ही रुद्र गाठीचीच केलेली बेबी शॉल !! घरातली लोकर संपवायची म्हणून झालेली :)
ह्याचा व्हिडियो .........
http://youtu.be/GEFXT35C_TE
" width="480" height="212" alt="" />
" width="480" height="360" alt="" />
" width="480" height="360" alt="" />
" width="480" height="360" alt="" />
प्रतिक्रिया
26 Feb 2012 - 12:53 pm | चिगो
सुंदर आहे ही शाल , ताई..
26 Feb 2012 - 1:54 pm | पिंगू
शॉल तर बनली... आता बेबी कुठून आणायची.. ;)
- पिंगू
26 Feb 2012 - 2:15 pm | नावातकायआहे
पराकाकांना विचारा! ;-)
26 Feb 2012 - 2:43 pm | जयवी
हे हे हे.......... बरोबर आहे. परा, श्रामो, टारझन....... आहेत की बरीच मंडळी :)
26 Feb 2012 - 4:22 pm | प्रशांत उदय मनोहर
पराकाका की परीताई? ;)
26 Feb 2012 - 2:47 pm | पैसा
या रुद्रगाठी घालून पूर्वी प्लॅस्टिकच्या पिशव्या केलेल्या आठवतायत!
26 Feb 2012 - 9:55 pm | निवेदिता-ताई
शाल सुंदरच........:)
पराकाका की परीताई? .....हे हे हे ..परा बघ रे जरा या लोकांकडे????..काय म्हणावे या लोकांना????....;)
27 Feb 2012 - 2:10 am | शिल्पा ब
छान आहे. प्रयत्न करुन बघते जमतेय का.
27 Feb 2012 - 11:02 am | जयवी
नक्की जमेल :) क्रोशा येत असेल तर जास्त लवकर जमेल :)
27 Feb 2012 - 2:48 am | पाषाणभेद
हं... मग काय काय बर्फी की पेढे?
क्रोशे म्हणजे मोठ्या सुया असतात ते नं? एक उलटा एक सुलटा असलं काहीतरी असत. बहीण करायची काहीतरी असलं.
27 Feb 2012 - 6:02 am | शिल्पा ब
बेबी शॉल म्हणजे बेबीसाठी केलेलीच असं नै हो!!! बेबी शॉल म्हणजे छोटुकली शॉल असं त्या म्हणत असाव्यात.
27 Feb 2012 - 10:59 am | जयवी
नाही. क्रोशे म्हणजे साधारण वीतभर लांबीची सुई असते आणि तिचं टोक वळलेलं असतं.
तू जे म्हणतो आहेस त्या साध्या स्वेटर वीणायच्या सुया :)
ह्या बघ अशा असतात क्रोशाच्या सुया.
आणि ह्या तू म्हणतोस तशा स्वेटर विणायच्या सुया ज्याला निटिंग निडल्स म्हणतात.
शिल्पा..... ह्म्म...... छोटुकली शॉल :)
27 Feb 2012 - 6:00 am | पारुबाई
मस्त दिसते आहे शाल.
एकसारखे आणि नाजूक काम आहे तुमचे.
27 Feb 2012 - 7:37 am | रेवती
आवडली.
रंगही छान.
27 Feb 2012 - 10:08 am | प्राजु
अरे वाह! जोरदार चालू आहे की क्रोशे काम!!
काय इशेष?? :)
27 Feb 2012 - 11:01 am | जयवी
विशेष काही नाही गं..... हे सगळं फार कंटेजियस असतं. मैत्रिणीला करतांना बघितलं त्यामुळे जुना छंद उफाळून आला :)