लिअँडर पेसचं हार्दिक अभिनंदन!

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
28 Jan 2012 - 7:36 pm

ज्येष्ठ भारतीय टेनिस पटू लिअँडर पेस याने पुरूष दुहेरीतील ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा झेकोस्लोव्हाकियाच्या रॅडेक स्टेपॅनेक च्या जोडीने जिंकून अकरावं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळवलं आहे. ३८ वर्षांचा पेस आणि ३३ वर्षांचा स्टेपॅनेक यांनी अमेरिकेच्या बॉब आणि माईक ब्रायन या जुळ्या भावांचा ७-६ (७/१), ६-२ असा पराभव केला. एक तास २४ मिनिटे चाललेल्या या झुंजीनंतर त्यांनी ब्रायन बंधूंचं १२वं ग्रॅड स्लॅम विजेतेपद निदान लांबवलं तरी. पेस ने आतापर्यंत ६ पुरूष दुहेरी आणि ५ मिश्र दुहेरी विजेतेपदं मिळवली आहेत.

पेसला आता मिश्र दुहेरीतही विजयाची संधी आहे, त्याचा हा सामना उद्या (रविवारी) रशियाच्या एलेना व्हेसिनिना हिच्या साथीने होईल.

पेसने या विजयानंतर आपल्या पत्नी आणि मुलीची आठवण तर काढलीच पण त्याची मैत्रीण-मार्गदर्शक-सहकारी मार्टिना नव्हरातिलोव्हा हिचाही आदराने उल्लेख केला.

१९९९ च्या विंबल्डन मध्ये पेसने अमेरिकेच्या लिसा रेमंडच्या साथीने मिश्र दुहेरी (आणि मला वाटतं त्याच वेळी पुरूष दुहेरी पदही) मिळवलं होतं.

पेसचं हार्दिक अभिनंदन आणि उद्याच्या विजयासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

क्रीडाअभिनंदन

प्रतिक्रिया

लिअँडर पेसचे हार्दिक अभिनंदन

उद्याच्या सामन्यात तो जिँकावा इच्छा

बहुगुणी's picture

28 Jan 2012 - 7:52 pm | बहुगुणी

मेलबोर्न सह इतरत्र, ऑस्ट्रेलियातच, क्रिकेट मध्ये वाताहत झाली असतांना हा टेनिसमधला विजय नक्कीच सुखावह आहे. (तरी बरं या खेळाच्या संदर्भात तरी '३७-३८ च्या आसपासच्या सिनीयर खेळाडूंनी निवृत्ती घ्यावी' असले सल्ले कुणी दिलेले ऐकले नाहीत....:-) )

चतुरंग's picture

28 Jan 2012 - 9:39 pm | चतुरंग

३८ व्या वर्षीसुद्धा पेसनं त्याचा स्टॅमिना चांगलाच टिकवलेला आहे. ही अजिबात सोपी गोष्ट नाही.
लिअँडरचा 'पेस' पुढल्या सामन्यातही कायम राहावा अशा शुभेच्छा! :)

-रंगँडर

३८ व्या वर्षीसुद्धा पेसनं त्याचा स्टॅमिना चांगलाच टिकवलेला आहे. ही अजिबात सोपी गोष्ट नाही.

+१
आवांतर :आता हुच्चभ्रु लोकांनी पेस म्हातारा झाला रिटायर कधी होणार असले प्रश्न नाही विचारले म्हणजे मिळवली.

Nile's picture

29 Jan 2012 - 5:30 am | Nile

हुच्चभ्रु लोक क्रिकेटशिवाय दुसरा खेळ पहात नाहीत, तेव्हा निश्चिंत झोपा. ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jan 2012 - 9:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>आता हुच्चभ्रु लोकांनी पेस म्हातारा झाला रिटायर कधी होणार असले प्रश्न नाही विचारले म्हणजे मिळवली.

मला असं वाटतं हुच्चभ्रु लोक पुढच्या वर्षी किंवा दोन वर्षाच्या आत खरडी करुन आपल्याला कळवतील की, पेसचा स्टॅमिना आता लटकला आहे, तेव्हा पेसने रिटायर व्हायला हरकत नाही.

यावरुन आठवण झाली. मार्टिना नव्हरोतिलोव्हा आणि स्टेफी ग्राफ या दोघींच्या झुंजी पाहतांना मजा यायची, सहजपणे मार्टिना जिंकायची हळुहळु मार्टिनाचे शॉट नेटात, सर्व्हीस नेटात, वय होतं गेलं. पुढे (सुंदर) स्टेफीनं तिला क्रॉस केलं. पुढे विल्यम भगिनींचा गवगवा कधी सुरु झाला ते कळले नाही.

कहने का मतलब, खेळ चपळतेचा, खेळ स्टॅमिनाचा, खेळ ताकदीचा, खेळ चाणाक्षपणाचा, तसा तो योग्य वयात खेळल्या जाणार्‍या स्फुर्तीचा आणि सळसळत्या उत्साहाचाही आहे.

-दिलीप बिरुटे
(खेळप्रेमी)

चेतनकुलकर्णी_85's picture

28 Jan 2012 - 11:23 pm | चेतनकुलकर्णी_85

हा खेळाडू कायम दुहेरी किंवा मिश्र दुहेरीतच का जिंकतो??? एकेरीत का जिंकत नाही ? (जसें अभिषेक बच्चन चे सोलो हिरो असलेले सिनेमे चालत नाहीत !!) लहानपणा पासून पाहत आलोय...
टेनिस ची जाण नसलेला क्रिकेटवेडा .........
तरीही अभिनंदन....

मोदक's picture

29 Jan 2012 - 12:25 am | मोदक

Synergy हेच उत्तर असावे यासाठी.

जे.पी.मॉर्गन च्या फर्मास धाग्याची आठवण आली...

http://www.misalpav.com/node/12382

अभिनंदन. :-)

५० फक्त's picture

28 Jan 2012 - 11:48 pm | ५० फक्त

अभिनंदन, अभिनंदन अभिनंदन.

त्रिवार अभिनंदन.

:-)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jan 2012 - 8:37 am | अत्रुप्त आत्मा

लिअँडरचा पेस चं खरोखरच जोरदार अभिनंदन....

अप्पा जोगळेकर's picture

29 Jan 2012 - 9:02 am | अप्पा जोगळेकर

मनापासून अभिनंदन.

भारताचं प्रतिनिधित्त्व करण्याचा अभिमान, आपण देशाला एक विजय मिळवून दिला ह्याचा आनंद, आपल्यामुळे आपल्या देशवासीयांना आनंद झाला आहे ह्याचं समाधान त्याच्या चेहर्‍यावरून ओसंडत असतं. कुठलाही खेळ खेळण्यासाठी भले जगातलं सर्वोत्तम कौशल्य नसलं तरी बेहेत्तर पण आमच्या लिएंडरसारखी जिगर हवी ! असे ११ लिएंडर मिळाले ना तर आपण केवळ त्यांच्या देशभक्तीच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर फुटबॉलचा वर्ल्डकप देखील जिंकून. मला तर वाटतं की भारतीय क्रिकेट संघात १३वा खेळाडू म्हणून लिएंडरला प्रत्येक दौर्‍यावर घ्यावं.... भारतासाठी खेळणं काय असतं हे बाकीच्यांना त्याच्याकडे बघून समजेल
उपरोल्लेखित अधोरेखित वाक्ये जे.पी. मॉर्गन यांच्या लेखातली. अतिशय आवडतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jan 2012 - 9:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुरुष दुहेरीतल्या विजयाबद्दल कौतुकच आहे. अभिनंदन.......!!!

-दिलीप बिरुटे