मराठी माणुस उधोग धंदयात खरच मागे आहे का?
प्रत्येक वेळी गैर मराठी माणसाशी तुलना करताना अस म्हटल जात की, मराठी माणुस उधोग धंदयात मागे आहे. तो सतत अपयशी ठरतो
हे कीतपत खर आहे?
कोण म्हण्ल ..? मराठी माणूस उद्योग धंद्यात मागे आहे. अजाबात नाय मराठी माणूस त्याचे उद्योग आणि त्याचे धंदे त्याच्या पद्ध्तीने जोरातच ...? चालवत असतो,आणि त्यात तो त्याच्या पद्ध्तीने यशस्वी ...?देखिल आस्तो....(काही अपवाद असतात डी.स्.के , किर्लोस्कर....वगैरे)
मराठी माणुस उधोग धंदयात मागे आहे. तो सतत अपयशी ठरतो
हे अस काही वर्षांपुर्वी म्हणले जायचे.आता जर आजुबाजुला डोळे उघडून पहा बरेच मराठी उद्योजक यशस्वि झालेले दिसतील ,माझ्याच कंपनी मधिल एक श्री.माने नावच्या साध्या कामगारने काहि वर्षांपुर्वि नोकरी सोडुन थर्माकोल ईंडस्ट्रीमध्ये धंदा सुरु केला,आज त्याची या ईंडस्ट्रीमध्ये एक यशस्वि उद्योजक म्हणुन गणना केली जाते...
देशातील ७०% रि़क्षांचे मीटर्स सुपर मीटर्स मुंढवा,पुणे येथे तयार होतात. देशातील अनेक बॅन्कांची प्रमुख कार्यालये मुंबईत आहेत. मराठी माणूस धंद्यात मागे म्हणणार्यांनी हे लक्षात ठेवावे.
मराठी म्हणून माणसाला सर्वच क्षेत्रांमधे वेगळं तपासणं यालाच माझा विरोध आहे. मराठीपणा हा फारतर साहित्य, संभाषण इतक्यापुरता मर्यादित ठेवता येईल..
तरीही धंद्याबाबतीतही मराठी माणसाला एक वेगळा गट असं समजून त्याचं मोजमाप करायचं असेल तर खालील काही विचार..
.."उद्योगधंद्यात" पुढे जाणे म्हणजेच एकूण पुढे जाणे असे आहे का?
उत्तम हुद्द्याच्या नोकर्या, देशीविदेशी कंपन्यांत नियुक्त झालेले सी ई ओ किंवा एमडी.. जगभर सॉफ्टवेअरमधे ठसा उमटवणारे तज्ञ, शेतीपासून अवकाशापर्यंत सर्वत्र संशोधनाने चमत्कार घडवणारे शास्त्रज्ञ.. हेही पुढे जाणे नाही का? अशा ठिकाणी मराठी माणसांची गर्दीच दिसेल..
इतर कोणत्या भाषिक समाजापेक्षा मराठीत तुलनेत कमी टक्के उद्योजक असतील.. पण इतर अनेक क्षेत्रांत ते पुढे असू शकतात आणि अन्य "भाषिक" मागे...
मराठी माणसाची एकूण प्रगती कुठेतरी होतेय ना आणि सर्वजण सुखी आहेत ना ते पहावं.. नपेक्षा मोठ्ठं उद्योगसाम्राज्य आणि सदैव तणावाखाली राहून एक दिवस मेंदूतली नस फुटून मृत्यू, असं नको..

हो... सिलिकॉन व्हॅलित मराठी लोक जास्त की मारवाडी?
तुलनात्मक दृष्ट्या मराठी मनुष्य उद्योग धंदा करण्याच्या प्रवृत्तीचा नाही..
उत्तर भारतीय / गुजराती / मारवाडी / पारशी इ. यांचा टक्का उद्योगात जास्त आहे.
याला अनेक अपवाद आहेत त्यामुळे मराठी उद्योग नाहीत म्हणणं खरं नाही पण तुलना केली तर प्रमाण खूप कमी आहे --
जुन्या पिढीतले बीजी शिर्के, गरवारे, किर्लोस्कर, त्यानंतर निर्लेप चे भोगले, विकोचे पेंढारकर, कॅमलिन चे दांडेकर अशी काही उत्तम नावं आहेत.
साधा विचार करा -- आत्ता आजूबाजूला किती जण मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे असा विचार करतात आणि किती जण कमी कष्टाची नोकरी स्विकारतात.
यात बरोबर चूक काही नाही. प्रवृत्ती / आवडी यातला फरक आहे.

ह्या लोकांयेवढे यश मिळवले तरच त्या यश मिळवणार्याला उद्योजक म्हणावे काय ?
माझ्या पाहण्यात असे अनेक मराठी उद्योजक आहेत जे एका ठरावीक चौकोनात अत्यंत यशस्वी आहेत आणि सुखी देखील आहेत. स्वतःचा व्यवसाय आहे, चार-आठ लोकांना नोकरी उपलब्ध करून दिलेली आहे. माझ्या दृष्टीने ते देखील यशस्वी उद्योजकच आहेत.
एखाद्या मारवाडी, गुजराथी माणसाने काही छोटासा व्यवसाय चालू केला तर तो आपल्या नजरेत ताबडतोब 'शेठ, धंदेवाला' वैग्रे बनतो. मात्र मराठी माणसाने असे काही केल्यास आपली पहिली प्रतिक्रिया म्हणजे 'घ्या ! घरचे झाले थोडे' किंवा 'कुठून अवदसा आठवली ह्याला' ह्याच प्रकारात असते. आपल्या दृष्टीने मग त्या मनुष्याचे काहीतरी वायफळ धंदे करणे सुरु असते.
बाकी

ह्याच्याशी सहमत.
पार्टटाईम एखादा धंदा करायची किंवा धंद्यात पैसे गुंतवायची देखील अशा लोकांची मानसिकता नसते. एकवेळ शेअर बाजारात गुंतवणूक करतील, पण कोणाला धंदा चालू करायला देखील ५ रुपये द्यायचे नाहित किंवा स्वतः भागिदारी करायचे नाहित. बर्याचदा पालक देखील भक्कमपणे पाठीशी उभे राहण्या ऐवजी नोकरीत कसे सुख, समृद्धी आणि स्वस्थता आहे हे पटवून देत बसतात.
उत्तर भारतीय / गुजराती / मारवाडी / पारशी इ. यांचा टक्का उद्योगात जास्त आहे
अनेकवेळा येथे धंद्यात एखाद्याला 'वर आणण्यासाठी' भाषा,जात यांचा पुरेपूर वापर केला जातो. पैसा,धंदा आपल्या ज्ञातीच्या,आपल्या भाषिकांमध्ये राहिला पाहिजे ही भावना त्यामागे असते. अर्थात व्यवसाय यशस्वी होण्यासाठी गुण लागतातच पण पैशाचे बॅकिंगही लागते.ह्या बॅकिंगचा वरील भाषिकांना फायदा होतो.
मग त्यात एखाद्याला नाव मिळाले की मग उद्यमशीलता,धडाडी,वेळेचे अचूक भान वगैरे म्हणून कौतुक केले जाते.
एखाद्या उद्योगात,व्यवसायात जेव्हा अमूक भाषेचे वा ज्ञातीचे लोक जास्त दिसतात तेव्हा तो योगायोग निश्चित नसतो.
पण पैशाचे बॅकिंगही लागते.ह्या बॅकिंगचा वरील भाषिकांना फायदा होतो
एकदम खरयं. अशाच एका जवळच्या पण अमराठी मित्राला तर आम्हि तोंडावर म्हनायचो सालं तुमच्यासारख आम्हाला बिन व्याजी कर्ज भेटत नाहि म्हणुन आम्हि मागे आहोत. हे ऐकुन तो मात्र प्रचंड भडकून एकदम वरच्या पट्टित किंचाळायचा , "अरे कोण म्हणतं आमच्या लोकांना बिनव्याजी कर्ज मिळतं" कुठुन ऐकता हे सगळं , कशाला विश्वास ठेवता यावर वगैरे वगैरे वगैरे... :)
मग त्यात एखाद्याला नाव मिळाले की मग
उद्यमशीलता,धडाडी,वेळेचे अचूक भान वगैरे म्हणून
कौतुक केले जाते.
जेब्बात. कसलि धडाडि अन कौशल्य घेउन बसलाय ? पुस्तकि फ़ंडे सगळे अन काय... पाण्यात पडलं कि हातपाय आपोआप
हालतातच तसच असतं ते. भरभरुन व्यावसायिक यशाच एकच गुपित सांगतो... "ग़ॉडफ़ादर" असणे. कधि तो नशिब अथवा कधि संधि वा बहुतांश वेळेस प्रत्यक्ष व्यक्तिच्या रुपाने भेटतो. बस हा ज्याच्या मागे आहे तो बघता बघता धनाड्य़ उरलेले व्यावसायिक राहिले तरी जन्मभर कश्टकरीच...
>> जेब्बात. कसलि धडाडि अन कौशल्य घेउन बसलाय ? पुस्तकि फ़ंडे सगळे अन काय... पाण्यात पडलं कि हातपाय आपोआप हालतातच तसच असतं ते.
आशु साहेब, पोहता न येणाऱ्या दहा जणांना मी पाण्यात ढकलतो आणि तुम्ही काठावर उभे राहून मोजा किती जण सुखरूप वर येतात ते. (तुम्हाला पोहोता येत नसेल तर तुम्हीच एक सब्जेक्ट बना) तुमचे म्हणणे खरे असते तर कुणीही बुडून मेले नसते किंवा धंद्यात पण बुडले नसते.
>>भरभरुन व्यावसायिक यशाच एकच गुपित सांगतो... "ग़ॉडफ़ादर" असणे. कधि तो नशिब अथवा कधि संधि वा बहुतांश वेळेस प्रत्यक्ष व्यक्तिच्या रुपाने भेटतो. बस हा ज्याच्या मागे आहे तो बघता बघता धनाड्य़ उरलेले व्यावसायिक राहिले तरी जन्मभर कश्टकरीच...
गॉडफादर मुळे माणूस वर जातो म्हणणे म्हणजे प्रचंड मोठा विनोद आहे. एकाच गुरु कडे शिकणारे दोन शिष्य कौशल्याची किंवा यशाची समान पातळी गाठत नाहीत. सगळे क्रेडीट त्या ग़ॉडफ़ादर ला देऊन तुम्ही कष्ट करणाऱ्याचे श्रेय अव्हेरता आहात.
जाता जाता एक अनाहूत सल्ला देतो, प्लीज कधीही चुकूनही व्यवसायात पडू नका.
कोण म्हणतंय मराठी माणुस उद्योगात मागं आहे, याचा काही विदा आहे का उपलब्ध ?
आणि असला मागं तर काय शश्प बिघडणार आहे का ? महाराष्ट्रात शेती करणारा मराठी माणुस उद्योग करत नाही असं म्हणायचं का ? सगळ्यांनीच उद्योग केले तर नोक-या कोण करणार ? (हे सगळ्यांनीच सॉफ्टवेअर तयार केले तर कोण वापरणार ? या चालीवर वाचावं)
तसंच बर्याच भागात काही विशिष्ठ उद्योगधंद्यामधे काही विशिष्ठ जाती-धर्मातल्या लोकांची मोनोपॉली असते.
आणि इतरलोकं यात न येण्यासाठी "मनुष्य बळ" वापरलं जातं. उदा. गॅरेज, छोटे ट्रॅव्हल्स (पब्लिक-गुड्स) अशा धंद्यांमधे एका विशिष्ठ समाजातले लोकं जास्त आहेत. ती लोकं इतर लोकांना धंदा करू देत नाहीत असं मला सोलापुरात एका ओळखिच्याने मार खाल्यावर सांगितलं होतं! :)
मिपावर देखील असे काही मोनोपॉली असलेले लेखक आहेत. ती लोकं इतरांना लेखन करू देत नाहीत असं मला कोल्हापुरात एका ओळखिच्याने अवांतराचा मार खाल्यावर सांगितल होतं!
मराठी माणुस उधोग धंदयात खरच मागे आहे का?
अस काही नसाव. उलट इनोवेटीव उधोग धंदयात मराठी माणुस पुढेच आहे.
नेमक यशस्वी कशाला म्हणायाच हा ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
एकदा उधोग धंदयात उतरल्या नंतर मराठी वगैरे अस काही नसत.
प्रत्येक माणूस उद्योग-धंदा करण्यासाठी संधी शोधत असतो. पण सदर प्रश्नकर्त्याने "कुठले इनोवेटीव धंदे" असा प्रश्न विचारला आहे. त्यावरुन निदान एखादे उदाहरण अपेक्षित असावे (निदान मलातरी आहे) व व्याकरणदृष्ट्या तसाच अर्थ निघतो. तिथे तुमचे उत्तर चुकीचे व चुकीचेच असल्याचे दिसते. बाकी तुम्हाला तुमचे व्यावसायिक गुपित सांगायचे नसेल तर सांगू नका, पण निदान चुकीची उत्तरे तरी देऊ नका. (ही माझी अपेक्षा अवाजवी असल्यास तो तुमचाच दोष आहे)
प्रश्नापुढे जे लिहिले आहे ते (व त्यासंबंधीत भावना) खोडून काढायची संधी तुम्ही वाया घालवलीत याचा खेद झाला. या खेदामुळेच मी वरची प्रतिक्रिया दिली.
जर सरळसोट उत्तर दिले असते तर तुम्ही गमावले काहीच नसते, शिवाय कश्या प्रकारचे उद्योग असू शकतात याची एक चुणुकही दाखवून दिली असती तर धाग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरले असते.
तुम्ही हे सकारात्मकतेने घ्याल अशी अपेक्षा करतोय. :)
धंदा करायला ३ गोष्टी लागतात
१. प्रचंड कष्ट करायची तयारी.
२. जिभेवर साखर.
३. चोख हिशेबीपणा.
या शिकण्यासाठी घरातील वातावरणही तसे असणे गरजेचे आहे. घरी/जवळच्या परिचयात कुणी दुकानदार/व्यावसायिक असल्यास मुलानी दुकान सांभाळणे सोपे असते.
तसे पाहिले तर मराठी माणसांत अनेक 'कम्युनिटीज' सुरूवातीपासूनच धंदा/दुकानदारी करणार्या आहेत. उदा. वाण्याचे / शिंप्याचे / सोनाराचे दुकान. इ.इ.
इतर 'रिटेल' व्यावसायिकांत / व्यवसायांत उडी मारण्याची धडाडी मराठी माणसे दाखवतात, पण बहुतेकदा मध्यमवर्गियांचा कल मात्र नोकरीकडे असतो. कारण १० ते ५ पाट्या टाकल्या की संध्याकाळी बायकोबरोबर फिरायला जायला मिळते. हक्काची सुटी/रजा मिळते. हे व असे सुख दुकानदारी/व्यवसाय करणार्याला जमत नाही. अन २४ तास - १२ महिने काम करावे लागते ते वेगळे. "हातावर पोट". पैसे भरपूर मिळतात पण त्यातही टीपीकल 'सरकारी नोकरी' सारखी शाश्वत पेन्शन+लाच खायची सोय नसते. (उलट खाऊ घालायला शिकावे लागते.)
एकंदर सरासरीने पहाता मराठी माणूस फार मागे नाही असेच मी म्हणेन.
@धंदा करायला ३ गोष्टी लागतात
१. प्रचंड कष्ट करायची तयारी.
२. जिभेवर साखर.
३. चोख हिशेबीपणा. >>> गोपाळा सहमती रे बाबा तुझ्याशी...अगदी मनातले शब्द बोल्लास.
आणी तु लिहिलेल्या वाक्यावाक्याशी मनापासुन सहमत आहे मी,,,अगदी हेच मत आहे माझं
धीरुभाई आणि मूर्तीं यांनी आपल्या आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे उद्योग केला व त्या प्रमाणात यश मिळवले. अंबानींचे यश अफाट आहे पण मूर्तींचे यशही उत्तुंग आहे. २५००० कोटी रुपये उत्पन्न असलेले कंपनी ही मोठीच असते. जे.आर.डी टाटा, गोदरेज (पारसी), बिरला, बजाज (मारवाडी), शंतनूराव किर्लोसकर, आबासाहेब गरवारे (मराठी), धीरुभाई अंबानी (गुजराती), नारायण मूर्ती (कानडी), विजय माल्या (तेलगू), सुनिल मित्तल (पंजाबी), असे गेल्या तीन चार दशकांतील मोठे उद्दोजक बघितले तर आपल्याला अस दिसतं की उद्दोग करणं किंवा त्यात मोठं यश मिळवणं हे कुण्या एका समाजाच्या/जातीच्या माणसांची मक्तेदारी मुळीच नसते. त्यामुळे तरूण मराठी उद्दोजकांनी या पैकी कुणाचीही पायवाट धरली तरी काहीच हरकत नाही. फक्त मराठी असल्याने आपल्यामध्ये उद्योग करण्याची प्रवृत्तीच नाही हा विचार मात्र टाकून द्यावा! कारण शेवटी यशाला कुठलीच जात किंवा भाषा नसते! - नितिन पोतदार
ज्याना आपण यशस्वी धंदेवाईक समजतो , त्या लोकांना जवळुन पहायची संधी मिळाली होती. त्या मुलांच्या बोलण्यात फक्त पैसे, बाहेरची खादाडी असलेच विषय असायचे. संगीत, साहित्य, कला ह्यांचा त्यांच्या बोलण्यात दुर दुर पर्यंत संबंध नसायचा. थोड्याच वेळात त्यांच्या बोलण्याचा कंटाळा यायचा. ही मुले साधारण शिक्षण झालेली होती. पण ह्याच समाजातील उच्च शिक्षण झालेली माणसे पण पाहीली, त्यांचा पण प्रमुख विषय पैसा हाच असायचा.
ह्याच समाजातील लोकांच्या धंद्याच्या यशस्वीतेची फूट्पट्टी सर्वांना लावणे योग्य नव्हे.
(अवांतरः ह्याच समाजातील लोकाना ज्.माणेकशा यांनी कसे निरुत्तर केले होते हे एका धाग्यात आले होते)
मराठी माणूस धंद्यात मागे असलाच तर त्याला कारण हेच....
निरर्थक गप्पांमध्ये घालवला जाणारा वेळ, विनाकारण काथ्याकूट, विनाकारण शब्दांचा कीस पाडणं, वादासाठी वाद करणं, ही आणि अशीच अनेक कारणं असू शकतात. इतर समाजातले लोक असले 'उद्योग' करण्यापेक्षा स्वतःच्या 'व्यवसाया'कडे लक्ष देऊन पुढे जात असतील.
मी देखील असाच मराठी. ;)
मला वाटतं, यूपी-बिहारी लोकांनी असं छटपूजा वगैरे एकत्र करण्याचं कारण महाराष्ट्रातलं वास्तव्य आणि मराठी लोकांचा शेजार हेच असावं. :)
प्रतिक्रिया
30 Dec 2011 - 11:17 am | परिकथेतील राजकुमार
ते आमाला काय इचारते ?
30 Dec 2011 - 11:36 am | मिसळलेला काव्यप्रेमी
काय? म्हणजे तुम्ही घाटी नाही?? अरेरे!! ;)
30 Dec 2011 - 11:22 am | पक पक पक
कोण म्हण्ल ..? मराठी माणूस उद्योग धंद्यात मागे आहे. अजाबात नाय मराठी माणूस त्याचे उद्योग आणि त्याचे धंदे त्याच्या पद्ध्तीने जोरातच ...? चालवत असतो,आणि त्यात तो त्याच्या पद्ध्तीने यशस्वी ...?देखिल आस्तो....(काही अपवाद असतात डी.स्.के , किर्लोस्कर....वगैरे)
30 Dec 2011 - 11:35 am | आत्मशून्य
=)
30 Dec 2011 - 11:46 am | सोत्रि
खरंच अज्याबात कल्पना नाही ब्वॉ !
पण तुमची कळकळ बघून एखादा 'उद्योग' चालू करावा म्हणतो.
त्यानंतरच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देता येइल.
- (उद्योगशील) सोकाजी त्रिलोकेककर
30 Dec 2011 - 2:24 pm | निश
सोत्रि साहेब
मी तुमच मिपा वरी ल लेख वाचतो नेहमि, मला ते वाचायला आवडतात.
तुमचि लेख लिहिण्याचि भाषा अतिशय सुन्दर आहे.
तुम्ही अतिशय चांगले लेखक होऊ शकता.
30 Dec 2011 - 3:44 pm | धन्या
म्हणजे सोत्रि आता चांगले लेखक नाहीत का? ;)
मर्यादा एकशे अठ्ठावीस अक्षरांची. (हे ढाई अक्षर प्रेम के च्या चालीत वाचावे.)
- धनाजीराव वाकडे
30 Dec 2011 - 9:49 pm | यकु
>>>>>>>> धन्या <<<<<<<<<<<<
एकदम कटींग करुन आल्यासारखं वाटतंय रे!!!
नाव कशाला बदललंस?
30 Dec 2011 - 11:50 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ही सारी त्या कृष्णाची किमया आहे असा अंदाज आहे. ;-)
30 Dec 2011 - 12:09 pm | पक पक पक
मराठी माणुस उधोग धंदयात मागे आहे. तो सतत अपयशी ठरतो
हे अस काही वर्षांपुर्वी म्हणले जायचे.आता जर आजुबाजुला डोळे उघडून पहा बरेच मराठी उद्योजक यशस्वि झालेले दिसतील ,माझ्याच कंपनी मधिल एक श्री.माने नावच्या साध्या कामगारने काहि वर्षांपुर्वि नोकरी सोडुन थर्माकोल ईंडस्ट्रीमध्ये धंदा सुरु केला,आज त्याची या ईंडस्ट्रीमध्ये एक यशस्वि उद्योजक म्हणुन गणना केली जाते...
30 Dec 2011 - 12:25 pm | निश
माने साहेब तुम्हि ग्रेट आहात माझा तुम्हाला नमस्कार
30 Dec 2011 - 12:27 pm | निश
खरच मनापासुन कौतुक माने साहेबांच
30 Dec 2011 - 3:18 pm | पक पक पक
मराठी माणुस उधोग धंदयात खरच मागे आहे का?
अस काहीतरी बोलुन मराठी माणसे स्वता: न्युनगंड निर्माण करतात आणी मागे पड्तात असे वाट्ते....
30 Dec 2011 - 3:24 pm | निश
तुमच म्हणण बरोबर वाटत आहे.
कारण कदाचित मराठी माणसे उधोग धंदा करताना बर्या वाईटाचा जास्त विचार करत असेल. जग काय म्हनेल याचा अपयश आल तर. त्यातुन न्युनगंड निर्माण होत असावा.
30 Dec 2011 - 12:30 pm | चिरोटा
देशातील ७०% रि़क्षांचे मीटर्स सुपर मीटर्स मुंढवा,पुणे येथे तयार होतात. देशातील अनेक बॅन्कांची प्रमुख कार्यालये मुंबईत आहेत. मराठी माणूस धंद्यात मागे म्हणणार्यांनी हे लक्षात ठेवावे.
30 Dec 2011 - 9:53 pm | सुनील
देशातील ७०% रि़क्षांचे मीटर्स सुपर मीटर्स मुंढवा,पुणे येथे तयार होतात
शक्य आहे. पण सदर कंपनीचा मालक कोण आहे, हे महत्त्वाचे!
देशातील अनेक बॅन्कांची प्रमुख कार्यालये मुंबईत आहेत.
याचा धाग्याशी असलेला संबंध समजला नाही!
30 Dec 2011 - 12:36 pm | गवि
मराठी म्हणून माणसाला सर्वच क्षेत्रांमधे वेगळं तपासणं यालाच माझा विरोध आहे. मराठीपणा हा फारतर साहित्य, संभाषण इतक्यापुरता मर्यादित ठेवता येईल..
तरीही धंद्याबाबतीतही मराठी माणसाला एक वेगळा गट असं समजून त्याचं मोजमाप करायचं असेल तर खालील काही विचार..
.."उद्योगधंद्यात" पुढे जाणे म्हणजेच एकूण पुढे जाणे असे आहे का?
उत्तम हुद्द्याच्या नोकर्या, देशीविदेशी कंपन्यांत नियुक्त झालेले सी ई ओ किंवा एमडी.. जगभर सॉफ्टवेअरमधे ठसा उमटवणारे तज्ञ, शेतीपासून अवकाशापर्यंत सर्वत्र संशोधनाने चमत्कार घडवणारे शास्त्रज्ञ.. हेही पुढे जाणे नाही का? अशा ठिकाणी मराठी माणसांची गर्दीच दिसेल..
इतर कोणत्या भाषिक समाजापेक्षा मराठीत तुलनेत कमी टक्के उद्योजक असतील.. पण इतर अनेक क्षेत्रांत ते पुढे असू शकतात आणि अन्य "भाषिक" मागे...
मराठी माणसाची एकूण प्रगती कुठेतरी होतेय ना आणि सर्वजण सुखी आहेत ना ते पहावं.. नपेक्षा मोठ्ठं उद्योगसाम्राज्य आणि सदैव तणावाखाली राहून एक दिवस मेंदूतली नस फुटून मृत्यू, असं नको..
30 Dec 2011 - 12:55 pm | कवितानागेश
असे सारखे सारखे मरणाबद्दल काय लिहिता हो? :)
30 Dec 2011 - 1:04 pm | गवि
ठीक आहे.. नाही बोलत मरणाविषयी....
पिंडाएवढा भात खाऊन पडतो कोपर्यात प्रेतासारखा शांत..
;)
चालूदे चर्चा..
30 Dec 2011 - 3:20 pm | धमाल मुलगा
केव्हढा तो मनाचा मोठेपणा. ;)
30 Dec 2011 - 10:13 pm | अत्रुप्त आत्मा
@---पिंडाएवढा भात खाऊन पडतो कोपर्यात प्रेतासारखा शांत.. :-D अबाबाबाबा...!ग.वि. अहो काय हो ही उपमा सुचली?हसुन हसुन पड्याक झालय आमचं..! :स्फोटकहास्यस्माइली:
----यामुळे असे सुचवण्यात येत आहे की, ग.वि. च्या जागी क.वि.हे नाम धारण करण्यात यावे
30 Dec 2011 - 1:58 pm | निश
गवि साहेब, खरच चांगले विचार
हे वाक्य मात्र निराश करुन गेल:- नपेक्षा मोठ्ठं उद्योगसाम्राज्य आणि सदैव तणावाखाली राहून एक दिवस मेंदूतली नस फुटून मृत्यू, असं नको..
त्याऐवजि मोठ्ठं उद्योगसाम्राज्य आणि खुप लोकांना काम हे जास्त आवडं असत.
सध्या जि परिस्थिती आहे जगात त्याचा विचार करता तुमचे विचारही योग्यच आहेत.
30 Dec 2011 - 7:31 pm | तुषार काळभोर
इतर कोणत्या भाषिक समाजापेक्षा मराठीत तुलनेत कमी टक्के उद्योजक असतील.. पण इतर अनेक क्षेत्रांत ते पुढे असू शकतात आणि अन्य "भाषिक" मागे...
हो... सिलिकॉन व्हॅलित मराठी लोक जास्त की मारवाडी?
30 Dec 2011 - 1:01 pm | मैत्र
तुलनात्मक दृष्ट्या मराठी मनुष्य उद्योग धंदा करण्याच्या प्रवृत्तीचा नाही..
उत्तर भारतीय / गुजराती / मारवाडी / पारशी इ. यांचा टक्का उद्योगात जास्त आहे.
याला अनेक अपवाद आहेत त्यामुळे मराठी उद्योग नाहीत म्हणणं खरं नाही पण तुलना केली तर प्रमाण खूप कमी आहे --
जुन्या पिढीतले बीजी शिर्के, गरवारे, किर्लोस्कर, त्यानंतर निर्लेप चे भोगले, विकोचे पेंढारकर, कॅमलिन चे दांडेकर अशी काही उत्तम नावं आहेत.
साधा विचार करा -- आत्ता आजूबाजूला किती जण मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे असा विचार करतात आणि किती जण कमी कष्टाची नोकरी स्विकारतात.
यात बरोबर चूक काही नाही. प्रवृत्ती / आवडी यातला फरक आहे.
30 Dec 2011 - 1:29 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या लोकांयेवढे यश मिळवले तरच त्या यश मिळवणार्याला उद्योजक म्हणावे काय ?
माझ्या पाहण्यात असे अनेक मराठी उद्योजक आहेत जे एका ठरावीक चौकोनात अत्यंत यशस्वी आहेत आणि सुखी देखील आहेत. स्वतःचा व्यवसाय आहे, चार-आठ लोकांना नोकरी उपलब्ध करून दिलेली आहे. माझ्या दृष्टीने ते देखील यशस्वी उद्योजकच आहेत.
एखाद्या मारवाडी, गुजराथी माणसाने काही छोटासा व्यवसाय चालू केला तर तो आपल्या नजरेत ताबडतोब 'शेठ, धंदेवाला' वैग्रे बनतो. मात्र मराठी माणसाने असे काही केल्यास आपली पहिली प्रतिक्रिया म्हणजे 'घ्या ! घरचे झाले थोडे' किंवा 'कुठून अवदसा आठवली ह्याला' ह्याच प्रकारात असते. आपल्या दृष्टीने मग त्या मनुष्याचे काहीतरी वायफळ धंदे करणे सुरु असते.
बाकी
ह्याच्याशी सहमत.
पार्टटाईम एखादा धंदा करायची किंवा धंद्यात पैसे गुंतवायची देखील अशा लोकांची मानसिकता नसते. एकवेळ शेअर बाजारात गुंतवणूक करतील, पण कोणाला धंदा चालू करायला देखील ५ रुपये द्यायचे नाहित किंवा स्वतः भागिदारी करायचे नाहित. बर्याचदा पालक देखील भक्कमपणे पाठीशी उभे राहण्या ऐवजी नोकरीत कसे सुख, समृद्धी आणि स्वस्थता आहे हे पटवून देत बसतात.
30 Dec 2011 - 1:46 pm | निश
अतिशय योग्य मत
तुमचे विचार खरच आवडले साहेब
मस्त
30 Dec 2011 - 1:56 pm | सुहास..
आपण करतो ब्वा !!
( तीन वडा-पाव च्या गाड्यांचा मालक ! वाश्या ......एक रेस्टा- बार लवकरच ! )
30 Dec 2011 - 2:10 pm | चिरोटा
अनेकवेळा येथे धंद्यात एखाद्याला 'वर आणण्यासाठी' भाषा,जात यांचा पुरेपूर वापर केला जातो. पैसा,धंदा आपल्या ज्ञातीच्या,आपल्या भाषिकांमध्ये राहिला पाहिजे ही भावना त्यामागे असते. अर्थात व्यवसाय यशस्वी होण्यासाठी गुण लागतातच पण पैशाचे बॅकिंगही लागते.ह्या बॅकिंगचा वरील भाषिकांना फायदा होतो.
मग त्यात एखाद्याला नाव मिळाले की मग उद्यमशीलता,धडाडी,वेळेचे अचूक भान वगैरे म्हणून कौतुक केले जाते.
एखाद्या उद्योगात,व्यवसायात जेव्हा अमूक भाषेचे वा ज्ञातीचे लोक जास्त दिसतात तेव्हा तो योगायोग निश्चित नसतो.
30 Dec 2011 - 9:14 pm | आत्मशून्य
पण पैशाचे बॅकिंगही लागते.ह्या बॅकिंगचा वरील भाषिकांना फायदा होतो
एकदम खरयं. अशाच एका जवळच्या पण अमराठी मित्राला तर आम्हि तोंडावर म्हनायचो सालं तुमच्यासारख आम्हाला बिन व्याजी कर्ज भेटत नाहि म्हणुन आम्हि मागे आहोत. हे ऐकुन तो मात्र प्रचंड भडकून एकदम वरच्या पट्टित किंचाळायचा , "अरे कोण म्हणतं आमच्या लोकांना बिनव्याजी कर्ज मिळतं" कुठुन ऐकता हे सगळं , कशाला विश्वास ठेवता यावर वगैरे वगैरे वगैरे... :)
मग त्यात एखाद्याला नाव मिळाले की मग
उद्यमशीलता,धडाडी,वेळेचे अचूक भान वगैरे म्हणून
कौतुक केले जाते.
जेब्बात. कसलि धडाडि अन कौशल्य घेउन बसलाय ? पुस्तकि फ़ंडे सगळे अन काय... पाण्यात पडलं कि हातपाय आपोआप
हालतातच तसच असतं ते. भरभरुन व्यावसायिक यशाच एकच गुपित सांगतो... "ग़ॉडफ़ादर" असणे. कधि तो नशिब अथवा कधि संधि वा बहुतांश वेळेस प्रत्यक्ष व्यक्तिच्या रुपाने भेटतो. बस हा ज्याच्या मागे आहे तो बघता बघता धनाड्य़ उरलेले व्यावसायिक राहिले तरी जन्मभर कश्टकरीच...
31 Dec 2011 - 12:07 am | विश्वनाथ मेहेंदळे
>> जेब्बात. कसलि धडाडि अन कौशल्य घेउन बसलाय ? पुस्तकि फ़ंडे सगळे अन काय... पाण्यात पडलं कि हातपाय आपोआप हालतातच तसच असतं ते.
आशु साहेब, पोहता न येणाऱ्या दहा जणांना मी पाण्यात ढकलतो आणि तुम्ही काठावर उभे राहून मोजा किती जण सुखरूप वर येतात ते. (तुम्हाला पोहोता येत नसेल तर तुम्हीच एक सब्जेक्ट बना) तुमचे म्हणणे खरे असते तर कुणीही बुडून मेले नसते किंवा धंद्यात पण बुडले नसते.
>>भरभरुन व्यावसायिक यशाच एकच गुपित सांगतो... "ग़ॉडफ़ादर" असणे. कधि तो नशिब अथवा कधि संधि वा बहुतांश वेळेस प्रत्यक्ष व्यक्तिच्या रुपाने भेटतो. बस हा ज्याच्या मागे आहे तो बघता बघता धनाड्य़ उरलेले व्यावसायिक राहिले तरी जन्मभर कश्टकरीच...
गॉडफादर मुळे माणूस वर जातो म्हणणे म्हणजे प्रचंड मोठा विनोद आहे. एकाच गुरु कडे शिकणारे दोन शिष्य कौशल्याची किंवा यशाची समान पातळी गाठत नाहीत. सगळे क्रेडीट त्या ग़ॉडफ़ादर ला देऊन तुम्ही कष्ट करणाऱ्याचे श्रेय अव्हेरता आहात.
जाता जाता एक अनाहूत सल्ला देतो, प्लीज कधीही चुकूनही व्यवसायात पडू नका.
31 Dec 2011 - 12:23 am | पाषाणभेद
चिरोटा अन आत्मशुन्य यांच्याशी सहमत.
अवांतर होतेय - मागे लोकमत ने महाराष्ट्रीय असला पुरस्कार जाहिर केला होता. स्पॉन्सर होते - गुप्ता गृप.
30 Dec 2011 - 2:28 pm | ५० फक्त
कोण म्हणतंय मराठी माणुस उद्योगात मागं आहे, याचा काही विदा आहे का उपलब्ध ?
आणि असला मागं तर काय शश्प बिघडणार आहे का ? महाराष्ट्रात शेती करणारा मराठी माणुस उद्योग करत नाही असं म्हणायचं का ? सगळ्यांनीच उद्योग केले तर नोक-या कोण करणार ? (हे सगळ्यांनीच सॉफ्टवेअर तयार केले तर कोण वापरणार ? या चालीवर वाचावं)
30 Dec 2011 - 2:30 pm | मन१
नाडीचा धंदा करणारी काही मराठी मंडळीही ठाउक आहेत.
30 Dec 2011 - 2:32 pm | दादा कोंडके
तसंच बर्याच भागात काही विशिष्ठ उद्योगधंद्यामधे काही विशिष्ठ जाती-धर्मातल्या लोकांची मोनोपॉली असते.
आणि इतरलोकं यात न येण्यासाठी "मनुष्य बळ" वापरलं जातं. उदा. गॅरेज, छोटे ट्रॅव्हल्स (पब्लिक-गुड्स) अशा धंद्यांमधे एका विशिष्ठ समाजातले लोकं जास्त आहेत. ती लोकं इतर लोकांना धंदा करू देत नाहीत असं मला सोलापुरात एका ओळखिच्याने मार खाल्यावर सांगितलं होतं! :)
30 Dec 2011 - 2:38 pm | परिकथेतील राजकुमार
मिपावर देखील असे काही मोनोपॉली असलेले लेखक आहेत. ती लोकं इतरांना लेखन करू देत नाहीत असं मला कोल्हापुरात एका ओळखिच्याने अवांतराचा मार खाल्यावर सांगितल होतं!
(ह.घ्या.हे.वे.सां. न.ल.)
30 Dec 2011 - 2:39 pm | आनंद
मराठी माणुस उधोग धंदयात खरच मागे आहे का?
अस काही नसाव. उलट इनोवेटीव उधोग धंदयात मराठी माणुस पुढेच आहे.
नेमक यशस्वी कशाला म्हणायाच हा ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
एकदा उधोग धंदयात उतरल्या नंतर मराठी वगैरे अस काही नसत.
30 Dec 2011 - 3:19 pm | चिरोटा
कुठले एनोवेटीव उद्योगधंदे? "आमचे येथे पेणचे गणपती आणि परकर मिळतील" वाले?
30 Dec 2011 - 4:11 pm | आनंद
शोधा म्हणजे सापडेल.
30 Dec 2011 - 5:18 pm | अन्या दातार
हेच उत्तर धागाकर्त्याला सुद्धा द्यायचेत की. तिथं कशाला मोठ्या गप्पा?
30 Dec 2011 - 5:52 pm | आनंद
मी ही उधोग धंदयात आहे. माझ्या अनुभवा वरुन धागाकर्त्याना उत्तर दिल आहे.
मोठ्या गप्पा वाटल्या असतिल तर माफ करा.
-आनंद
30 Dec 2011 - 6:44 pm | अन्या दातार
बर. असुद्यात. आम्हाला त्याबद्दल दु:ख नाही.
प्रत्येक माणूस उद्योग-धंदा करण्यासाठी संधी शोधत असतो. पण सदर प्रश्नकर्त्याने "कुठले इनोवेटीव धंदे" असा प्रश्न विचारला आहे. त्यावरुन निदान एखादे उदाहरण अपेक्षित असावे (निदान मलातरी आहे) व व्याकरणदृष्ट्या तसाच अर्थ निघतो. तिथे तुमचे उत्तर चुकीचे व चुकीचेच असल्याचे दिसते. बाकी तुम्हाला तुमचे व्यावसायिक गुपित सांगायचे नसेल तर सांगू नका, पण निदान चुकीची उत्तरे तरी देऊ नका. (ही माझी अपेक्षा अवाजवी असल्यास तो तुमचाच दोष आहे)
30 Dec 2011 - 7:45 pm | आनंद
कुठले इनोवेटीव धंदे या पुढे ही सदर प्रश्नकर्त्याने काही लिहले आहे ते वाचल नाही वाटत.
प्रश्न सरळ असता तर उत्तर ही सरळच दिल असत.
30 Dec 2011 - 8:03 pm | अन्या दातार
प्रश्नापुढे जे लिहिले आहे ते (व त्यासंबंधीत भावना) खोडून काढायची संधी तुम्ही वाया घालवलीत याचा खेद झाला. या खेदामुळेच मी वरची प्रतिक्रिया दिली.
जर सरळसोट उत्तर दिले असते तर तुम्ही गमावले काहीच नसते, शिवाय कश्या प्रकारचे उद्योग असू शकतात याची एक चुणुकही दाखवून दिली असती तर धाग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरले असते.
तुम्ही हे सकारात्मकतेने घ्याल अशी अपेक्षा करतोय. :)
30 Dec 2011 - 9:37 pm | आनंद
मला वाटत यावर एक लेख ही लिहता येइल, पण टंचनिका नसल्यामुळे जरा वेळ लागेल;)
3 Jan 2012 - 11:00 am | प्रदीप
!!!
30 Dec 2011 - 3:19 pm | खुन्खार अकिब
मराठी मानुस उद्योगात मागे असेल पन ' धंदया'त नक्किच नाही...........
30 Dec 2011 - 8:21 pm | आनंदी गोपाळ
धंदा करायला ३ गोष्टी लागतात
१. प्रचंड कष्ट करायची तयारी.
२. जिभेवर साखर.
३. चोख हिशेबीपणा.
या शिकण्यासाठी घरातील वातावरणही तसे असणे गरजेचे आहे. घरी/जवळच्या परिचयात कुणी दुकानदार/व्यावसायिक असल्यास मुलानी दुकान सांभाळणे सोपे असते.
तसे पाहिले तर मराठी माणसांत अनेक 'कम्युनिटीज' सुरूवातीपासूनच धंदा/दुकानदारी करणार्या आहेत. उदा. वाण्याचे / शिंप्याचे / सोनाराचे दुकान. इ.इ.
इतर 'रिटेल' व्यावसायिकांत / व्यवसायांत उडी मारण्याची धडाडी मराठी माणसे दाखवतात, पण बहुतेकदा मध्यमवर्गियांचा कल मात्र नोकरीकडे असतो. कारण १० ते ५ पाट्या टाकल्या की संध्याकाळी बायकोबरोबर फिरायला जायला मिळते. हक्काची सुटी/रजा मिळते. हे व असे सुख दुकानदारी/व्यवसाय करणार्याला जमत नाही. अन २४ तास - १२ महिने काम करावे लागते ते वेगळे. "हातावर पोट". पैसे भरपूर मिळतात पण त्यातही टीपीकल 'सरकारी नोकरी' सारखी शाश्वत पेन्शन+लाच खायची सोय नसते. (उलट खाऊ घालायला शिकावे लागते.)
एकंदर सरासरीने पहाता मराठी माणूस फार मागे नाही असेच मी म्हणेन.
30 Dec 2011 - 10:25 pm | अत्रुप्त आत्मा
@धंदा करायला ३ गोष्टी लागतात
१. प्रचंड कष्ट करायची तयारी.
२. जिभेवर साखर.
३. चोख हिशेबीपणा. >>> गोपाळा सहमती रे बाबा तुझ्याशी...अगदी मनातले शब्द बोल्लास.
आणी तु लिहिलेल्या वाक्यावाक्याशी मनापासुन सहमत आहे मी,,,अगदी हेच मत आहे माझं
31 Dec 2011 - 5:02 am | अभिजीत राजवाडे
ज्यांना मराठी माणसाच्या कर्तुत्वाबद्दल शंका असेल त्यांनी नितिन पोतदार यांचा ब्लॉग वाचावा. खरच इतके छान विवेचन केले आहे त्यांनी.
http://www.myniti.com/
धीरुभाई आणि मूर्तीं यांनी आपल्या आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे उद्योग केला व त्या प्रमाणात यश मिळवले. अंबानींचे यश अफाट आहे पण मूर्तींचे यशही उत्तुंग आहे. २५००० कोटी रुपये उत्पन्न असलेले कंपनी ही मोठीच असते. जे.आर.डी टाटा, गोदरेज (पारसी), बिरला, बजाज (मारवाडी), शंतनूराव किर्लोसकर, आबासाहेब गरवारे (मराठी), धीरुभाई अंबानी (गुजराती), नारायण मूर्ती (कानडी), विजय माल्या (तेलगू), सुनिल मित्तल (पंजाबी), असे गेल्या तीन चार दशकांतील मोठे उद्दोजक बघितले तर आपल्याला अस दिसतं की उद्दोग करणं किंवा त्यात मोठं यश मिळवणं हे कुण्या एका समाजाच्या/जातीच्या माणसांची मक्तेदारी मुळीच नसते. त्यामुळे तरूण मराठी उद्दोजकांनी या पैकी कुणाचीही पायवाट धरली तरी काहीच हरकत नाही. फक्त मराठी असल्याने आपल्यामध्ये उद्योग करण्याची प्रवृत्तीच नाही हा विचार मात्र टाकून द्यावा! कारण शेवटी यशाला कुठलीच जात किंवा भाषा नसते! - नितिन पोतदार
31 Dec 2011 - 10:31 am | निश
मित्रहो खरच मी तुमचा आभारि आहे तुमच्या मतां बद्दल.
पण मला वाटत, तुम्हि दिलेल्या धाग्याच्या ह्या उडंद प्रतिसादा वरुन अस वाटत कि,
मराठी माणुस जिथे जातो तिथे यशस्वि होतोच होतो.
खरच मि आपला आभारि आहे.
हा धागा आता बन्द केला तरी चालेल मला.
धन्यवाद..............................
2 Jan 2012 - 9:38 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अरे वा !!! मराठी माणूस उद्योगांमध्ये पुढे गेला याची एकदम प्रचीती आली की काय ?
की काहीही बदलणार नाही असे वाटले अचानक ?
2 Jan 2012 - 1:10 pm | मराठी_माणूस
ज्याना आपण यशस्वी धंदेवाईक समजतो , त्या लोकांना जवळुन पहायची संधी मिळाली होती. त्या मुलांच्या बोलण्यात फक्त पैसे, बाहेरची खादाडी असलेच विषय असायचे. संगीत, साहित्य, कला ह्यांचा त्यांच्या बोलण्यात दुर दुर पर्यंत संबंध नसायचा. थोड्याच वेळात त्यांच्या बोलण्याचा कंटाळा यायचा. ही मुले साधारण शिक्षण झालेली होती. पण ह्याच समाजातील उच्च शिक्षण झालेली माणसे पण पाहीली, त्यांचा पण प्रमुख विषय पैसा हाच असायचा.
ह्याच समाजातील लोकांच्या धंद्याच्या यशस्वीतेची फूट्पट्टी सर्वांना लावणे योग्य नव्हे.
(अवांतरः ह्याच समाजातील लोकाना ज्.माणेकशा यांनी कसे निरुत्तर केले होते हे एका धाग्यात आले होते)
3 Jan 2012 - 11:13 am | प्यारे१
मराठी माणूस धंद्यात मागे असलाच तर त्याला कारण हेच....
निरर्थक गप्पांमध्ये घालवला जाणारा वेळ, विनाकारण काथ्याकूट, विनाकारण शब्दांचा कीस पाडणं, वादासाठी वाद करणं, ही आणि अशीच अनेक कारणं असू शकतात. इतर समाजातले लोक असले 'उद्योग' करण्यापेक्षा स्वतःच्या 'व्यवसाया'कडे लक्ष देऊन पुढे जात असतील.
मी देखील असाच मराठी. ;)
मला वाटतं, यूपी-बिहारी लोकांनी असं छटपूजा वगैरे एकत्र करण्याचं कारण महाराष्ट्रातलं वास्तव्य आणि मराठी लोकांचा शेजार हेच असावं. :)
ह. घ्या. न घ्या. कसेही...