रसिक मनाचा अवखळ झारा.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
11 Jun 2008 - 11:53 am

कविता

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

11 Jun 2008 - 12:04 pm | अरुण मनोहर

छान. प्रकाश चित्रही सुंदर. पण कविता रिव्हर्स हायलाईट्मधे वाचायला त्रास होतो आहे.
अवांतर- आधीच तर खुप जणांना कविता वाचायचा कंटाळा असतो. त्यात मांडणीने अडथळे कशाला घालतात कोण जाणे! ह. घ्या. :)

उदय सप्रे's picture

11 Jun 2008 - 12:09 pm | उदय सप्रे

अरूण जी,

आपली तक्रार अगदी रास्त आहे , पण ही जे.पी.जी.फाईल असल्याने आता त्याची परत उसंतवार करत बसायला वेळ कमी पडतोय्.....गैरसोयीबध्द्ल मंडळ दिलगिर आहे !

प्राजु's picture

11 Jun 2008 - 12:14 pm | प्राजु

शब्दसाज आणि नाद माधुर्य अप्रतिम जमले आहे.
विशेषतः

सळसळणारे केस मोकळे..... कधी तुझा अन सुगंध न्यारा...

हे कडवे तर अगदि चित्रमय. वरती दिलेले चित्रही त्या कवितेला अगदी साजेसे आहे. अभिनंदन एका सुंदर काव्यासाठी.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

उदय सप्रे's picture

11 Jun 2008 - 1:46 pm | उदय सप्रे

प्राजु,

तुमच्या सर्व प्रतिसादांबध्दल धन्यवाद ! आता जरा तुमच्या या प्रतिसादाखालील प्रतिसाद पण वाचा , मी खरंच संभ्रमात पडलोय की मी इतका वाईट लिहितो की काय?

अहो, मला ते चित्र अपलोडिंग नीट नव्हतं येत ते आता कळाले म्हणून असलेल्या कविता एकदम प्रकाशित केल्या इतकंच.....

आपला,

उदय सप्रे

झारा-- वारा --- गारा ---सारा ---न्यारा॑ ---थारा ---कोरा--- सावरा--

हे ला "र ला ट" आता कोणीतरी आवरा भरा भरा

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विसुनाना's picture

11 Jun 2008 - 1:51 pm | विसुनाना

बाकी कविता ठीक आहे. पण -
रसिक मनाचा अवखळ झारा - या ओळीतला 'झारा' या शब्दाचा अर्थ काय?
'झरा' म्हणायचे आहे काय?

की तळायला वापरतात तो?

अभिज्ञ's picture

11 Jun 2008 - 2:05 pm | अभिज्ञ

मी हि कविता वाचलि. वरुन खाली अन खालून वरति अशा क्रमानेहि वाचून पाहिलि.
अर्थातच अर्थात काहि फरक पडला नाहि.अचंबा वाटला.
ह्या प्रकाराला व्याकरणात नक्कि काय म्हणतात?

(अनभि़ज्ञ) अभिज्ञ.

उदय सप्रे's picture

11 Jun 2008 - 2:15 pm | उदय सप्रे

अ(न्)भिज्ञ साहेब,

शेवटी एक वीट फेकून आमचा विठ्ठलराव केलात तुम्ही !

ही कविता म्हणजे मधुचंद्राचं वर्णन आहे टप्प्याटप्याने.....आणि तुम्हाला ते उलट क्रमाने वाचून पण अर्थात काहीच फरक पडला नाही असे वाटत असेल तर "आम्ही विठ्ठलराव आहोत" ही आम्ही मान्य करतो बिनशर्त !

मंडळ आभारी आहे !