पाने गळू लागली आणि झाडांवर पक्षी दिसू लागले.
म्हणजे पाने कमी झाल्यामुळे ते झाडावर येत आहेत असे मला म्हणायचे नाही तर पाने कमी झाल्यामुळे ते दिसू लागले. फुले गळाल्यामुळे फुलातले किडे खाणारे छोटे पक्षी गायब झाले आणि त्याची जागा घेतली झाडांच्या टणक शेंगा खाणार्या पक्षांनी. मैनांनी, आणि पोपटांनी. अर्थात एकदा त्यात एक हळद्याही घुसला होता. त्याचा सुंदर पिवळा रंग बघताना भान हरपते. त्याचाही फोटो टाकला आहे.
पोपटांना चेहरा असतो आणि त्यावर भाव उमटतात हे आपल्याला हे फोटो बघितलेत तर उमगेल. आणि त्यांच्याही भन्नाट स्टाईल्स असतात...........
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
9 Jan 2012 - 12:13 pm | तुषार काळभोर
पोपटांना चेहरा असतो आणि त्यावर भाव उमटतात हे आपल्याला हे फोटो बघितलेत तर उमगेल. आणि त्यांच्याही भन्नाट स्टाईल्स असतात...........
पोपटाचा शेवटचा फोटो बघा...काय माज आहे त्याच्या तोंडावर!
9 Jan 2012 - 12:14 pm | स्पा
फोटो सामान्य वाटले.. मजा नाही आली
9 Jan 2012 - 3:41 pm | जयंत कुलकर्णी
शक्य आहे. लो रेझोल्युशनचे आहेत... मुळ कदाचित आपल्याला आवडतील...
9 Jan 2012 - 12:41 pm | जागु
सुंदर.