पुण्यातली प्रेक्षणीय-स्थळे ?

बन्याबापू's picture
बन्याबापू in काथ्याकूट
19 Dec 2011 - 11:58 pm
गाभा: 

नमस्कार मिपा करानों !
काय सांगु यार..गेले चार-पाच वर्ष कुठेच फिरलो नाही.घर ते कॉलेज बाकी वेळच नाही मिळाला कुठे फिरायला.आता कॉलेज सुरू झाले तर कुठेतरी एकटेच फिरायला जायची हुक्की आली.म्हणुन लगेच पुण्यात भावाला ला कॉल करुन सांगितले " मी येणार आहे पुण्याला..आपण कुठेतरी मस्त फिरायला जाऊ ! भावाने लगेच 'हो' बोलला.तसे एका मैत्रिणीला ही भेटायचे आहे म्हणुन जात आहे.माझी फक्त एकच मैत्रीण आहे आणि तिला जर मी आता पुण्यात जाऊन नाही भेटलो तर पुन्हा कधी आयुष्यात भेटु नाही शकणार..कारण (आता सांगत नाही..जावू दे )..तर मित्राणो..मला सांगा ना 'पुण्यात प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत ? तिथे कसे जायचे ? जवळपास ठिकाणे च सांगा ? किल्ले बघायला..त्यांचा इतिहास जाणून घ्यायला मला खुप आवडते.तर,पुण्यात कोणते किल्ले आहेत जवळपास ?

मी आता शनिवारी सकाळी पुण्यात येईन.माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीला भेटेन..खुप बोलणार आहे तीचाशी..कारण ती मला पुन्हा कधीच भेटणार नाहीये.मला तुम्ही मदत करा..मला जे २ दिवस मिळाले आहेत खुप मस्ती करायची आहे..खुप फिरायचे आहे..माझ्या गोड मैत्रिणीला पण मनभरून पाहीन ..खुप बोलेन..खुप आनंद देईन तिला.मी गेले ३ वर्षापासून मिपा चा नियमित वाचक आहे.आज जे मनात आले ते लिहिले..काहीच वाटत नाहीये..असे वाटत आहे "घरातल्यानाच विचारत आहे मी " .आणि हो मित्राणो..मी जरी बाहेर फिरत नसलो तरी मिपा वर खुप काही चांगले बघायला..वाचायला..अनुभव..संस्कार मिळत आहे मला..मी खुप मनापासुन आभार मानतो तुम्हासर्वांचे ! तुम्ही सगळे 'मिपा' कर खरेच खुप चांगले आहात..गोड आहात.

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2011 - 6:40 pm | अत्रुप्त आत्मा

त्यामुळे तोन्ड कुठे लपवावे न कुठे नाय आमी, हे बि लिवा म्हन्जे बेस होइल. :bigsmile:
हे करुन पहा---(हापिसात उपलब्ध जागेनुसार) डोळे मिटुन घेतले की तोंड लपवल्याची भावना अपोआप तयार होते :-D

वपाडाव's picture

21 Dec 2011 - 6:53 pm | वपाडाव

१. आपल्याच दातांमध्ये हाताची दोन बोटे रुतवुन ठेवावीत म्हंजे काहीच होणार नाही.....
२. खुर्चीवर थोडे सांभाळुन बसावे....

चिंतामणी's picture

22 Dec 2011 - 8:20 am | चिंतामणी

तुमचा धागा दिडशतक पुर्ण करून व्दिशतकाकडे वाटचाल करू लागला आहे.

उत्तरोत्तर असेच सल्ले तुम्हाला मिळत राहोत आणि तुमची प्रगती होत राहो अश्या शुभेच्छा.