हे माझ्या कॅननच्या कॅमेर्यातून आलेले काही फोटो.
दिवेआगरच्या किनार्यावर सूर्यास्त पहात असतानाचे फोटो आहेत.
कॅमेरा चे सेटिंग मॅन्युअल होते. त्यामुळे फोटो सोनेरी रंगात रंगवल्या प्रमाणे दिसताहेत.
फोटो डेस्कटॉपवर डाऊनलोड करायच्या आधीच ही जादू मला उमजली होती.
अॅन इव्हिनिंग ऑन दिवेआगर बीच १
अॅन इव्हिनिंग ऑन दिवेआगर बीच २
प्रतिक्रिया
5 Jan 2012 - 10:57 pm | प्रास
झकास फोटो!
अतिझकास विडंबन!!
5 Jan 2012 - 11:36 pm | ५० फक्त
'हे माझ्या कॅननच्या कॅमेर्यातून आलेले काही फोटो.
दिवेआगरच्या किनार्यावर सूर्यास्त पहात असतानाचे फोटो आहेत.'
याचा अर्थ तुम्ही सुर्यास्त पाहात होता, अन तुमच्या कॅननच्या कॅमेरात हे फोटो आपोआप आले असं म्हणायचं आहे का तुम्हाला ?
कारण तुमच्या कॅमेरात असे आपोआप आलेले फोटो पाहिले आहेत नाणेघाटात, टाकु काय इथे ?
6 Jan 2012 - 4:44 am | धन्या
काय हे पन्नासराव, तुम्हाला अजूनही शंका आहे? एव्हाना वल्लीच्या कॅमेर्यात आपोआप फोटो येतात याची तुम्हाला खात्री पटायला हवी होती.
नाणेघाटाची सहल (आणि त्या सहलीचे फोटोसुद्धा ;) ) झक्कासच होते. पण आता कोकणात जाऊन फोटो काढण्याचे मनावर घ्या ब्वॉ !!!
वल्लीशेठ, दोन्ही फोटो एकदम झक्कास !!!
6 Jan 2012 - 12:54 am | रेवती
मस्त फोटो.
सूर्य डोंगरामागे किंवा समुद्रात मावळत नसल्याने बरे वाटले.
विडंबन झकास!;)
भारतीय घटनेने दिलेल्या अधिकारामुळे हसले.
6 Jan 2012 - 8:55 am | चिंतामणी
संपादक मंडळ आणि सरपंचाना विनंती
मेनुबारमधे "विडंबन" हा पर्याय द्यावा.
(मेनुबार म्हणल्यावर होणारा गोंधळ टाळण्यासाठी तो काय हे खाली देत आहे.) :~ :-~ :puzzled:
स्वगृह साहित्य चर्चा काव्य पाककृती कलादालन भटकंती घोषणा नवे लेखन मदत पान विडंबन
6 Jan 2012 - 9:25 am | स्पा
दोन्ही फोटो सुरेखच ..
दिवेआगर... अप्रतिम ठिकाण आहे...
एक ट्रेक करायला हरकत नाही :)
6 Jan 2012 - 10:00 am | मी-सौरभ
स्पाडू: तुला ट्रिप म्हणायचं होतं का???
--------
मद्यं मोक्षमुक्ती साधनं!!
रम व्हिस्की व्हिस्की व्हिस्की: !! ;)
6 Jan 2012 - 11:54 am | किसन शिंदे
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ....
जेवढा साधा वाटतो तेवढा साधा नाहियेस म्हणजे तु!
6 Jan 2012 - 1:21 pm | विजुभाऊ
स्पाडू: तुला ट्रिप म्हणायचं होतं का???
तो जिथे जातो तो ट्रेकच असतो.
एक नंबरच्या प्लॅटफोर्म वरून ट्रेक करून ४ नंबरच्या प्लॅतफॉर्म वर जातो
7 Jan 2012 - 12:20 am | सूड
अरे तो फक्त असं म्हणेल, ठरलं की म्हणेल. दुसरा किंवा चौथा ठरवा/ पहिल्या, तिसर्या किंवा पाचव्यालाच जमेल. इत्यादि,इत्यादि .
6 Jan 2012 - 1:38 pm | स्पा
एक नंबरच्या प्लॅटफोर्म वरून ट्रेक करून ४ नंबरच्या प्लॅतफॉर्म वर जातो
हॅ हॅ
+१
6 Jan 2012 - 2:11 pm | स्मिता.
दोन्हीही एकदम मस्त आहेत.
6 Jan 2012 - 2:36 pm | गणेशा
मस्त
6 Jan 2012 - 9:56 pm | अत्रुप्त आत्मा
मुळ रचनेचा फारच छान फोटो काढलात हो. ;-)