>>ऍक्रोस्टिक म्हणजे काय रे पक्या?
ह्म्म्म्म,
लिखाणातील प्रत्येक ओळीतले पहिले अक्षर घेऊन एक वेगळाच शब्द तयार होतो. तो शब्द कवितेचा विषय , शीर्षक , कवितेची मध्यवर्ती कल्पना , संदेश वगैरे दर्शवतो. काही वेळेस एकच अक्षर न वापरता अक्षरांचा समूह (पण अक्षरसंख्या समान हवी) किंवा एक पूर्ण शब्द ही वापरतात. हा काव्यप्रकार ईंग्लीश आहे.
उदा. Jasmin Just Adorable Adventurous Sweet Mature Interesting Nice girl
Rabbit Runs fast Awesome Bounces Best at hopping I nteresting pet Tons of fun
प्रतिक्रिया
11 Jun 2008 - 12:10 pm | पक्या
मस्तच .
म दिरेशिवाय
धु न्दावणारं
बा वनकशी
ला वण्य
ऍक्रोस्टिक काव्य आवडलं
11 Jun 2008 - 12:13 pm | ऋचा
तुम्ही खुप छान लिहिता आणि चित्र पण छान काढलं आहे
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
11 Jun 2008 - 9:57 pm | तळीराम
सांग ना रे!
11 Jun 2008 - 10:04 pm | वरदा
चित्रही छान आणि चारोळ्याही छान!
11 Jun 2008 - 10:55 pm | पक्या
>>ऍक्रोस्टिक म्हणजे काय रे पक्या?
ह्म्म्म्म,
लिखाणातील प्रत्येक ओळीतले पहिले अक्षर घेऊन एक वेगळाच शब्द तयार होतो. तो शब्द कवितेचा विषय , शीर्षक , कवितेची मध्यवर्ती कल्पना , संदेश वगैरे दर्शवतो. काही वेळेस एकच अक्षर न वापरता अक्षरांचा समूह (पण अक्षरसंख्या समान हवी) किंवा एक पूर्ण शब्द ही वापरतात. हा काव्यप्रकार ईंग्लीश आहे.
उदा. Jasmin
Just Adorable
Adventurous
Sweet
Mature
Interesting
Nice girl
Rabbit
Runs fast
Awesome
Bounces
Best at hopping
I nteresting pet
Tons of fun
12 Jun 2008 - 11:15 am | नीलकांत
अफजल खान निघाल्याची बातमी रामदास स्वामींनी अश्याच स्वरुपात महारांजा लिहून पाठवली होती असं म्हणतात.
12 Jun 2008 - 11:32 am | उदय सप्रे
नीलकांत जी,
बरोबर आहे , यासाठी आपण रणजित देसाई यांचे "लक्ष्यवेध" हे पुस्तक वाचा.....खेरीज माझे (आगामी) कान्होजी जेधे पण वाचा (कधी येईल माहित नाहि हां !)
12 Jun 2008 - 8:35 am | यशोधरा
दुसरी चारोळी आवडली. चित्रही छान आलय..
12 Jun 2008 - 4:53 pm | आंबोळी
उठून रोज
दळतो कविता
यमके जुळवून
सचित्र करतो
प्रकाशण्यास आहे मिपा
(ह्.घ्या.)
12 Jun 2008 - 4:59 pm | अमोल केळकर
:))
13 Jun 2008 - 10:02 am | उदय सप्रे
पण अपूर्ण्....सप्र नाहिये आंबोळी साहेब , सप्रे आहे.....
पण प्रयत्न एकदम झकास्...आणि हो.....आता आमचे लिखाण मिप वर एकदम बंद बरं का, उगाचच जबरदस्ती नको.....
13 Jun 2008 - 10:36 am | धमाल मुलगी
चारोल्या आवड्ल्या. शेवट्ची मात्र पुर्ण दिसत नाही.
13 Jun 2008 - 10:49 am | उदय सप्रे
शेवटची चारोळी पण पूर्णच आहे , फक्त ती खाली माझे हस्ताक्षर खोडून कॅलिग्राफीमधे लिहिली आहे.....
घडवल्यावर जिला त्याला वाटलं
आपली बाकी निर्मिती नगण्य
अशी ही एकच मधुबाला .....म्हणजे
म दिरेशिवाय
धु न्दावणारं
बा वनकशी
ला वण्य
14 Jun 2008 - 1:01 am | विसोबा खेचर
उदयराव, आपल्या प्रयत्नांना अवश्य दाद देतो परंतु मला हे चित्र फारसं आवडलं नाही.
ते नीट जमलेलं नाही असं माझं प्रांजळ मत आहे..
असो, पुढील चित्रकलेसाठी शुभेच्छा!
तात्या.