केबल कफ कॅप

जयवी's picture
जयवी in कलादालन
12 Mar 2012 - 8:14 pm

चार दिवसांपूर्वी नेटवर सर्फिंग करता करता क्रोशे कामाचा एक सुरेख ब्लॉग दिसला. तो बघतांना एक केबल कफ कॅप दिसली. मनापासून आवडली. ३-४ रंगांची थोडी थोडी लोकर उरली होती . मग तीच वापरुन ही कॅप बनवली. तिथे एकाच रंगात होती. पण उरलेले रंग वापरुन मल्टीकलर कॅप बनवली.

ही त्या ब्लॉगची लिंक.
http://crochet-mania.blogspot.com/2012/03/crochet-cable-cuff-cap.html

DSC00512" alt="" />

DSC00514" alt="" />

DSC00527" alt="" />

कला

प्रतिक्रिया

जाई.'s picture

12 Mar 2012 - 8:30 pm | जाई.

तुझ्या हातात कला आहे जयवीतै
आवडली कँप

रेवती's picture

12 Mar 2012 - 8:42 pm | रेवती

छान झालिये गं.
माझ्या आत्तापर्यंत २ ते ३ टोप्या तरी हरवून झाल्यात. तू शेजारीण असतीस तर बरं झालं असतं.;)

जयवी's picture

12 Mar 2012 - 9:10 pm | जयवी

:)

प्राजु's picture

12 Mar 2012 - 11:57 pm | प्राजु

हेच म्हणते..
माझ्याही आणि माझ्या लेकाच्याही हरवल्यात कॅप्स!

ही भन्नाट दिसतेय.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Mar 2012 - 6:03 pm | परिकथेतील राजकुमार

टोपी दिसल्या दिसल्या घालायची तयारी सुरु. ;)

असो...

इकडे विणकामाच्या सुया कुठे मिळतात ते आता शोधायला हवे.

जयवी's picture

16 Mar 2012 - 6:18 pm | जयवी

अहो राजकुमार...... तुमचा जिरेटोप जागेवर आहे ना :)
बाकी..... त्या सुया वगैरे तुमची राजकन्या शोधेल की...... ;)

निवेदिता-ताई's picture

12 Mar 2012 - 8:44 pm | निवेदिता-ताई

हो ना...तुझ्या हातात कला आहे जयवी ....

मस्त ..कॅप आवडली

तर्री's picture

12 Mar 2012 - 8:51 pm | तर्री

काल बॉग पाहिला > आज टोपी तय्यार. काय स्पीड आहे की चेष्टा.
आपले हे असे जिन्नस पाहून आपण म्हणजे अगदीच "हे" आहोत हा कॉम्पप्लेक्ष तयार होतो आहे हो.

जयवी's picture

12 Mar 2012 - 9:09 pm | जयवी

तर्री.......माफ करा...... चुकून "काल" लिहिलं. आता संपादन करता येत नाहीये :(
४ दिवसांपूर्वी बघितला आणि आज टोपी तयार झाली.
कृपा करुन गैरसमज करुन घेऊ नका लोक्स.

रेवती's picture

13 Mar 2012 - 1:36 am | रेवती

बदलले. त्यातूनही 'काल' लिहिल्यामुळे जरा इंप्रेशन पडत होतं मस्तपैकी तर खुलासा केलास.;)

रेवती......बदल केल्याबद्दल घन्यवाद :)
आणि इंप्रेशनचं म्हणशील तर ....... चुकीचं इंप्रेशन नकोच गं...... खरं सांगून थोडं कमी पडलं तरी चालेल. उगाच भलत्या अपेक्षा वाढल्या तर सांभाळणं मलाच कठीण होईल....... !!

छ्या आता टोप्या घालणार... :D

- (लाल टोपीवाला) पिंगू

अत्रुप्त आत्मा's picture

13 Mar 2012 - 3:35 pm | अत्रुप्त आत्मा

क्लास क्लास..हाय क्लास...रंगसंगती आणी प्रमाणबद्धते करिता ---^---

अवांतर-@३-४ रंगांची थोडी थोडी लोकर उरली होती . मग तीच वापरुन ही कॅप बनवली>>> म्हणुनच ही कॅप इतकी क्लासिक बनली.. यासारखाच माझा पर्वा-चतुर्थीचा अनुभव शेअर करतो... दुपारी २वाजता काम अवरुन घरी जात असताना,अनपेक्षितपणे एकांचा फोन आला,की आज कहिही करुन अभिषेकाला याच...गेलो मग ...जाताना आमच्या फुलांच्या पिशवीत डोकाऊन पाहिले,तर अगदी तुरळक फुलं उरली होती...मनात म्हटलं,,,आज या शिल्लक फुलांमधुन मधुन काय रांगोळी येइल कुणास ठाऊक..? पण पुजा सुरु झाली आणी गंपती बाप्पांसमोर नुसता फुलांचा मोदक काढु म्हणता म्हणता... अचानक माझ्या मनात आलं....आणी काढुन झाला तो हा गंपतीबाप्पाच.. :-)

कधी कधी भरपुर फुलं असुनही खेळ रंगत नाही...आणी बर्‍याचदा उरलेली फुलं अशी कमाल घडवुन अणतात.. :-)

जयवी's picture

13 Mar 2012 - 4:33 pm | जयवी

कसला जबरी दिसतोय गणपती....!!
कमाल आहात तुम्ही !!!!!!!!!!
हातात जादू आहे हो......!!

क्यूट गणपती बाप्पा बरं काहो गुर्जी.

तर्री's picture

13 Mar 2012 - 7:58 pm | तर्री

कल्पकता व कला यांचा सुरेख संगम !!!

पैसा's picture

13 Mar 2012 - 7:59 pm | पैसा

टोपी मस्तच! चार दिवसात म्हटलंस तरी माझ्या मते फार लौकर झाली.

आणि भटजी, गणपती छान आहे हो!

सानिकास्वप्निल's picture

15 Mar 2012 - 4:53 pm | सानिकास्वप्निल

जयवीताई सुंदरचं टोपी आहे :)
तुझे क्रोशाचे काम पाहून मला ही राहवेना..खरचं व्यसन आहे गं :)
तू किती सहजपणे करतेस गं आवडले मला :)

सानिका....... तो हो जाओ शुरू तुम भी :)

मदनबाण's picture

16 Mar 2012 - 12:45 pm | मदनबाण

वा... किती सुंदर विणलय ! :)
कलाकाराचे कलाकारी करणारे हात... :)

जाता-जाता :--- हे बरयं इथे मेंढ्यांना टकलु करायचं आणि त्यांच्या लोकरीची टोपी करायची ! ;) बिचार्‍या मेंढ्या ! ;)

जयवी's picture

16 Mar 2012 - 6:13 pm | जयवी

मदन बाणा.........धन्यु !!
बाकी ..... जाता जाता फार मार्मिक बोलून जातोस बॉ तू :)

अरे मेल्या, त्यांच्या अंगावर येईल की लोकर पुन्हा!
आमच्या डोक्यावर उगवणारे का ती?