प्रार्थना

पेशवा's picture
पेशवा in जे न देखे रवी...
4 Apr 2012 - 2:22 am

प्रार्थनेचे हात जुने होत नाहीत, विटत नाहीत, विरत नाहीत
धोकादायक वस्तूंची विल्हेवाट कशी लावतात?
चंद्र उगवलेल्या रात्रीत मल्हार ऐकताना
पाऊस बनून कोसळावेसे वाटते आहे
माझी म्हणावी अशी जमीन उरलेली नाही
माझे म्हणावे असे आकाश उरलेले नाही
वीजा, ढग, सोसाट्याचा वारा ह्यांचा वरखर्च...
रकाने मारलेल्या मन-देहाला झंकारणे झेपणार की नाही?

रात्र उलटताना पुन्हा पुन्हा त्याच दिवसापाशी सोडते
उजेडाची भुक, उजेडाची तहान
घनघोर पसरलेले उजेडाचे रान
उजेडाची श्वापदे त्यांचे स्वप्न-भक्षी दात
उजेडाची भिती मागते माझे प्रार्थनेचे हात...
दिसू लागतो राक्षस श्रद्धेमागे मेलेला
ऐकु येतो शोक मला प्रार्थनेने गाडलेला...
अशावेळेस हात जोडू?
कुणासमोर जोडू?
कसे जोडू ?
का जोडू?

ह्या चंद्र उगवलेल्या रात्रीत
मल्हार ऐकताना वाटते आहे पाऊस व्हावे
माझ्या ह्या प्रार्थनेला पुन्हा कोणावर कोसळण्याआधीच
काही ओलाव्याचे आयाम मिळावे?

अद्भुतरसमुक्तक

प्रतिक्रिया

हे वाचा राव..
काल रात्रीपासून पडलंय तरी या घडीला ६२ वाचने आहेत.

प्रतिमासंपृक्त (!) मुक्तक आवडले.

पियुशा's picture

4 Apr 2012 - 2:43 pm | पियुशा

मस्त !!!!!!

प्यारे१'s picture

4 Apr 2012 - 2:51 pm | प्यारे१

मस्त...!
(बरंचसं भीतीदायक, अंधःकारमय, नेव्हर एन्डींग वाटतंय)

परिकथेतील राजकुमार's picture

4 Apr 2012 - 2:55 pm | परिकथेतील राजकुमार

पण ज्यांना हे मुक्तक / पद्य जे काय आहे ते समजले आहे त्यांनी मला देखील समजवायची कृपा करावी.

यकुशेठ तुमचे समजावणे मला खूप आवडते.

तुमच्या समजावणीचा पंखा

निच

गणामास्तर's picture

4 Apr 2012 - 7:22 pm | गणामास्तर

पराशेठ तुम्ही माणूस आहात कि पंखा? बाकी तुमच्या स्वाक्षरीची उकल झाली बर का.:;)

कवितानागेश's picture

4 Apr 2012 - 3:19 pm | कवितानागेश

मलापण रात्री भिती-बिती वाटते कधीकधी...
मग मीपण प्रार्थना करते....
आणि झोपून जाते. :)

पराशेठ ऐका - एरव्ही आम्ही ही डोंबा'रीगिरी केली नसती. पण खुद्द तुम्ही काही बोलावं आणि आम्ही ते करु नये हे होणे नव्हेंऽ!
ऐका -
मी प्रतिमासंपृक्त कविता म्हणालो कारण या कवितेत मिसळीत नुसते हिरवेगार बटबटीत वाटाणे असावेत तशा प्रतिमा ओळीओळीत विखरुन पडल्या आहेत. हे प्रतिमारुपी वाटाणे आपण आधी वेगळे काढू म्हणजे त्यातली मालमसालायुक्त अस्सल तर्री किती आहे ते दिसेल.
1. प्रार्थनेचे हात (हे पुन्हा जुने होणार नाहीत, विरणार नाहीत)
2. धोकादायक वस्तूंची विल्हेवाट (ही ओळ चुकारपणे मुक्तकात शिरली आहे, आता प्रार्थना करताय तर त्यात धोकादायक वस्तू कुठून आल्या)
3. चंद्र उगवलेल्या रात्रीत मल्हार (मल्हार रात्रीच गातात ना, पुन्हा एकदा कंफर्म करुन घ्‍या! पुन्हा नसती भानगड करायचा कुणीतरी, मल्हार रात्री गात नाहीत! म्हणून )
4. माझी जमीन (ही जमीन शिल्लक उरली नाहीय! ऐकताय ना?? जमीन शिल्लक उरली नाहीय बरसायला.. ;-) )

5. वीजा, ढग, सोसाट्याचा वारा (आता हा गोष्‍टी अगदी फुकट असतात सगळ्यांना, ह्या वरखर्चात कशा घुसल्या? तर काहीतरी काळंबेरं आहे. या खर्च‍िक वीजा, ढग, वारे वेगळेच आहेत. पण इथे मुक्तकाचा आनंद घेताना ते आपल्या नेहमीच्याच ‍वीजा, ढग, वारे)

6. रकाने मारलेला देह (अकौंटींगच्या रजिस्‍टरशी कविची कधीतरी सलगी होती किंवा आहे असे मानायला हरकत नाही. कविराजांनी या रकान्यांचा वापर मानवी आयुक्षात आलेली रखरखीत स्थिती मांडण्यासाठी सूचकपणे केला आहे. एरव्हीही मानवी आयुक्ष चौकट चौकटच झालंय. त्यामुळं त्यात कसले झंकार आणि कसले हुंकार हे बरोबर आहे. आळं मारा.)

7. उजेडाची भूक, उजेडाची तहान (इथून पुढे मात्र सगळे मुक्तक अति रिफाइन्ड आहे.. पण शेवटी प्रार्थनेत सम गाठलीय)
8. उजेडाची श्वापदे, त्यांच दात
9. श्रद्धेमागे मेलेला राक्षस
आणि एवढं सगळं झाल्यावर वरच्या ओळी पाहिल्या तर लक्षात येतं की 'अरे, वर ती प्रार्थना म्हणत होतो, तीचं काय झालं?'
मग राक्षस मेल्यानंतर (पुन्हा श्रद्धेमागचा, श्रद्धेमागे राक्षस असतो? हां, काहीतरी श्रद्धा असली आणि तो माणूस तरीही राक्षसी असला तर तसं असेल. पण तरीही श्रद्धेमागचा राक्षस हे काय पटत नाय.) कुणी शोक करीत नाही तरी 'प्रार्थनेने गाडलेला' शोक कविराजांना ऐकू येतो आहे. म्हणजे मुक्तक जास्त आत शिरलं तर भुसभुसशीत आहे. प्रतिमासंपृक्त मुक्तक आहे, ते नुसतं पहा, त्यात गेलात तर दलदलीत गेल्यासारखं होईल.

आता खरं म्हणजे मेलेल्या राक्षसानंतर, प्रार्थनेने गाडलेल्या शोकानंतर 'हात जोडण्याचा' संबंध नाही. कुणासमोर?, कसे? का? वगैरे प्रश्न मुक्त‍कनिर्मिती करताना आलेल्या आवेशातून उद्भवले आहेत. त्यामागे काही नाही हे वर आपण पाहिलं आहेच.
पुन्हा एकदा चंद्र उगवलेल्या रात्रीत मल्हार आला. आता राक्षस मेला, प्रार्थनेत गाडलेला शोकही ऐकून झाला तरी पुन्हा चंद्र उगवलेल्या रात्रीत मल्हार कसाकाय येतोय? तर त्याचं कारण पुढे आहे. प्रार्थना कोसळण्याआधीच तिला 'ओलाव्याचे' आयाम पाहिजे आहेत. वर सांगितलेला रकाने मारलेला देह ओलाव्याचे आयाम मागतोय!

कविराजांनी त्यांचा मुक्तकाचे असे मृतदेहासारखे केलेले विच्छेदन पाहून हंबरडा फोडू नये ही विनंती !

प्रीत-मोहर's picture

4 Apr 2012 - 3:49 pm | प्रीत-मोहर

=)) =))

अगगगगगगगं...

पहाटवारा's picture

4 Apr 2012 - 4:15 pm | पहाटवारा

स्साला ऊग्गाच नाय .. कविने अद्भुत कॅटेगरि दिलीये कवितेला ..
यक्कु शेठ .. तुमचा पीहेच्डी चा विषय काय होता ??? विच्छेदन वगेरे तर नव्हे ???

यकु's picture

4 Apr 2012 - 4:39 pm | यकु

>>>>यक्कु शेठ .. तुमचा पीहेच्डी चा विषय काय होता ??? विच्छेदन वगेरे तर नव्हे ???

--- असंख्‍य विषय होते हो पीहेच्डीचे.. पण त्या पीहेच्ड्या माझ्या नव्हत्या, माझ्या क्लाएंटसच्या होत्या ;-)
प्रोफाइल वाचा माझं प्लीज.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Apr 2012 - 3:50 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =))

यक्कुशेठ __/\__

आम्ही नतमस्तक झालो हो.

बाकी जाता जाता 'विद्रोही मुक्तक' आहे येवढे म्हणाला असतात तरी काम झाले असते की. ;)

गावकुसाबाहेरचा
परा महार

>>>जाता जाता 'विद्रोही मुक्तक' आहे येवढे म्हणाला असतात तरी काम झाले असते की.

अहो ते शेवटचा टाका मारुन पांढरा कपडा टाकेपर्यंत मला तरी कुठं कळलं होतं?
प्रतिमा जाणवल्या होत्या.

अर्थात हाच त्याचा अर्थ आहे असे मी म्हणत नाही. कविराज जर आवेशात येऊन वेगळा अर्थ सांगते झाले तर तोही ऐकायला मजा येईल.
हे कवी लोक फार कोमल मनाचे असतात. 'पेशवा' यांनी जरुर अर्थ सांगावा ही विनंती.

प्यारे१'s picture

4 Apr 2012 - 4:53 pm | प्यारे१

यकु,

कृ शि सा न वि वि

आधीचं आपरेशन होताना धुगधुगी होती. विद्रोही शब्दाबरोबर प्राण गेला.
च्यायचं. शेवटचा टाका काय, पांढरं कापड काय... काय चाललंय काय???

पुढच्या किंवा पहिल्याच समांतर+ विद्रोही + शाहू फुले आंबेडकरवादी + चळवळी साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदाची खुर्ची तुमचीच्च...!

>>>>पुढच्या किंवा पहिल्याच समांतर+ विद्रोही + शाहू फुले आंबेडकरवादी + चळवळी साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदाची खुर्ची तुमचीच्च...!

---- त्या खुर्चीवर आम्ही स्वत:च्या हातानं पराशेठला नेऊन बसवू आणि आम्ही खाली हिरव्या चव्हाळ्यावर पब्लिकमध्‍ये बसू ! वर वाचा पराशेठच्या स्वाक्षरीत काय लिहिलंय ते ;-)

माणणीय परा हे खुर्चीवर बसले काय आनी नाय बसले काय.....

त्ये आमच्या रुधयशिंहासणावर विराजमाण झालेले आहेतच.
त्यां णी ह्यावेळेला णम्र भूमिका घेऊन तुम्हालाच खुर्चीवर बसवायचा जो ऐतिहाशिक णिर्नय घेतलेला आहे त्याबद्दल आमच्या हिर्दयातले त्यांचे स्थाण आजूणच वर गेलेले आहे. (सोगतः आता का खांद्यावं बस्ता का मा. परा ;) )

(दुस्रं सोगतः कोन म्हनलं रे की परानीच खाज्खुजली टाकली खुर्चीवं)

पराशेट आगे बडो, हम तुमारे सात हय! :)

(परा मारतो आता मला)

परिकथेतील राजकुमार's picture

4 Apr 2012 - 5:41 pm | परिकथेतील राजकुमार

त्यां णी ह्यावेळेला णम्र भूमिका घेऊन तुम्हालाच खुर्चीवर बसवायचा जो ऐतिहाशिक णिर्नय घेतलेला आहे त्याबद्दल आमच्या हिर्दयातले त्यांचे स्थाण आजूणच वर गेलेले आहे.

साला तुम्ही उच्चवर्णीय हे असे परस्पर स्वतःच ठरवून मोकळे होता.

पैसा's picture

4 Apr 2012 - 6:35 pm | पैसा

मुक्तक सगळंच कळलं नाही पण आवडलं. यकुनी लावलेला अर्थ संपूर्ण कळला असं हिंमत करून म्हणते! =))

आत्मशून्य's picture

4 Apr 2012 - 6:45 pm | आत्मशून्य

अद्भुत किती कळलं नाही... पण भिषण नक्कि आहे.

उजेडाची श्वापदे त्यांचे स्वप्न-भक्षी दात
उजेडाची भिती मागते माझे प्रार्थनेचे हात...
दिसू लागतो राक्षस श्रद्धेमागे मेलेला
ऐकु येतो शोक मला प्रार्थनेने गाडलेला...

_/\_

पेशवा साहेब, खर तर ह्या दोन ओळिच पुरेश्या आहेत सगळी कविता काय आहे हे सांगायला.

प्रार्थनेचे हात जुने होत नाहीत, विटत नाहीत, विरत नाहीत
धोकादायक वस्तूंची विल्हेवाट कशी लावतात?

प्रार्थनेचे हात जुने होत नाहीत, विटत नाहीत, विरत नाहीत
म्हणुनच ते धोकादायक आहेत हे तुमच म्हणण जबरदस्त आहे..

कविता खरच आवडली. माणसाच्या आगतिकतेचे अगदि तंतोतंत रुप साकार केल आहेत तुम्हि कवितेत.

मृगनयनी's picture

4 Apr 2012 - 10:50 pm | मृगनयनी

पेशवा'जी.. खूपच्च गूढ आणि गर्भितार्थाने भारलेली कविता उर्फ मुक्तक!!! कीप इट अप!!! :)

ही कविता -अजूनही शनवारवाड्यावर अदृश्य रुपात वस्तव्यास असणार्‍या 'नारायणराव पेशव्यां'नी केलेली वाटते!!!

-
नमुना मुर्लेकर उर्फ नमाबाई गानडे उर्फ मृगनयनी लिमये !!!

*~ घेई अमृताचा वसा... साथ देई माझा सखा.. त्याच्या कृतार्थ डोळ्यांत झुले उंच माझा झोका ~*

पेशवा's picture

4 Apr 2012 - 11:36 pm | पेशवा

कविराजांनी त्यांचा मुक्तकाचे असे मृतदेहासारखे केलेले विच्छेदन पाहून हंबरडा फोडू नये ही विनंती !>>

काळजी नसावी ... पण यकू तुमचे व्यवछेदन कवीते विशयी कही सांगू वा न सांगू तुमच्या कलास्वादाच्य प्रक्रिये विषयी मात्र बरेच सांगून जाते. त्या अर्थाने मृतदेहासारखे विच्छेदन कवीतेच न होता रसास्वादाच्या आपल्या विचारसरणिचे झाले असेही म्हणता येईल नाही का? अर्थ समजाऊन घेताना / सांगताना पडलेले प्रष्ण व त्यांच्या उत्तरासाठीची झटपट वाचताना मजा आली. :-)

सर्व वाचकांचे आभार ...

यकु's picture

4 Apr 2012 - 11:36 pm | यकु

झालात ना नाराज :(
अहो कलास्वादाची प्रक्रिया, रसास्वादाची विचारसरणी दरक्षणी बदलते (किमान माझी तरी)
ती एकच एक नसते.

यामुळंच म्हणालोय की तुम्ही जरुर या मुक्तकाबद्दल काही सांगा.

पेशवा's picture

4 Apr 2012 - 11:41 pm | पेशवा

यकू गैर्समज नसावा ... नाराज का होउ? कविता तिचा अर्थ वाचणार्यावर अवलंबुन आहे. त्याच्या डृश्टिकोनातुन कविता कशी दिसते हे फार कमी वेळ कळते. आपण अर्थ सांगताना ती तुम्हाला जशी दिसली तशी मांडलीत व ते वाचताना मला मजा आली .. खरच ह्यात नारजी नाही ... कुतुहल आहे इतकेच.

कविता तिचा अर्थ वाचणार्यावर अवलंबुन आहे.

दॅट्स इट !
विच्छेदनही पराशेठनं अर्थ समजाऊन देण्याची मागणी झाल्यानंतरच केलंय ;-)
नाहीतर पहिल्या प्रतिक्रियेत मी 'प्रतिमासंपृक्त' म्हणून शांत बसलो होतोच की.

आपण अर्थ सांगताना ती तुम्हाला जशी दिसली तशी मांडलीत व ते वाचताना मला मजा आली .. खरच ह्यात नारजी नाही ... कुतुहल आहे इतकेच.

आभारी आहे. :)

५० फक्त's picture

5 Apr 2012 - 12:17 am | ५० फक्त

पहिल्या दोन ओळी वाचुन मला आठवतंय की, प्रार्थना हे बायकोचं नाव असावं की काय कुणाच्या तरी ?