सरळ रस्ता

मयुरपिंपळे's picture
मयुरपिंपळे in जे न देखे रवी...
30 Jan 2012 - 9:22 pm

जीवन म्हणजे एक सरळ रस्ता
किती तरी होतात मनाला खस्ता |

आनंदाला हि नाही कुठं कट्टा
दुःखांनी सुधा मांडला सर्वी कडे सट्टा |

रात्र व दिवस ह्यांचा नुसता पोर खेळ
ह्यामध्ये सावलीचा ही कुठं नाही बसत मेळ |

नाला, नद्यांनी बदलला मार्ग
पण रस्ता मात्र सरळ|
-- मयुर (नवकवी)

करुणकविता

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2012 - 9:26 pm | बिपिन कार्यकर्ते

हम्म्म!

मेघवेडा's picture

1 Feb 2012 - 2:25 pm | मेघवेडा

हम्म.

हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है! :)

पक पक पक's picture

30 Jan 2012 - 9:35 pm | पक पक पक

स्व'देशी चा मार्ग अवलंबा ;) सर्व रस्ते अगदी तुम्हाला हवे तसे वेडे वाकडे होतिल .....

मयुरपिंपळे's picture

30 Jan 2012 - 9:59 pm | मयुरपिंपळे

स्व'देशी चा मार्ग अवलंबा ,सर्व रस्ते अगदी तुम्हाला हवे तसे वेडे वाकडे होतिल .....

ह्म्म

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jan 2012 - 6:32 pm | अत्रुप्त आत्मा

एक लडकी भिगी भागी
माझं नाव लंगडा त्यागी ;-)
मला का मिळत नाही या जगी..?
मी रडलो तर म्हणतात उगी..उगी..!

चचा---येशील कधी परतुन..? इतक्या जिलब्या पचत नाहीत रे एकट्याला ...
हं.... व्यर्थ हे जिवन>>>>
<<<< हां सुचलं सुचलं---
व्यर्थं हे माझे जिवन
तो सिनेमातला जी-१
खायला ग्येलो मी जिलब्या
पण तोंडात पडला घावन ... ;-)

प्रचेतस's picture

31 Jan 2012 - 9:56 pm | प्रचेतस

चचा---येशील कधी परतुन..? इतक्या जिलब्या पचत नाहीत रे एकट्याला ...

चचा येणार नाही इतक्यात परतून,
मिपा ब्लॉकलंय त्याच्या हापिसातून,
टाकुनी मिपावर इतक्या जिलब्या,
हापिसात झाल्यात भलत्याच बोंबा.

वपाडाव's picture

31 Jan 2012 - 8:10 pm | वपाडाव

आपण विदर्भातले आहात का??

मयुरपिंपळे's picture

31 Jan 2012 - 9:29 pm | मयुरपिंपळे

नाही

मूकवाचक's picture

1 Feb 2012 - 10:17 am | मूकवाचक

कविता म्हणजे फकस्त दोन ओळीमधले यमक
प्राची ला गच्ची जोडणे हेच तिचे गमक

नवकवीना घाबरून आज ओस पडला कट्टा
कवितेची चारचौघात तरी थाम्बली आहे थट्टा

शब्द आणि यमके यान्चा नुसता पोर खेळ
भाव आणि आशयाचा मात्र कुठे न बसे मेळ

काव्य चारोळ्यान्चा कविराज सोडा वाममार्ग,
गद्याचे पकडा विमान!

-- मूकवाचक (गद्यकवि)

जीवन म्हणजे एक सरळ रस्ता
किती तरी होतात मनाला खस्ता |

जेवण म्हणजे एक भरलेलं ताट
बसायच्या आधी घेतात पाणी अन् पाट :P

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2012 - 11:38 am | अत्रुप्त आत्मा

@जेवण म्हणजे एक भरलेलं ताट
बसायच्या आधी घेतात पाणी अन् पाट
मेलो....मेलो...अगागागागागा...वल्लीदा...ठ्ठार जाहलो...निर्वाण निर्वाण निर्वाण पावलो..

वल्लीदांनी फोडिला नवकवीपणाचा माठ
नवकविंनो सांभाळून...आहे वल्लीदांशी गाठ

अवांतरः-येऊ द्या अता अश्याच प्रतिक्रीया भरमसाठ

हा हा हा हा
@वल्ली , अत्रुप्त स्मायल्या भारी रे ;)

मोहनराव's picture

1 Feb 2012 - 2:22 pm | मोहनराव

ठार जाहलो वल्लीसाहेब! फुटलो!

ही घ्या...

भरुदे नवकवितांचा माठ
करुदे त्यांनाही मान ताठ
येउदे परत त्यावर विडंबनाची लाट
काव्यरसाची लागेना का वाट!! ;)

वपाडाव's picture

1 Feb 2012 - 2:36 pm | वपाडाव

यावर उत्तर म्हणुन मला एक कविता लिहावी वाटत आहे...
@ क्या बैठी है वल्ली की शॉट,
नवकवि की लगगयी है वाट,
और खडी होगयी है खाट,
सगळे पळ रहे है सुसाट !!

सुहास झेले's picture

1 Feb 2012 - 4:13 pm | सुहास झेले

हा हा हा ... वल्लीशेठ. एकदम षटकार :) :)

मयुरपिंपळे's picture

2 Feb 2012 - 2:13 pm | मयुरपिंपळे

कृपया नवी कवीची थट्टा करु नये Emoticon

प्रचेतस's picture

2 Feb 2012 - 2:15 pm | प्रचेतस

कृपया नवी कवीची थट्टा करु नये

नवी कवीची का नव कवीची?

मोहनराव's picture

2 Feb 2012 - 2:32 pm | मोहनराव

ओले बाळा, कोणीही थट्टा करत नाहीये! फक्त लवकर मोठा हो म्हणुन गोंजारत आहेत, हो किनै ओ वल्ली?

प्रचेतस's picture

2 Feb 2012 - 2:35 pm | प्रचेतस

थट्टा कोण कशाला करील उगाच.
नवकवींची नवोन्मेषी नवप्रतिभा जागृत व्हायलाच हवी.

स्पा's picture

1 Feb 2012 - 2:42 pm | स्पा

जीवन म्हणजे एक खारा पिस्ता
परवडत नाही म्हणून होतात मनाला खस्ता |

आमच्या कवितांना नाही कुठं कट्टा
जिलब्या पाडतोय.. करा चट्टा मट्टा |

शब्द आणि यमक ह्यांचा नुसता पोर खेळ
ह्यामध्ये अर्थाचा कुठंही बसत नाही मेळ |

नव्या , जुन्या मेम्ब्रांनी घेतले नव वळण
पण "मिपा " मात्र अजूनही नेहमीसारखेच सरळ|

नवकवींना नाउमेद करणार्‍या प्रवृत्तींचा जाहिर निषेध.

मयुरपिंपळे's picture

1 Feb 2012 - 3:52 pm | मयुरपिंपळे

आभारी आहे आपला ....

नवकवींना नाउमेद करणार्‍या प्रवृत्तींचा जाहिर निषेध.

@ मयुरपिंपळे
तुम्ही सिरियस नका होउ लगेच ,मि पा कराची सवय आहे ही ;)
तुम्ही छान छान कविता करा, छान छान प्रतिसाद आपोआप मिळ्तील :)

मनराव's picture

1 Feb 2012 - 4:31 pm | मनराव

जसे या कवितेला मिळाले......... :)

वपाडाव's picture

1 Feb 2012 - 4:31 pm | वपाडाव

गोग्गोड बोलुन आपल्या धाग्यावरचे प्रतिसाद वाढवण्याचा अतिशय हि&ही प्रयत्न...

आम्ही तरी गोग्गोड बोलतो ;) " तु तर डायरेक्ट सुपारी देतोस अस एकुन आहे ;)

मयुरपिंपळे's picture

1 Feb 2012 - 11:02 pm | मयुरपिंपळे

मिपा काराची सवय महित आहे आणी
काहि मिपा सदस्य हे चांगलेच परीचयाचे आहेत.

कवितानागेश's picture

1 Feb 2012 - 3:05 pm | कवितानागेश

कविता चांगली वाटली. पुलेशु. (पुनर्लेखनास शुभेच्छा)

मयुरपिंपळे's picture

2 Feb 2012 - 10:47 am | मयुरपिंपळे

थंक्स शुचि ... काय माहीत मिपाकर आता लिहुन देतील की नाही :)

काय माहीत मिपाकर आता लिहुन देतील की नाही

अहो अजिबात असं नाही.. उलट तुमच्याकडून याहून अधिक चांगलं लिहून होईल आणि नेहमीच अधिकाधिक चांगलं लिहिलं जाईल अशी याची काळजी घेतील सगळे..

आनंदाला कट्टा राहिला नाही काय म्हणताय हो कवितेत?

मिपा हा आनंदाचाच कट्टा आहे.. वर्षभराहून अधिक इथे येत असूनही तुम्हाला तो गावला कसा नाही??

अन्नू's picture

2 Feb 2012 - 6:30 pm | अन्नू

काय माहीत मिपाकर आता लिहुन देतील की नाही

मिपाकरांना असे हसत खेळत खट्याळपणाने प्रतिसाद देण्याची सवयच आहे.
असे पण मिपाकर हे कसलेले शिल्पकार आहेत हो या बाबतीत, तुम्हाला बी-घडण्यासाठी ते शाब्दीक ठोके टाकतीलही प्रसंगी तुमच्यावर पण त्यातून तुमची अधिकाधिक सुंदर मुर्ती घडावी असाच हेतू त्यांचा असतो.

राग मानू नका आणि आपले लिखाण मिपावर टाकत चला!
पु.ले.शु. :)

मी-सौरभ's picture

2 Feb 2012 - 8:13 pm | मी-सौरभ

@मयूर पिंपळे
अस्सं नाय कराच्च..
तुम्ही आत्ता नदीच्या अलीकडे आहात.. पलीकडे यायला पोहावं लागणारच :)
पु.ले.शु.

(नदीच्या पुलावरुन मजा बघणारा)

मयुरपिंपळे's picture

2 Feb 2012 - 8:57 pm | मयुरपिंपळे

होईल सवय ह्याची अस वाटत. शेवटी मिपाकरच ते! टकया ये रे बाबा

गवि's picture

2 Feb 2012 - 10:15 am | गवि

जीवन म्हणजे एक बारकं लाटणं
पाठीत बसेल असं सारखं वाटणं

वाटण वाटणं म्हणजेही नुसते हाल
अहो आणखी किती मटण खाल?

भारतीय स्त्रीच्या मनाचा अन जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न..

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2012 - 11:24 am | अत्रुप्त आत्मा

@जीवन म्हणजे एक बारकं लाटणं
पाठीत बसेल असं सारखं वाटणं

वाटण वाटणं म्हणजेही नुसते हाल
अहो आणखी किती मटण खाल?
अरे बास रे बास...! अता हसून हसून मारायची पाळी येणारे...

मयुरपिंपळे's picture

2 Feb 2012 - 11:59 am | मयुरपिंपळे

मिपा यमक स्पर्धा १ २ ३ चालु.... Emoticons

इरसाल's picture

2 Feb 2012 - 2:51 pm | इरसाल

लग्न म्हणजे आहे एक शिरस्ता
त्यासाठी तुम्ही फाडलाय का बस्ता

आनंदाला इथे कुठेही नाही तोटा
नातेवाईकांनी मांडलीय पुरेपूर थट्टा

रात्र व दिवस ह्यांचा नुसता पोर खेळ
नवरी म्हणे नवर्याला लागतोय का इतका वेळ

गाद्या गिरद्यांनी बदलला रस्ता
पण नवरा मात्र सरळ

(आंबट चवी )

प्रचेतस's picture

2 Feb 2012 - 2:56 pm | प्रचेतस

__/\__

मयुरपिंपळे's picture

2 Feb 2012 - 9:16 pm | मयुरपिंपळे

Emoticon

विडंबनाचार्य श्री वल्ली महाराज की जय हो ! महाराज आपणांस साष्टांग ____/।\____