दुनिया तुझ्यामुळे....

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
18 Feb 2012 - 10:49 pm

दुनियादारी शिकण्या शिकविण्यात, जन्म सारा चालला
दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला

ते न फसवे आता
हास्य ओठी जे दावतो
श्वास होउनी गेल्या आता
रिती ज्या मी पाळतो
न जाणो कधी कसा हा जीव, ऐहिकात रमाया लागला
दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला

सुजनाची धुंदी आता
होय मला पारखी
शब्दही लेखणीत यायला
मागतात पालखी
असा कसा फकीराचा पाय, वस्तीत रुताया लागला
दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला

दुनिया तूच सांगशी
काय करू अन करू नको
जरी सरणावर पडलो
तरी सांगशील मरू नको
अताशा न देताही मला तुझा, आदेश कळाया लागला
दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला,
दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला.....

गझल

प्रतिक्रिया

आशयघन लिहीले आहे;
पण वृत्तात मार खात असल्याने, ओघवती शब्दयोजना नसल्याने एवढ्या आशयघन काव्याला काव्याभ्यासूंनी प्रतिक्रिया दिल्या नसाव्यात. :)

इन्दुसुता's picture

22 Feb 2012 - 6:17 am | इन्दुसुता

" आशयघन लिहीले आहे;"

याच्याशी सहमत