सचिन तेंडुलकर

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in क्रिडा जगत
25 Feb 2012 - 8:36 am

Times of India च्या सर्वे मधे २६,८१३ लोकांना असं वाटतं की सचिन ने रिटायरमेंट घ्यायला हवी...
माझंही मत असंच आहे.

फक्त महाशतक होण्यासाठी खेळत रहाणं मला तरी बरोबर वाटत नाही.
त्याचा कपिल देव होउ नये अशी मनापासून ईच्छा आहे.
तुम्हाला काय वाटतं ??????????

क्रिकेट

प्रतिक्रिया

पैसा's picture

25 Feb 2012 - 10:18 am | पैसा

तिथे तुमचा आमचा प्रश्न येत नाही. इतर कोणत्याही क्षेत्रात रिटायर होताना जसं कोणीही किती पैसे मिळतील, रिटायर झाल्यानंतर आपण काय करू शकतो या सगळ्याचा विचार करतो, तसाच त्यानेही केला असेल. खेळत राहण्यामागे त्याची स्वतःची आपल्याला माहिती नसलेली कारणं असतील!

अन्या दातार's picture

25 Feb 2012 - 10:37 am | अन्या दातार

हा लेख इथून उडावा असं वाटतं!! :(

शेखर काळे's picture

25 Feb 2012 - 10:48 am | शेखर काळे

साधं गणित आहे .. जो पर्यंत लोक पैसे देऊन सचिनला खेळतांना बघायला जातील, तोपर्यंत भारतिय क्रिकेट बोर्ड त्याला रिटायर होऊ देणार नाही. शिवाय माझ्या मते त्याची कामगिरी इतरांच्या मानाने वाईट झालेली नाही.
बोर्डाचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या (आणि माझ्याही) मते एक महिना वाट पहा, भारतिय संघ पुन्हा श्रीलंके विरुद्ध भारतात खेळेल, सचिन एक काय २-३ शतके काढेल, आणि आपण सगळे सचिनच्या दीडशेव्या शतकाची वाट पाहू !

- शेखर काळे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Feb 2012 - 5:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकतर अशा दोनचार ओळीचा धागा आणि पुन्हा विषय सचिन. आता काय बोलायचं. Times of India च्या सर्वे मधील २६,८१३ लोकांना जसं वाटतं अगदी तस्सच मलाही वाटतंय. माझी लाख इच्छा आहे, की सचिनने आता प्रातःस्मरणीय सत्य साईबाबांचं स्मरण करुन निवृत्तीची घोषणा करुन टाकावी. पण, आपलं ऐकतंय कोण ? परिकथेतील राजकुमार मागे एका चर्चेत म्हणाले होते (आशय असाच असावा. कमी जास्त झाले तर माझी जवाबदारी) की, जोपर्यंत भारतीय क्रि.बोर्डाला वाटते की जोपर्यंत पब्लिक 'सचिन सचिन' करत मैदानात येतंय ना तोपर्यंत त्याच्या नावावर आपण आपला धंदा करुन घ्यावा असे त्यांचे धोरण असल्यामुळे सचिन अजुन काय रिटायर होणार नाही, असं वाटतं.

राहीलं महाशतकाचा विषय तर लवकरच सचिन महाशतक पूर्ण करील अशी आशा सच्याचा फलंदाजीचा फ्यान म्हणुन वाटते. वाटलं तर नेदरलँड, बांग्लादेश वगैरेंच्या बरोबर वंडे मालिका आणि कसोटी सामने आयोजित करावे जोपर्यंत महाशतक होत नाही तोपर्यंत या मालिका चालु ठेवाव्या. पण, असं आहे की सच्या लुंग्या सुंग्या टीमसोबत धावाचा डोंगर रचत नाही. (विदा नाही पण असं वाटतं) पुस्तकात नसलेले आणि असलेले जगातल्या कोणत्याही सुमार ते अप्रतिम गोलंदाजाविरुद्धचे अप्रतिम फटके मी केव्हाच विसरलो आहे. तेव्हा आता या विषयावर मी काहीच बोलायचंच नाही असं ठरवलं आहे. तुर्तास इतकेच. ;)

-दिलीप बिरुटे

अमोल केळकर's picture

25 Feb 2012 - 5:29 pm | अमोल केळकर

अभिनंदनाचे लेख सगळ्यांनीच तयार करुन ठेवले आहेत, सर्व न्यूज चूनेल्स नेही आपापले व्हिडीओ सज्ज केले आहेत, संपादकीय तयार आहे. सचिन या सगळ्यांची मेहनत वाया जावू देणार नाही. हे सर्व अडगळीत जाई पर्यंत शतक नक्की होईल :)

अमोल केळकर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Feb 2012 - 5:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असे लवकरच झाले तर मला आठ पंधरा दिवस ऑफलाइन राहुन मिपा वाचावे लागेल. किंवा डु आयडी घेऊन (घेणार नाही)
'' सच्या बोलत नाही त्याची ब्याट बोलते आता विरोधक काय बोलणार कुठे गेले ते सच्याला रिटायर व्हा रिटायर व्हा म्हन्नारे लोक'' असा प्रतिसाद टाकावा लागेल. आणि सच्याचे पुलचे फटके, जीवघेणा पॅडलस्वीप. ष्ट्रेट ड्राइव्ह, स्क्वेअर कट, अशा काय नी किती फटक्याचं कौतुक करावं लागेल. :)

अभिनंदनाचे लेख सगळ्यांनीच तयार करुन ठेवले आहेत

मिपावर तर खुपच कौतुकाचे धागे निघतील. मीही एखादा अभिनंदनाचा लेख लिहीन. युट्युबवरील काही फटक्यांचे लिंका-बिंका, फलंदाजीचा विदा, झेलांचा विदा, गोलंदाजीचा विदा काय नी काय सेव्ह करुन ठेवतो. इथं जागा नै मिळाली तर ब्लॉगवर लिहीन. जगभर क्रिकेट रसिक न तुटणार्‍या रेकॉर्डचं कौतुक करत असतील आणि अशा आनंदाच्या प्रसंगी आपण कशाला कोणी गेल्यासारखं तोंड करुन राह्यचं, नै का, काय म्हणता ? :)

-दिलीप बिरुटे

अन्या दातार's picture

25 Feb 2012 - 6:09 pm | अन्या दातार

प्रा.डॉ. दिलीप बिरुटे हा सचिन तेंडूलकरचा मिपावरील मिपावरचा आयडी असल्याची दाट शंका येतेय ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Feb 2012 - 6:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नै हो. मी आपला वरीजनल दिलीप बिरुटे आहे. वाटल्यास महाविद्यालयाचे ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड दाखवतो. :)

-दिलीप बिरुटे

अन्या दातार's picture

25 Feb 2012 - 7:38 pm | अन्या दातार

महाविद्यालयाचे ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड

ओरिजिनल सचिनला यापैकी काहीही मिळणे सहजशक्य आहे ;)

रघु सावंत's picture

25 Feb 2012 - 8:04 pm | रघु सावंत

सचिन या सगळ्यांची मेहनत वाया जावू देणार नाही.

चौकटराजा's picture

25 Feb 2012 - 8:25 pm | चौकटराजा

सचिन तेडूलकर हा सर्वकालीन महाफलंदाज आहे .त्याने अनेक विक्रम केले आहेत पण तो सर्वोत्तम फलंदाज नाही. माझ्या आठवणी प्रमाणे त्याचा व ग्लेन मॅक्ग्रा चा खरा फारसा सामना झालेलाच नाही. त्याने अपयश पाहिले आहे व यश पुन्हा मिळू शकते हे ही पाहिले आहे. चाळीशी ला आल्याने त्याचे रिफलेक्स कमी होऊन तो बाद होत असावा. आपल्या निवृतीचे कारण गावसकरानी हेच दिले होते. पण सचिनने आणखी
एखाद्या सिरीजचा चान्स घ्यावा. त्याला १०० व्या महा शतकाचे आकर्षण असेल असे वाटत नाही. पण अजूनही तो विझलेला आहे असे मला
तरी वाटत नाही. त्याच्या पेक्षा चांगला गेल्या चार वर्षात कोण भारतीय खेळला आहे ?

टवाळ कार्टा's picture

26 Feb 2012 - 12:01 am | टवाळ कार्टा

+१

मी-सौरभ's picture

26 Feb 2012 - 12:38 pm | मी-सौरभ

त्याच्या पेक्षा चांगला गेल्या चार वर्षात कोण भारतीय खेळला आहे ?

विराट, धोनी, युवराज, द्रविड ई.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Feb 2012 - 4:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रिकेट हा खेळ सांघिक असल्यामुळे कोणा एकामुळं खेळात विजय मिळतो वगैरे म्हणण्यात काही अर्थ नाही. चार वर्षात त्याच्याबरोबर इतरही खेळाडुंनी खेळ केलाच आहे.

>>>>>> चाळीशी ला आल्याने त्याचे रिफलेक्स कमी होऊन तो बाद होत असावा.
गप्प बसायचं ठरवलं आहे.

असो, आजच्या सामन्यात नेहमीप्रमाणे सच्या फेल गेला. आणि सध्याच्या सर्वांच्याच सुमार प्रदर्शनामुळे आपण पराभुतही झालो. पण, आज ब्रेट्लीमुळं त्याला धाव घेतांना ब्रेक लागला आणि तो धावबाद झाला. इथं पंचानी त्याला वाचवलं असतं तर शंभरचा चान्स होता असे म्हणायला काय हरकत आहे.

गेल्या सहा सामन्यामधील सच्याच्या धावा. आज १४,२२,३,१५,४८,२. = १०४
सेहवाग................................................................५,०,२०,१०,२३,४,- = ६२
धोनी...................................................................१४,५६,५८,४४,४,२९= २०५
विराट कोहली.......................................................२१,६६,१२,१५,१८,७७= २०९
(माहिती सौजन्य)

-दिलीप बिरुटे
(रैवारचा रिकामटेकडा)