परवाच महाबळेश्वरास जाउन आलो. तिथले काही फोटू येथे डकवत आहे.
१. वाईचे काशीविश्वेश्वर मंदिर
२. मंदिराचे कळस
३ शेजारीच असलेला गणपती मंदिरातील ढोल्या गणपती
४. पाचगणीतील पारशी पॉईंटवरून दिसणारा कमळगड
५. महाबळेश्वरात जाताना मध्ये एका ठिकाणी गो-कार्टींग केले
६. महाबळेश्वरावरून दिसणारे सह्याद्रीचे कडे
७. मढीमहाल उर्फ आर्थर सीट पॉईंट
८. सह्याद्रीच्या कड्यांची पायर्या पायर्यांची प्रस्तर रचना
९. डेक्कन ट्रॅप
१०. मंकी पॉईंट
११.रायरेश्वर
१२. सह्याद्रीच्या कडेकपारी
१३. सावित्रीचे खोरे
१४. चंद्रगड
१५. वेण्णा तलावाच्या काठावर
१६. सुरम्य संध्याकाळ
१७. स्ट्रॉबेरीच्या शेतात
१८. लालचुटूक स्ट्रॉबेरी
१९. शेवटी जाताना स्ट्रॉबेरी विथ क्रीम
२०. स्ट्रॉबेरी विथ क्रीम
प्रतिक्रिया
27 Dec 2011 - 2:36 pm | गवि
वाहवा.. भले..
जातोच आता जानेवारीत. दरवर्षीची स्ट्रॉबेरी सीझनची व्हिजिट बाकी आहेच...
27 Dec 2011 - 2:40 pm | स्पा
अप्रतिम रे वल्ली... कातील फोटो आलेत
सह्याद्रीचे सगळेच फोटो देखणे आलेत.
संध्याकाळचे फोटू पण मस्तच
चला सगळे जाऊ , महाबळेश्वरात
27 Dec 2011 - 8:51 pm | मितभाषी
असेच म्हणतो. लै भारीईईईई
27 Dec 2011 - 2:41 pm | गणपा
मस्त फोटो रे वल्ली.
27 Dec 2011 - 2:41 pm | लीलाधर
आता जाणे होणारच आहे फेब्रुवारीत
मस्तच रे वल्ल्या फारच छान आणि :) अतिशय सुंदर मनमोहक, मनाला भुरळ पाडणारी अप्रतिम फोटोग्राफी.
27 Dec 2011 - 2:43 pm | मन१
एक मिपा ट्रिप काढावी काय इकडे.
27 Dec 2011 - 2:43 pm | मन१
एक मिपा ट्रिप काढावी काय इकडे.
27 Dec 2011 - 2:51 pm | अन्या दातार
कशाला? महाबळेश्वरचे काश्मीर करायला का?? ;)
27 Dec 2011 - 3:09 pm | मन१
त्यापेक्षा काश्मीरलाच एक मिपा ट्रिप काढूयात.
27 Dec 2011 - 8:54 pm | मितभाषी
मलाबी येउद्या रे
27 Dec 2011 - 2:46 pm | अन्या दातार
फोटो अप्रतिम.
विशेषतः शेवटचे दोन ;)
अवांतरः स्ट्रॉबेरी विथ क्रीम नक्की कुणाबरोबर खाल्ले रे?? स्पा काकांचा सल्ला लक्षात होता ना लोहगड धाग्यावरचा की विसरलास?? ;)
27 Dec 2011 - 8:53 pm | प्रचेतस
चार ग्लास दिसत आहेत ना तिथे. ;)
28 Dec 2011 - 9:41 am | वपाडाव
पुणे गेट इथे ४ फ्रुट पंच गणेशाने एकट्याने रिचवले होते......
म्हणुन अन्याला हा प्रश्न पडला असावा कदाचित.....
27 Dec 2011 - 2:49 pm | विजय_आंग्रे
मुंबई कींव्हा एलिफीस्टन टोकावरुन घेतलेला प्रतापगडाचा ही एकादा फोटो हवा होता.
सुंदर प्रकाशचित्रे !
27 Dec 2011 - 2:49 pm | सर्वसाक्षी
मजा आली. वर घरबसल्या ढोल्या गणपतीचे दर्शन आणि तेही मंगळवारी.
धन्यवाद
27 Dec 2011 - 3:10 pm | प्रशांत
+१
27 Dec 2011 - 2:56 pm | प्यारे१
आयच्चं.
चोच्या वाईला जाणार होतास तर सांगणार कोण रे?
वाय झेड तिज्या आ.. :|
फोटो भारीच्च.
27 Dec 2011 - 3:03 pm | किसन शिंदे
काशी विश्वेश्वराचे फक्त कळसाचेच फोटो टाकलेस रे, आतले फोटो काढले नाहीत काय??
27 Dec 2011 - 3:03 pm | नंदन
फोटो आवडले. सह्याद्रीचे तर खासच.
27 Dec 2011 - 3:08 pm | अमृत
सह्याद्रीचे फोटो खूप आवडलेत इतरही फोटो छानचं..... महाबळेश्वरची सफर घडविल्याबद्दल धन्यवाद....
अमृत
27 Dec 2011 - 3:36 pm | पक पक पक
फोटो खुप मस्त आले आहेत ,भरपुर मजा केलेली दिसते आहे, ते कार्टिंग कुठे केले...?
): मुड बनला महाब्ळेश्वरला जाण्याचा.धन्यवाद वल्लि महाशय....
27 Dec 2011 - 3:40 pm | जयंत कुलकर्णी
वेण्णा लेकचा काय फोटो आलाय ! मस्त.
27 Dec 2011 - 4:40 pm | स्वाती दिनेश
सगळेच फोटो मस्त..
स्वाती
27 Dec 2011 - 5:44 pm | वपाडाव
सगळेच फटू छान.... मजा आली असणारंच....
27 Dec 2011 - 5:52 pm | ५० फक्त
अच्छा म्हणजे तुम्ही उनाड, भाकड, उत्तम असे पंचांगात दिवस पाहुन फिरायला जाता काय ?
असो, एका उनाड दिवसातल्या उनाड्क्या बद्दल लिहिलं पाहिजे ना, नुसतेच छान छान फोटो काय टाकताय ?
27 Dec 2011 - 8:51 pm | प्रचेतस
पंचांग कसले बघतोय. तसेही हापिसात आम्ही रोजच उनाडक्या करत असतो, त्यामुळे आमच्यासाठी सगळे दिवस उनाडच.
27 Dec 2011 - 6:37 pm | जोशी 'ले'
खुपच सुंदर फोटोग्राफी...मला सावित्रिचे खोरे खुप आवडले
27 Dec 2011 - 7:18 pm | मदनबाण
सुरेख... :)
27 Dec 2011 - 8:16 pm | सुधांशुनूलकर
छान फोटो.
स्ट्रॉबेरीबरोबरच मलबेरी (तुती) चा सीझन असला तर दुधात साखरच ! आम्ही मे महिन्यात गेलो होतो तेव्हा उत्कृष्ट मलबेरी भरपूर खायला मिळाली.
आणखी एक : महाबळेश्वरपेक्षा पाचगणीला मुक्काम करावा असं सुचवावसं वाटतं......महाबळेश्वरमधे फार गर्दी असल्यास.
27 Dec 2011 - 8:51 pm | अन्या दातार
ऐकतोयस ना रे वल्ली?? ;)
28 Dec 2011 - 6:56 am | ५० फक्त
अरे तो कशाला ऐकतोय आता, त्याचं झालंय ना बुकिंग, हां प्रश्न उरला गर्दीचा तर गर्दी काय रस्त्यावर, बाजारपेठेत असणार आहे....
27 Dec 2011 - 8:32 pm | गणेशा
अप्रतिम रे वल्लीशेठ....
स्ट्रॉबेरी विथ क्रिम मला खुप आवडते ...
28 Dec 2011 - 12:10 am | मी-सौरभ
+१
28 Dec 2011 - 1:06 am | पाषाणभेद
फारच सुंदर फोटो आले आहेत. सह्याद्रीच्या रांगा मस्तच.
28 Dec 2011 - 1:39 am | प्रभाकर पेठकर
येत्या भारत भेटीत, मुद्दाम छायाचित्रे काढण्याची योजना आखून, महाबळेश्वर भेट ठरविली पाहिजे.
28 Dec 2011 - 7:21 am | सुहास झेले
वाह वाह... सुंदर फोटो...
सह्याद्रीचे फोटो तर अफाट आलेत... आवडेश :) :)
28 Dec 2011 - 9:28 am | अत्रुप्त आत्मा
फोटोंबद्दल काय बोलणार ... वल्लिदा...एक सो एक आहेत... अख्खं प्रदर्शन अवडलचं,पण त्या शेवटच्या स्ट्रॉबेरीच्या दोन स्टॉलनी घात केला राव. अगदी अमचं क्रीम काढलं कि वो...! अत्ताच्या अता जावंसं वाटतय. अजेबात र्हाव्वत न्हाय बगा...ग्येलो ग्येलो आमी आता म्हाबळेव्शरात...!
28 Dec 2011 - 10:53 am | चिंतामणी
स्ट्रॉबेरी विथ क्रीमचे फोटो जिवघेणे आहेत.
28 Dec 2011 - 11:56 am | सोत्रि
अगदी हेच म्हणातो!
- (स्ट्रॉबेरीखाऊ) सोकाजी
28 Dec 2011 - 11:44 am | सुहास..
मस्त च !!
28 Dec 2011 - 12:59 pm | परिकथेतील राजकुमार
वल्ली खरच वल्ली आहेस बाबा __/\__
तो ' स्ट्रॉबेरी विथ क्रीम' बघून खपल्या गेल्या आहे.
28 Dec 2011 - 4:47 pm | धमाल मुलगा
एव्हढे डोंगरदर्यांचे वगैरे फोटो काढलेयत म्हणजे एकटाच गेला होतास वाटतं. काय, सध्या हिलस्टेशन्स इव्हॅल्युएशन' करतोयस असं दिसतंय. ;)
फोटूबद्दल नो कमेंट्स! वल्लीचा क्यामेरा भारीए आणि त्यानं क्लिकपण नाही केलं तरी लै भारी फोटू निघतात हे मला ठौक है :D
28 Dec 2011 - 4:49 pm | स्पा
फोटूबद्दल नो कमेंट्स! वल्लीचा क्यामेरा भारीए आणि त्यानं क्लिकपण नाही केलं तरी लै भारी फोटू निघतात हे मला ठौक है
असेच म्हणटॉ :)
28 Dec 2011 - 5:53 pm | प्रचेतस
पण साधाच क्यामेरा आहे बे. कॅननचा एस एक्स ११० आय एस पॉईंट अँड शूट.
28 Dec 2011 - 4:49 pm | निश
लय भारी
खरच मस्त आहेत फोटों
एकदम सुन्दर आहेत फोटों
१० वीत असताना गेलेल्या शाळेच्या सहलिची आठवण झाली.
28 Dec 2011 - 6:34 pm | पैसा
सह्याद्रिचं सगळं रौद्र सौंदर्य मस्त टिपलंय. बाकी फोटो पण फार छान! मी गेल्या वर्षी गणपतीत महाबळेश्वरला गेले होते तेव्हा इतका पाऊस होता, की ढगातून गाडी चालवावी लागत होती, त्यामुळे अक्षरशः काही दिसलं नाही. पण या फोटोंमुळे महाबळेश्वर पाहिल्यासारखं वाटलं.
30 Dec 2011 - 2:14 pm | सविता००१
ग्रँड फोटो आहेत. जीवघेणे ' स्ट्रॉबेरी विथ क्रीम'. वल्लीबाबा खरच क्लासिक आहेत सगळे फोटो
2 Jan 2012 - 4:26 pm | संजयशिवाजीरावगडगे
लईभारी स्ट्रॉबेरी विथ क्रीम
6 Jan 2012 - 9:18 am | बज्जु
सुरेख फोटो. चंद्रगडाचा फोटो विशेष आवडला.
बज्जु
6 Jan 2012 - 3:24 pm | मेघवेडा
लै खास फोटो आहेत वल्ली! खूप आवडले!