आसमंती हा बहर बसंती
सरे पानगळ शिशिराची
कोकील कंठी सुरु होतसे
मैफिल ही नव वर्षाची
नवे सूर अन् नवे तराणे
नव्या दिशा, उन्मेष नवा
नवीन स्वप्ने, नवी भरारी
नवी दृष्टी अन् जोश नवा
नवसूर्याचे तेज लेऊनी
सृष्टी गाई गीत नवे
उधळण होता सप्तसुरांची
इंद्रधनुवर रंग नवे
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा !!
प्रतिक्रिया
23 Mar 2012 - 1:34 pm | सांजसंध्या
इतकं लयीत आहे कि वाचताना आपोआप गाणंच झालं... सुरेख !
मराठी नववर्षाच्या शुभेच्छा !
24 Mar 2012 - 1:58 am | जयवी
शुक्रन :)
23 Mar 2012 - 1:42 pm | गणपा
मस्त.
तुलाही नववर्षाच्या अनेकोत्तम शुभेच्छा !!!
24 Mar 2012 - 1:58 am | जयवी
धन्यु :)
23 Mar 2012 - 1:47 pm | पैसा
नव्या वर्षाच्या शुभेच्छा!
23 Mar 2012 - 2:39 pm | पियुशा
अरे वा, पाड्व्याच्या काव्यमय शुभेच्छा आवड्ल्या :)
23 Mar 2012 - 2:40 pm | सुहास झेले
सहीच.... पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा !!! :) :)
23 Mar 2012 - 3:03 pm | चौकटराजा
जयवी, कमी शव्दाच्या ओळी घेऊन काव्य करणे भलतेच अवघड . ते धनू आपण चांगलेच पेलले आहे.
काव्य हा कमीतकमी शब्दांत जास्त काही सांगून जाणारा म्हणूनच थेट काळजला गवसणी घालणारा. या कवितेत आपली आशा, शुभेच्छा
सारे आत कुठेतरी येऊन भि़डले. आता माफी एक कडवे माझे.
नवसूर्याचे तेज लेऊनी
सृष्टी गाई गीत नवे
उधळण होता सप्तसुरांची
इंद्रधनुवर रंग नवे
नवसूर्याचे तेज लेऊनी
सृष्टी गाई गीत नवे,
उधळण होता सप्तरंगी ती,
अस्मानी ते रंग नवे .
( चैत्रात आकाशात इंद्रधनु येणे अशक्य नाही पण शक्यता कमी यास्तव हा बदलाचा यत्न )
24 Mar 2012 - 1:57 am | जयवी
:)
23 Mar 2012 - 4:13 pm | देविदस्खोत
@ सर्व मिपाकरांना "गुढीपाडव्या निमित्त" मनांपासून अनेकानेक हार्दीक शुभेच्छा......!!!!!!! @
23 Mar 2012 - 4:42 pm | अत्रुप्त आत्मा
23 Mar 2012 - 9:07 pm | प्यारे१
पहिल्या कडव्याचा एसेमेस पण आला मला ... नॉन मिपाकर आहे कुणीतरी. :)
कॉपीराईट घेत जा जयवीतै!
24 Mar 2012 - 1:56 am | जयवी
अच्छा........असं पण आहे का...... कमाल आहे !!
कोणीतरी एसेमेस पाठवला म्हणजे त्यांना हे आवडलं... ह्यात आनंद मानायला हवा. पण हे कवीच्या नावाशिवाय पाठवणं कसं थांबवायचं... !!!! कॉपीराईट म्हणजे काय करायचं ?
अशानं कुठल्याही साईटवर लिहिणंच बंद करावं लागेल.
23 Mar 2012 - 9:50 pm | जाई.
छान कविता
24 Mar 2012 - 1:59 am | जयवी
धन्यवाद लोक्स :)