आजची रात्र...

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
5 Mar 2012 - 10:51 am

सुटुनी चांदण्या रातीतून, पहाट शिरतसे नभात या
तरूण आहे मात्र अजूनी, रात्र आजच्या क्षणांत या

मनातले वादळ तुझ्या-माझ्या, उतरे मद्याच्या प्याल्यांत या
एक एक घोट फिरूनी, काहूरतो शरीरात या

न आहे न होती कधी, तमा लोकांची मला
नाही तरी काय मिळाले, त्यांच्यासवे जगण्यात या

दे शब्दमिठी मला तुझी, सोडू नकोस सैल जरा
कैफ मला जगू दे जरा, आज अश्या धुंदण्यात या

चार भिंतीं पलिकडे, थोपविलेस तू 'त्या' वणव्याला
सखया आज राख होऊदे, जगावेगळ्या जळण्यात या

आहेच चिंता उद्या पुन्हा, जगण्याची तुला मला
बघ जराशी आहे अजुनी, रात्र आजच्या क्षणांत या

गझल

प्रतिक्रिया

सांजसंध्या's picture

5 Mar 2012 - 11:35 am | सांजसंध्या

न आहे न होती कधी, तमा लोकांची मला
नाही तरी काय मिळाले, त्यांच्यासवे जगण्यात या

व्वाह ! सुंदर गझल

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Mar 2012 - 1:25 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त कविता!

आहेच चिंता उद्या पुन्हा, जगण्याची तुला मला
बघ जराशी आहे अजुनी, रात्र आजच्या क्षणांत या

क्या बात! व्वाह!!

वपाडाव's picture

7 Mar 2012 - 5:21 pm | वपाडाव

हेच्च अन असेच म्हणतो...

मूकवाचक's picture

5 Mar 2012 - 1:38 pm | मूकवाचक

गझल आवडली.

इन्दुसुता's picture

5 Mar 2012 - 10:20 pm | इन्दुसुता

आवडली

अमितसांगली's picture

6 Mar 2012 - 8:29 am | अमितसांगली

दे शब्दमिठी मला तुझी, सोडू नकोस सैल जरा
कैफ मला जगू दे जरा, आज अश्या धुंदण्यात या....

आवडली......

मयुरपिंपळे's picture

6 Mar 2012 - 11:38 am | मयुरपिंपळे

जिलबी ;)

अमितसांगली's picture

7 Mar 2012 - 7:41 pm | अमितसांगली

आवडली