म्हणून ......!!

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
30 Mar 2012 - 3:17 pm

म्हणून ............

सावरायचे होते आता सगळ्यांनाच
एकमेकांबरोबर स्वतालाच .............
कुठेतरी बिनसले कि सगळे संपले असे नाही ........
नाती अशी सहजासहजी तुटत नाहीत
..म्हणून..............

झाल्या असतील खुळ्या काही चुका
सुधारून पाहू ना एकदा..........
नाही जगता येत 'तुझ्याशिवाय'
सांगून पाहू एकमेकांना एकदा.........
...म्हणून .................

पाण्यात मिसळलेला रंग जसा
वेगळा करता येणार नाही
तसाच तुझ्या आठवणीचा पसारा
आवरता येणार नाही
दोन श्वासातले अंतरही मोजता येणार नाही
..म्हणून...........

म्हणून..... आज भेटू आपण नव्याने .......
वाट पाहू एकमेकांची आठवणीने ......
मी जरा लवकरच येणार आहे तिथे .......
तू माझ्याबरोबर नसतानाची "मी" आणि मी तुझ्याबरोबर नसतानाचा "तू" ........
बघायचे आहे दोघांना.. .............
..म्हणून ........

कविता

प्रतिक्रिया

निनाद's picture

31 Mar 2012 - 1:36 pm | निनाद

तुमची कविता छान आहे. विषय आवडला.
त्यातला आशावाद आवडला.

पण टिंबे घातल्याने मजा जाते.
पुढच्या वेळी विना टिंबांनी लिहा.

(टिंबे ही मराठी नवकाव्याची ओळख आहे का?)

तुमच्याच कवितेवर आधारीत मला खालीला ला ला शब्द सुचले..

सावरायचे होते मिळूनी या आयुष्याला
तुला, अन जमलेच तर कधी तर मला

बिनसले कोठे सारा आनंद कसा लोपला
थांब तरी अजूनी खेळ नाही हा संपला

रंग नव्या नात्याचा मनी माझा मानला
क्रोधात विटला रंग परी गंध न लोपला

खुळेपण माझे अन अशा चुका झाल्या
सुधारून पाहू एकदा, चालू कसा एकला

तुजविना दिवस गेला काय करू रात्रीला
त्या आठवातच माझा जीव सदा रमला

तू सांग मला मनीचे मी सांगतो तुला
संवादातून मिळे अर्थ एकत्र जगण्याला

अंतर न श्वासात जणु रंग मिळे पाण्याला
आठवांचा हा सागर मनी अथांग पसरला

परत भेटू नव्याने तू मला अन मी तुला
तू कशी दिसे, मी सैरभैर दिसत एकला

सांजसंध्या's picture

31 Mar 2012 - 2:09 pm | सांजसंध्या

निनाद यांनी केललं संस्करण आवडलं.

निनाद's picture

31 Mar 2012 - 2:18 pm | निनाद

धन्यवाद सांजसंध्या