मी .हरवते ........त्याची कथा

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in जनातलं, मनातलं
13 Jun 2008 - 1:14 pm

मी ,वैशाली हसमनीस,वय ५९,शिक्शक म्हणून सेवामुक्त,मुलगा व सून गेल्या महिन्यात नोकरीनिमित्त मलेशियात दाखल झाले.मीही उत्साहात त्याच्याबरोबरच मलेशियात आले.गुड्।घेदुखीने बेजार पण मन मात्र ताज ,सर्व काही बघण्यास उत्सुक,अश्या अवस्थेत कोलालंपूरला गेलो.जेंटीगला जाण्यासाटी पूदुराया बस स्थानकावर पोहोचलो.बसाआरक्श्णाकरिता मुलगा गेला,त्याच्या मागोमाग सूनही मला सांगून गेली.मी पायदुखीमुळे मागे मागे चालत राहिले.बसस्थानकावर खूप गर्दी होती.त्यामुळे मला मुलगा व सून कोटेही दिसेनात.त्यांनाही मी दिसेना.ते मला शोधू लागले व मीही त्या दोघाना.बराच वेळ गेला .माझ्याभोवती चार पाच माणसे जमली.ती काहीतरी विचारीत होती.पण ती भाशा मला येत नव्हती.मनातून खूप भिती वाट्त होती.माझ्याकडे पासपोर्त,फोन,तिथले चलनही नव्हते.पत्त्ता माहीत नाही.सर्व धीर एकवटून मी तिथेच उभी राहून पोलीसाचा शोध घेउ लागले.तो लांबवर उतेभाहोता.आता तोच आपला तारणहार अथवा मारणहार.पण त्याच्यापर्यन्त जाणॅही अवघड होतें.कारण खूपच गर्दी होतीं.तेवध्यात मुलाचा निळा शर्ट दिसला्.हाक मारली.तो धावत आला.ती भेट अविस्मरणीय होती.परदेशवारीचा हा पहिलाच फटका.वयस्कर माणसानी आपल्याबरोबर परदेशात फिरताना कमीत कमी फोन बाळ्गावा ही विनंती.

नृत्य

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

13 Jun 2008 - 1:31 pm | स्वाती राजेश

जेव्हा परदेशात आपण कुठे फिरायला गेलो, तर सोबत मुलाचे व्हिजिटींग कार्ड ठेवावे....
कोणत्याही दुकानात जाऊन फोन करता येतो,(दुकानदाराला रिक्वेस्ट करून), हाताने खाणाखुणा करून...
सोबत फोन असेल तर उत्तमच...पण नसेल तर..

आम्ही हा प्रयोग मुलावर करतो.....त्याच्या खिशात एक व्हिजिटींग कार्ड ठेवतो....:)

अरुण मनोहर's picture

13 Jun 2008 - 3:42 pm | अरुण मनोहर

वाचून असे वाटले की कदाचित तुमचा मुलगा व सून हरवले होते. माझा मुलगा पाच वर्षाचा असतांना सिंगापूरच्या बीझी मार्केट मधे तो (असाच) हरवला होता (असे आम्हाला वाटले होते). नंतर खूप वेळाने दोघांनी एकमेकांना शोधून काढ्ल्यावर आईला त्याचे पहीले वाक्य हे होते- "आई तू कुठे हरवली होतीस?"!!!

जेन्टींगची मजा ह्या हरवण्यातून घेतली की नाही?

हरवणे ही एक relative घटना असावी. :) :)

बहुगुणी's picture

13 Jun 2008 - 8:29 pm | बहुगुणी

माझ्या सासुबाई १९९७ साली लॉस अँजेलिस येथे आमच्याकडे आल्या असतानाची गोष्ट. आम्ही (मी आणि आई) एका महाकाय सुपरस्टोअर मध्ये गेलो असताना भरपूर फिरून खरेदी पूर्ण झाल्यावर चेक आउट लाईन मध्ये उभे असता, पुढील २० एक माणसे पाहून आई म्हणाल्या "माझे पाय आता दुखायला लागलेत, मी तिथे बाकावर जाऊन बसते तुमचं होईपर्यंत"; असं म्हणून त्या चेक आउट काऊंटर २ च्या पलिकडिल बाकावर बसल्या. पुढची १०-एक माणसं सरकल्यावर अचानक तो काऊंटर बंद करून मला आणि इतरांना चेक आउट काऊंटर २० वर जाण्यास सांगितले गेले. मी आईंना खुणेने 'तिथेच बसा, मी परत येतो' म्हणून सांगितले. तो काऊंटर २० निघाला स्टोअरच्या विरूद्द दिशेला! मला तिथे पोचून, पैसे देऊन परत येईपर्यन्त १५ मिनिटे लागली असावीत, पण आईं तो पर्यंत मला गाठायला कंटाळून परत आत शिरल्या, मी अन्य मार्गाने त्यांना शोधायला काऊंटर २ कडे आणि त्या काऊंटर २० कडे, आमची गर्दीत चुकामुक झाली. मला ब्रम्हांड आठवले! पण घाबरून न जाता परदेशात प्रथमच आलेल्या आईंनी एक सर्व्हीस काऊंटर शोधला, त्यांच्या तोडक्या मोडक्या ईंग्रजीत बोलून "माय सन इन लॉ..लॉस्ट्...माय नेम सुधा....एस यु डी एच ए.." असं सांगितलं, त्यानंतर माझ्या नावाचे स्पेलिंग लिहुन दिले, आणि "अनाउन्स प्लि़ज" म्हणून सांगितले. (मी २ वर्षं अगोदर अमेरिकेत येऊनही माझ्या डोसक्यात हे काही सुचलं नाही!), सुरुवातीला मला पब्लिक ऍड्रेस सिस्टीम वरचं 'सुडॅ इज वेटिंग फॉर रॅम ऍट सर्व्हीस काऊंटर" हे काही ३-४ मिनिटे कळलंच नाही, पण अखेर लक्षात आल्यावर मी त्यांना भेटलो, तेंव्हा त्या सर्व्हीस काऊंटर वरील बाईंनी म्हंटलं "यू आर न्यू , आय सपोज. बट गूड फॉर यू, शी हॅज व्हेरी गुड प्रेझेंस ऑफ माईंड. टेक केअर." मनात म्हंटलं "खरंय तुझं, बये! मीच 'केअर' घ्यायला पाहिजे!"

एक काळजी घेता येऊ शकते ती म्हणजे चक्क ऑफिस बॅजसारखे बॅज बनवायचे आणि गळ्यात अडकवून शर्ट्/साडीच्या आत ठेवून द्यायचे.
त्यावर आवश्यक माहिती - ज्याच्या गळयात बॅज आहे त्या व्यक्तीचे नाव, तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नं, .
जेष्ठांकडे मोबाइल देऊन ठेवलात तर उत्तमच! (पण सांभाळणे कधीकधी जिकिरीचे होते.)

ह्या व्यतिरिक्त आपण कोणत्याही मोठ्या मॉल किंवा अवाढव्य ठिकाणी जिथे चुकामूक होऊ शकते अशा ठिकाणी गेलो की आत जाण्या आगोदरच, चुकलो तर कुठे येऊन थांबायचे हे ठरवून ठेवावे. त्यातही जेष्ठ लोकांनी शोधाशोध करत फिरु नये हे ही पक्के करावे म्हणजे त्रास कमी होतो.

(२००७ च्या सप्टेंबरातली एक आठवण. न्यू यॉर्कच्या जॉन एफ केनेडी ह्या अवाढव्य एअरपोर्टवर मी माझ्या मेव्हण्याला सोडायला गेलो होतो. एका लिफ्ट्मधून बाहेर पडलेल्या एक भेदरलेल्या आजीबाई दिसल्या. जाम घाबरल्या होत्या. एशियन वाटत होत्या. चौकशी केल्यावर समजले त्यांना पंजाबीशिवाय कोणतीही भाषा येत नव्हती आणि त्या पाकिस्तानातून आलेल्या होत्या. माझी पंजाबी म्हणजे "ओय पुत्तर, की गल है?" ह्या चार दोन शब्दापलीकडे नाही. सुदैवाने माझा मेव्हणा अस्खलित पंजाबी बोलतो. त्याने चौकशी केली तेव्हा समजले की मुलाबरोबर होत्या आणि चुकामूक झाली. कोणीतरी पंजाबी बोलणारे सापडले ह्याचाच त्यांना एवढा आनंद झाला की काही क्षण त्या भराभरा बोलत राहिल्या. आपल्या भाषेचा केवढा परिणाम आपल्यावर असतो हे आपत्कालीन परिस्थितीत प्रकर्षाने जाणवते. त्या आजीबाई जवळजवळ रडायला लागल्या होत्या. त्यांच्याकडे मुलाचा मोबाईल होता त्या नंबरावर संपर्क झाला आणि पाचेक मिनिटात त्यांची भेटही झाली. आमचेही टेन्शन हलके होऊन आम्ही पुढे निघालो!)

चतुरंग