांगले आहे.दिल्लीत हुमायूं मकबरा,लाल किल्ला,पुराना किल्ला ,कुतुबमिनार,अक्षरधाम.आझाद हिंद ग्राम,बिर्ला,गार्डन आँफ फाईव्ह सेन्सेस, मंदिर,राजघाट......दिल्ली जवळ वृंदावन ,मथुरा ,आग्रा,हरिद्वार,सारिस्का वाईल्ड लाईफ .देहरादून् -मसूरी,चार धामांपैकी काही धाम चंदीगडहून जवळ.
  • Log in or register to post comments

९९ चित्रपटातला सायरस म्हणतो

दिपक
गुरुवार, 04/05/2012 - 15:21 नवीन
Delhi being a strange city where girls are either named Pooja or Neha, they are DTM (Dehati Turn Model). where it’s cold in March, where spoiled brats play loud music in cars, and where everyone is out to steal your stuff.
;-)
  • Log in or register to post comments

आम्ही नाहि हो गेलो कधी दिल्ली

प्राध्यापक
गुरुवार, 04/05/2012 - 18:02 नवीन
आम्ही नाहि हो गेलो कधी दिल्ली ला ,पण मनोबा पानीपतावर नक्की जाउन या.चिमुट भर तीथली माति कपाळाला लावा,आणी चीमुट भर आम्हालाहि घेउन या,तुम्चे वास्तव्य सुखकर होवो.
  • Log in or register to post comments

मनोबा अगदी लग्न ठरलेल्या मुलीसारखी काळजी करतोय...

योगप्रभू
गुरुवार, 04/05/2012 - 18:42 नवीन
लग्न ठरलेली मुलगी जशी 'सासर कसं असेल, माझ्याशी सगळे कसं वागतील, सासुरवास तर सहन करावा लागणार नाही ना, अशा शंकांनी आधीच काळजी करत बसते, तसं झालंय का मनोबा तुझं? :) काळजी करु नकोस. इरसालच्या रुपाने आपलं माहेरचं माणूस आहे तिथं. मराठी माणसानं बाहेरच्या राज्यात एकमेकांशी फटकून राह्यचं नाही आणि कामाशी मतलब ठेवायचा एवढं धोरण पाळलं, की चिक्कार होतं. (अवांतर - मागे बिहारी लोकांना मुंबईत धोपटल्याच्या बातम्या तिकडील वर्तमानपत्रांत फारच ब्लोन अप प्रसिद्ध झाल्या. त्या काळात माझा एक मित्र आयटी ट्रेनिंग देण्यासाठी पुण्यातून तिकडे गेला होता. तो महाराष्ट्रातून आलाय कळल्यावर आख्खी बॅच खुन्नसने बघायला लागली. इंट्रोड्रक्शनमध्येच मुलांनी संतप्तपणे 'तुमच्या राज्यात काय चाललंय?' असे प्रश्न विचारायला सुरवात केली. त्यावर आमच्या मित्राने रोखठोक बजावले, 'ट्रेनिंगमध्ये आयटीखेरीज बाकी चर्चा होणार नाही. ज्यांना अफवांवर प्रश्न विचारुन टाईमपास करायचा असेल त्यांच्यासाठी रिसेसमधली केवळ पाच मिनिटे मी देऊ शकेन. पण पुन्हा हा विषय निघणार नाही. चार दिवसांत तुम्ही वेळ वाया घालवलात तर जबाबदारी तुमची असेल.' रिसेसमध्ये त्याने एकच प्रश्न विचारला, ' तथाकथित मारहाण प्रत्य़क्ष डोळ्यांनी बघणारे तुमच्यात कुणी आहेत का? किंवा कुणाचे नातलग मुंबईहून जीवाच्या भीतीने पळून आलेत का?' यावर अर्थातच सर्वांचे उत्तर नकारार्थी होते. मग माझा मित्र म्हणाला, 'आम्हीही आमच्या राज्यात राहून अशा अफवा हिंदी चॅनलवर पाहिल्या आणि आमच्या परप्रांतीय मित्रांबरोबर त्यांची मनसोक्त टवाळीही केली.' त्यानंतर वातावरण एकदम नॉर्मल. (तेव्हा काय, अपने कामसे मतलब रखनेका. छे महिने के बाद वापस आनेका. अपनेको चंडीगड की जागीर नै मिली है. काय को टेन्शन लेने का?)
  • Log in or register to post comments

तिकडचे लोक अगदी चकाकच राहतात

रेवती
गुरुवार, 04/05/2012 - 21:07 नवीन
तिकडचे लोक अगदी चकाकच राहतात याच्याशी हजारदा सहमत. माझी वहिनी ही टिपिकल महाराष्ट्रीय वातावरणात (म्हणजे वरणभात) वाढलेली असूनही गेल्या ४ वर्षात तिच्या पेहेरावात अमूलाग्र बदल झालाय. एक दिल्लीकर मैत्रिण (कपूर) भारतभेटीनंतर आली तेंव्हा ८ ते १० हजाराला एक असे चार पाच कपडे (इतर साधे वेगळे) घेऊन आली. पन्नास हजार रूपये असे खर्च केलेले पाहून "जरा जास्तच वाटतात ना" यावर ती म्हणाली की ही 'इन्व्हेस्टमेंट' आहे. त्यात कसली डोंबलाची इन्व्हेस्टमेंट ते अजूनही समजले नाही. एका पार्टीला घातलेला कपडा पुन्हा घालायचा नसेल तर हे भलतच महाग प्रकरण वाटलं. माझी नंणंद एकेक किस्से सांगते चंदीगडातल्या बायकांचे की नुसतं ऐकत रहावं. घरची गरीबी असली तरी दारापुढे कार हवीच असे विचार असतात. दुकानात जाऊन एकच कपडा घेऊन येणे हा तर अपमान (स्वत:चा). मी नवा शिवलेला कॉटनचा कपडा घातला तर एका दिल्लीकर मैत्रिणीची आई मला म्हणाली "आजकाल तू अशी का राहतेस? सिल्कचे कपडे का घालत नाहीस?" त्यांना सांगितलं की मी आधीही अशीच रहात होते हे नविन नाही. ;) एका बावा आडनावाच्या मैत्रिणीने तिची खरेदी दाखवून माझे डोळे पांढरे केले होते.
  • Log in or register to post comments

दिल्ली मेट्रो

पुण्याचे वटवाघूळ
Fri, 04/06/2012 - 08:19 नवीन
मनराव, दिल्ली शहर माझे अत्यंत आवडते आहे आणि विशेषतः तिथली मेट्रो. दिल्ली मेट्रोवरील युट्यूबावरील http://www.youtube.com/watch?v=V9VO5lShb1A हे गाणे नक्कीच बघा. तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे म्हणून मुद्दामून देत आहे.
  • Log in or register to post comments

दिल्लीत आणि जवळपास काय बघावे

चित्रगुप्त
Fri, 04/06/2012 - 08:31 नवीन
तुम्हाला नेमके काय आवडेल हे ठाऊक नाही, तरी काही जागा अश्या: १. पुराना किल्ला २. या किल्ल्याजवळच असलेले 'क्राफ्ट्स म्युझियम (दोन्ही जागा शांत, रमणीय, झाडे, हिरवळ.. म्युझियम मध्ये उत्तम दर्जाच्या हस्तकलेच्या वस्तु प्रदर्शित आहेत, आणि विकतही घेता येतात). ३. जनपथ वरील 'कोटेज एम्पोरीयम' वस्तू महाग, पण बघण्यासाठी उत्तम जागा. ४. दिल्ली हाट : (इथे चिपळूणकर यांनी चालवलेल्या महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांच्या दुकानात भाकरी पासून पुरणपोळी पर्यन्त सर्व पदार्थ मिळतात). ५. लोधी गार्डन व जवळच असलेले हॅबिटाट सेंटर. ६. खरेदीसाठे सरोजिनिनगर मार्केटही चांगले, परन्तु दिल्लीत सगळीकडे अविश्वसनीय एवढी घासाघीस आवश्यक. अर्ध्यापेक्षाही कमी किमतीत वस्तू मागावी. विक्रेत्याने अपमान केला तरी निर्ढावल्याप्रमाणे घासाघीस करावी. (आधी जेंव्हा काहीच घ्यायचे नसेल तेंव्हा मुद्दाम बाजारात जाउन कमाल घासाघीस किती करता येते ते बघावे, म्हणजे कल्पना येते) मोठमोठ्या शोरूम्स मध्ये पण जरा सभ्य तर्हेने घासाघीस चालते. ७. तुम्हाला जर प्राचीन अवषेश, मंदिरे, इमारती बघण्याची आवड असेल तर 'शेखावटी' प्रदेशात जावे. (काही गावांची नावे: मंडावा, सिस्लोद, अलसीसर-मलसिसर, चुरु, पिलानी इ.) गुडगाव पासून साधारण पणे २०० कि.मि. असेल. बरीचशी लहान लहान खेडी, भव्य हवेल्या, त्यावर सर्वत्र चित्रकला, किल्ले, छत्र्या, इ. बघण्यासारखी आहेत. किमान एक रात्र मुक्काम करून फिरावे. रस्ते उत्तम आहेत.
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ मन (भाउ) जावा, मस्त

आत्मशून्य
Fri, 04/06/2012 - 15:48 नवीन
हॅहॅहॅ :) मन (भाउ) जावा, जिवाची दिल्ली करा किंव्हा आणखीही काही करा ;) , पण मस्त मजा करुन या. मनापासुन शुभेच्छा. जाण्यापुर्वी हा चित्रपट बघा अंदाज येइलच काय करायचं ह्याचा http://www.imdb.com/title/tt1370429/
  • Log in or register to post comments

मी काय म्हणते, मनसाहेबांना

रेवती
Fri, 04/06/2012 - 17:45 नवीन
मी काय म्हणते, मनसाहेबांना एजंट विनोद आणि ब्लड मनी हे दोन्ही वाईट चित्रपट एकाच दिवशी दाखवावेत आणि दिल्लीला पाठवावं. त्यानंतर घडणारी प्रत्येक गोष्ट चांगलीच वाटेल.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा