सांज साजरी
सखी लाजरी,
आठव बोचरी
रुतली पुन्हा...
पेटलेले रान
उन्हाला तहान
सुन्न वहीचे पान,
मिटले पुन्हा...
दमलेला श्वास
श्रमलेली आस,
अवघडले त्रास
दुर्मुखले पुन्हा...
तू असण्याचे भास
मनाचे खोटे कयास,
निराशेने खास
गाठले पुन्हा...
आशेनेच फसवणे
जगासवे हेलकावणे,
मिळवून गमावणे
घडले पुन्हा...
शुभ्र तेवती वात
काळावरही मात,
एक नवी सुरुवात
भरारले.... पुन्हा!!
-बागेश्री
प्रतिक्रिया
23 Mar 2012 - 7:36 pm | अत्रुप्त आत्मा
व्वा...! झकास...! मला तर ही कवितेची कविता वाटते... :-)
कवितेच्या प्रतिभेसंमंधीची कविता,
ती येते आणिक जाते येताना कधी कळ्या आणिते...
अन जाताना फुले मागिते..ती येते आणिक जाते....
23 Mar 2012 - 8:04 pm | पैसा
तुमच्या कविता सुंदर आहेत!
23 Mar 2012 - 8:16 pm | यकु
>तू असण्याचे भास
>मनाचे खोटे कयास,
>निराशेने खास
>गाठले पुन्हा...
>आशेनेच फसवणे
>जगासवे हेलकावणे,
>मिळवून गमावणे
>घडले पुन्हा...
अल्पाक्षरी शब्दयोजना आवडली.
23 Mar 2012 - 10:15 pm | प्रचेतस
कविता आवडली.
24 Mar 2012 - 12:00 pm | स्पंदना
दोन दोन शब्द्..छानच.
24 Mar 2012 - 1:14 pm | वेणू
सगळ्यांचे आभार!!
अपर्णा ह्या खाली लिहीलेल्या ओळींवर मी एक ललित लेख लिहिला आहे (न्माझ्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित आहे तो), तो इथे पोस्ट करते आहे लगेच :)
शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
24 Mar 2012 - 1:29 pm | निश
वेणूजी , कविता आवडली.
अल्पाक्षरी पण कवितेचे भाव सहजच समजावणारी एक तरल मस्त कविता.
24 Mar 2012 - 4:51 pm | प्यारे१
चान चान...!
26 Mar 2012 - 9:14 am | वेणू
धन्यवाद! :)