✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपाची घटना - एक प्रकटनात्मक चौकशी..

क
कॉमन मॅन यांनी
Sat, 01/28/2012 - 14:43  ·  लेख
लेख
मिसळपाव या संकेतस्थळाच्या सर्व सन्माननीय सभासदांना सप्रेम नमस्कार, काही प्रश्न आमच्या मनात आले ते इथे विचारत आहे - १) मिपाच्या वापरासंबंधीची, इथे वावरण्यासंबंधीची, लेखनासंबंधीची, प्रतिसाद देण्यासंबंधीची एखादी स्वतंत्र घटना अस्तित्वात आहे काय? १-अ) असल्यास कोठे वाचावयास मिळेल? वरील प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर कृपया खालील प्रश्न गैरलागू समजावे - २) अशी एखादी घटना अस्तित्वात असावी काय? २-अ) सदर घटना समितीमध्ये कोण कोण मंडळी असावीत? अध्यक्षीय स्थान कुणाकडे असावे? २-ब) सदर घटनेमधील ठळक कलमे काय असावीत असे आपल्याला वाटते? जर भविष्यात अशी एखादी मिपा-घटनासमिती स्थापन झाल्यास त्या समिती सभासदांमध्ये खालील सन्माननीय सभासदांची नावे असावीत असे आम्ही सुचवतो - :) १) गणपा २) परिकथेतील राजकुमार ३) पक पक पक ४) चिरोटा ५) पुण्याचे वटवाघूळ ६) मिसळलेला काव्यप्रेमी ७) अतृप्त आत्मा ८) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे इत्यादी... अध्यक्षीय स्थान बहुधा मिपाचे मालकच भुषवतील असे वाटते परंतु समितीमधील सभासदांची नावे आपणही सुचवावीत! नावे सुचवताना शक्यतो सदर समिती सभासदाविषयी माहितीपूर्ण परंतु सभ्य शब्दात एखाद् दोन ओळी लिहिल्यास ते एक छान मंथन ठरावे! ;) कृपया विषयाला अनुसरून सर्व सभासदांची येथे विस्तृत चर्चा व्हावी अशी अपेक्षा. हा धागा आम्ही केवळ खोडसाळपणाकरता काढला आहे असे कुणा सभासदांना वाटल्यास त्यांच्याही मताचा आदर आहेच! ;) आपलाच, कॉमॅ.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4597 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

धोरण

गणपा
Sat, 01/28/2012 - 15:00 नवीन
कॉमन मॅन यांनी या धोरणातील कलमे वाचावीत अशी विनंती करतो.. Image removed.
  • Log in or register to post comments

बाकी त्या वरच्या यादीत टवाळ

गणपा
Sat, 01/28/2012 - 15:14 नवीन
बाकी त्या वरच्या यादीत टवाळ परा बरोबर माझं नाव पाहुन अंमळ वेदना झाल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१

परिकथेतील राजकुमार
Sat, 01/28/2012 - 15:41 नवीन
सहमत आहे. एका हलकट आणि नवाबी मणूक्षाबरोबर, जो संपादक देखील आहे, माझे नाव जोडलेले बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. आता मी माझ्या दुर्लक्षीत पॅंथरच्या कार्यकर्त्यांना काय तोंड दाखवणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

नक्की कुणाबद्दल बोलताय? बी

गणपा
Sat, 01/28/2012 - 17:07 नवीन
नक्की कुणाबद्दल बोलताय? बी स्पेसिफिक. तिथं अजुन एक संपादक दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

=)) =))

परिकथेतील राजकुमार
Sat, 01/28/2012 - 17:19 नवीन
ज्याचीत्याची जाण, समज आणि संवेदनशीलता वैग्रे वैग्रे.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

सेम सेम...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/28/2012 - 17:09 नवीन
बाकी त्या वरच्या यादीत टवाळ परा बरोबर माझं नाव पाहुन अंमळ वेदना झाल्या. सहमत आहे. माझं नाव पराबरोबर दिसल्यामुळे मला तर डाव्या गुडघ्यात चमका निघाल्यासारख्या वाटत आहे. चिकनगुनियाची लक्षणं अशी नाव जोडल्याबरोबर दिसायला लागतात. :) बाकी, कॉमन मॅनचे धागे मनोरंजक, माहितीपूर्ण, आणि शंभर प्रतिसाद गाठणारे असतात. धन्यवाद...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हम्म

परिकथेतील राजकुमार
Sat, 01/28/2012 - 17:20 नवीन
प्रा.डॉ., आपलं काय ठरलंय?तुम्ही माझ्या खोड्या काढायच्या नाहीत आणि मी तुमच्या! ठरलंय की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो ठरलंय...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/28/2012 - 17:22 नवीन
>>> तुम्ही माझ्या खोड्या काढायच्या नाहीत आणि मी तुमच्या! ठरलंय की नाही ? हो ठरलंय....! आपण एकमेकांच्या अज्याबात खोड्या काढायच्या नाही असं आपलं खंडोबाच्या जेजुरीला ठरलंय.(च्यायला, हे कधी ठरलं कोणास ठाऊक) -दिलीप बिरुटे (तलवार म्यान करुन जींजीस निघालेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

उत्तम कुरकुरीत जिलबी -

स्पा
Sat, 01/28/2012 - 15:06 नवीन
उत्तम कुरकुरीत जिलबी - धन्यवाद
  • Log in or register to post comments

+१

सुहास झेले
Sat, 01/28/2012 - 17:20 नवीन
ह्येच म्हणतो..... चालू द्या :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

उत्तम कुरकुरीत जिलबी....? तरी

पक पक पक
Sat, 01/28/2012 - 23:24 नवीन
उत्तम कुरकुरीत जिलबी....? तरी पण जिलबीच ! नाय का..? :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

माझे नाव समितीत?

पुण्याचे वटवाघूळ
Sat, 01/28/2012 - 16:24 नवीन
अहो मला महिन्या-दोन महिन्यापूर्वी संगणकावर धड मराठीपण लिहिता येत नव्हते. अशा मनुष्याला एकदम घटनासमितीत कुठे पाठवता? असो. तरीही मी त्या समितीत जायला योग्य आहे असे तुम्हाला वाटले म्हणून माझ्या अंगावर चांगले मूठभर मास चढले आहे.त्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अहो मला महिन्या-दोन

पक पक पक
Sat, 01/28/2012 - 17:56 नवीन
अहो मला महिन्या-दोन महिन्यापूर्वी संगणकावर धड मराठीपण लिहिता येत नव्हते. अशा मनुष्याला एकदम घटनासमितीत कुठे पाठवता? असो. तरीही मी त्या समितीत जायला योग्य आहे असे तुम्हाला वाटले म्हणून माझ्या अंगावर चांगले मूठभर मास चढले आहे.त्याबद्दल धन्यवाद. अहो याच कारणामुळे मला देखिल उलट लटकावस वाट्त आहे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

७) अतृप्त आत्मा>>> इथे(ही)

अत्रुप्त आत्मा
Sat, 01/28/2012 - 17:29 नवीन
७) अतृप्त आत्मा>>> Image removed. इथे(ही) सतावा नंबर लागल्यामुळे ...सॉरी..सॉरी..नंबरात सातवा लागल्यामुळे आंम्हाला नो इंग्लिस कुल मधिल इयत्ता साहावी-ड (गेले ते दिवस/आणी रात्री सुद्धा.. ;-) ) मधे सहामाहित वर्गात पाचवा आल्यानंतर जी खुषी मनात दाटलीवती तीच अत्ता दाटून आलीये... (सातव्या नंबरमुळे खुषित आलेला) Image removed. अत्रुप्त आत्मा
  • Log in or register to post comments

आमच देखिल थोड्फार तसच काहीसं

पक पक पक
Sat, 01/28/2012 - 17:54 नवीन
आमच देखिल थोड्फार तसच काहीसं झालेल आहे...(बरच काही दाटुन आल आहे...:) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

चांचौ *

नरेश_
Sat, 01/28/2012 - 18:19 नवीन
मान्य वर मंडळींचे अभिनंदन आणि पुवाशु... ;) सोगत : चल बाला... आटाठ पारट्या लागु हायस कुटं?| | | | | *जातीवाचक नव्हे, वाक्प्रचार या अर्थी.| | |
  • Log in or register to post comments

च्यायला...

कुंदन
Sat, 01/28/2012 - 19:44 नवीन
च्यायला...काय दिवस आलेत. पर्‍याचे नाव २ नंबर ला अन प्रा डॉ चा ८ वा ( अगदी शेवटचा ) नंबर. ;-) प्रा डॉ ना अभ्यास वाढवायला पायजेल असे वाटतेय.
  • Log in or register to post comments

घटनात्मक दर्जा ?

चौकटराजा
Sat, 01/28/2012 - 21:06 नवीन
अरे भावानो , तुमची 'मिपा' ला घटनात्मक दर्जा द्यायची ही 'गेम चेंजर " खेळी दिसतिया. त्ये काय बी करा.पन ह्यी माजी आयडीयाचा कल्पना हाय . तवा हिक्ड दिल्लीला रायलटी पाठवून शान द्या म्ह़ंजी झालं ! तुम्चा --- आर आर जी.
  • Log in or register to post comments

प्रतिसरकार स्थापन करणार्‍या

पक पक पक
Sat, 01/28/2012 - 21:25 नवीन
प्रतिसरकार स्थापन करणार्‍या क्रांतीसिंह नाना पाट्लांची आठ्वण झाली......
  • Log in or register to post comments

>>हा धागा आम्ही केवळ

आशु जोग
Sat, 01/28/2012 - 22:30 नवीन
>>हा धागा आम्ही केवळ खोडसाळपणाकरता काढला आहे असे कुणा सभासदांना वाटल्यास त्यांच्याही मताचा आदर आहेच! हे फार आवडलं
  • Log in or register to post comments

हा धागा आम्ही केवळ

पक पक पक
Sat, 01/28/2012 - 23:19 नवीन
हा धागा आम्ही केवळ खोडसाळपणाकरता काढला आहे असे कुणा सभासदांना वाटल्यास त्यांच्याही मताचा आदर आहेच! हॅ हॅ हॅ !!!खोडसाळपणाकरता का शतकमोहोत्सवा करीता...? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

पाशवी शक्तींच्या प्रतिक्रिया

सूड
Sat, 01/28/2012 - 23:24 नवीन
पाशवी शक्तींच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments

मिपा हे एक खाजगी सम्स्थळ आहे.

विजुभाऊ
Sat, 01/28/2012 - 23:42 नवीन
मिपा हे एक खाजगी सम्स्थळ आहे. इथे सार्वजनीक कमिटी वगैरे काहिही नाही. त्यामुळे कॉमनमॅन यांच्या प्रश्नाना काहीच अर्थ रहात नाही. या धाग्यात काहीच अर्थ नाही. धाग्यामुले काही फरक पडेल असेही नाही.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आवडला. आभारी आहे..

कॉमन मॅन
Mon, 01/30/2012 - 12:24 नवीन
प्रतिसाद आवडला. आभारी आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हा अन्याय आहे मिपा-समितीमधील

पियुशा
Sun, 01/29/2012 - 10:28 नवीन
हा अन्याय आहे ;) मिपा-समितीमधील सभासदांमध्ये , एकाही महिलेचे/ युवतीचे नाव नाही ,महिलाना ३३% आरक्षण असुन देखील हा अन्याय ;) कॉमन मनुक्षा तुझे मिपावरचे दिवस लवकरच भरतील अशाने ;) Image removed.
  • Log in or register to post comments

ह्म्म...

पर्नल नेने मराठे
Sun, 01/29/2012 - 18:52 नवीन
ह्म्म...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

'महाशतक'

आशु जोग
Sun, 01/29/2012 - 14:45 नवीन
या धाग्याचे 'महाशतक' झाले तरी सचिन आपला कोरडाच शतकाविना हाही मोसम गेला
  • Log in or register to post comments

मिसळ

चिरोटा
Mon, 01/30/2012 - 10:44 नवीन
समितीत माझे नाव पाहून हरखून गेलो. आज फक्त हाच धागा सारखा रेफ्रेश करत राहणार.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा