नजरा

रेशा's picture
रेशा in जनातलं, मनातलं
28 Mar 2012 - 10:23 pm

तो झोपेतच यंत्रवत पावले टाकणारा, तेल लावून चापून पाडलेला भांग, गळ्यात अडकवलेली water bag , आईच्या खांद्यावर त्याचे दप्तर , बेफिकीरपणे आई बरोबर पडणार्‍या पावलांत बूट, अंगात uniform , गळ्याला टाय.. आणि रोजचाच प्रश्न आज डब्याला काय? ,... बस stop वर तो आई बरोबर उभा !!

आणि तो बस stop च्या समोरच्या parking lot वर, अंगात half pant , आणि फाटलेला बनियन, चपला वैगरे चैन त्याला परवडण्यातली नव्हतीच, हातात फडका, लोकांच्या कार पुसत तो एकटा उभा ,...

त्यांची नजरा नजर होते: एक नजर बेफिकीर, झोपाळू,घाबरी आणि शाळेत सकाळी जायचे म्हणून काहीशी वैतागलेली,,.. दुसरी अस्वस्थ, काळजीत, उदास त्या पहिल्या नजरेचा हेवा करणारी तरी खूप स्वतंत्र ,...

तो शाळेतून घरी येणारा मस्ती करत, मित्रांबरोबर खेळत, मारामारी करत, waterbag मधलं पाणी एक-मेकांच्या अंगावर उडवत, अवखळ ,.. धबधब्या सारखा,, चिंता काळजी याचे सावटही न पडलेला, चेहऱ्यावर आनंद शाळा सुटलेली असण्याचा आणि घर गाठण्याची घाई, बस यायला थोडा वेळ असतो, मग तो समोरच्या चिंचा बोरांच्या गाडीवर जातो ,,, बोरं घ्यायला ...

आणि तो त्याच गाडीवर छोट्या बहिणीबरोबर बोरं, चिंचा विकत,,, झाडाला दगड मार,,, विकण्यासाठी त्या जमवत,.. सकाळचाच अवतार याचाही.., पण तो स्थिर गाडीवर उभा, चिंचा, बोर विकण्यासाठी मस्त typical स्वरात लावलेला आवाज गाडीवर व्यवस्थित मांडलेली बोरं चिंचा गोळ्या वैगरे ,, चेहर्‍यावर आनंद कोणीतरी गिर्हाईक आलं म्हणून,... चार पैसे मिळणार म्हणून ,.....

त्यांची नजरा नजर होते : एक नजर पुन्हा बेफिकीर, थोडासा रुबाब आलेला असतो आता त्या नजरेत,.. हातातले पैसे खुळखुळवत नजरेत एक हुकमीपण ,.... दुसरी नजर आशाळभूत, सचिंत, गहिरी आणि खूप खूप जबाबदार, एक छोटीशी इच्छा त्या नजरेत दिसते, कधी तरी शाळेत जाण्याची आणि त्या मुलांमधला एक होण्याची,, त्या नजरेत असते एक आशा शिकण्याची आणि पुस्तकातले तक्ते गिरविण्याची

तो T shirt आणि half pant पायात sports shoes , हातात बॉल कधी फुटबॉल चा तर कधी क्रिकेटचा आणि bat सुद्धा, कधी rakets कधी स्केटींग, सायकल तर रोजचीच,.. तो संध्याकाळी, बागेमध्ये मित्रांबरोबर..., खूप खूप ओरडणारा, मस्त मस्त खेळणारा हुशार आणि त्याच्या मित्रांना खूप खूप आवडणारा,.. त्याला खूप मित्र मैत्रिणी आहेत, रोज काही तरी खाऊ आणणारे किंवा त्याचा खाऊ हक्काने मागणारे,..

आणि तो बागेच्या बाहेर भेळ-पुरीच्या गाड्यांवर बश्या विसळणारा, अजूनही सकाळचाच आवतार, अनवाणी पाय आता थोडे थकलेले, तो त्याच्या कडे बघणारा, यंत्रवत अचुक स्वतःचे काम करणारा, बॉल बागेच्या बाहेर आलाच तर तो आत फेकणारा आणि गाडीपासून लांब गेला म्हणून त्या गाडीच्या मालकाच्या शिव्या खाणारा ... तरीही बॉल मात्र अचूक त्याच्याकडे फेकणारा

त्यांची नजरा नजर होते बॉल देता-घेताना: एक नजर आनंदी, खूप खूप बोलकी, फ्रेश, बेफिकीर, थोडीशी गर्विष्ठ, बॉल हातात आल्यावर "त्या" नजरेशी अगदी सहजच संबंध संपवणारी ,.... दुसरी नजर वाट बघणारी बॉल बागेबाहेर यायची,.. आशाळभूत, स्वप्नाळू, थोडीशी दु:खी, कधीतरी त्या बागेत प्रवेश मिळेल या आशेवर दुप्पट जोमाने गाडीवर काम करणारी,..

जेवण वैगरे करून आई बाबांबरोबर cartoons बघून मऊ मऊ गादीत आणि Ac च्या गारव्यात भीती वाटते म्हणून आईचा हात हातात घेऊन, तिच्या प्रेमाच्या उबेत त्या घराचा राजकुमार, "तो" शांत शांत झोपणारा ,.....
समोरच्याच झोपडपट्टीत आई विना भावंडाना चार अन्नाचे घास भारावू शकलो या खुशीत त्या चिल्ल्या पिल्यांचा अन्नदाता त्या घराचा राजा, "तो" जमिनीवर आणि छताचे पांघरूण करून स्वस्थ झोपलेला ,,, डोळ्यात काही स्वप्न घेऊन,.. त्याच्या नजरेला आठवत आणि ती आपल्या भावंडांमध्ये शोधत ....

आणि त्या नजरा: एक bus stop च्या आलीकडे आणि दुसरी त्या पलीकडे बंद पापण्यांत दडलेल्या ....

... रेघोटी

रेखाटनलेख

प्रतिक्रिया

जेनी...'s picture

28 Mar 2012 - 10:31 pm | जेनी...

एक नजर अलिकडची , एक नजर पलिकडची ..
स्तब्ध ,शान्त ,थोडी अवखळ् पण हळवी लहर ..दोन्हि नजरेत निरगसतेची
चित्र उभ राहिल वाचताना .

छान

आचारी's picture

28 Mar 2012 - 10:33 pm | आचारी

अतिशय सु॑दर...........

पैसा's picture

28 Mar 2012 - 10:38 pm | पैसा

दोन्हीतला फरक छान दाखवलात रेशाबै, पण परत... मराठीत इंग्लिशची भेसळ जरा टाळता आली तर बघा! :)

पिंगू's picture

28 Mar 2012 - 11:06 pm | पिंगू

चांगलेच चित्रण केले आहे. आवडले.

- पिंगू

सानिकास्वप्निल's picture

29 Mar 2012 - 1:06 am | सानिकास्वप्निल

खूपचं छान :)
आवडले :)

स्पंदना's picture

29 Mar 2012 - 4:52 am | स्पंदना

चांगल लिहिलय.

५० फक्त's picture

29 Mar 2012 - 7:14 am | ५० फक्त

छान लिहिलंय, थोडासा दुर्लक्षित विषय आहे, त्यामुळं बरं वाटलं वाचुन.

प्रभाकर पेठकर's picture

29 Mar 2012 - 9:26 am | प्रभाकर पेठकर

हे चित्र आणि ते चित्र. रंगवायला अगदी सोप्पं. चांगलंच रंगविले आहे. अभिनंदन.

पण, 'त्या'चित्राच्या नायकाला कधी काही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे का? त्याची 'स्वप्न' पुरी करण्यासाठी काही हातभार लावला आहे का? नुसते काही पैसे देऊन नाही. त्याच्या शिक्षणाचे पूर्ण पालकत्व घेऊन. ते जर आपण करणार नसलो तर नुसत्या चित्रांमधील कृष्ण-धवल आणि सप्तरंगांना अधोरेखित करून आपली जबाबदारी संपणार नाही. सर्वच मिपाकर ह्या मुद्यावर सहमत असतील आणि कुठे न कुठे, काही न काही 'कृती' करीत असतील असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.

अवांतरः पैसा ह्यांच्या विधानाशी १०० टक्के सहमत.

मुक्त विहारि's picture

29 Mar 2012 - 9:55 am | मुक्त विहारि

छान लिहिले आहे...

प्रास's picture

29 Mar 2012 - 10:10 am | प्रास

चांगलं लिहिलं आहे. दोन जीवनांमधलं अंतर व्यवस्थित व्यक्त झालं आहे.

मात्र एक सूचना -

पैसाताईंनी लिखाणातल्या शब्दांबद्दल लिहिलं आहेच पण त्याबरोबर विरामचिह्नांच्या अतिरिक्त वापराबद्दलही सांगावसं वाटतं. स्वल्पविराम आणि पूर्णविराम त्यांच्या त्यांच्या जागीच योग्य दिसतात. तुम्ही त्यांचा जो सढळ उपयोग केलेला दिसतोय तो अस्थानी आणि अयोग्य आहे हे समजून घ्या. कधी तरी काही गोष्टी वाचकावर सोडून देण्यासाठी टिंबांचा वापर होतो आणि तो बर्‍यापैकी वाचकमान्य आहे पण वरच्या लिखाणात त्याचा अतिरेक झाला आहे. त्याचबरोबर टिंबाऐवजी वापरलेले स्वल्पविरामाचे चिह्नदेखिल चुकीचे आहे याचीही नोंद घ्यावी.

पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!

सस्नेह's picture

29 Mar 2012 - 10:57 am | सस्नेह

ही नजरांची जुगलबंदी प्रत्यक्षात पाहायची असेल तर 'चिल्लर पार्टी ' चित्रपट अवश्य पहावा. त्यात तर एक नजर व्हर्सेस अनेक अशी जुगलबंदी लई भारी घेतलीये...
लेख चांगला चितारला आहे.

कपिलमुनी's picture

29 Mar 2012 - 1:06 pm | कपिलमुनी

+१ @ लीना

परिकथेतील राजकुमार's picture

29 Mar 2012 - 1:09 pm | परिकथेतील राजकुमार

छान चित्र रंगवले आहे.

बर्‍याच दिवसांनी काही वेगळे आणि उत्तम वाचायला मिळाले.

पु.ले.शु.

मृत्युन्जय's picture

29 Mar 2012 - 1:23 pm | मृत्युन्जय

खुपच सुंदर. मिपावर अधुनमधुन खुप छान काहितरी वाचायला मिळते त्यातलेच हे एक.

जाई.'s picture

29 Mar 2012 - 1:58 pm | जाई.

छान लिहील आहे
आवडल

गरीब ,मध्यमवर्ग , श्रीमंत असे ३ वर्ग
एखादा श्रींमत मुलगा मध्यमवर्गीय मुलावर ह्याच दृष्टीकोनातून पाहतो.
( आमच्या बालपणी आमच्या समवयस्क अनिवासी भावंडे ) आणि समाजातील श्रीमांतांकडे मी सुद्धा असूयेने पाहायचो;
''च्यायला ८० टक्के मिळवण्यासाठी पिळवणूक तरी व्हायची नाहि त्यांची''.
गरिबांना मध्यम वर्गीयांचे तर त्यांना श्रीमंताचे सुप्त आकर्षण असते,
जिस्म मध्ये जॉन म्हणतो '' जो नही दिल को मिल सखता
दिल को उसी कि ख्वाहिश हे ,
मुझ को दिल से यही शिकायत हे , शिकायत हे.
ताऱ्यांचे बेट ह्या सिनेमात हेच प्रभावीपणे मांडले आहे.
लेख आवडला अश्याच वैविध्य पूर्ण विषयावर लिहित जा.

दोन्ही नजरेन पहाण आवडलं.

धन्यवाद

पुढच्या लेखांमध्ये सुचनां चा नक्कीच विचार करेन आणि चुका सुधारण्याचा पुर्ण प्रयत्न असेल :)

स्मिता.'s picture

29 Mar 2012 - 11:16 pm | स्मिता.

खूप दिवसानी मिपावर टुकार धाग्यांच्या गर्दीत काहितरी छान वाचायला मिळालं. दोन्ही नजरा बोलक्या आहेत. आणखी असे लेखन येवू द्या.

सोत्रि's picture

29 Mar 2012 - 11:56 pm | सोत्रि

खूप दिवसानी मिपावर टुकार धाग्यांच्या गर्दीत काहितरी छान वाचायला मिळालं.

सहमत! छान लेखन!!

प्रास ह्यांनी सांगितलेला सल्ला तेवढा अमलात आणा पुढच्यावेळी मग अजून छान होईल.

- (जिलब्यांच्या अजीर्णावर उतारा मिळालेला) सोकाजी

आत्मशून्य's picture

30 Mar 2012 - 12:03 am | आत्मशून्य

कोणताही अतिरेक टाळुन केलेले अत्यंत सुरेख संवेदनशील व दर्जेदार लिखाण.

वाचताना डोळ्या समोर चित्रच न्हवे तर कथेतील पात्रांच्या मनामधे जे भाव आहेत त्याचे प्रतिबींबही तयार होत होतं. खरोखर छान लिहीत आहात. पुढिल लेखनास शुभेच्छा. :)

प्राजु's picture

30 Mar 2012 - 1:43 am | प्राजु

हा तुमचा लेख आणि http://www.maayboli.com/node/33831 हा लेख एकदमच आले बहुधा, आणि एकाच विषयावर आणि मी सुद्धा ते लागोपाठच वाचले. :)

रुमानी's picture

30 Mar 2012 - 11:08 am | रुमानी

तुमच्या नजरेतिल वेगळी नजर मस्त!
सहज व बोलकी.......

मन१'s picture

30 Mar 2012 - 12:06 pm | मन१

तरीही मनाचा ठाव घेणारं लेखन.
@स्मिता.
खूप दिवसानी मिपावर टुकार धाग्यांच्या गर्दीत काहितरी छान वाचायला मिळालं.
+१

@पेठकर अंकलः-
जबाबदारी घ्यायची म्हटलं तरी बर्‍याच मर्यादा येतात. त्यावर स्वतंत्र धागा होउ शकतो.

प्रभाकर पेठकर's picture

30 Mar 2012 - 8:45 pm | प्रभाकर पेठकर

जबाबदारी घ्यायची म्हटलं तरी बर्‍याच मर्यादा येतात. त्यावर स्वतंत्र धागा होउ शकतो.

अगदी साध्या साध्या गोष्टींपासून सुरुवात करावी. जसे, आपल्या घरी येणार्‍या मोलकरणीच्या, माळ्याच्या, राखणदाराच्या, भाजीवालीच्या मुलां-मुलींच्या शाळेची जबाबदारी (त्यांच्या शाळेत जाऊन मुख्याध्यापकांशी बोलून) घेता येते. त्यात विशेष अडचणी येत नाहीत असा अनुभव आहे.

माझी मावस बहिण पुण्यात भाजीवाल्यांच्या, रखवालदारांच्या, मोलकरणीच्या मुलामुलींची, विनामोबदला शिकवणी घ्यायची. तोपर्यंत नापास होणारी ती मुलं काठावर का होईना पास व्ह्यायला लागली. त्या काळात दरवर्षी परीक्षा होऊन नापास विद्यार्थी त्याच वर्गात पुन्हा बसायचे. आता हल्ली आठवीपर्यंत नापास करीतच नाहीत असे ऐकले आहे. असो.

जबाबदारी घेण खरच छान पण खरच मर्यादा येतात.

@ प्राजू : तुम्ही दिलेल्या धाग्यावरील लेख खरच सुन्दर आणि दोन आयुश्यांमधला फरक दाखविणारा आहे.