मिपाची घटना - एक प्रकटनात्मक चौकशी..

कॉमन मॅन's picture
कॉमन मॅन in काथ्याकूट
28 Jan 2012 - 2:43 pm
गाभा: 

मिसळपाव या संकेतस्थळाच्या सर्व सन्माननीय सभासदांना सप्रेम नमस्कार,

काही प्रश्न आमच्या मनात आले ते इथे विचारत आहे -

१) मिपाच्या वापरासंबंधीची, इथे वावरण्यासंबंधीची, लेखनासंबंधीची, प्रतिसाद देण्यासंबंधीची एखादी स्वतंत्र घटना अस्तित्वात आहे काय?

१-अ) असल्यास कोठे वाचावयास मिळेल?

वरील प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर कृपया खालील प्रश्न गैरलागू समजावे -

२) अशी एखादी घटना अस्तित्वात असावी काय?

२-अ) सदर घटना समितीमध्ये कोण कोण मंडळी असावीत? अध्यक्षीय स्थान कुणाकडे असावे?
२-ब) सदर घटनेमधील ठळक कलमे काय असावीत असे आपल्याला वाटते?

जर भविष्यात अशी एखादी मिपा-घटनासमिती स्थापन झाल्यास त्या समिती सभासदांमध्ये खालील सन्माननीय सभासदांची नावे असावीत असे आम्ही सुचवतो - :)

१) गणपा
२) परिकथेतील राजकुमार
३) पक पक पक
४) चिरोटा
५) पुण्याचे वटवाघूळ
६) मिसळलेला काव्यप्रेमी
७) अतृप्त आत्मा
८) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इत्यादी...

अध्यक्षीय स्थान बहुधा मिपाचे मालकच भुषवतील असे वाटते परंतु समितीमधील सभासदांची नावे आपणही सुचवावीत! नावे सुचवताना शक्यतो सदर समिती सभासदाविषयी माहितीपूर्ण परंतु सभ्य शब्दात एखाद् दोन ओळी लिहिल्यास ते एक छान मंथन ठरावे! ;)

कृपया विषयाला अनुसरून सर्व सभासदांची येथे विस्तृत चर्चा व्हावी अशी अपेक्षा.

हा धागा आम्ही केवळ खोडसाळपणाकरता काढला आहे असे कुणा सभासदांना वाटल्यास त्यांच्याही मताचा आदर आहेच! ;)

आपलाच,
कॉमॅ.

प्रतिक्रिया

गणपा's picture

28 Jan 2012 - 3:00 pm | गणपा

कॉमन मॅन यांनी या धोरणातील कलमे वाचावीत अशी विनंती करतो..

बाकी त्या वरच्या यादीत टवाळ परा बरोबर माझं नाव पाहुन अंमळ वेदना झाल्या.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jan 2012 - 3:41 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत आहे.

एका हलकट आणि नवाबी मणूक्षाबरोबर, जो संपादक देखील आहे, माझे नाव जोडलेले बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. आता मी माझ्या दुर्लक्षीत पॅंथरच्या कार्यकर्त्यांना काय तोंड दाखवणार ?

नक्की कुणाबद्दल बोलताय? बी स्पेसिफिक.
तिथं अजुन एक संपादक दिसतोय.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jan 2012 - 5:19 pm | परिकथेतील राजकुमार

ज्याचीत्याची जाण, समज आणि संवेदनशीलता वैग्रे वैग्रे.... ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2012 - 5:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी त्या वरच्या यादीत टवाळ परा बरोबर माझं नाव पाहुन अंमळ वेदना झाल्या.

सहमत आहे. माझं नाव पराबरोबर दिसल्यामुळे
मला तर डाव्या गुडघ्यात चमका निघाल्यासारख्या वाटत आहे.
चिकनगुनियाची लक्षणं अशी नाव जोडल्याबरोबर दिसायला लागतात. :)

बाकी, कॉमन मॅनचे धागे मनोरंजक, माहितीपूर्ण, आणि शंभर प्रतिसाद गाठणारे असतात. धन्यवाद...!

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jan 2012 - 5:20 pm | परिकथेतील राजकुमार

प्रा.डॉ., आपलं काय ठरलंय?तुम्ही माझ्या खोड्या काढायच्या नाहीत आणि मी तुमच्या! ठरलंय की नाही?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2012 - 5:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> तुम्ही माझ्या खोड्या काढायच्या नाहीत आणि मी तुमच्या! ठरलंय की नाही ?

हो ठरलंय....! आपण एकमेकांच्या अज्याबात खोड्या काढायच्या नाही असं आपलं खंडोबाच्या जेजुरीला ठरलंय.(च्यायला, हे कधी ठरलं कोणास ठाऊक)

-दिलीप बिरुटे
(तलवार म्यान करुन जींजीस निघालेला)

स्पा's picture

28 Jan 2012 - 3:06 pm | स्पा

उत्तम कुरकुरीत जिलबी

- धन्यवाद

सुहास झेले's picture

28 Jan 2012 - 5:20 pm | सुहास झेले

ह्येच म्हणतो..... चालू द्या :) :)

पक पक पक's picture

28 Jan 2012 - 11:24 pm | पक पक पक

उत्तम कुरकुरीत जिलबी....?

तरी पण जिलबीच ! नाय का..? :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

पुण्याचे वटवाघूळ's picture

28 Jan 2012 - 4:24 pm | पुण्याचे वटवाघूळ

अहो मला महिन्या-दोन महिन्यापूर्वी संगणकावर धड मराठीपण लिहिता येत नव्हते. अशा मनुष्याला एकदम घटनासमितीत कुठे पाठवता? असो. तरीही मी त्या समितीत जायला योग्य आहे असे तुम्हाला वाटले म्हणून माझ्या अंगावर चांगले मूठभर मास चढले आहे.त्याबद्दल धन्यवाद.

पक पक पक's picture

28 Jan 2012 - 5:56 pm | पक पक पक

अहो मला महिन्या-दोन महिन्यापूर्वी संगणकावर धड मराठीपण लिहिता येत नव्हते. अशा मनुष्याला एकदम घटनासमितीत कुठे पाठवता? असो. तरीही मी त्या समितीत जायला योग्य आहे असे तुम्हाला वाटले म्हणून माझ्या अंगावर चांगले मूठभर मास चढले आहे.त्याबद्दल धन्यवाद.

अहो याच कारणामुळे मला देखिल उलट लटकावस वाट्त आहे :D

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jan 2012 - 5:29 pm | अत्रुप्त आत्मा

७) अतृप्त आत्मा>>> इथे(ही) सतावा नंबर लागल्यामुळे ...सॉरी..सॉरी..नंबरात सातवा लागल्यामुळे आंम्हाला नो इंग्लिस कुल मधिल इयत्ता साहावी-ड (गेले ते दिवस/आणी रात्री सुद्धा.. ;-) ) मधे सहामाहित वर्गात पाचवा आल्यानंतर जी खुषी मनात दाटलीवती तीच अत्ता दाटून आलीये...

(सातव्या नंबरमुळे खुषित आलेला) अत्रुप्त आत्मा

आमच देखिल थोड्फार तसच काहीसं झालेल आहे...(बरच काही दाटुन आल आहे...:) )

नरेश_'s picture

28 Jan 2012 - 6:19 pm | नरेश_

मान्य वर मंडळींचे अभिनंदन आणि पुवाशु... ;)
सोगत : चल बाला... आटाठ पारट्या लागु हायस कुटं?|
|
|
|
|
*जातीवाचक नव्हे, वाक्प्रचार या अर्थी.|
|
|

कुंदन's picture

28 Jan 2012 - 7:44 pm | कुंदन

च्यायला...काय दिवस आलेत.
पर्‍याचे नाव २ नंबर ला अन प्रा डॉ चा ८ वा ( अगदी शेवटचा ) नंबर. ;-)
प्रा डॉ ना अभ्यास वाढवायला पायजेल असे वाटतेय.

चौकटराजा's picture

28 Jan 2012 - 9:06 pm | चौकटराजा

अरे भावानो , तुमची 'मिपा' ला घटनात्मक दर्जा द्यायची ही 'गेम चेंजर " खेळी दिसतिया. त्ये काय बी करा.पन ह्यी माजी आयडीयाचा कल्पना हाय . तवा हिक्ड दिल्लीला रायलटी पाठवून शान द्या म्ह़ंजी झालं ! तुम्चा --- आर आर जी.

प्रतिसरकार स्थापन करणार्‍या क्रांतीसिंह नाना पाट्लांची आठ्वण झाली......

आशु जोग's picture

28 Jan 2012 - 10:30 pm | आशु जोग

>>हा धागा आम्ही केवळ खोडसाळपणाकरता काढला आहे असे कुणा सभासदांना वाटल्यास त्यांच्याही मताचा आदर आहेच!

हे फार आवडलं

पक पक पक's picture

28 Jan 2012 - 11:19 pm | पक पक पक

हा धागा आम्ही केवळ खोडसाळपणाकरता काढला आहे असे कुणा सभासदांना वाटल्यास त्यांच्याही मताचा आदर आहेच!

हॅ हॅ हॅ !!!खोडसाळपणाकरता का शतकमोहोत्सवा करीता...? :D

पाशवी शक्तींच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील.

मिपा हे एक खाजगी सम्स्थळ आहे. इथे सार्वजनीक कमिटी वगैरे काहिही नाही.
त्यामुळे कॉमनमॅन यांच्या प्रश्नाना काहीच अर्थ रहात नाही. या धाग्यात काहीच अर्थ नाही. धाग्यामुले काही फरक पडेल असेही नाही.

कॉमन मॅन's picture

30 Jan 2012 - 12:24 pm | कॉमन मॅन

प्रतिसाद आवडला. आभारी आहे..

हा अन्याय आहे ;)
मिपा-समितीमधील सभासदांमध्ये ,
एकाही महिलेचे/ युवतीचे नाव नाही ,महिलाना ३३% आरक्षण असुन देखील हा अन्याय ;)
कॉमन मनुक्षा तुझे मिपावरचे दिवस लवकरच भरतील अशाने ;)

पर्नल नेने मराठे's picture

29 Jan 2012 - 6:52 pm | पर्नल नेने मराठे

ह्म्म...

आशु जोग's picture

29 Jan 2012 - 2:45 pm | आशु जोग

या धाग्याचे 'महाशतक' झाले तरी

सचिन आपला कोरडाच शतकाविना

हाही मोसम गेला

चिरोटा's picture

30 Jan 2012 - 10:44 am | चिरोटा

समितीत माझे नाव पाहून हरखून गेलो. आज फक्त हाच धागा सारखा रेफ्रेश करत राहणार.