गाभा:
आत्ताच सकाळी सकळी चहा पिताना हि बातमी वाचली ....
http://esakal.com/eSakal/20120129/5355751858605295094.htm
पवार साहेब म्हणे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत म्हणे.. तसेच राज्यसभेवर जाऊन जनतेचे पैसे पण वाया घालवणार नाहीयेत...
आपल्याला काय वाटते? बोलल्या शब्दाला जागतील कि जसे वेगळ पक्ष काढून पण सोनिया चे पाय धरले तसे करतील??
अवांतर : मला तर असे वाटते कि स्विस बँकेने आता जास्त काळा पैसा जमा करण्यावर असमर्थता व्यक्त केली असेल......
प्रतिक्रिया
29 Jan 2012 - 10:59 am | आशु जोग
चेतन कुलकर्णी
तुमची इच्छा आहे का त्यांनी राजकारण सोडावे.
तुम्हाला काय नि का वाटतं ते कळू द्या.
29 Jan 2012 - 11:33 am | चेतनकुलकर्णी_85
अश्या लोकांनी व त्यांच्या पिलावळीने राजकारणच काय लवकरात लवकर हे जग हि सोडून जायला हवे ...
टपाल तिकीट ते क्रिकेट हा त्यांचा प्रवास सर्वांनाच माहित आहे.....
29 Jan 2012 - 11:06 am | सुहास झेले
काय राव.... नुसती बातमी लिंकवून धागा काढायचा? काय बोलणार.....चालू द्या !!
अवांतर - मिपाच्या २०१२ च्या डायऱ्या आल्या काय? खूप जणांना भेट देता येतील.
29 Jan 2012 - 11:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय राव.... नुसती बातमी लिंकवून धागा काढायचा? काय बोलणार.....चालू द्या !!
गप्पं बसायचं ठरवलं आहे.
-दिलीप बिरुटे
29 Jan 2012 - 11:24 am | आशु जोग
मिपाचे साहेब मिपा सोडणार, मिपावरून निवृत्त होणार
असाही धागा लवकरच येवू पाहत आहे
--
काय करणार
तुका म्हणे उगी रहावे|
जे जे होइल ते ते पहावे ||
29 Jan 2012 - 11:37 am | चेतनकुलकर्णी_85
अश्या लोकांनी व त्यांच्या पिलावळीने राजकारणच काय लवकरात लवकर हे जग हि सोडून जायला हवे ...
भ्रष्टाचाराच्या बोळातील त्यांचा प्रदीर्घ प्रवास हा सर्वश्रुतच आहे....
29 Jan 2012 - 11:46 am | आशु जोग
चेतनजी
एकच सांगतो. एक चांगला पर्याय महाराष्ट्रात आणि देशात उभा करा
या लोकांचे महत्व आपोआप कमी होत जाइल
29 Jan 2012 - 11:54 am | चेतनकुलकर्णी_85
साहेब एवढे हुशार आहेत ती त्यांनी आधीच राज्यात व दिल्लीत त्यांचे वारसदार तयार करून ठेवलेत....
29 Jan 2012 - 3:39 pm | चिंतामणी
अनेकांच्यामते त्यांना अनेक पुढे होणा-या गोष्टी आधीच समजतात. त्यामुळे असा निर्णय घेतला असावा.
देव करो आणि साहेब "लोकाग्रहा"पुढे न झुकता निर्णयावर ठाम राहोत.
31 Jan 2012 - 11:22 am | नेहरिन
साहेब जेव्हा "नाही नाही " म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ "हो" असा असतो. तेव्हा समजदार लोकानी समजुन घ्यावे कय ते.
29 Jan 2012 - 3:53 pm | अत्रुप्त आत्मा
@पवार साहेब म्हणे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत म्हणे..>>>
पाठ-बळ नसल्यामुळे त्रास होत असेल अता उभं र्हायला... ;-)
होतं असं..वयाचा परिणाम,,,दुसरं काय..? ;-)
29 Jan 2012 - 4:41 pm | डिजेबॉय
साहेब जग सोडुन गेले तरी काही हरकत नाही माझी..!!
29 Jan 2012 - 4:54 pm | कुंदन
स्टार माझा वर साहेबांची मुलाखात बघा , फार च प्रेरणादायक आहे.
http://www.youtube.com/watch?v=6abGGd-Z8p8&feature=share
वयाच्या २२ व्या वर्षापासुन ( च्यायला कोण रे तो २ + २ म्हणतोय ) साहेब राजकारणात आहे म्हटलं.
29 Jan 2012 - 6:03 pm | पक पक पक
खर बोलायला ते काय गांधीवादी आहेत का...? तस असत तर हरविंदरला दुसरा चांन्स दिला असता की...?:bigsmile:
29 Jan 2012 - 6:29 pm | चौकटराजा
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही .
दुर्लक्ष करायचे , गप्प रहायचे
हा त्यांचा स़ंदेश विसरणार नाही.
29 Jan 2012 - 8:50 pm | नितिन थत्ते
मला साहेब म्हणजे हे साहेब वाटले आणि ते निवृत्त म्हणजे काय होणार असा प्रश्न पडला.
31 Jan 2012 - 5:31 pm | चिंतामणी
मोगल सैन्याला जसे संताजी-धनाजी सगळीकडे दिसत तसेच "हे" तुम्हाला साहेब दिसत असावेत.
29 Jan 2012 - 9:21 pm | चेतनकुलकर्णी_85
मनी वसे ते स्वप्नी दिसे..नितीन राव... :)
30 Jan 2012 - 10:37 am | चिरोटा
मग आता पुढचा 'मराठा स्ट्रॉन्गमॅन ' कोण? आदरणीय अजित पवार की सुकन्या सुप्रिया सुळे? बहुदा गादी सु.सु.सु. कडे जाईल. पुतणे कंपनी राजकारणात काकांचा घात करते असा अनुभव आहे.
30 Jan 2012 - 11:56 am | चौकटराजा
चिरोटा बाबू , पुतण्याचा घात करणारे काका इतिहासापासून आहेत. वडीलांचा घात करणारे ही इतिहासात आहेत. भावाला कैदेत ठेवणारेही आहेत.
30 Jan 2012 - 12:01 pm | रमताराम
ते आता 'वर' जाणार आहेत.... म्हणजे वरच्या वर्गात जाणार आहेत. मागल्या दाराने राज्यसभेत जातील नायतर फुडल्या येळंला 'उप्राष्ट्रपती'पदाचा चा चानस घेतील (पंतप्रधान व्हायचं तर र्हायलंच आता, निदान त्ये तरी का सोडाव?)
30 Jan 2012 - 6:32 pm | पक पक पक
म्हणजे वरच्या वर्गात जाणार आहेत....
शुद्द्लेखनात 'स' राहिला वाट्त...
30 Jan 2012 - 9:30 pm | अशोक पतिल
फारच छान प्रतिक्रीया वाचायला मिळाल्यात . काय करणार जो तो आपापल्या कोषात , स्वप्नरजन करतोय,दुसरे काय .पवार साहेबाचे ही काही स्वप्नरजन करत असतील .ज्याचे त्याचे जग निरनिराळे ...
30 Jan 2012 - 10:35 pm | पक पक पक
.पवार साहेबाचे ही काही स्वप्नरजन करत असतील .
हल्ली हरविंदर सिन्ग येतो म्हणे त्यांच्या स्वप्नात.. ;)
30 Jan 2012 - 10:43 pm | चेतनकुलकर्णी_85
काय सांगता..?? साहेबांच्या "तसल्या" आवडी निवडी पण इतक्या बदलल्या काय?? :O
31 Jan 2012 - 10:23 am | नितिन थत्ते
कळफलकाला लगाम घालावा. कमरेखालचे विनोद नकोत.
30 Jan 2012 - 11:03 pm | एक
देव, गॉड इ. इ सचिन तेंडुलकर वर पण काढा. फक्त लिंक बदलावी लागेल.
(अवांतरः ह्या साहेब लोकांपेक्षा त्यांना डोक्यावर घेऊन नाचणार्यांचा जास्त वीट आला आहे. ह्यांना स्वःताची आयुष्य नाहीच का? का हमाला सारखं डोक्यावर काही घेतल्या शिवाय चैन पडत नाही? )
31 Jan 2012 - 10:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अवांतर आवडले.
-दिलीप बिरुटे
31 Jan 2012 - 11:23 am | नेहरिन
अवांतर आवडले.