सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
27 Feb 2012 - 2:18 pm

महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा
सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा
कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही
सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा
धगधगत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये
घुमतो आवाज मराठीचा
एकतेची साद घेवुनी
संवाद मराठीचा
शब्द चिंगार
आवाज मराठीचा
संस्कार दिसे खुलुनी
साजशृंगार माय मराठीचा
हाती तेजोमय तलवार तळपते
रणांगणात गर्जतो यल्गार मराठीचा
गरजले परके सारे जरी घरात आपापल्या
नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा
शिवबाची ज्योत ह्रदयी ठेवतो तेवत, बाणा मराठीचा
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

--- ---शब्दमेघ ------

वीररसकविताभाषा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

27 Feb 2012 - 2:22 pm | प्रचेतस

अप्रतिम कविता रे.

मी-सौरभ's picture

28 Feb 2012 - 6:20 pm | मी-सौरभ

सहमत

प्रकाश१११'s picture

27 Feb 2012 - 6:55 pm | प्रकाश१११

झेंड्यासकट उत्तम कविता.
छान लय.नि झकास शब्द ..!!

पक पक पक's picture

27 Feb 2012 - 10:01 pm | पक पक पक

गणेशा ,काव्यमय भगवा खुप खुप आवड्ला....छान ! मस्त !! लाजवाब!!!

जाई.'s picture

27 Feb 2012 - 10:07 pm | जाई.

समयोचित कविता

अत्रुप्त आत्मा's picture

27 Feb 2012 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा

समरगीतकार गणेशभाऊंचा इजय असो...

पैसा's picture

28 Feb 2012 - 12:07 am | पैसा

गेल्या वर्षी तू असा प्रयत्न केला होतास नाही? कविता मस्त आणि सादरीकरण छानच!

पाषाणभेद's picture

28 Feb 2012 - 1:40 am | पाषाणभेद

भगवा झेंडा!
जय महाराष्ट्र!

वपाडाव's picture

28 Feb 2012 - 4:28 am | वपाडाव

**********
*******
***
*******
**********
.
.
.

स्वातीविशु's picture

28 Feb 2012 - 3:12 pm | स्वातीविशु

भगव्या झेंड्यासह कविता आवड्ली.

इन्दुसुता's picture

29 Feb 2012 - 7:12 am | इन्दुसुता

कविता अतिशय आवडली गणेशा.
" लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी ' ची आठवण झाली.
गेल्या वर्षी मला वाट्ते तात्यांनी दुवा दिला होता. कुणीतरी परत द्या रे ईथे. :)