होळी म्हणले की ' बोंबलणे ' आणि ' टिमकी ' वाजवणे याचे बाळकडू आम्हाला घाटावरच मिळाले. मात्र मुंबईत आल्यावर या दोन्ही गोष्टीना मुकलो. दरवर्षी सोसयटीच्या आवारात अगदी पारंपारिक पध्दतीने होळी साजरी होते मात्र या दोन्ही गोष्टी बघायला ( करायला ) मिळत नाहीत. मात्र या वर्षी होळी पेटली की ठरवलय ,प्रसादाचा नारळ होळीत सोडायचा आणि मग होळी भोवती प्रदक्षिणा मारत बोंब ठोकायची. ' हा काय करतोय येड्यासासारखा ? ' असे सोसायटीतील लोकाना वाटले तरी चालेल .
वर्ष भरात ज्या गोष्टींमुळे त्रास झाला/ होतो त्यांचा उध्दार करायचाच म्हणून यादी तयार करायला घेतली ती अशी :)
१) पहिली फेरी सचिनच्या नावे - अरे भो x x च्या, प्रतेक सामन्यात अपेक्षा ठेवल्या होत्या, मित्रांशी पैजा लावल्या होत्या आता बोंबल्तो तुझ्या नावाने . आता तरी बांग्लादेशात होऊदे !
२) पर्यावरणवादी - या नालायकांना फक्त होळी आणि दसरा या दिवशीच झाडे, पर्यावरण -हास यांची आठवण होते. बकरी ईदला मुक्या प्राण्यांची हत्या होताना एक शब्द निघत नाही
३) मुंबईकर - मराठी अस्मितेचा अभिमान बाळगत धुलवडीच्याच दिवशी रंगमंचमी साजरी करणा-या मुंबईकरांसाठी तिसरी फेरी ( यात आम्ही स्वता: ही आलो :) )
४) खास ' ती ' च्या साठी - ती हो आमची , ८.०५ ची पनवेल - ठाणे लाल डब्बा - एक दिवस जरी वेळेवर आली तर शप्पथ
बास ! बास ! दमलो , याच्या पुढे फे-या मारता येणार नाहीत ( आणि जास्त बोंबलूनही उपयोग नाही ). पुढल्या वर्षी पर्यंत सा-या सोसायटीला नाही बोंबलायला लावले तर ' घाटावरचा' असे म्हणून घेणार नाही
काय तुमची टार्गेट्स तयार आहेत का ? कळूदे आम्हाला ही :)
( टीपः वरील यादीत ताई, माई, अक्का, बाबा, अण्णा, दादा, काका- पुतण्या, गुरु, भाई, महागाई , भ्रष्टाचार यांना मुद्दाम स्थान दिले नाही. यांच्या नावाचा शिमगा रोजचाच आहे. त्यांच्या बद्दल बोंबलणे जाऊ दे त्यांच्या करामतीने आमची बोबडी वळु नये हीच ' होळी' चरणी प्रार्थना :) )
अमोल केळकर
प्रतिक्रिया
7 Mar 2012 - 10:04 am | इरसाल
मिपावरील कंपू प्रतिसादक. (भेडचालवाले...);)
7 Mar 2012 - 10:23 am | डॉ.श्रीराम दिवटे
जावयाची गाढवावरून धिंड काढून बोंब ठोकण्याची एक प्रथा आहे. तो सोहळा मात्र डोळे भरून साठवून ठेवावा असा असतो. जावयाच्या नावाने शिव्या घालणारी सासू म्हणजे ढाँसूच!
7 Mar 2012 - 12:11 pm | स्वातीविशु
हा मलाही मुंबैत आल्यावर पड्लेला प्रश्न आहे. आपल्या महाराष्ट्रीय परंपरेत होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुळवड (धुलिवंदन). यादिवशी होळीची जी राख असते त्यात थोडे पाणी टाकून चिखल करतात आणि त्यात एकमेकांना लोळवतात. :)
यादिवशी कुठलाच रंग वापरत नाही. फक्त धुळ / माती ह्याने ती साजरी करायची असते. (ते आपल्या त्वचेला हानीकारकही नसते.) :)
होळीचा पाचवा दिवस म्हणजे रंगपंचमी. हा दिवस मात्र सर्व रंगांचा( नैसर्गिक व त्वचेला, डोळ्यांना हानी न करणारे रंग) वापर करुन साजरा करायचा असतो.
मुंबईत मात्र असे कोणीही करताना दिसत नाही. त्या युपी, बिहार्यांसारखी धुळवडीला कधी कधी होळीलाच रंगपंचमी साजरी करताना मराठी लोक दिसतात. (आम्ही लहाणपणी जे काही मजा केलीये तशी आता खरच अजिबात मजा नाही. :( )
असो होळी, धुळ्वड आणि रंगपंचमीच्या सर्वांना खुप शुभेच्छा.
7 Mar 2012 - 7:11 pm | अमितसांगली
आमच्याकडून फक्त शुभेच्छा....
23 Mar 2016 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला ज्यांनी ज्यांनी वर्षभर त्रास दिला त्यांच्या बैलाला रे भो. :)
-दिलीप बिरुटे