कोण येथे गुरुवर्य ?

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
12 Mar 2012 - 9:46 pm

कोण येथे गुरुवर्य ?
खितपत पडले शौर्य
अहिंसेचे पुतळे मानतो
मौनात दडले क्रौर्य

झाकोळला स्पष्ट अंधार
मुखवट्यात गळले धैर्य
स्त्रीत्वाची ताकद जाणतो
खुऱाड्यात लुटले कौमार्य

घुंगूरपाण्यात डुबले नेत्र
कळले कोणास सूरगांभिर्य
दगडात ईश्वर जाणतो
देवत्व शोधतो सूर्य

भावनांचा गच्च बाजार
मनात हरवले माधुर्य
वैराग्यात निरपेक्षता मानतो
अहंकारातून घडते कार्य

---- शब्दमेघ
(कविता पुन:प्रकाशित, नविन काव्य सुचत नसल्याने फक्त कविता वाचताना आपलीही एखादी कविता आता असावी या भावनेमुळे पुन्हा येथे कविता देत आहे. गोड माणुन घ्यावी.)

रौद्ररसकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

12 Mar 2012 - 10:10 pm | प्रचेतस

गणेशा, सुंदर कविता रे,
पण विडंबन पाडण्याचा मोह आवरता आला नाही.

कोण येथे कविवर्य?
गळाठून गेले धैर्य
कविता पाडत असताना
नष्टच झाले शब्दाश्वैर्य

जाहला शब्दांचा अंधार
निसटले यमकाचे वैदुर्य
कवित्वाची ताकद जाणतो
जुळवूनी वाक्ये आचार्य

शब्दकळांत डुबले सत्व
कळले कोणास स्वरगांभिर्य
कागदाचेच बोळे करितो
पाडूनी जिलब्या अनिवार्य

कडव्यांचा नुसता बाजार
कवितेचे हरवले माधुर्य
यमकातच सार्थकता मानतो
जाणूनी मीच कविवर्य

(विडंबन आताच प्रकाशित, नविन काव्य सुचत नसल्याने फक्त कविता वाचताना आपलेही एखादे विडंबन त्यावर असावे या भावनेमुळे नुकतेच येथे देत आहे. गोड मानून घ्यावे)

गणेशा's picture

12 Mar 2012 - 10:50 pm | गणेशा

___/\___

वल्ली, विडंबन खुपच छान !
मला ह्या कवितेचे विडंबन करता येणार नाही असे वाटले होते, पण तु साक्षात विडंब देवताच आहे असे वाटते आहे.
बोला विडंबाच्या नावान , चांगभलं !

अत्रुप्त आत्मा's picture

12 Mar 2012 - 10:52 pm | अत्रुप्त आत्मा

कोण येथे कविवर्य?
गळाठून गेले धैर्य
कविता पाडत असताना
नष्टच झाले शब्दाश्वैर्य.... >>>>>>>>

कालच्या ऊरलेल्या भाताला फोडणी लावून "गोड" मानून घ्या हे सांगण्यासारखे आहे.
विडंवन मूळ कवितेपेक्षा सरस आहे.

नविन लिखानास प्रेरणा देणारा रिप्लाय .
धन्यवाद .
फक्त मागील कविता जशीच्या तशी दिली आहे, त्याला फोडनी दिली नाही, त्यामुळे अजुन बेचव लागत असेल काव्य तर स्वॉर्री.

@ पका काका

मनापासुन आभार

पक पक पक's picture

12 Mar 2012 - 10:27 pm | पक पक पक

गणेशा मस्त रे , खरच खुप खुप आवड्ले... :)

वल्ली _____/\_____ साष्टांग नमस्कार...

सांजसंध्या's picture

13 Mar 2012 - 2:40 pm | सांजसंध्या

छान आहे कविता, विडंबन आता पाहीले. मस्त झालेय :)