मी जन्मसिद्ध पार्लेकर. आम्हाला गावच नाही. आई-वडील तसे वऱ्हाडातले, पण आता तिथे कुणाचंच काही आणि कोणी शिल्लक नाही. त्यामुळे आमचं सगळं मुंबई एके मुंबईच. 'सब भूमी गोपाल की' हे तत्व प्रथमपासून पाळल्यामुळे याचं कधी दुःख जरी वाटलं नाही तरी एक शल्य सतत मनात होतं. मग आपल्या मुलांना नि त्यांच्याही मुलांना कुंकवापुरतं का होईना पण एक गाव असावं, गावी जायला घर असावं, खेळाबागडायला अंगण असावं, आपले झाडं लावायचे, शांततेत बसायचे शौक (हो, आता शांतता हा मोठा ऐषारामी शौकच म्हटला पाहिजे) पुरवावेत इ. इ. म्हणून एका टुमदार गावात रिकामा गावठाण भूखंड शोधून, रीतसर कायदेशीर बाबी पूर्ण करून तिथे घर बांधायचं काढलं. किल्ल्याच्या पायथ्याचा गाव. मग काय सोन्याहून पिवळं. सेकंड होम, सप्ताह-अखेर बंगले योजना, रो हाउसेस (नावाची खुराडी) अशा लोकप्रिय योजनांत मुद्दामून न जाता प्रत्यक्ष गावात, एकुटवाणं घर बांधायचं, ज्यात जमीनीचा सात-बाराही स्वतःच्या नावावर असेल म्हणजे जमीनीच्या त्या तुकड्यावर खरीखुरी मालकी असेल म्हणून ही उठाठेव केली. एकही नवा पैसा जास्तीचा न देता, वाट्टेल तिथे वाट्टेल तितक्या वेळी अत्यंत ताप-त्रासदायक चकरा मारून का होईना पण सातबारा नावावर झाला या समाधानात जेव्हा ग्रामपंचायतीकडे घरबांधणीची परवानगी घ्यायला गेलो तेव्हा दाताखाली पहिला दगड आला. पंचायत समिती सदश्श्यांनी सहा जणांचे म्हणून लंपसम् २०००० रु. मागितले. काही दिवस चाल ढकल करून ते दिले. आयुष्यात लाचखोरी करण्याचा हा पहिला प्रसंग. आणि शेवटचाच अशी मनाशी घट्ट गाठ बांधून घरबांधणी सुरू केली. सदस्यांनी दिलेल्या प्रेमळ सूचनावजा आदेशांप्रमाणे बांधणीचं कंत्राट गावातल्याच उपसरपंचाला (हाही विनोदच. यांची बायको खरी उपसरपंच. पण हे भाऊ सगळीकडे स्वतःची ओळख उपसरपंच म्हणून देत फ़िरतात. महिला सक्षमीकरण की जय!). मध्यंतरी अण्णा हजाऱ्यांचं वगैरे आंदोलन होऊन गेलं. एकदा भाऊंना फ़ोन लावला तर म्हणे आता एक आठवडाभर खूप बिझी आहे, गावात भ्रष्टाचार विरोधी रॅली काढायचीए ना! पण आता आमचं बांधकाम पूर्णत्वाकडे जाताना घरपट्टी लागू करण्यासाठी आवेदन केलं तर सगळ्यांसाठी त्याचे पंधरा हजार मागत आहेत. 'नाय हो, आम्ही गावात कुणालाच नाय सोडला' हे स्पष्टीकरण. पैसे द्यायचे नाहीत हे ठरलेलंच आहे पण मला वाटतं की ते देऊन टाकून थोडी मनःशांती विकत घेण्याचा मोह कधीही होऊ शकतो. गावातल्यांना नि पंचायत समितीला नडायला माझी ना नाही. पण या कारणांमुळे मनात शंका निर्माण होतात -
- अशाने आपली तत्वपूर्ती साधली तरी पुढच्या मोठ्या काळासाठी सगळ्यांशी वाकड्यात जाणं हा वेडेपणा ठरेल अशी भीती वाटते.
- पुन्हा 'आहेरे-नाहीरे' वर्ग, शहरचे-गावचे, कदाचित ब्राह्मण-इतर यां अशा भिन्नतांपोटी गावकऱ्यांचा आपल्याबद्दल नेमका काय ग्रह असेल / होईल हेही सांगता येत नाही.
- मोक्याच्या ठिकाणीं बसलेल्या व्यक्तींनी असे पैसे मागणे हा त्यांचा हक्क प्रस्थापित झालेला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून केवळ शासकीय फ़िया भरून आपलं काम होईल असं मानणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे हे वास्तव आहे.
- आनंदाचे चार क्षण अनुभवता यावेत म्हणून बांधलेल्या घराच्या रूपाने नवीन विकतची दुखणी नि मनस्ताप येऊ नयेत!
... तर मंडळी, या मुद्द्यांवर कुणाचं काही म्हणणं, प्रोत्साहन, सल्ला, प्रेरणा, इशारे, अनुभव वा शंका इ. इ. असल्यास अवश्य इथे मांडाव्यात.
प्रतिक्रिया
22 Mar 2012 - 12:11 pm | परिकथेतील राजकुमार
अहो प्रत्येकाचा एक बाप असतो, तो शोधा म्हणजे झाले.
एखादा आमदारपुत्र गाठा, त्याला दोन चार वेळा तुमच्या नव्या आणि सध्या मोकळ्या घरात रेव्ह पार्टीला, श्रमपरीहाराला पाठवून द्या. ;)
22 Mar 2012 - 12:50 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अहो, रोगापेक्षा उपाय भयंकर व्हायचा. पंचतन्त्रातली पक्षी, साप आणि मुंगुस हि गोष्ट आठवली. (किंवा अमोल पालेकर, स्वरूप संपत, शत्रुघ्न सिन्हा आणि उत्पल दत्त चा नरमगरम नावाचा सिनेमा) :-)
बाकी धाग्याच्या विषयावर अनुभव सांगणारे इथे नक्की सापडतील.
22 Mar 2012 - 1:20 pm | परिकथेतील राजकुमार
कुणीतरी पुढाकार घ्यायला नको का ?
आता संधी मिळाली आहे तर धागाकर्त्याने हा उपाय करून बघावा. ह्याचे जे काय परिणाम होतील त्यामुळे इतर अशा प्रकारच्या नाडलेल्या लोकांना नवीन रामबाण उपाय तरी सापडेल, किंवा निदान ह्याचे तोटे झाले तर ते काय असतील ह्याचे ज्ञान तरी होईल ना.
22 Mar 2012 - 1:52 pm | कौन्तेय
मेहेन्दळ्यांनी म्हटलं रोगापेक्षा उपाय भयंकर. मला वाटून गेलं की हाडी मासी मुरलेल्या गळवाला सणक आली म्हणून घरच्या सुरीने कापून काढावे की संयत वैद्यकीय उपचार घेऊन कसे बरे करावे या विवंचनेत असलेल्याला "अहो दारू पिऊन टुन्न व्हा नि वर एक इंजक्शन मारियुआनाचं मारा - बघा दुःख पळतं की नाही" असा सल्ला देण्यासारखं आहे! प्रतिसादातल्या खेळकरपणाचं स्वागत. तुम्ही तुमचं नाव खरंतर 'वस्तुस्थितीतील राजकुमार' ठेवायला हवं. तुमचे शौक वा गहन प्रश्नांवरचे आमदारांच्या रेव्ह पार्ट्या आदि गुलछबू उतारे पाहून तुमचा पत्ता १० जनपथ आहे की काय अशी शंका कुणालाही यावी! येऊ द्या अजून ... (शंका नव्हे, प्रतिसाद)
22 Mar 2012 - 1:40 pm | गवि
प्रचंड अनुभव आहे या गोष्टीचा.. तुमच्या अनुभवांची कार्बन कॉपी आहे असं समजा.. शब्दशः..
आपल्यासारखे कोणीतरी गावगाड्यात भरडले गेले / जात आहे हे पाहून बरं वाटावं की वाईट अशा द्विधा स्थितीत मन आहे..
गावाविषयी आणि गावकर्यांविषयी मला तिडीक बसली आहे.. असा होलसेल तिरस्कार अत्यंत चूक असतो हे माहीत असूनही ते टाळता येत नाहीये.. माझं ठाम मत हे तीन वेगवेगळ्या गावांमधे एकीकडे जमीन/सातबारा इ इ बाबत, दुसरीकडे घर, पंचायत, घरपट्टी, अशा सर्व अनुभवांतून झालं आहे.. ही गावंही कोकण, घाट, खानदेश अशा वेगवेगळ्या जॉग्रफीमधली आहेत.. त्यामुळे गावातली गुंडगिरी, दहशत, प्रत्येक कामात पैसे काढण्याची सरपंच, तलाठी आदिंची हाव, घराशी संबंधित सर्व सिव्हिल वर्क्स तिथल्या स्थानिक कारागिरांकडून करुन घेण्यासाठी धमकीचे फोन हे सर्व सर्व सोसलेलं आहे..
सुतार, मिस्त्री, प्लंबर, बांधकाम व्यावसायिक वगैरे हे लोक स्थानिक असण्याचा आग्रह समजू शकतो, पण ते ज्या गचाळ दर्जाचं काम करतात आणि दुप्पट किंवा तिप्पटही चार्जेस घेतात, त्याउप्पर बाहेरुन माणून आणू दिला जात नाही.. आणलेल्या माणसाला धमक्या / हाणामार्या करुन पळवून दिलं जातं.. आपल्यालाही धडाधड फोन येतात. गाडी भरुन माणसं जमाव करतात..
आणि म्हणे यांच्यासोबत शेजार जमवून आनंदाने रहायचं.. खेड्यातली जमीन कसणे, टुमदार घर वगैरे स्वप्नांचा कचरा झाला आहे....
मी स्वत: ब्राह्मण आहे हे माझ्या कधीच लक्षात नसतं पण त्यांच्या नेमकं असतं.. तस्मात ब्राह्मण असण्यावरुन तर इतकी वाईट वागणूक मिळते की तो तिरस्कार सहन करण्यापेक्षा तिथली शेती स्थानिकांना मातीमोलाने विकून टाकली..
जाऊदे.. त्यातल्या आणखीन आठवणी काढून तपशीलवार देणं म्हणजे धुतलेले हात परत गटारात घालण्यासारखं आहे..
शहरी मित्रांना इतकंच सांगू इच्छितो की शहरातच घराची जुळणी करा.. लहानसा फ्लॅटही बरा.. किंवा मग खेड्यात जाणारच तर गाव विकत घेता येईल इतका जास्तीचा पैसा असला तरच हात घाला त्यात..
22 Mar 2012 - 2:01 pm | परिकथेतील राजकुमार
वरील प्रतिसाद हा अतिशय विद्वेष पसरवणार आहे. सदर प्रतिक्रियेचा व प्रतिसादकाचा मी निषेध करतो.
सर्वच जाती धर्मांना कुठे ना कुठे चुकीची वागणूक ही मिळतच असते. काही काळापूर्वी बामणांनी इतरांना कसे वागवले होते हे प्रतिसादक महाशय विसरलेले दिसतात. ते गावाची गोष्ट करत आहेत, पण एकेकाळी कित्येक जाती-धर्मांना देवळात देखील प्रवेश मिळत नसे हे विसरून कसे चालेल ? अशाच गावांमधून दलितांचे हत्याकांड केल जाते आणि दलित स्त्रीयांना विवस्त्र फिरवले जाते. मात्र अश विषयांवरती कोणी उघडपणे निराशा, शोक व्यक्त करताना दिसत नाही.
अशा प्रकाराच्या प्रतिसादांची निदान मिसळपाव सारख्या निधर्मी संस्थळावरती दखल घेतली जावी अशी अपेक्षा आहे.
22 Mar 2012 - 2:10 pm | कपिलमुनी
सही राहीली की ओ..
परादास आठवले
दुर्लक्षित पँथर
;)
22 Mar 2012 - 2:12 pm | गवि
अपेक्षित प्रतिसाद.. आले छिद्रान्वेषी लोक लगेच..
बाकीची व्यथा काही तुम्हाला दिसली नाही, अन ब्राह्मण शब्द तेवढा दिसला..
हल्ली साधा ब्रा काढण्याची सोय राहिली नाही.. (ब्रा म्हणता ब्रह्महत्या किंवा तत्सम अर्थाने.. )
लगेच अॅट्रॉसिटीचे कोणतेसे कलम लागलेच म्हणून समजा..
गावात कोणत्या जातीचे किती लोक आहेत ते मला माहीत नाही.. पण मला ही जाणीव करुन दिली जाते हे नक्की.
अगदी पहिल्यांदा मी दिवसभर जमिनीच्या सर्व्हे नंबरवरुन माझ्या कै. आजोबांची कोर्टातून सुटलेली जमीन शोधत होतो.. सापडत नव्हती.. शेवटी एका गावकर्याने हलक्या आवाजात मला "बामणाची जमीन म्हणताय का?.." असं विचारलं आणि मग लगेच जमीन सापडली.. असो..
22 Mar 2012 - 2:15 pm | मूकवाचक
हल्ली ब्रा काढण्याची सोय राहिली नाही.. लगेच अॅट्रॉसिटीचे कोणतेसे कलम लागलेच म्हणून समजा..
इथे ब्र काढण्याची सोय राहिली नाही अशी सुधारणा करायला हवी.
22 Mar 2012 - 2:19 pm | गवि
काय ब्रं क्रावं.. बूच लावून केलेल्या सूचनेचं.. ?? :(
22 Mar 2012 - 2:19 pm | परिकथेतील राजकुमार
तो मुद्दाम दखल घेतली जावी अशा प्रकारे लिहिला गेल्याने दिसला.
तुम्हाला माहिती नाही ? मग तुम्हाला तुमच्या जातीमुळे छळणारे तुमचे जातवालेच नसतील कशावरुन ? ज्ञानेश्वरांना देखील छळले होते म्हणे.
अहो तशी पद्धत असते गावाकडे. बामणाचा वाडा, बामणाची विहीर, बामणाची जमिन इ.इ.
आणि काय हो महारवाडा, मांगाची वस्ती शब्द तुम्हाला खटकत नाहीत का ? नुसती 'बामणाची जमिन' शब्द वापरला तर किती लागला तुम्हाला तो.
22 Mar 2012 - 2:22 pm | गवि
पराषेट, मूळ विषयाला धरुन बोला.. फाटे फोडू नका..
गावकरी आणि शहरी लोकांचे त्यांच्यासोबतचे अनुभव असा विषय आहे.. त्याविषयी आपले मौलिक मत द्या.. उगाच धागा ओढत घोंगडी कशाला उसवायची म्हणतो मी... आँ ?!
22 Mar 2012 - 2:27 pm | परिकथेतील राजकुमार
सतत आपल्या जातीवर किती अन्याय होतो हे दाखवणार्यांपैकी तुम्ही एक आहात.
उलट 'वरील लेखात जाती विषयी आलेले वाक्य काढावे' अशी तुमच्यासारख्या समंजस सदस्यांनी मागणी करायला हवी होती. पण शेवटी तुम्हीपण त्यांच्यापैकीच निघालात. आम्ही लोक आता शिकतोय, तुमच्या बरोबरीला येतोय हे तुम्हाला सहन होत नाही.
मी व माझी संघटना तुम्हा लोकांचा निषेध करते. उद्या सकाळी १०.०० वाजता क्रांती चौकात तुमच्या पुतळ्याचे दहन करणार असल्याचे मी इथे जाहिर करतो आहे.
22 Mar 2012 - 2:31 pm | गवि
तुम्ही मला पाहिले असावेत अशी आशा करतो.. पुतळा बनविण्यास केवढे मटेरियल लागेल याचा अंदाज आहे ना? आणि जाळायलाही रॉकेलचा ट्यांकर मागवून ठेवा हो..
-(हितचिंतक) गवि
22 Mar 2012 - 2:35 pm | परिकथेतील राजकुमार
आमचे हित झाल्याने ज्यांना चिंता वाटते ते हे हितचिंतक.
असो..
आम्ही ह्या विद्वेषी बामणी धाग्यावरुन रजा घेतो.
22 Mar 2012 - 2:33 pm | यकु
>>>>१०.०० वाजता क्रांती चौकात तुमच्या पुतळ्याचे दहन करणार असल्याचे मी इथे जाहिर करतो आहे.
---- क्रांती चौकात सध्या पुतळे दहनास मनाई आहे.
तिथे मोठ्ठा फ्लायओव्हर बांधला, आणि दर सहा महिन्याला पाडला जात आहे.
तुम्ही बामणांचे नेहमी येणेजाणे असलेल्या बालगंधर्वसमोर, किंवा बामणांचा बजबजाट असलेल्या पुणे विद्यापीठासमोर उदबत्ती लाऊनच गविंचा निषेध करा! ;-)
22 Mar 2012 - 2:36 pm | गवि
तुला रे मेल्या कोणी शाप दिला.. ? यकुच बरा होतास की..
22 Mar 2012 - 2:45 pm | यकु
इथे केलेली पापकर्मे भोवली हो!
भोगतोय आता किमान हजार वर्षे हा शाप.
(दग्ध आणि शापित) यक्कु.
9 Apr 2012 - 8:01 pm | विजुभाऊ
दहन करायला नेलेला पुतळ्याचे भाडे थकलय. ते लवकर भरा.
22 Mar 2012 - 6:02 pm | बाळ सप्रे
ब्राम्हण्याचा अभिमान/गर्व न बाळगणार्याला पण जन्माने ब्राह्मण असल्यामुळे त्रास देणे हे देखिल निषेधार्थच आहे.. यात कुठेही पूर्वी ब्राह्मणांनी केलेल्या अन्यायाला पाठिंबा नाही..
त्यांचा मुद्दा एवढाच होता.. पैसे खाणे हा एक छळ आणि वर तुमच्याप्रमाणे काही कारण नसताना जातिचा उल्लेख करायचा..
22 Mar 2012 - 2:48 pm | निश
मी स्वत: ब्राह्मण आहे , मला ही गवि साहेब तसा अनुभव आला आहे गावाला.
फरक एव्हढाच आहे की, आम्ही शेती वीकली नाही .
22 Mar 2012 - 3:24 pm | गवि
गावकरी जबरदस्तीने जमीन बळकावून त्यावर बसलेले असते आणि पूर्णतः बेकायदेशीररित्या जमिनीत घुसून बसलेले असूनही त्यांच्याकडे कोणत्याही क्षणी जमिनीवर हक्क सांगण्याची संधी कायद्याने असती तर कदाचित विकावी लागली असती..
असो.. पुन्हा जातीयवाद व्हायचा..
अधिक त्रांगडी न होता तुमचे गावतले सर्व काम पार पडो ही शुभेच्छा..
आमचीही रजा...
22 Mar 2012 - 3:30 pm | निश
खरच असो होउ नये म्हणुन रखवालदार ठेवले आहेत.
आपली जमीन जाण दुसर्या ला तेहि जबरदस्तीने ह्या सारख दु:ख नाही.
22 Mar 2012 - 1:42 pm | स्पा
विमे आणि पराची हि सौजन्यदाहक चर्चा वाचून डोळे पाणावले :D
22 Mar 2012 - 3:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे
तुमच्या डोळ्यांना पाणावाण्याखेरीज काही कामे नाही वाटते सध्या. फडके रोड वर फिरत जा जरा, डोळ्यांना करण्यासारखे बरेच काही मिळेल. फडके रोड नको असेल तर हापिस कॅन्टीन आहे. नाहीतर हापिसातून बाहेर पडून पवईत जा. तिथे पण बरेच काही आहे. ;-)
22 Mar 2012 - 3:29 pm | धन्या
ते दातात सिमेंट भरायला जातात की. ;)
22 Mar 2012 - 5:51 pm | अत्रुप्त आत्मा
@ते दातात सिमेंट भरायला जातात की.>>>
23 Mar 2012 - 12:17 am | सूड
शेवटचा हात मारुन झालाय म्हणे त्या शिमेटवर, त्यामुळे पाणावायला फक्त डोळेच उरलेत. ह्या पावसाळ्यात मिठीला पूर येऊ नये असं वाटत असेल तर आधी स्पाकाकाचे डोळे पाणावणं कसं थांबेल याचा शासनाने विचार करायला हवा.
22 Mar 2012 - 2:17 pm | मन१
एकाच जात्यातले आपण दोन दाणे ....
भरडून जगणे हेच नशिबाचे देणे....
22 Mar 2012 - 2:25 pm | यकु
गवि!!! आवरा!!
राजीनामा मागतोय मला आमचा मॅनेजरऽऽ!
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
=))
कसले 'ब्रा' काढत बसलाय!
22 Mar 2012 - 6:34 pm | चाणक्य
हा हा हा.... भर शांततेत फिस्कन हसलो ना राव. तरी बर बॉस जवळ नव्हता.
22 Mar 2012 - 2:28 pm | ५० फक्त
तुम्ही जर कायमचं त्या घरात राहायला जाणार नसाल तर, तुमच्या मागं मा. श्री. परा, यांनी सांगितलं आहे तसंच होणार आहे तिथं, त्यापेक्षा सरळ तो बाप शोधा, पैसे टाका, काम करुन घ्या, मोकळ व्हा. अगदीच शक्य असेल तर त्यांच्या नावानं एखादं फ्लेक्स वगैरे लावायचं जमवता येईल का तुमचं नाव टाकुन ते पहा आणि मग बघा तुमची सगळी कामं कशी पटकन होतात ते पहा.
22 Mar 2012 - 2:33 pm | परिकथेतील राजकुमार
कोणालातरी माझ्या बोलण्यातले मर्म कळाले तर.
मी तर म्हणतो हे देखील जमत नसेल तर गेला बाजार तिथल्या आमदाराला वास्तुशांतीला बोलवा आणि बघा मजा. ते ही जमत नसेल तर पैसे मागणार्या ४ लोकांच्यात फूट पाडा.
हाय काय आन नाय काय !
22 Mar 2012 - 2:33 pm | सर्वसाक्षी
कौंतेय,
आपला अनुभव कुणी बांधकाम व्यावसायिक आपल्या जाहिरातीत वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेटा मस्त पैकी आपला अनुभव लिहुन खाली ठळक अक्षरात जाहिरात करेल "हे सगळे त्रास सहन करण्यापेक्षा आमच्या प्रकल्पातील टुमदार घरकुल घ्या आणि घराबरोबर मनःशांतीही मिळवा"
22 Mar 2012 - 2:56 pm | सुधीर
सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी नसतात, काही ठिकाणी माघार घेणेच समंजसपणाचे असते. पण जर का हीच तुमच्या आयुष्याची महत्त्वाची लढाई असेल तर पूर्ण ताकदीने लढा आणि जिंकाच! कोण जाणे, त्या गावाबरोबर तुमचही नाव इतिहासात कोरले जाईल?
22 Mar 2012 - 3:27 pm | कौन्तेय
तीनही वाक्यं आशयगर्भ. आभार -
22 Mar 2012 - 3:32 pm | ५० फक्त
सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी नसतात,
असं नव्हे तर, ज्याला आपण लढाई म्हणतो, ती लढाईच नसते, आपला ना तो गोष्टीतला ससा झाला आहे, पाठीवर पान पडलं तरी, आभाळ पडलं म्हणुन जगभर बोंबलत फिरणारा. कुठलीही छोटी गोष्ट आपण लढाई म्हणुन धरुन बसतो आणि मग ती हरली म्हणुन आपणच निराश होतो.
तुमचा पगार किती
तुम्ही बोलता किती
याच चालीवर
आपलं आयुष्य किती
आपण लढतोय किती- असं विचारायची पाळी आली आहे,
एक दिवस असं लढता लढता आपली अवस्था सिकंदराच्या सैन्यासारखी होईल, लढणं नको आणि विजय पण नको पण मायदेशी आपल्या लोकांजवळ जायचं आहे, हा हट्ट धरुन बसु. पण एवढे लांब आलेले असु त्यांच्यापासुन की परत फिरलो तरी त्यांच्याजवळ पोहोचायच्या आधीच आयुष्य संपुन जाईल.
23 Mar 2012 - 12:05 pm | सुधीर
सर्वप्रथम मिपाकर (आणि मायमराठीवर प्रेम करणार्या पाहुण्यांनाही) गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
काही गल्लत होतेय, मला जी लढाई अपेक्षित आहे ती, सदसद्विवेकबुद्धी आणि अंतर्मनाच्या कौलाने दिलेली लढाई! "ह्या लढाईसाठीच जणू आपला जन्म झालाय" असं वाटतं ती लढाई. मग ह्याचा शब्दशः अर्थ घेतला तर, तीच लढाई जी महाराज "स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा" असं म्हणून लढले, तीच लढाई ज्याच्यासाठी वीर बाजींनी खिंड लढवली, तीच लढाई ज्यासाठी नरवीर तानाजी "आधी लगीन कोंढाण्याचं" म्हणून रायबाचं लग्न बाजूला सारून लढले आणि शब्दशः अर्थ नाही घेतला तरी तीच लढाई ज्यासाठी लोकमान्यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" असं म्हणून इंग्रज सरकार विरुद्ध दंड थोपटले, तीच लढाई ज्यासाठी आंबेडकरांनी दलितांवरील अन्याय दूर करण्याचं ठरवलं, तीच लढाई ज्याच्यासाठी कोलंबसाने अमेरिका आणि वास्को-द-गामाने भारतात जायचा मार्ग शोधला, तीच लढाई ज्यासाठी राइट बंधूंनी विमान बनवण्याचा ठरवलं आणि तीच लढाई ज्यासाठी चार्ल्स लिंडबर्गने न्यूयॉर्क ते पॅरिस प्रवास केला! सिकंदर आणि सम्राट अशोक बर्याच लढाया लढाया लढले खरे पण त्या त्यांचा लढाया नव्हत्याच मुळी, कदाचित सम्राट अशोकाची खरी लढाई "बुद्धाच्या शांतीच्या संदेशाचा राज्यात आणि दूर परराज्यात प्रचार करणं" ही असावी.
मला तरी असं वाटतं की, बर्याचवेळा अशी लढाई लढून आपलंच नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असते त्यामुळेच, ती लढावी, का लढू नये अशी द्विधा मनस्थिती होते. इथेच नेमकं, भगवद्-गीते मधलं तत्त्वज्ञान "निर्णय क्षमतेसाठी" मदत करतं पण एकदा का निर्णय झाला की, "कर्मण्ये वा..." ह्या हिंदू तत्त्वज्ञानाला मिपाकरांच्या भाषेत फाट्यावर मारून (तात्पुरता), पाश्चिमात्यांच्या "जिंकण्याची कला"(विनींग थिअरीज) वा "स्फुर्थी मिळवण्याची कला" (मोटिव्हेशनल थिअरीज) (किंवा शिव खेरांच्या "You can win" सारख्या थिअरीज) आत्मसात करून ती लढाई जिंकण्यासाठीच लढता येते.
तुम्ही म्हणता त्यात काहीसं तथ्य असावंही, कारण "युगांतर" मध्ये इरावती कर्वे असंच काहीसं म्हणतात, "माणसाचा प्रवास हा त्याच्या स्वभाव धर्म आणि आचरणाला अनुसरून एका विशिष्ट दिशेने होत असतो, महाभारताची लढाई जिंकूनपण पांडवांना राज्य उपभोगण्याच सुख काही मिळालं नाही". मग ही सगळी "झंजट" का बरं करावी? माहीत नाही. सुख म्हणजे मग नक्की काय? मग भाऊ खांडेकरांच्या सुखाच्या शोधाचं तत्त्वज्ञान मन शांत करतं. ह्या झंजटीमधूनच निरस जीवनाला अर्थ येणार असेल तर ही झंजट व्यर्थ नसावी. बघू आज असं वाटतय खरं, जग सोडायची वेळ येईल तेव्हाच कदाचित कळेल काय खरं आणि काय खोटं! :)
23 Mar 2012 - 1:38 pm | कौन्तेय
दुर्दैवाने 'प्राइसलेस' म्हटल्यावर जे वजन येतं ते अनमोल म्हटल्यावर येत नाही. पण सुधीर, तुमची प्रतिक्रीया पहिल्याच वेळी मी याच व्यापक अर्थाने घेतली होती. म्हणून तर तीनही वाक्यं आशयगर्भ असं लिहून पाठवलं. पण उलगडून दाखवल्याबद्दल आभार. एका पेशल धाग्याचा विषय आहे हा -
चरैवेति.
22 Mar 2012 - 3:24 pm | कौन्तेय
गवि - तुमच्या पहिल्या प्रतिसादात काय समजायचं ते समजलो.
प.रा. - तुमची फूट पाडण्याची कल्पना एकदम भारी [आता १० जनपथाचा संशय आणखी बळावतोय बरं ...]
तुम्हां दोघांचा वाद हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असला तरी संदर्भयोग्य नसल्याने नजरेआड करणे प्राप्त आहे.
५० फक्त - फ्लेक्स जबराट! खरोखर -
सर्वसाक्षी - बिल्डरच्या योजनांपैकी तयार बंगला न घेण्यामागे काही भूमिका होती. त्यातला काही भाग वर दिलाही आहे. बिल्डरांना खुषाल जाहीरात करू द्या. तसंही आजकाल जाहीरात न करताच हे बंगल्यांचे प्रकल्प हातोहात विकले जात आहेत म्हणे. माझ्याप्रमाणे स्वतः खटपटी करून बांधलेले बंगले बिल्डरच्या तयार योजनांपेक्षा दीडेक पटीने महाग पडतात हा स्वानुभव बांधकाम व्हायच्या आधीच आला आहे + डोक्याचा ताप!
अजूनही माझा निर्णय चुकला म्हणायचं नाही मला. या भ्रष्टाचार / लाचखोरीच्या सामान्यीकरणाकडे कसं बघायचं या बाबतीत तुमचं मार्गदर्शन घेतोय हे खरं.
22 Mar 2012 - 4:24 pm | सर्वसाक्षी
कौंतेय,
गेल्या ५ वर्षातला अनिष्ट प्रकार. पूर्व द्रुत महामार्गावर हल्ली संध्याकाळी ७-७.३० नंतर गोदरेज हॉस्पिटलच्या सिग्नलला लोक सर्रास फाट्यावर मारतात. मला हे आवडत नाही आणि पटतही नाही. मात्र एक गोष्ट लक्षात आली की दिवा लाल असूनही सगळी वाहने भरधाव जात असताना जर मी तत्वाखातर तिथेच उभा राहीलो तर मागुन येणारे वाहन मला धडक देईल. जगलो वाचलो तर पोलिस उपदेश करतील "काय राव तुम्ही? जीव मोठा की सिग्नल? असे कसे उभे राहता? जायचे होते सिगनल तोडुन तुम्हीही, जर पकडलच असत समजा तरी ५०-१०० रुपयांचा प्रश्न!"
हल्ली मीही सगळ्या वाहनांबरोबर नाईलाजाने का होईना पण जातो. दिवा लाल असो की हिरवा.
22 Mar 2012 - 3:49 pm | पैसा
लाच न दिल्याने येणारं टेन्शन, वेळ देणं परवडणारं असेल तर ठीक. पण आधीच तुम्हाला पुरेसा त्रास झालेला दिसतो आहे. तो वाढवाल तर घरावर त्या सगळ्याचा किती परिणाम होईल, सगळे प्लस मायनस समोरासमोर ठेवून बघा आणि निर्णय घ्या. एक पक्कं लक्षात ठेवायचं. लढा बिढा ठीक आहे पण आपल्याला हुतात्मा नक्कीच व्हायचं नाही!
22 Mar 2012 - 4:04 pm | कौन्तेय
तणाव नि वेळ दोन्ही खरेतर परवडण्यासारखे नाहीतच.
जटायूची क्षमा मागतो पण "अडविता खलासी पडलो" तरीही "पळविली रावणे सीता" हेही नकोय.
22 Mar 2012 - 3:53 pm | स्वातीविशु
म्हणून वर्षातून किमान एकदातरी गावाला जाऊन मी तुमचा, तुम्ही माझे असे एकत्र राहावे/वागावे. पैसा, नोकरी, शहरी राहणीमान या गोष्टी तर आपल्याजवळ आहेतच, पण थोडे आम्ही रत्नागिरीकर / सातारकर/कोल्हापुरकर / सांगलीकर/मिरजकर / इ.इ. अभिमानाने म्हणवून घ्यावे. :)
मग अशा जमिनजुमला/वाडवडिलांकडून आलेली मिळकत किंवा नविन जागा खरेदी/बांधकाम अश्या प्रकरणात तुमच्या बाजूने नक्कीच कोणीतरी मदतीला धावून येतील. गावच्या लोकांना तुम्ही पैशाने नाही तर प्रेमाने जिंका, तरच तुमची "माझे गाव, गावचे घर" कल्पना अस्तित्वात येईल. :)
(गावी नेहमी आवडीने जाणारी)
स्वाती
22 Mar 2012 - 4:01 pm | गवि
धाग्यावर प्रतिक्रिया थांबवूनही हे वाचल्यावर राहावलं नाही..
"गाव" म्हणजे वरील उल्लेख केलेल्यांपैकी किंवा तत्सम मुळीच नव्हे.. तालुक्याच्या ठिकाणालाही मी शहरच म्हणेन..
गाव म्हणजे ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पोलीसपाटील .. इ इ..
गावगाडा हा प्रकार तुम्ही अनुभवला आहे की नाही हे माहीत नसल्याने याबाबत अधिक विधाने करत नाही..
22 Mar 2012 - 4:05 pm | पैसा
आणि प्रेमाने जिंकणे वगैरे काही तिथे चालत नाही हे मी गेल्या २ वर्षातल्या विकतच्या मनस्तापावरून सांगू शकते.
22 Mar 2012 - 4:27 pm | गवि
पैसाताई,गुहागरजवळ माझं मूळ गाव आहे..
बाकी कोंकण ही माझं आणखी आवडीचं असण्यामागे कारण असं की तुलनेत (तुलनेतच) कोंकणातल्या गावगाड्याच्या पीडा खूपच कमी असतात.. त्यामानाने देशावर विचारु नका.. हातीपायी धड राहिलो तरी बरं म्हणायचं..
कोकणात नुसते उच्चारवात वाद चालतात पण अन्यत्र प्रत्यक्ष हातघाईवर प्रकरणं येतात..
उदा. कोंकणातल्या गावी मी तीनचार वर्षांत एकदा जातो तेव्हा आजुबाजूचे लोक घरी चहाला बोलावतात. तुम्ही आता इकडेच राहायला या वगैरे म्हणतात ... मग हळूच तुमच्या आंबीची खांदी आमच्या हद्दीत येऊन कौलावर आंबे कसे पडताहेत अशा स्वरुपाची कुरकुर करतात..
पण
खानदेशातल्या गावी गेल्यावर लांबूनच शिवीगाळ, जमिनीच्या मोजणीच्या वेळी मोजणीच्या खुणा बुजवणे, जमीनीवर हातभट्ट्या लावलेल्या दिसणे, येताजाता धमक्या देणे, आपण तिथे असेपर्यंत पाळत असे प्रकार होतात. हे आजचे नाही, माझे आजोबा आणि बाबा प्रत्यक्ष शेती करत होते तेव्हाही औतास आडवे येणे, बांध तोडणे, हद्दी हलवणे, मारामार्या करणे हे चालायचं.. दरवर्षी जाण्याने त्यात काडीचा फरक पडणार नाही याची खात्री आहे.. सुट्टीत चार दिवस मजा म्हणून पाहुणा म्हणून गावाकडे जाणं आणि तिथल्या समस्यांशी थेट सामना होणं यात खूप फरक आहे हे नम्रपणे सांगावंसं वाटतं.
अन्य एका गावात मी पूर्वी एक लहान घर घेतलं, तिथे घराची ग्रिल बसवण्यासाठी मी जवळच्या गावातूनच (ही दोन गावे वेगळी होती हेही मला माहीत नव्हतं त्यावेळी) एका माणसाला घेऊन गेलो.. स्थानिक लोक हेरगिरी करत पाळतीवर असतात याची पहिली प्रचिती आली.. आणलेला मनुष्य मापे घेत असतानाच गावच्या सरपंचाचा फोन माझ्या मोबाईलवर वाजला.. (मी त्याला ओळखतही नव्हतो.. राखणदाराकडून नंबर घेऊन वगैरे तो गावभर गेला होता).. आमच्या गावात येऊन बाहेरच्याला आणता, आमची शेजारच्या गावांशी भांडणं लावता.. नंतर काही भानगड झाली, इजा झाली तर मग तक्रार करु नका.. इथे तुम्ही नसता, घराची सेफ्टी आमचेच लोक बघतात.... वगैरे सुरु झालं. मग भानगड नको म्हणून तो आलेला मनुष्य एस्टिमेट बनवलेलं असूनही घाबरुन निघून गेला..
त्यानंतर त्याच कामाच्या तिप्पट एस्टिमेट करुन लोकल माणसाने दिलं.. घरासमोर गाडी भरुन गुंड आले.. नाइलाजाने काम पुढे ढकललं..
बरेच दिवस मनस्ताप झाल्यावर काम तर केलंच पाहिजे म्हणून ते त्याच माणसाला द्यावं लागलं.. त्याने कितीही सांगूनसुद्धा अतिशय ढोबळ आणि वाईट दर्जाचं काम केलं.. पण ऑप्शन नव्हता..
22 Mar 2012 - 4:46 pm | पैसा
पूर्वी कधीतरी आमच्या लांज्याजवळच्या देवधे गावातल्या जमिनीवर एक गावगुंड कूळ लावून घ्यायचा प्रयत्न करतोय हे सांगितलं होतं. ती केस तारखा पडत चालूच होती. त्या गुंडाने पोलीसपाटला कडून खोटंच पत्र मिळवलं आपण जमीन कसतो आहे म्हणून. वकिलाने सांगितलं तुम्ही आतापर्यंत तिथे गवत काढत होता, तर या वर्षी भात घाला. माझे सासरे एका गड्याला घेऊन गेले तर हा राक्षस माझ्या ८८ वर्षाच्या सासर्यांच्या अंगावर काठी घेऊन धावून आला. "म्हातार्या, आताच तुला संपवतो" म्हणत. त्या गड्याने सासर्याना कसं तरी तिथून वाचवून पोलीस स्टेशनवर जाऊन तक्रार नोंदवली, पोलिसांनी लगेच त्या गुंडाला लॉक अपमधे घातला. पण सुटून आल्यावर त्याला काही पश्चात्तप वगैरे नाहीच. आता कूळाच्या केसबरोबर ही पोलीस केसही सुरू आहे. माझ्या नवर्याला महिन्यातून निदान ४ फेर्या एकूण ३ केसेससाठी माराव्या लागतात. कारण महिन्यातून ६ ते ८ दिवस तारखाना हजर रहावं लागतं. घरातलं मांजर आपल्या घरात आलं म्हणून एका शेजार्याने मारून टाकल. दुसर्याने कुत्रा मारला. इथे प्रेमाने जिंकणे वगैरेला कुठे स्कोप आहे?
22 Mar 2012 - 4:47 pm | कौन्तेय
नेमका हाच विचार करून श्रम+सामग्री असंच एकरकमी कंत्राट त्या गावाच्या उपसरपंचपतीला दिलं. मालक म्हणून आमची भूमिका केवळ फ़रशा, नळ, विविध डिझाइन्स नि रंगछटा निवडण्याची राहील; बाकी पूर्ण प्रकल्प फ़क्त चावी-फ़िरवा करारावर पूर्ण करायचा ठरले. त्याने जवळच्याच एका घरातून वीज घेतली. त्याच्या नेहमीच्या पुरवठा करणाऱ्यापेक्षा दुसऱ्या एका रेती / सीमेंट सप्लायरसोबत त्यांचा काही अंतर्गत बेबनाव झाला. कदाचित त्याला पुरवठा करू द्यावा असं त्याचं म्हणणं असावं. तेवढा डूख धरून त्याने एम.एस.इ.बी.ला तक्रार केली की वीज बेकायदा घेतलीए. एमेसीबीने २०हजार रु. दंड ठोकला तो शांतपणे या कंत्राटदाराने माझ्या डोक्यावर टाकला. "ओ साहेब, आमच्या खिशातून जाणार आता हे पैशे" म्हटल्यावर मी फ़ार ताणलं नाही. पण शेवटच्या हिशेबात हा मुद्दा लावून धरू या समजुतीत मी सध्या आहे ... !
22 Mar 2012 - 6:19 pm | गणपा
माताय तुमच्या गाववाल्यांत बरीच एकी दिसते.
मध्यंतरी आमच्या गावाचा युपी, बिहार होऊ घातला होता. सगळे कंत्राटदार एकजात भय्ये. (गाववाल्यांचा आळशीपणा कारणिभुत होता म्हणा.) पण सध्या भय्या हटाव आंदोलन चालु आहे.
पण गवि पैसाताय म्हणतात तसे लोकांना नाडण्याचे प्रकार ऐकिवात नाहीत बॉ.
22 Mar 2012 - 4:15 pm | कौन्तेय
गवि भाऊ, गोळाबेरीज बघावी या मताचा मी आहे. स्वातीताईंच्या कथनातला "गावच्या लोकांना तुम्ही पैशाने नाही तर प्रेमाने जिंका, तरच तुमची "माझे गाव, गावचे घर" कल्पना अस्तित्वात येईल." हा कळीचा मुद्दा आहे, जो मौल्यवान आहे.
पण ते प्रत्यक्षात यायला घरपट्टी तर भेटली पायजेल! हां का नाय?
बाकी गाव - तालुका - शहर संकल्पना हे मुद्दे आत्ता लावून धरले तर आणखी एक उपचर्चा फाटेचर्चा इथे सुरू होईल ...
22 Mar 2012 - 4:15 pm | स्वातीविशु
मी तर फक्त एक उदाहरणादाखल मिपाकरांसाठी रत्नागिरीकर / सातारकर/कोल्हापुरकर / सांगलीकर/मिरजकर / इ.इ. असे लिहिले आहे. ;)
गावगाडा किंवा ग्रामपंचायत हा प्रकार थोडा कमी माहीत असला तरी निदान माझ्या गावच्या छोट्या खेड्यापाड्यात ("___वाडी" म्हणजे कमी लोकसंख्या असलेल्या गावात) बरेचदा जाऊन राहीले आहे /राहते. :)
"गावच्या लोकांना तुम्ही पैशाने नाही तर प्रेमाने जिंका, तरच तुमची "माझे गाव, गावचे घर" कल्पना अस्तित्वात येईल" हे माझे अनुभवाचे बोल मी व्यक्त केले आहे, हे महत्वाचे. :)
22 Mar 2012 - 4:30 pm | गवि
तुमचा मुद्दा ढोबळमानाने मान्यच आहे..
मलाही सरसकट मत बनवणं आवडत नाही, पण तसं झालंय खरं.. :)
अशा जागी स्वत: जाऊन घर बनवणं, स्थानिक होऊ पाहणं, यात असे त्रास होतात. सुटीत नऊ दिवस नवलाई टिकणारा "पाहुणा" म्हणून जायला मात्र गावासारखं ठिकाण नाही... :)
22 Mar 2012 - 4:59 pm | कौन्तेय
म्हणता ते बरोबरच. आमच्या आजच्या योजनेनुसार हे घर आत्ता थोडी आवाक्याबाहेरची उडी मारून बांधावं; मुलं मोठी होईस्तोवर बारा पंधरा वर्षे याचा उपयोग सुट्टी, सप्ताह-अखेर, मित्र-मंडळी, मेजवान्या, झाडे लावणे नि समाजकार्य इ.इ.साठी करावा; नि योग्यवेळी पूर्णवेळ वास्तव्यासाठी तिथे जावं असं आहे. यामधे तुम्ही म्हणता तसे गावात अधून मधून जात राहिल्याने परिचय, संपर्क, संबंध वाढत राहतील नि स्थायिक व्हायला अडचण येणार नाही असं वाटतं. आपण योजत जावं ... बाकी त्याची इच्छा!
22 Mar 2012 - 5:12 pm | गवि
मी उपरोधाने किंवा छद्मीपणाने म्हणत नाही याची खात्री आधीच देऊन म्हणतो :
वर उल्लेखलेल्या प्रत्येक इच्छेमधली / प्लॅनमधली कोणती गोष्ट किती जमली हे अजून कितीही वर्षांनी सांगा, पण जरुर सांगा. सिरियसली इंटरेस्ट आहे जाणून घेण्यात..
१. वीकेंडसना जाणं जमलं का? जमल्यास महिन्यातून / वर्षातून किती वेळा.
२. राहणे कमी अन मेंटेनन्स-सफाई आदि कामातच जास्त वेळ या कारणाने जाणं कमीकमी होत गेलं नाही ना?
३. पूर्णवेळ वास्तव्याला शहर सोडून गावात जाणं खरंच घडलं का?
या तिन्हीची उत्तरं कितीही वर्षांनी दिलीत तरी वाट पाहीन.
असंख्य (जवळजवळ सर्व) वीकेंड होम्स भग्नावस्थेत मालकांची वाट पाहात पडलेली राहतात किंवा मग सधन मालक माळी, वॉचमन ठेवून ती धूळ झटकती ठेवतात असा अनुभव आहे.. ऐकण्यातले तीनचार अपवाद (प्रत्यक्ष पाहण्यात एकही नाही) वगळता शहरी लाईफमधला मनुष्य गावात कधीही दीर्घकाळ (आठवड्याच्या वर) रहायला किंवा वीकेंड वगैरेला त्याच गावी त्याच घरात पुन्हापुन्हा जायला प्लेन कंटाळतो असा अनुभव आहे. तुमचा वेगळा निघो अशी सदिच्छा..
22 Mar 2012 - 5:28 pm | यकु
पूर्ण आयुष्य शहरात गेलेल्या 'मूळच्या' गावातील लोकांना निवृत्तीच्या काळात गावाकडे परतण्याची ओढ निर्माण होणे समजू शकते, पण बर्याचवेळा त्यात ताप होतो.. मी तरी माझ्या घरातच एक फार वाईट अनुभव घेतलाय..
माझे आजोबा आयुष्यभर नोकरीच्या निमित्तानं या शहरात, त्या शहरात रहात आले. निवृत्त झाल्यावर 'आता गावचे निवांत आयुष्य जगू' म्हणून गावात गेले. पण कसचे काय! आजारपणं, थोडंसं काही झालं की डॉक्टरकडे पळण्याची शहरातली सवय.. 'चांगल्या' दवाखान्यात दाखवण्यासाठी नेहमी शहराकडे चकरा माराव्या लागणं.. गावातल्या खमक्या लोकांशी खेटण्याची तयारी नसणं, मग मनस्ताप, गावातले असले तरी त्या लोकांशी जुळवून घेता न येणे.. अहो, आजोबांनी काम करायला येणार्या मजूरांना नुसते पाच रुपये वाढवून दिले तर लोक च्यावच्याव करायला लागले घरी येऊन रात्री.. कशाला मजूरांचे नखरे करताय म्हणून..
अशाच मनस्तापात ते आठ दहा वर्षे गावात राहिले आणि जायचं वय नसतानाही एक दिवस फटकन गेले.. काही आजार न होता. हे खेड्यातले रोजचे मनस्ताप पुरेसे ठरले. ! :(
22 Mar 2012 - 4:54 pm | स्वातीविशु
मान्य आहे. स्वार्थ कुठे नसतो.... तरीही आपण मार्ग काढतोच ना. काही वाईट अनुभव आले असले तरी थोडेतरी चांगले अनुभव येतीलच ना? शेवटी गाव सुद्धा नव्याच्या नऊ दिवसांत वसत नसते ना..त्यासाठी तुम्हाला किती वेळ, महिने, वर्षे द्यावी लागतील ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.
थोडा वेगळा विचार करून पाहायला तर हरकत नाही. "एकमेकां साह्य करु, अवघे धरु सुपंथ" असे म्हटलेलेच आहे. (बहुतेक तुकारामांनी?)
कित्येक लोक आम्हाला गावच नाही असे म्हणतात, तेव्हा वाईट वाटते, म्हणून हा लेखनप्रपंच. :)
23 Mar 2012 - 1:51 am | शिल्पा ब
अहो म्याडम, कोकणातलं माहीत नाही पण देशावर शेतावरुन मारामार्या होतात...माझ्या काका अन काकुवर सुद्धा शेतावर असताना हल्ला झाला होता. हास्पिटलात होते दोघेही. आम्ही तिन पिढ्या गावातच आहोत तरी असं. आता तो काका अन त्याचं कुटुंब सोडलं तर बाकी सगळे शहरात विखुरलेत त्यामुळे समजा आम्ही कोणी मुलं तिथे गेलो तरी वाडवडलांच्या पुण्याईने त्रास कमी झाला तर होईल तेवढंच.
दोन दिवस भेट देणं अन कायमचं राहणं वेगळं. गावचे लोकं अडाणी वाटतात पण फार च्यापटर असतात.
असो, लेखकाला शुभेच्छा. गावातला कोणीतरी पावरबाज माणुस बघुन त्याच्याशी "मैत्री" चं धोरण ठेवलतं तर उपयोगी पडेल.
23 Mar 2012 - 11:49 pm | मोदक
>>>गावचे लोकं अडाणी वाटतात पण फार च्यापटर असतात
एका अत्यंत छोट्या खेड्यात अलिकडेच आलेला अनुभव...
कळसूबाई ट्रेक ला ९ मित्र २ गाड्या घेवून गेलो होतो.. शाळेच्या आवारात (१५ X ३०... यावरून गावाचे आकारमान कळेलच :-)) गाड्या लावल्या तर एक बाई लगेच आली पार्कींग चे पैसे मागयला, किती मागावेत..? ५० रू.
आम्ही चालू केले, शाळेची जागा आहे.. सार्वजनीक आहे... असले काही पैसे तुम्ही घेवू शकत नाही.. वगैरे वगैरे..
आम्ही सगळेच जण जास्त हुज्जत घालू लागलो तर म्हणाली, "इथे आमची मुले खेळतात.. आरसे / काचा फोडतात त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागते."
आम्ही सगळे दोन मिनिटे सुन्न.. असले कांही अपेक्षीतच नव्हते. :-(
22 Mar 2012 - 5:26 pm | कौन्तेय
प्रत्येकाच्या इथल्या लिखाणाचा फ़ायदाच होणार आहे.
गवि, तुमच्या ३ प्रश्नांना मोल आहे. आभार. तुमचा विपत्ता कळवा. अजून पाच वर्षांनी कळवतो ...
22 Mar 2012 - 7:31 pm | पिंगू
सध्या तरी घराच्या प्रश्नावरुन नाही. पण जमिनीच्या प्रश्नावरुन गेली १५ वर्षे भांडतोय. पण अजून तरी हाती काही लागलेलं नाही आणि म्हणाल तर प्रेमाची भाषा वापरुन काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे आडमुठेपणा आणि खमकेपणा हीच शस्त्रे इथे उपयोगात येतात. त्यांचाच वापर केला तर योग्य..
- पिंगू
22 Mar 2012 - 7:50 pm | स्वछन्दि
आडमुठेपणा आणि खमकेपणा हि शस्त्रे चुकुनहि वापरलि गेलि कि जगण मुश्किल करतात लोक.
कारण पावर त्यान्चा हातात आहे.
आपल गप गुमान सेफ साईड पकडा. ;)
22 Mar 2012 - 7:54 pm | पिंगू
सध्या तरी मी हेच शस्त्र वापरतोय. पण नुसत्या आडमुठेपणाने काही होत नाही हो. थोड्याफार गुंडपुंड आणि पुढार्यांच्या ओळखीपण लागतात.
- पिंगू
22 Mar 2012 - 8:03 pm | स्वछन्दि
ओळखीपायि त्यान्च्या गरजा पुरवायला आपले रुपये जातात त्याच काय?
22 Mar 2012 - 8:10 pm | रेवती
लेखकाचा तसेच काही प्रतिसादकर्त्यांचा अनुभव आजकालच्या काळातला आहे (गेल्या काही वर्षांतला).
माझ्या आजोबांनी चाळीस खोल्यांचा वाडा (कुठे ते विचारू नका) केवळ ब्राह्मण्/अब्राह्मण या वादामुळे जिवाला वाचवण्यासाठी (अंदाजे ६० - ६५ वर्षांपूर्वी किंवा जास्तही) सोडून दिला तोही सगळ्या वस्तू, सोन्यानाण्यासकट, गाईगुरांसकट. शेती गेली. रात्रीत रस्त्यावर आलेल्या कुटुंबाला वर यायला अनेक वर्षं लागली पण अपार कष्टामुळे ते झालं. आपापली घरं बांधताना पैशापेक्षा जुन्या जखमांच्या आठवणींनी बाबा काकांनाच नाही तर आमच्या पिढीलाही जाळून काढलं. सगळ्यांची दोन चार घरं झालीत. रहायला तिथे कोणीच जात नाही. वास्तूशांतीही एकाच दिवशी केल्या सगळ्यांनी. रात्री सगळी भावंडं एकत्र येऊन रडली. मी तिथे नंतर कधीही गेले नाही.
भ्रष्टाचाराचा भाग आपण बनू नये म्हणून बाबा, काकांनी सरळमार्गाने काम करून घेण्यासाठी जीव झिजवला आणि मला त्याची तिडीक बसली. आपल्या मन:शांतीसाठी जिथे कुठे द्यावे लागतील ते द्या आणि चार दिवस सुखाने घरात रहायची सोय करून घ्या.
तीन महिन्यांपूर्वी माझ्या सासासूसासर्यांनी नातवाला (माझ्या मुलाला) कोकणात असलेलं जुनं घर दाखवायला नेलं. आता पडलय. आत जाण्याचीही इच्छा झाली नाही. फोटो काढला फक्त.
22 Mar 2012 - 9:29 pm | ५० फक्त
रेवतीआजै मी वर हेच लिहिलं आहे,
तुमचा पगार किती
तुम्ही बोलता किती
याच चालीवर
आपलं आयुष्य किती
आपण लढतोय किती- असं विचारायची पाळी आली आहे,
एक दिवस असं लढता लढता आपली अवस्था सिकंदराच्या सैन्यासारखी होईल, लढणं नको आणि विजय पण नको पण मायदेशी आपल्या लोकांजवळ जायचं आहे, हा हट्ट धरुन बसु. पण एवढे लांब आलेले असु त्यांच्यापासुन की परत फिरलो तरी त्यांच्याजवळ पोहोचायच्या आधीच आयुष्य संपुन जाईल.
22 Mar 2012 - 8:22 pm | स्वछन्दि
भ्रष्टाचाराला थारा न देणारे असेच कष्ट उपसतात.
आनि भ्रष्टाचार करनारे मजेत राहतात ..
23 Mar 2012 - 12:15 am | सुधीर
काहीसं अवांतर, जग किती विचित्र आहे, एकीकडे काही माणसांना गावं नाही, म्हणून कुठल्याशा एका खेड्यात एक कोपरा जमीन घेऊन त्यावर हक्काचं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण करताना इतक्या अडचणींना तोंड द्यावं लागतं, तर काहींना हक्काच्या जमिनीवर नाईलाजास्तव पाणी सोडावं लागतं आणि काही जण तर अशीही असतात की, जी वडिलोपार्जित जमीन-घरदार-परंपरा-भाषा-संस्कृती वार्यावर सोडून, परदेशात वा इतरत्र स्थायिक झालेली असतात. काही वर्षांपूर्वी मी पण त्यातलाच होतो, गावं आवडत नव्हतं अशातला भाग नाही, पण सगळं आयतं मिळालं की जी बेफिकिरी वाढते ना त्यातलीच गत होती! अशा गोष्टींमधली अमूर्त (इंन्टँजिबल) किंमत जाणवली ती पणजोबांनी स्वमेहनतीने घातलेला गडगा (कुंपण), लावलेली झाडं पाहिल्यावर!
आता तुमच्या प्रश्नाकडे वळतो. तुमचा हा सगळा तिढा, "लाच देऊन काम करवून न घेणे" ह्या तत्त्वामुळे निर्माण झाला आहे. माणसाने नेहमी तत्त्वनिष्ठच असलं पाहिजे. पण ही तत्त्वं आपलीच परीक्षा घेतात.
१. जर तुम्ही (वा तुमच्या वतीने तुमची बाजू मांडेल असा) वाक्-चातुर्याने गावातल्या संबंधित मंडळींना लाच न देता, काम करवून घेतलंत तर फारच उत्तम! माणसं चांगलीच असतात, पण त्यांचे विचार चुकीचे असतात आणि ते बदलता येतात. हे सत्य आहे, असं मानून.
२. पण जर का त्या माणसांचं मतपरिवर्तन होण्याची सुतराम शक्यता नसेल, तर असा मार्ग ज्यात तत्त्वही मोडणार नाहीत आणि कामही होईल. जसं परा ने सांगितल्याप्रमाणे (वा त्यात काहिसा बदल करून) कुठलेही तत्त्व न मोडता आणि प्रकरणही अंगलट न येता, "काट्याने काटा काढता येतो का ते बघा". जर कुठलीही तत्त्वे मोडणार नसतील, तर काय हरकत आहे? पण काम झाल्यावर "गरज सरो वैद्द मरो" अमलात आणावे लागेल पण त्याला इलाज नाही आणि त्यात चूकही नाही. तो एक रणनितीचा भाग आहे.
३. चौकटीच्या बाहेरचा मार्ग (लाच मागताना छुपं छायाचित्रण करून मग मिडिया पुढे भिंग फोडण्याची धमकी देणं इ.... मला आपलं बोलायला काय जातंय, तुमच्यावर गुजरलय, पण असाच काहीसा मार्ग...)
४. अगदीच नाईलाज होत असेल तर, तुमचा तत्त्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. जसं "कुठलंही काम होण्याच्या आधी अधिकार्याला जर का तुम्ही पैसे दिलेत तर ती होते "लाच", पण तेच पैसे तुम्ही काम झाल्यावर दिलेत तर ते होते "बक्षीस"!" अगदी तशीच वेळ आली तर काम झाल्यावर द्या.
23 Mar 2012 - 12:11 am | खेडूत
सगळ्यांचे प्रतिसाद पाहिले..मस्त चर्चा..
मी प्रत्येकी वीस वर्षे खेड्यात आणि शहरात काढलीयत. आजही तिथे घर आणि शेत आहे. पण आईवडील तिथेच रहातात. त्यामुळे लोकांना आपलेपणा राहतो.
खेड्यात (मंजे तालुका पण खेडेच) सुखाने राहायचे असेल तर:
तुमचे वर्गमित्र किंवा स्नेही, नातलग तिथे रहात असले पाहिजेत.
तुमच्या कुटुंबाचे गावात काही योगदान असेल.. शिक्षक, सरकारी नोकर, डॉक्टर वगैरे..
स्थानिक पुढार्याच्या तुम्ही जवळचे असाल.
अनेक वर्षे तिथेच नोकरी केली असेल वगैरे..तर त्रास होत नाही.
मुळात वाकडे पणा हा स्थायी भाव असतो. वेळ तर मोप असतो. माणसातला तिरकस पणा कळावा लागतो
आणि काही चांगले लोक पण असतात बरं का!..
याशिवाय रात्री वीज बहुधा नसतेच, टी व्ही, फ्रीज वगैरे वापरता येत नाही. अन्न उरले तर मुंग्या/ झुरळे, कुत्री, मांजर, माकडे शेअर करायला येतात. फोन कधीही बंद पडू शकतो. वैद्यकीय सेवा मिळेलच असे नाही. पाणी नळाला येत नाही, मग विहीर शोधत फिरायचे. ( पण रहाट वापरता येतो का?)
कामाला कोणी मिळत नाही त्यामुळे गावात साठी नंतर वगैरे राहणे अत्यंत गैरसोयीचे आहे. त्यामुळे मी तर माझ्याच गावी एक दिवसाच्या वर नाही राहू शकत.
बाकी आपलेपणा असल्याने जात थोडी दुय्यम होते असा अनुभव आहे. भ्रष्टाचार मात्र फारच आहे. तो शहरापेक्षा कमी किंवा जास्त नाही.
एक चांगला उपाय म्हणजे लागतील ते पैसे टाकून सुट्टीत कोकणात किंवा इतरत्र मजेत जाऊन राहावे.
किंवा ज्यांचे खेड्यात घर आहे असे (माझ्यासारखे) खेडूत मित्र वाढवावेत..!
23 Mar 2012 - 2:11 am | नेत्रेश
जर आपलेच गाव असेल किंवा गावातला तालेवार / पावरफुल माणुस आपल्याबरोबर असेल तर काहीच प्रश्ण येत नाही.
अन्यथा सुद्धा गावी घर बांधताना शक्यतो परवानग्या वगैरे घ्यायच्या भानगडीत पडायचे नाही.
सगळी कामे माहीतीतल्या चांगल्या माणसांकडुन (किंवा काँट्रॅक्टर कडुन) झटपट करुन घ्यायची.
सर्व काम पुर्ण झाले की बांधकामाला दंड भरुन मान्यता मीळवण्यासाठी अर्ज करायचा. आपण लाच अम्हणुन दिलेल्या रक्कमेच्या तुलनेत सरकारी दंड नगण्य असतो. तुमचे अनधीकृत बांधकाम कोणतीही ग्रामपंचायत पाडणार नाही याची खात्री बाळगा. येवढे होई पर्यंत वीज आणी पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्याचे कसब आपोआप अंगी येते.
या फॉर्म्युल्याचे जनक कोकणातलाच एक अत्यंत यशस्वी कंत्राटदार आहे. तसेच हा फॉर्म्युला आम्ही व आमच्या अनेक आप्तेष्टांनी अनेकदा व अनेक ठीकाणी यशस्वीपणे वापरुन सिद्ध केलेला आहे.
23 Mar 2012 - 6:14 pm | शैलेन्द्र
अगदी बरोबर.. शेतकी जमीनीवरही दणकुन घर बांधयचं.. नंतर वर्षाला ५००-७०० रुपये दंड होतो.. तो भरायचा..
23 Mar 2012 - 10:54 am | कौन्तेय
|| भारतीय नववर्ष ५११४ सर्वांना सुखा समाधानाचे नि आनंदाचे जावो ||
आभार. शिल्पा, पिंगू, शापित, स्वच्छंदी, रेवती, सुधीर, खेडूत, नेत्रेश आदींच्या म्हणण्यातूनही भरपूर तथ्यांश सापडत आहे. सगळे प्रतिसाद पाहता प्रथमदर्शनी वाटत आहे की गावाच्या पंचायतीमधे उभा राहून कुणी (१) शहरी, (२) सुखवस्तू दिसणारा, (३) फ़ॉरेनवाला, (४) अनोळखी, नव्यानेच प्लॉट खरेदी केलेला माणूस - स्वतःवर शेकत आहे म्हणून सचोटीचे फ़ंडे देऊ लागला तर त्याचे लगेचचे नि दूरगामी परिणाम चांगले नसतील. कदाचित ब्राह्मण हाही पैलू माझ्या इच्छेविरुद्ध तिथे जोडला जाऊ शकतो. गावातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध गावकऱ्यांपैकीच जर कुणी निशाण घेऊन बाहेर आला तर त्याला कुमक पुरवण्याचं काम आपण करू शकतो, पण लढा सुरू करण्याचं नाही हे सत्य कटू आहे.
मला आता असं विचारवंसं वाटेल की शहरी वा ग्रामीण कुठल्याही प्रकारच्या घट्टपणे रुळलेल्या लाचखोरीला व्यक्तीगत विरोध केल्याचं कुणाचं स्वतःचं, बघण्यातलं उदाहरण कुणी देऊ शकेल का? मध्यंतरीच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांमुळे लाच देणारे व घेणारे यां दोघांतही काही सकारात्मक बदल झालेले दिसतात का? मी सन २००१पासून भारताच्या नि पर्यायाने राजकीय / सामाजिक चळवळींच्या बाहेरच आहे. त्यामुळे तळाच्या वास्तविकतांचा फ़ार अंदाज नाही.
येऊ देन्याची कृपाया ...
23 Mar 2012 - 12:38 pm | JAGOMOHANPYARE
शहरातले लोक तरी खेड्यातून नव्याने येणार्या लोकाना आजकाल शहरात कुठे सुखाने जगू देतात? .. मग खेड्यातल्या लोकानी तुम्हाला तुमचे नबाबी शौक पुरे करायला कशाला मदत करायची? जिथे आहात तिथेच सुखाने रहा....
परदेशात होता म्हणताय, मग पास्पोर्ट कुठून काढलात? पार्ल्यातूनच ना? तेंव्हा पार्ल्याच्या पोलिसानी, पास पोर्ट ऑफिसने फुकट कामे करुन दिली होती का? ( माझाही पास्पोर्ट ठाण्याचाच होता, तो तरी फुकट झाला नव्हता.) आता खेड्यातही तोच अनुभव येतोय तर खेड्यातले लोक बघा कसे माजलेत म्हणून मात्र लगेच धागा उघडलात !
आजकाल खेड्यातही भाड्याने जागा मिळणं मुश्किल होत चाललय.. तिथं खेड्यातले घर म्हणजे नबाबी शौक पुरे करण्याची सोय , अशी मेंटॅलिटी असलेल्या लोकाना असे अनुभव येणं यात अगदी काही अनपेक्षित नाही.
आणि पैसा खेड्यातल्या सरपंचानं खाल्ला काय आणि मुंबईच्या पोलिसानं खाल्ला काय शेवटी तो मुंबई बसलेला एखादा मंत्री, पक्ष श्रेष्ठी यांच्याच डोंबलावर जाऊन पडणार असतो... तुमच्या पार्ला शिवाजी पार्कातच हे बसलेले असतात.. तुमचेच गाववाले हो! कशाला उगाच त्या खेड्यातल्या लोकांच्या नावानं बोंब मारायची?
23 Mar 2012 - 12:44 pm | यकु
फर्मासऽ!
ही पण बाजू खरी आहे.
23 Mar 2012 - 1:33 pm | कौन्तेय
ओ येस. शापित, अशा बऱ्याच फ़र्मास, खऱ्या बाजूंच्या नव्या वास्तवांशी जुळवून घेतानाचं चाचपडणं सुकर व्हावं म्हणून तर हा धागा काढला.
जगमोहनप्यारे, 'जास्तीचे पैसे लाचस्वरूपात भरावे लागले तर कांगावा करू नये; कारण कुठे ना कुठे आपण सगळ्यांनी ते भरलेलेच आहेत' हा तुमचा मुद्दा समजला. बाकीच्या बहुमूल्य निंदेसाठीही आभार. तुमच्या डोक्यात फ़ुटलेले बार संभवतः त्या पैसे मागणार्यांच्याही डोक्यात असू शकतील इतका अर्थबोध तीमुळे झाला.
धागा काढला तो कुणी माजलंय बिजलंय अशी रडारड करण्यासाठी नाही. तसा माझा हेतू वा मजकूराचा अर्थ नव्हता, नाही नि नसेल. तुम्हाला कुठे जाणवलाच तर स्वतःची माफ़ी मागून घ्या.
23 Mar 2012 - 1:47 pm | गणपा
बाबौ शॉल्लीड फुटलो या वाक्यावर. =))
मनीच्या बाता: गण्या लेका ही नव वर्षाच्या स्वागताच्या आतषबाजीची सुरवात तर नव्हे ना?
23 Mar 2012 - 2:23 pm | ५० फक्त
खर्रंच मा. गणपाभौ,
मी तर पडलो खुर्चीतुन खाली, खरोखर एक नविन युगारंभ करणारं वाक्य आहे हे.
23 Mar 2012 - 1:50 pm | प्रभाकर पेठकर
भ्रष्टाचाराचे समर्थन नाही परंतु, यंत्रातील मोठी चाकं फिरतात तेंव्हा लहान चाकांना फिरावेच लागते अन्यथा मोडून, तुटून पडावे लागते.
23 Mar 2012 - 2:01 pm | JAGOMOHANPYARE
तेच तर मी लिहिले आहे... मोठी चाकं पार्ला आणि शिवाजी पार्कातच यांच्याच अंगावरनं फिरतात, तेंव्हा हे काही बोलत नाहीत आणि आता खेड्यातली दोन चार चाकं फिरली तर याना लगेच सच्चाई, देशप्रेम्,समाज शुद्धीकरण, भगवद्गीता ... काय काय 'मोहन भार्गवी ' काव्यमय सुचायला लागलंय! पार्ल्यातला फ्लॅट कुणाला पैसे न देताच यांच्या नावावर झाला की काय!! :)
23 Mar 2012 - 2:33 pm | ५० फक्त
धन्यवाद जगमोहनप्यारेजी, जे मी साध्या सभ्य शब्दांत लिहिलं होतं तेच तुम्ही उघड उघड लिहिलं,
जेंव्हा आपलं जळतं तेंव्हा ती आग आणि उब मिळते तेंव्हा शेकोटी असा उद्योग करणारे लोक ना कायद्याचं राज्य येउ देतात ना दोन नंबरचं, आणि जेंव्हा जशी वेळ येईल तेंव्हा त्या त्या राज्याच्या नावानं किंवा विरोधात मेणबत्या लावत फिरतात,
मला तर या बाबतच्या एका धागाकर्त्याने बरेच वैयक्तिक स्वरुपाचे प्रश्न विचारले, त्याबद्दल खरड केली, पण मी त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देउन एक प्रतिप्रश्न केला की मग त्याला उत्तर अपरिहार्य कारणानं मिळालं नाही.
(संदर्भ -http://misalpav.com/node/20887#comment-378272)
23 Mar 2012 - 3:46 pm | JAGOMOHANPYARE
तो धागा बघितला.. शहरातल्या भ्रष्टाचाराच्या मानाने हा खेड्यातला भ्रष्टाचार नगण्यच आहे.
http://misalpav.com/node/20887
-----------------------------------------------------
शहरास्ते पंथान:
( एकदा शहराचा रस्ता धरला की षौक फर्मावायला परत खेड्यात येऊ नये.. :) आलच, तर त्याची किंमत मोजावी.) )
---------------------------------------------------------
23 Mar 2012 - 2:45 pm | जयंत कुलकर्णी
मी आता जे लिहिणार आहे ते वाचायचं आणि विसरून जायचे.
आमच्या गावात एक जोशी नावाचे कुटूंब टिकून होते. मुलगा टेल्कोत कामाला. बाकी सर्व गावी शेती. बागायती ५ एकर आणि जिरायत २० एक असेल. गावात त्रास सुरू झाला. पण शेवती हद्दच बदलायला लागली तेव्हा जोशी आजोबांनी नातवाला साद घातली. ही जमीन वाचावायची असेल तर नोकरी सोड गावाकडे ये. नातवाने नोकरी सोडली आणि गावी गेला. गेल्या गेल्या धक्काबुक्की होऊन खाली पडला. मग बरेच छळ झाले.... नातवाने वैतागून नेपाळ गाठले आणि येताना कट्टा घेऊन आला. दुसर्या दिवशी दारू पिऊन शेजार्याच्या छाताडावर रोखला आणि.... सगळं सुरळीत झाले... आज ५ एकरावर उस आणि २० एकरला पाणी यायची शक्यता आहे....
गावाकडे असेच रहावे लागते. ब्राह्मणांनाच नाही तर सगळ्यांनाच....
23 Mar 2012 - 3:28 pm | गणपा
प्रयत्न केला पण
हे वाचुन रहावलं नाही. एक बाळ बोध प्रश्न आलाच मनी.
कट्टा/कुकरी कितीला पडला/पडली?
येण्याजाण्याचा खर्च पहाता तेवढ्याच किमतीला पुण्या/मुंबईतुन एखादी तलवार नक्कीच आली असती. नाही का? ;)
23 Mar 2012 - 5:26 pm | विश्वनाथ मेहेंदळे
गणपा भौ, कट्टा म्हणजे पिस्तुल ना ? रोखायला ते बरे कि लांब लचक तलवार ?
23 Mar 2012 - 5:50 pm | गणपा
हा हा हा
कट्ट्यार / कट्टा गोंधळ उडाला खरा माझा. आमच्या त्येला भाषेत 'घोडा' म्हंत्यात नव्हं. ;)
तरीबी मुंबई/पुण्यात ते स्वस्त नसतं का मिळाल? :)
23 Mar 2012 - 6:00 pm | कौन्तेय
जयंतराव,
रक्तविहीन क्रांती हे दिवास्वप्नच म्हणायचं तर ...
आभार.
23 Mar 2012 - 3:14 pm | नगरीनिरंजन
हम्म...रोचक अनुभव आणि त्यावर वेधक चर्चा चालू आहे.
सगळं कसं पैशापाशी सुरु होऊन पैशापाशी येऊन थांबतं, नाही? एक गाव असतं, एक अंगणही असतं पण पैशाची (शब्द पिशाच्चाशी संबंधित वाटतो ना?) भूक ते सगळं सोडायला लावते. जेव्हा पैसा येतो आणि जे सोडलं ते पुन्हा मिळवावं वाटतं तेव्हा ते सगळं नासलेलं असतं.
स्वतःची किंवा दुसर्याची पैशाची भूक त्यानंतर कधीच शांत बसू देत नाही.
ये महलों ये तख्तों ये ताजों की दुनिया
ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया
ये इन्सां के दुश्मन समाजों की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?
23 Mar 2012 - 5:33 pm | कौन्तेय
नगरीनिरंजन गुरूजी,
साधारणत: धागाबाह्य प्रतिसाद, बादरायणसंबंधयोजित खिजवाखिजवी वा इतर जावईशोध इ.कडे दुर्लक्ष करण्याचा माझा नेम आहे. पण तुमच्या या टिप्पणीची नजाकत अलग आहे. सुंदर आहे आणि ती १००% ससंदर्भ नसली तरी चर्चाविघटकही नाही म्हणून सहर्ष स्वागत.
23 Mar 2012 - 6:47 pm | नगरीनिरंजन
टिप्पणीचे स्वागत केल्याबद्दल धन्यवाद आणि ती कोणा एकावर रोखून केलेली नाही हे ही तुमच्या लक्षात आले असेल अशी आशा करतो. स्वतः पैसे कमावण्याच्या चक्रात अडकल्याने स्वत:ला पडलेले हे प्रश्न आहेत बाकी काही नाही.
स्वप्नं पाहणे वाईट नाही पण आपली स्वप्नं प्रत्यक्षात मालकीहक्क आणि भौतिक गोष्टींमध्येच का रुततात? एवढं करून आपण जे मिळवायला बघतो ते मिळेल याची खात्री काय?
असो.
23 Mar 2012 - 3:45 pm | भीमाईचा पिपळ्या.
खेडूत, जयंत कुलकर्णी यांच्याशी सहमत. एकतर तुम्ही आंधीत जागा/जमीन घेतली. त्यात तुम्ही तसे उपरेच त्यामुळे सबुरीनेच घ्यावे लागेल. कट्टा, बॅनर, पुढार्यांच्या ओळखी कामाला येतील असे वाटत नाही.
मीही दुसर्या गावात जमीन घेतली आहे. मी ज्याच्याकडून जमीन घेतली त्याचा शेजारी (त्यांचे एकमेकाशी वाद होते तरी)त्या जमीनीवर डोळा ठेवून होता. त्याने जमीन त्या शेजर्याला न विकता मला विकली. हे मला सर्व नंतर कळले.
झाले. मी जमीन घेतली. एकाला वाट्याने जमीन कसायला दिली. तर हा पठ्ठ्या शेजारी त्रास द्यायला लागला. रस्ता बंद करणे, औत अडवणे, पंप बंद करणे. शेती अवजारांची चोरी करणे, बैलांवर विषप्रयोग करणे, वाटेकर्याला दमदाटी करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे. असे करुन २ वाटेकरी त्याने पळवून लावले. शेवटी मी सलग १५ दिवस त्या गावाला राहून नवीन वाटेकरी लावला. त्या त्रासदायक शेतकर्याचा सगळा ७/१२ काढला तर तो गावातही तसाच उर्मटपणे वागत असल्याचे कळले. त्याने पोर्वीचेच प्रकार चालू केल्यावर त्याला पहिल्यांदा समज दिली. तो बधला नाही मग त्याला एक दिवस अक्षरशः बडवून काढला. तर त्याने माझ्यावर अॅट्रासिटी टाकली. मीतर त्यात माहीर. मी त्याच्यावर जालीम क्रॉस टाकली. दरम्यान त्याला माझा कोर्टाचा 'अनूभव' कळला नि केस मिटवून घेवू म्हणून मागे लागला. त्याला चांगला ६ महीने तंगवून मगच केस मिटवली.
आता एकदम सुरळीत चालू आहे. वाटेकर्याकडे कधी खत आणण्यास पैसे नसतील तर तोच शेजारी खते देतो. २-३ महिन्यात मी कधी गेलो तर मी त्याला त्याचे पैसे देतो, तर 'नंतर दिले तरी चालतील' असे म्हणून पैसे घेतो.
23 Mar 2012 - 5:32 pm | नगरीनिरंजन
हा आणि इतर प्रतिसाद वाचून शेतकरी लोक गरीब बिचारे वगैरे नसतात एवढे मात्र कळले. :-)
माझ्या कृषीअधिकारी असलेल्या भावाने अनेक नमुनेदार किस्से सांगितले होतेच, हे वाचून त्याला बळकटी मिळाली.
23 Mar 2012 - 5:54 pm | कौन्तेय
पिपळ्या पैलवान भाऊ,
तुम्ही एका दमात उच्चारलेले अनुक्रमे "अडवणूक ... चोरी ... विषप्रयोग ... दमदाटी ... धमक्या ... समज ... बडवणे ... ऍट्रोसिटी ... जालिम क्रॉस टाकणे ... तंगवणे ... मिटवणे" हे सगळे क्रीयाकलाप बघून छातीच दडपली शप्पत. दाद देतो तुमच्या हिंमतीची! तरीही तुम्ही सबुरीचा सल्ला देताय हे त्याहून विशेष. लक्षात ठेवतो. एसोएससाठी तुमचा हस्तध्वनी क्र. देऊन ठेवा राजे. नेमक्या कुठल्या गुहेत पाय टाकतो आहे याची आता हळूहळू कल्पना यायला लागली आहे. पण गुहेतच पाय टाकायचा तर काळीजही वाघाचंच हवं. हौन् जाऊ द्या ...
23 Mar 2012 - 6:05 pm | यकु
शुभ पंथावर आस्ते जावा !!!
:p :p :p
23 Mar 2012 - 5:27 pm | स्वातीविशु
हम्म... दुसर्या बाजूशीही सहमत.
गावाला जाऊन राहायचे तर वेळ आली तर प्रेमाने अन वेळ आली तर खमकेपणाने.
गावी अनेक लोक मोडेन पण वाकणार नाही अशा प्रकारचे असतात, त्यांना वेळीच इंगा दाखवावा लागतो.
23 Mar 2012 - 5:54 pm | ५० फक्त
एकंदरीत काय, मा. श्री. महात्मा मो.क. गांधीनी जो संदेश दिला खेड्यात चला, त्याला काही अर्थ उरलेला दिसत नाही, किंवा खेड्यात चला अन चार दिवसांनी परत या असं नवं व्हर्जन यायला हवं.
23 Mar 2012 - 6:21 pm | अर्धवट
हॅ हॅ हॅ.. एकंदरीत उद्बोधक धागा.. माझंही गाव आहे आणी तिथे मी नियमीत जातो..
या सगळ्या चर्चेला दोन बाजू आहेत...
खूप वर्षांनी गावाकडे जाणं हे खरंच अवघड आहे, बसलेल्या, सुरळीत चालणार्या सीस्टीममधे तुम्हे बाहेरून जाता म्हणल्यावर त्रास होणारच की...
तुमच्याजागी मी मला कल्पून बघितलं आणि जरा निराळा अँगल समोर आला... मला असं जाणवलं की मला असं गावात जाऊन राहाणं तितकंसं अवघड जाणार नाही, निदान आत्तातरी तसं वाटत नाही कारण,
गावातून कुणी तरी शहरातलं काही ना काही काम घेउन नेहेमीच माझ्या घरी येत असतो, आणि तो माणूस नात्यागोत्याचा नसताना, केवळ गाववाला म्हणून माझ्याकडे येतो याचा मला आनंदच होतो. ते जे काही काम असेल ते करण्याचा मी मनापासून प्रयत्न करतो. किमान अगदी विस्तॄत माहिती तरी नक्की देतो.
कुणी नोकरी मागायला आलेला असतो, तर कुणी सरकारी ऑफीस मधे एखादं काम काढून आलेला असतो, कुणाला चांगला दवाखाना हवा असतो, किंवा डॉक्टरची, वकिलाची ओळख हवी असते..
असे ५-१०-१५ वर्षे झाल्यावर मग संबंध तयार होतात, माणसं जोडली जातात, गावची आमंत्रणं मिळत जातात, वानवळा पोच होतो,
मग गावकडं जायला अवघड वाटत नाही....
मला तर उलटं वाटतं आता, मला शहरात काही अडचण आल्यावर गावकडची ओळख निघेल का असा मी नकळत विचार करायला लागतो.
आता हे सगळं नसताना, मी काय केलं असतं.. म्हणजे घर बांधणं हे एकमेव ध्येय न ठेवता तिथे कायम राहाणंही सुलभ होइल यासाठी...
एखादी स्कॉर्पियो घेतली असती, पांढरे कडक स्टार्चचे कपडे घालून, गाडीवर चालक ठेउन अथवा स्वत:च खंडीभर धुरळा उडवत एक वर्ष ये जा केली असती तिकडे, एखादा पोलीस अधिकारी, एखादा आमदार, एखादा पाटबंधारे अधिकारी, एखादा सिवील सर्जन याला तिकडे दोन तीन वेळा जेवायला घेउन गेलो असतो.
तिकडे गेल्यावर ड्रायवरला दिवसभर रिकामा सोडून असली काही वाक्ये पेरायला सांगीतलं असतं.
"च्यायला साहेब लै बाराचा आहे, लैच गरम काम आहे"
"सायबानं फोनाफोनी केल्यावर मोठ्यामोठ्या लोकांची फाटते"
"सेठ कशी पाचर मारंल सांगता येत नाय" वगैरे वगैरे..
गावतल्या तरण्या लोकांच्या पाठीवर हात ठेऊन जाता येता, "कसं काय रे, काय लागलं तर सांगत जा" असं म्हणलो असतो, त्यातलेच ५-७ जण जमवून तालुक्याला अथवा जिल्ल्ह्याला एखाद्या ३ स्टार बारमधे बसून लै पाजली असती, त्यात गावातल्या सगळ्या भानगडी काढून घेतल्या असत्या.. वगैरे वगैरे वगैरे..
एखादा २ वर्षाचा कोर्सच म्हणा ना....
23 Mar 2012 - 6:37 pm | ५० फक्त
उत्तम सुचना, एक विनंती अशाच सुचना नविन संस्थळ काढणा-यांसाठी देता येतील काय कुणाला, माझ्या कडं एक गुंठा मंत्री आहे त्याला एक संस्थळ काढायचं आहे.
23 Mar 2012 - 6:44 pm | कौन्तेय
आता हे म्हंजे तुम्ही निराळंच काढलंत. उत्तरार्धातली अवस्था माझ्या आजच्या परिस्थितीला अनुरूप असल्याने मी तसं तसं करावं असा सल्ला असेल तर त्यातून आपसूक निघणारा अर्थ हा की आत्ताला वरचे पैसे टिकवून काम काढून घ्या, नि पुढच्या काळात लफडा नको असेल तर किमान हे हे करा! एका घराचं मार्गी लावण्यासाठी पांढरे, कडक ष्टार्च इस्त्रीचे कपडे, (कदाचित एक रे ब्यान गागल नि बोटभर रुंदीची सोन्याची चैन) एक स्कोर्पिओ, डायवर, त्याचा पगार, दारू पिण्याची सुरुवात वा पाजण्याची हातोटी हे सगळं जुळवून आणणं आहे. आवघड आहे राव.
23 Mar 2012 - 8:15 pm | भीमाईचा पिपळ्या.
कौन्तेय एकतर तुम्ही ५० हजाराला चूना लागल्यानन्तर हा धागा काढला आहे :P
थोडेफार व्यवहार नि संवादकौशल्याच्या जोरावर तुमचे हे (किरकोळ) काम झाले असते. प्रत्येक गावात सगळेच माणसे नीतीभ्रष्ट, विघ्नसंतोषी नसतात.
सविस्तर व्यनि करतो.
23 Mar 2012 - 8:59 pm | कौन्तेय
नाही. अजून पैशाचं कबूलही केलेलं नाही नि अव्हेरलंही नाही. मी स्वत: तिथे पोहोचून काही बोलबच्चन करून संवादकौशल्य गाजवायचं म्हणतोय. आता त्यामुळे रक्कम घटते की वाढते हे बघायचं. :-D
प्रत्येक माणसाची नियत खराबच असं समजून वागू लागलो तर जगात जगायलाच नको. मला सगळे नीतीभ्रष्ट असतात असं अजिबात वाटत नाही. माणसाच्या चांगूलपणावर विश्वास असल्यानेच बहुदा मला आजवर चांगले अनुभव येत गेले आहेत. यातही येतील. व्यनि.चं स्वागत आहे -
23 Mar 2012 - 9:09 pm | कौन्तेय
मंडळी,
साधक बाधक नि भरघोस गप्पांसाठी सगळ्यांचे आभार. आत्तापर्यन्त झालेल्या चर्चेतून बरेच मुद्दे हाती आले. काही उत्तरं मिळाली, तर काही नवीन प्रश्न मिळाले! चर्चौघात मिळालेल्या या दुव्यांचाही उपयोग झाला http://misalpav.com/node/20887 | http://www.misalpav.com/node/17574 .या चर्चा मंथनात काही मला मानवणारे व काही न मानवणारे पण वेधक, ठोस मुद्दे सापडले ते असे (द्विरुक्ती वा विस्तारभयास्तव प्रत्येक व्यक्तीचा मुद्दा त्याच विशिष्ट स्वरूपात वा क्रमाने जसाच्या तसा देत नाही) -
सगळ्याची गोळाबेरीज म्हणून मधे म्हटल्यानुसार गावाच्या पंचायतीमधे उभा राहून कुणी (१) शहरी, (२) सुखवस्तू दिसणारा, (३) फ़ॉरेनवाला, (४) अनोळखी, नवखा, उपरा माणूस - केवळ स्वतःवर शेकत आहे म्हणून सचोटीचे फ़ंडे देऊ लागला तर त्याचे लगेचचे नि दूरगामी परिणाम चांगले नसतील. या कारणामुळे आत्तातरी विकतची मनःशांती आपलीशी करावी लागेलसं दिसतंय. पण सरते शेवटी जर त्या मार्गाने गेलोच तर
ही शल्यं मनात राहणार आहेत.
असो. बाकी या सूत्राच्या अनुषंगाने इथे सुरू झालेली चर्चा सुफ़ळ संपूर्ण झाली असं मी माझ्याकडून जाहीर करतो.
शुभम् भवतु।
23 Mar 2012 - 9:20 pm | JAGOMOHANPYARE
- आपण इतके पैसे दिल्याने गरीबांना नाडणाऱ्या व्यवस्थेला आपण आणखी बळकटी दिली नि घरपट्टी देण्याचा रेट वाढवून ठेवला त्याचं काय? >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
त्याची चिंता तुम्ही करु नका... घर कच्चं आहे, पक्कं आहे, नवीन आहे, जुनं आहे, आतल्या सोयी.. अशा गोष्टींवर फाळा ठरतो... त्यामुळं इतरांची चिंता तुम्ही करु नका.
- हा; किंवा आपल्यातला अथवा समाजातला किमान एक दोष तरी निवारण्यासाठी आपण काही करणार आहोत की नाही?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
याला मात्र फक्त तुम्हीच जबाबदार आहत.. पार्ल्याला फ्लॅट घेऊन किती वर्षे झाली? तेंव्हा बी एम सी ला किती पैसे मोजले होते? तेंव्हा जर वरच्या १८ पैकी काही केले असते तर ही वेळ कदाचित आली नसती नै का?
-------------------------------------------------------------------------
शहरास्ते पंथानः :)
---------------------------------------------------------------------------
23 Mar 2012 - 9:19 pm | खेडूत
>>> आपण आपलं पाह्यलं, पण गरीबानं काय करायचं?
-- गरिबाला असले प्रश्न पडतच नाहीत!
23 Mar 2012 - 10:17 pm | कौन्तेय
जागो.
तुमचा पार्ले नि शिवाजीपार्क यां 'स्थळां'बाबत काही नाजुक तगादा असेल - मी समजू शकतो; पण त्याचा राग या चर्चासूत्रावर का काढता??? आणि आता तेही संपलं आहे. मंडळ आभारी नाही! गुडनाइट.
24 Mar 2012 - 12:27 am | सातबारा
तुम्ही धाग्याचा शेवट केलेला आहे. मात्र मी आत्ताच धागा पाहील्याने माझे काही स्वानुभवाचे बोल.
वर दिलेले खेडूत, पिपळ्या, अर्धवट यांचे उपाय चांगलेच आहेत. त्यात पुढील भर घाला ..
- दारात एक कार कायम उभी असू द्यात.
- दुसर्यांना मनापासून मदत करता आली पाहीजे. ( अर्थीक नाही. पैसे उसने दिले की गेले. वेळेला आपल्या कडील वस्तू इ. शेअर कराव्यात.)
- दुबळी कडी असा माणूस ओळखून त्याला अंकीत करा. मात्र त्याचे काही चुकले की कानातील केस जळतील अशा अस्सल शिव्या त्याला द्या. तुम्हाला घाण घाण शिव्या येतात हे जगाला माहीत असू द्यात. (आधी अभ्यास करा. पॉवरफुल माणसाला शिव्या द्याल तर मग .. )
- पोलीस हे खाकी वर्दीतील सहाय्यक तुमच्या बाजूनी करुन घ्या. एकदा शेजार्याच्या पोराने खोडी काढायला माझे ड्रीप चे लॅटरल दारु पिवून उपटून काढले. मी पोलीसाला १००० रु. दाखविले. ५०० आत्ता ५०० काम झाल्यावर , त्याला उचल. माझे हजार गेले. पोलीसाने त्याला दोन कानफटात मारल्या त्याचे कडून ही ५०० काढले. आता माझ्या कडे चोरी होत नाही.बोअर मारताना शेजार्याच्या आंब्याची फांदी जी आमचे कडे वसवा/ अतीक्रमणच होती, थोडी छाटली, त्याने बोअर ची गाडी बंद केली ,बोअर वाल्याला धमकावले. एकदम टेन्शन. त्याला म्हटले **** त दम असेल तर अर्धा तास इथेच थांब. तालुक्याला जावून पोलीस जीप व सहा पोलीस आणले. खर्च ५००० रुपये. नंतर चार बोअर झाले.
- तुमच्या जमीनीचा तुकडा तुम्हाला विकायचा आहे अशी आवई उठवा. (सर्व जमीन नाही , तुकडा फक्त) ओळख नसलेले लोक राम राम घालतात.
-विरुध्ध पार्टीला तुम्ही जमीन विकणार असा संशय दोन्ही पार्टींमध्ये पेरा. दोन्ही पार्ट्या तुमची काळजी घेतील.
- विरुध्ध पार्टीतील सावकारांना तुमच्या जमीनीचे अमिष दाखवून किरकोळ कर्ज दोघांकडून ही काढा. (एवढेच कर्ज, की जे तुम्ही कधीही फेडू शकाल.) ते कर्ज थकवा. तुम्हाला आपोआप रक्षणकर्ते मिळतील.
- तुम्हाला कशाची ही घाई नाही हे दाखवा. काम नाही झाले तरी विचलीत होवू नका.
-हा माणूस काहीही करु शकतो याच्या नादी लागायला नको असे तुमच्याबद्दल रिपोर्टस लोकांपर्यंत जावू द्यात. ( मात्र तसे काहीही करण्याच्या भानगडीत पडू नका)
- फार कोणाच्यात मिसळू नका. गावच्या राजकारणात तर अजीबात जावू नका. मात्र दोनचार प्रतिष्ठीत लोकांशी गोड बोलून संपर्कात रहा.
- बिन्धास्त भ्रष्टाचार करा. (भ्रष्टाचा विरोधी आंदोलनात काय घडते ते जवळून पहात आहे. सन्मार्ग आपला नाही हे माहित करुन घ्या)
पस्तीसाव्या वर्षी पुणे सोडून शेतावर स्थायीक व्हायचा निर्णय घेवून मी गेली पंधरा वर्षे शेतावर राहूनच हे सर्व एन्जॉय करतो आहे. त्यामुळे पहील्या धारेचा सल्ला देवू शकतो आहे.
24 Mar 2012 - 7:05 am | कौन्तेय
सातबाराराव,
काय हान्लाय्!!. ... व्वा - मझा आला.
माझी फ़क्त एका निवासी भूखंडाव्यतीरिक्त कुठलीही शेतजमीन नसल्याने तुम्ही दिलेले सगळेच जालिम उपाय आजमावता येणार नाहीत, पण एकंदर अर्क रामबाण आहे. आभारी आहे.
कसलेला अध्यक्ष सभेत नेहमी उशीरा येऊन समारोपाच्या भाषणात अशी काही सर्व्हिस टाकतो की सगळे जाम प्याक्! ... !
तुमचं समर्पक, मुद्देसूद नि चपखल समारोपाचं भाषण पाहून मला पुन्हा एकदा आभारप्रदर्शनाला उभं रहावं लागलं. बहुत बढिया.
आयोजकांनी सभा संपन्न म्हणून घोषित केली असली तरी अजून पसायदान होणं बाकी आहेसं दिसतं.
चेक् चेक् चेक् - ध्वनिपरीक्षण एक दोन तीन ...
25 Mar 2012 - 2:31 am | रेवती
अगदी अगदी.
भिमाईचे पिपळ्याराव आणि सातबारा यांनी मस्त प्रतिसाद दिलेत.
24 Mar 2012 - 6:14 pm | तिमा
मला कल्पना आहे की सगळी चर्चा संपली आहे. पण वर पार्ल्याचा उल्लेख आला म्हणून लिहावेसे वाटले की माझा अनुभव लिहावा.
आम्ही पार्ल्यात गेली ४० वर्षे रहात आहोत. आम्हीही पासपोर्ट काढला आहे, पोलिस स्टेशनात गेलो आहे. पण पासपोर्टसाठी तरी अजून आमच्याकडे कधीही कोणीही पैसे मागितले नाहीत आणि आमचे काम वेळेत झाले. कोणाचीही ओळख काढावी लागली नाही.
बाकी सर्व चर्चा ऐकून गांवाविषयी धडकीच भरली. आमची धांव फार तर पुण्यापर्यंत!
तुमच्या कामात तुम्हाला शुभेच्छा.
25 Mar 2012 - 6:02 am | कौन्तेय
नमस्कार.
धागाबाह्य लेखन, विषयांतर, प्रतिसादाला प्रतिवाद, तिरकी तिरकी चर्चा, मग भांडणं, व्यक्तीगत हल्ले नि चर्चाविघटन या गोष्टी टाळायच्या म्हणून मीही काही लिहिलं नव्हतं. तुमच्या या अहवालातून मोठे महान प्रश्न पडलेल्यांना उत्तर मिळावं. धन्यवाद. शेवटी गाववालेच धावून आले बघा!
पारपत्र (मराठीत पासपोर्ट) व वाहनचालन परवाना यां दोन्ही ठिकाणी वा पो. चौकीत मला जास्तीचे पैसे द्यावे लागले नव्हते. पारल्याचं घर बाबांचं आहे. पंचेचाळीस वर्षांपूर्वी त्यांनीही त्या व्यवहारात पैसे चारलेले नाहीत. मी माझ्या नवी मुंबईतील रहात्या घराच्या व्यवहारातही नाहीत. नशीबाने प्रस्तुत चर्चेतला निवासी भूखंडही गावाबाहेरच्या एका वयस्कर गृहस्थाचा होता, जो तत्वनिष्ठही आहे (गृहस्थ). त्यामुळे आमचा सगळा व्यवहार पांढराच होऊ शकला. गटबुक नकाशा हस्तगत करण्यासाठी ज्या स्थानिक मित्राने खेट्या घातल्या त्याला दाद मिळत नाहीएसं पाह्यल्यावर मी मुद्दाम भारतवारी काढली नि तहसील कार्यालयात थडकलो तर तिथल्या जबाबदार साहेबाने पंधराव्या मिनिटाला तिरक्या नजरेने माझ्या हातात तो ठेवला. तिथलं बदललेलं वातावरण बघता मी त्यांना तहेलकाचा पत्रकार वगैरे वाटलो असण्याची शक्यता आहे. तसं मित्र मला म्हणाला.
नवा सातबारा काढण्यासाठी मात्र तलाठ्याला पाचेकशे रु द्यावे लागलेले. तस्मात, गोळाबेरीज पाहता माणसाचा चांगुलपणा नि पैसे न चारताही कामं होण्याची शक्यता या गोष्टी गृहित धरण्याइतपत आयुष्याचा चांगला अनुभव मला आजवर आलेला आहे. याला नशीब म्हणू वा आईवडिलांची पुण्याई.
म्हणून समानशील मित्रांशी अनुभवांची देवघेव व्हावी यासाठी हा धागा काढला 'होता'. अन् त्यावरच्या त्वरित नि् अर्थपूर्ण प्रतिसादांसाठी (निंदेसकट) मिपा.करांचे आभार मानावे तितके कमी आहेत.
शुभम् भवतु -
25 Mar 2012 - 3:02 am | दादा कोंडके
बापरे, लेख आणि प्रतिक्रिया वाचून माझं स्वप्न मोठ्ठं होण्याआधिच त्याच्या गळ्याला नख लावलं मी. :(
25 Mar 2012 - 6:34 am | कौन्तेय
दादा,
'लगिन पहावं करून नि घर पहावं बांधून' म्हणतात. करून पहावं!
जोखीम आहे कबूल, पण ती कशात नाही? घेऊन टाकायची. पुढचं पुढे! आवश्यक पूर्वतयारी केली की झालं.
जर लोकांच्या वाईटच अनुभवांवर विसंबायचं ठरवलं तर आयुक्ष्यात कुठे जायला नको न् काही करायलाच नको.
शुभ पंथावर बिनधास्स जावा -
25 Mar 2012 - 12:43 pm | आशु जोग
गावात हा त्रास
पण
शहरात हा त्रास नसतो असं आहे का !