पुण्यातली प्रेक्षणीय-स्थळे ?

बन्याबापू's picture
बन्याबापू in काथ्याकूट
19 Dec 2011 - 11:58 pm
गाभा: 

नमस्कार मिपा करानों !
काय सांगु यार..गेले चार-पाच वर्ष कुठेच फिरलो नाही.घर ते कॉलेज बाकी वेळच नाही मिळाला कुठे फिरायला.आता कॉलेज सुरू झाले तर कुठेतरी एकटेच फिरायला जायची हुक्की आली.म्हणुन लगेच पुण्यात भावाला ला कॉल करुन सांगितले " मी येणार आहे पुण्याला..आपण कुठेतरी मस्त फिरायला जाऊ ! भावाने लगेच 'हो' बोलला.तसे एका मैत्रिणीला ही भेटायचे आहे म्हणुन जात आहे.माझी फक्त एकच मैत्रीण आहे आणि तिला जर मी आता पुण्यात जाऊन नाही भेटलो तर पुन्हा कधी आयुष्यात भेटु नाही शकणार..कारण (आता सांगत नाही..जावू दे )..तर मित्राणो..मला सांगा ना 'पुण्यात प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत ? तिथे कसे जायचे ? जवळपास ठिकाणे च सांगा ? किल्ले बघायला..त्यांचा इतिहास जाणून घ्यायला मला खुप आवडते.तर,पुण्यात कोणते किल्ले आहेत जवळपास ?

मी आता शनिवारी सकाळी पुण्यात येईन.माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीला भेटेन..खुप बोलणार आहे तीचाशी..कारण ती मला पुन्हा कधीच भेटणार नाहीये.मला तुम्ही मदत करा..मला जे २ दिवस मिळाले आहेत खुप मस्ती करायची आहे..खुप फिरायचे आहे..माझ्या गोड मैत्रिणीला पण मनभरून पाहीन ..खुप बोलेन..खुप आनंद देईन तिला.मी गेले ३ वर्षापासून मिपा चा नियमित वाचक आहे.आज जे मनात आले ते लिहिले..काहीच वाटत नाहीये..असे वाटत आहे "घरातल्यानाच विचारत आहे मी " .आणि हो मित्राणो..मी जरी बाहेर फिरत नसलो तरी मिपा वर खुप काही चांगले बघायला..वाचायला..अनुभव..संस्कार मिळत आहे मला..मी खुप मनापासुन आभार मानतो तुम्हासर्वांचे ! तुम्ही सगळे 'मिपा' कर खरेच खुप चांगले आहात..गोड आहात.

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

20 Dec 2011 - 12:05 am | मी-सौरभ

पुण्यात प्रेक्षणीय असे बरेच काही आहे. (सजीव- निर्जीव, फुकट - सशुल्क, स्थिर- चलित ई.)
तुला काय काय प्रेक्षणीय वाटते ते सांगितलस तर माहिती देणे सोपे होईल.

पक पक पक's picture

20 Dec 2011 - 6:20 pm | पक पक पक

चला बन्याबापु तुमची पुणे ट्रिप सुरु झालि ,तुमच्या प्रश्नाला आता किमान एक हजार पुणेरी थाटातिल उत्तरे मिळ्णार.....

मी-सौरभ's picture

21 Dec 2011 - 3:19 pm | मी-सौरभ

एकच उपप्रतिसाद???

चिंतामणी's picture

20 Dec 2011 - 12:48 am | चिंतामणी

पुण्यातली प्रेक्षणीय-स्थळे याचेपुढे ? टाकल्याबद्दल

आणि प्रश्णचिन्ह अयोग्य जागी टाकले असल्याने उत्तर देण्याची गरज नाही.

बन्या बापु's picture

20 Dec 2011 - 1:58 am | बन्या बापु

अजुन एक बन्या बापु !

तुर्तास एवधेच लिहितो :-)

इंटरनेटस्नेही's picture

20 Dec 2011 - 2:53 am | इंटरनेटस्नेही

जे एम रोड. ;)

गणपा's picture

20 Dec 2011 - 3:12 am | गणपा

सन्माननिय परिकथेतील राजकुमाराशी संपर्क साधावा. ते या विष्यातले उत्तम जाणकार आहेत.
उलट एकदाका त्यांना भेटायला त्यांच्या कार्यालयात गेलात की तिथे बरीच 'प्रेक्षणीय-स्थळे' स्वतःहुन चालून लालेली दिसतील आणि तुमचे इतरस्त्र जाण्याचे कष्ट वाचतील.

अन्या दातार's picture

20 Dec 2011 - 7:20 am | अन्या दातार

सालं जो उठतो तो स.प.रा. याच्या कॅफेकडे येणार्‍या चंचल प्रेक्षणीय स्थळांबद्दल बोलतो. मी गेलो तर तिच्यामारी (सॉरी सॉरी, तद माताय) कुणीच दिसलं नाय!

आता स.प.रा जर प्रेक्षणीय वगैरे वाटला तर प्रश्न वेगळा ;)

पाषाणभेद's picture

20 Dec 2011 - 8:42 am | पाषाणभेद

>>> आता स.प.रा जर प्रेक्षणीय वगैरे वाटला तर प्रश्न वेगळा ..
संविधानाने कायदा मंजूर केल्याने त्याची मोकळीक घेता की काय अन्याराव तुम्ही?

बन्या अरे फुरसूंगी सारखी मोकळी ढाकळी जागा सोडून उगा कशाला गर्दीत घेवून फिरतोस मैत्रीणीला पुण्यात? दोन दिवस मिळालेच आहेत तर निट साजरे कर तिच्याबरोबर.
ट्ट्ट्टॉक्क!

अन्या दातार's picture

20 Dec 2011 - 8:46 am | अन्या दातार

मी मोकळीक घेणार असं थोडीच म्हणालोय पाभे! ते वाक्य इतरांसाठी होते. आपल्याला पुण्यात कुठे फिरायचे वगैरे असले फालतू प्रश्न पडतच नाहीत मुळी.

सूड's picture

20 Dec 2011 - 9:57 am | सूड

>>तिथे बरीच 'प्रेक्षणीय-स्थळे' स्वतःहुन चालून लालेली दिसतील
चालून लालेली ? म्हण्जे नक्की कशी?

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2011 - 9:06 am | अत्रुप्त आत्मा

तुंम्हाला काय काय प्रेक्षणीय वाट्टं ते कळवा,म्हणजे तशी यादी देता येइल. ;-)

नायतर पुणे दर्शन बस मधुन एखाद्या अट्टल पुणेकराला बरोबर घेउन फिरा.म्हणजे बस तुंम्हाला पुण्यातल्या दर्शनीय जागा दाखवेल,आणी जाता जाता पुणेकर तुंम्हाला प्र-दर्शनीय स्थळं दाखवेल ;-)

धन्या's picture

20 Dec 2011 - 9:37 am | धन्या

आणी जाता जाता पुणेकर तुंम्हाला प्र-दर्शनीय स्थळं दाखवेल

भटजीबुवा, तुम्ही तुमची सोय पाहत आहात का? ;)
ते त्यांच्या गोड मैत्रिणीला घेउन फीरायचं म्हणत आहेत. पुण्यातले गणपती आणि मारुती पाहायचे आहेत असे कुठं म्हणाले आहेत?

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2011 - 12:59 pm | अत्रुप्त आत्मा

भटजीबुवा, तुम्ही तुमची सोय पाहत आहात का? >>> :-D
<<< आंम्ही कुठे म्हटलं कि ते 'दाखवणारे' आंम्ही असू , आणी असलो तर असु देत की..!तुंम्हाला का यायला लागलय कुत्सित हसू :-p

अवांतर-पुण्यातले गणपती/मारुती सोडुन द्या...आंम्हाला एकट्याला आणी दोघांना निवांत भेट द्यावयाची असल्यास अशी इतर ठिकाणंही माहित आहेत म्हंटल...! ;-)

पक पक पक's picture

20 Dec 2011 - 6:24 pm | पक पक पक

अत्रुप्त आत्मा......

ओंकारेश्वर्,वैकुंठ इत्यादी इत्यादी..........?

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2011 - 6:54 pm | अत्रुप्त आत्मा

ओंकारेश्वर्,वैकुंठ इत्यादी इत्यादी..........? ओssssss ती ठिकाणं आंम्हा भूतयोनीतील अत्रुप्तांसाठी :ghost: राखीव आहेत,ती आंम्ही तुम्हाला कशी दाखवू...? :evil: वेडपट...माणुस कुठले..!? ;-)

(चवताळलेला) :evil: अत्रुप्त आत्मा :ghost:

च्यायला तुमचा दशक्रिया विधी झाला नाहि कि काय ........?तसेही तुमचे प्रतिसाद वाचुन बन्याबापु आत्तापर्यंत निधन पावले असतीलच .दोघांचा दहावा एकदम करुन घ्या,म्हणजे तुम्हिही शांत व्हाल आणी बापूंच्या आत्म्याला सद्गगती लाभेल...

गपा की राव !! कशाला बिचार्‍याला आंजामनि करायला भाग पाडताय.

पक पक पक's picture

21 Dec 2011 - 6:29 pm | पक पक पक

सगळ्यांना गप बसवता आहात ,तुम्हि काय मिपा वरती सम्नवयक आहात का...? कि लोकसभेचे सभापति आहात....?

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2011 - 11:05 pm | अत्रुप्त आत्मा

@-च्यायला तुमचा दशक्रिया विधी झाला नाहि कि काय ........? :-D त्याचा भूत होण्याशी कुठे संमंध असतो.. ;-)

@-तसेही तुमचे प्रतिसाद वाचुन बन्याबापु आत्तापर्यंत निधन पावले असतीलच . माझे प्रतिसाद वाचुन निधन पावले,हे म्हणण खरं असेलही पण तुमचे प्रतिसाद वाचून त्यांना सदगती नक्की मिळाली असेल.

@-दोघांचा दहावा एकदम करुन घ्या,म्हणजे तुम्हिही शांत व्हाल आणी बापूंच्या आत्म्याला सद्गगती लाभेल... मी भडकलेलो नाही,प्रतिसाद गमतिनी लिहिलावता,त्यामुळे शांत होण्याची गरज मला नाहिये...

पक पक पक's picture

21 Dec 2011 - 6:24 pm | पक पक पक

दशक्रिया विधी झाला नाहि तर आत्मे अत्रुप्त राहतात असा समज आहे.त्या मुळे ते लवकरात लवकर उरकुन घ्या आणि मुक्त व्हा.....

त्यांचे सुख अत्रुप्तीतच आहे हो. कशाला उगाच त्यांच्या अत्रुप्तीवर गदा आणताय.

पक पक पक's picture

21 Dec 2011 - 7:44 pm | पक पक पक

अस आहे का..?बर ! मग त्यांना वैकुंठ आणि ओंकारेश्वरा वरच विहार करु दे न ,त्या बन्याबापुंच का झाड धरायला लागले आहेत...

प्रचेतस's picture

21 Dec 2011 - 9:08 pm | प्रचेतस

वैकुंठ म्हणजे साक्षात विष्णूलोक, ओंकारेश्वर म्हणजे साक्षात कैलास.
ही दोन्ही ठिकाणे म्हणजेच मोक्षप्राप्तीची स्थानं. तिकडे विहार करून त्यांना मोक्ष नाही का मिळणार,
अत्रुप्त आत्म्याला मोक्ष नकोय हो, त्यांना अत्रुप्तीच्या असीम अवकाशात स्वच्छंदपणे विहार करू द्या की जरा. जी झाडं धरायची ती धरू द्या.

पक पक पक's picture

21 Dec 2011 - 10:11 pm | पक पक पक

वैकुंठ म्हणजे साक्षात विष्णूलोक, ओंकारेश्वर म्हणजे साक्षात कैलास आता हि दोन ठिकाणे बन्याबापुंना पण दाखवा एवढेच म्हणालो होतो हो मि , पण त्यावरुनच हा आत्मा खवळ्ला , त्याला वाट्ले बन्याबापु त्याच्या मैत्रिणी बरोबर ह्या प्रदेशात अतिक्रमण घडवुन आणत आहे ,त्या मुळे त्याला शांत करायच्या हेतुने हा सल्ला दिला गेला...बाकि तुमची भुतदया पाहुन माझे ह्रुदय भरुन आले.त्यांच्या बद्द्लचे तुमचे प्रेम बघता मि माझा आग्रह मागे घेत आहे.....

प्रचेतस's picture

21 Dec 2011 - 10:43 pm | प्रचेतस

त्या मुळे त्याला शांत करायच्या हेतुने हा सल्ला दिला गेला...

तुमच्या सल्ल्याने थोडीच तो शांत होणार आहे तो? अहो अत्रुप्त आहे तो. इतका सहज त्रुप्त कसा होईल?

बाकि तुमची भुतदया पाहुन माझे ह्रुदय भरुन आले.

गल्लत करताय हो तुम्ही भूतयोनी वेगळी आणि आत्मे वेगळे. भूताला मुक्ती मिळते पण आत्मा अमर असतो. आणि हो, तुमचे हृदय भरून आले तर पटकन डॉक्टरला दाखवून घ्या बरे आधी नाहीतर तुमचाच आत्मा फटकन मोकळा व्हायचा आधी. ;)

अहो अत्रुप्त आहे तो. इतका सहज त्रुप्त कसा होईल.

एकंदरीत चर्चेतुन असे दिसते आहे कि अत्रुप्त आत्मा आत्तातरी शांत आहे ,पण तुम्च्या सारखे काही समंधच अधिक त्रस्त झाले आहेत्.असो पण आता माझ्या जिवावर बेतले आहे तर मग मि काढता पाय घेतो.पण मग भुत योनी वेगळी आत्मा वेगळा असे काहितरी तुम्ही बडबडलात ते कसे.आत्म्याला चेहरा नसतो मग त्या अत्रुप्त आत्म्याच्या प्रतिसादात असलेले चेहरे तुम्चे आहेत का...?

प्रचेतस's picture

21 Dec 2011 - 11:07 pm | प्रचेतस

एकंदरीत चर्चेतुन असे दिसते आहे कि अत्रुप्त आत्मा आत्तातरी शांत आहे

सध्या शांत असला तरी प्रकट होणारच ना केव्हा ना केव्हातरी.

पण तुम्च्या सारखे काही समंधच अधिक त्रस्त झाले आहेत्.

आम्ही समंध, कमाल आहे ब्वा तुमची? आम्ही आपले साधेसुधे आहोत हो.

सो पण आता माझ्या जिवावर बेतले आहे तर मग मि काढता पाय घेतो

तेच तुमच्यासाठी बरे हो. पण ते डॉक्टरला दाखवायचं विसरू नका हो.

आत्म्याला चेहरा नसतो मग त्या अत्रुप्त आत्म्याच्या प्रतिसादात असलेले चेहरे तुम्चे आहेत का...?

आमचे तर नाहीत ब्वा. कदाचित तुमचे असावेत. काहीवेळा ते चेहरे पकपकत असल्याचा भास होतो मात्र.

पक पक पक's picture

21 Dec 2011 - 11:24 pm | पक पक पक

आमचे तर नाहीत ब्वा. कदाचित तुमचे असावेत

नाही हो माझे कसे असतील दोन तिन प्रकारचे आहेत्....तुम्चेच दोघा तिघांचे असावेत्.मि तर साधा माणुस आहे.

प्रचेतस's picture

22 Dec 2011 - 8:31 am | प्रचेतस

आजकाल साधी माणसंच वेगवेगळे मुखवटे लावून फिरत असतात हो.

समंधांपेक्षा तुम्ही त्रस्त वाटताय पक पक पक , साहजिक आहे म्हणा. तुम्ही तुमचा आयडी सार्थक करताय !! अभिनंदन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

पक पक पक's picture

21 Dec 2011 - 11:28 pm | पक पक पक

ह्ये कुठुन आल मध्येच ......? धन्यवाद पण माझा वाढदिवस नाहि आज्.असो तुम्ची जयंति कधी ते सांगा ,नक्की साजरी करु...

>>? धन्यवाद पण माझा वाढदिवस नाहि आज...
अस्सं?? मग अभ्यास वाढवा. मोठे व्हा !! पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

अन्या दातार's picture

21 Dec 2011 - 9:34 pm | अन्या दातार

ते वैकुंठ नि ओंकारेश्वर राहुदेत. तुम्ही का त्यांच्या मागे लागत आहात? कोई पुरानी दुश्मनी? ;)

पक पक पक's picture

21 Dec 2011 - 10:18 pm | पक पक पक

अरे वा अन्या भौ बरेच दिवस आपली गाठ-भेठ नाहि. कसे आहात आपण.आणि असे मधेच कसे भुता सारखे प्रकट झालात.काय मुळव्याधीचा त्रास परत सुरु झाला कि काय..?

अन्या दातार's picture

21 Dec 2011 - 10:28 pm | अन्या दातार

काय मुळव्याधीचा त्रास परत सुरु झाला कि काय..?

तुम्हाला मुळव्याध झाल्याची लक्षणे तुमच्या प्रतिसादांवरुन वाटत आहेत; म्हणून जरा जमालगोटा द्यायला आलो ;)

इलाज पडला की कळेलच आम्हाला.

तुम्हाला मुळव्याध झाल्याची लक्षणे तुमच्या प्रतिसादांवरुन वाटत आहेत.

नाहि हो मला तसा काहि त्रास नाहि,पण तुमच्या आजारा बाबत आपली मागे एकदा चर्चा झाली होती ना.आणी बरेचदा तुमची मुळ्व्याध उपटल्यावर तुम्ही माझ्या कडुनच उपचार करवुन घेता ना..?विसरभोळे पणा चांगला नाहि अन्याभौ,बाकि वयोमाना नुसार हे प्रकार होणारच.

अन्या दातार's picture

21 Dec 2011 - 10:54 pm | अन्या दातार

डू नॉट फीड द ट्रोल्स असे काहिसे वाचलेले आठवतंय. त्यामुळे नो कॉमेंट्स.
या धाग्यावरचा हा माझा शेवटचा प्रतिसाद. चर्चा अति-अवांतराकडे नेण्यात मला स्वारस्य नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2011 - 11:19 pm | अत्रुप्त आत्मा

त्यांना वैकुंठ आणि ओंकारेश्वरा वरच विहार करु दे न ,त्या बन्याबापुंच का झाड धरायला लागले आहेत... >>> का हो पकाऊ ...मी कोणाचं झाड धरेन नायतर मुळं ...आपण माझी पारंबी कशाला निष्कारण ओढताय?... मी आपल्या आधी वाटेला तरि गेलो होतो का? कशाला वाद वाढवताय उगा..?

बेसिक शंकांचे निरसन केल्यास पुण्याविषयी गायडन्स देण्याचा प्रयत्न केला जाईल.

१) मैत्रिणीला मनभरुन भेटून मग एकटेच फिरणार आहात की मनभरुन भेटण्यासाठीच विविध ठिकाणांचा बॅकड्रॉप हवाय?
२) मैत्रिणीला शेवटचे भेटण्याची वेळ आहे हे सांगण्याच्या तुमच्या टोनवरुन एकूण सर्व लक्षात येत आहे.. त्यामुळे ते वेगळं सांगायची गरज नाही. पण शंका उरतेच मित्रा, की सर्वात आवडती, गोड इ. मैत्रीण शेवटच्यांदा भेटण्याची वेळ येईपर्यंत परिस्थिती असताना इतिहास आठवत किल्ले कसले फिरतोस..?

स्पा's picture

20 Dec 2011 - 9:58 am | स्पा

मैत्रिणीला शेवटचे भेटण्याची वेळ आहे हे सांगण्याच्या तुमच्या टोनवरुन एकूण सर्व लक्षात येत आहे.. त्यामुळे ते वेगळं सांगायची गरज नाही. पण शंका उरतेच मित्रा, की सर्वात आवडती, गोड इ. मैत्रीण शेवटच्यांदा भेटण्याची वेळ येईपर्यंत परिस्थिती असताना इतिहास आठवत किल्ले कसले फिरतोस..?

अराररा .. गविनी पार टेम्प्युत बसवला कि हो बन्याला =))

गप्प रे. शेवटची भेट अशी ऐतिहासिक वास्तूंच्या साक्षीने अनुभवण्याची गंमत तुम्हा मुंबैकरांना काय कळणार !! ;)

-१

मुंबईत ऐतिहासिक वास्तू किंवा मैत्रिणी नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का?

मृत्युन्जय's picture

20 Dec 2011 - 10:30 am | मृत्युन्जय

- १

काय उपयोग त्या फतर्‍या मुंबईचा जर तिच्यात बन्याबाप्पूंची गोग्गोड मयतरिण नसेल तर?

गवि's picture

20 Dec 2011 - 10:43 am | गवि

तुम्ही मुंबैस फतरे म्हणा नाहीतर आणि काही.. आम्ही ठाणेकर असल्याने आमच्या कातडीस त्यातले काही लागत नाही..

शिवाय अगदी मुंबईकर असतो तरी प.पू. पु.ल. यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबईचा जाज्वल्य अभिमान असलाच पाहिजे अशी अट मुंबईकर होण्यासाठी आवश्यक नाहीच आहे. ती अट पुण्याला.. तिथे जाज्वल्य अभिमान पाहिजे..

स्पा's picture

20 Dec 2011 - 10:48 am | स्पा

+५० फक्त

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Dec 2011 - 9:04 am | विश्वनाथ मेहेंदळे

अगदी अगदी.... पुणेकरांना वाटते की मुंबईला शिव्या घातल्या की मुंबईकरांना राग येईल. परत एकदा पुलं वाचा म्हणावे....

:p :-p :tongue:

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Dec 2011 - 11:31 am | विश्वनाथ मेहेंदळे

याला जित्याची खोड म्हणतात हो ;-)

तेच की !! त्यांची सोन्यासारखी मयतरीण पुण्यात असेल तर त्या मुंबैच्या बॅण्डस्टॅण्ड ला काय आग लावायची ?? ;)

किसन शिंदे's picture

20 Dec 2011 - 10:19 am | किसन शिंदे

गप्प रे. शेवटची भेट अशी ऐतिहासिक वास्तूंच्या साक्षीने अनुभवण्याची गंमत तुम्हा मुंबैकरांना काय कळणार

?????

एवढ्या लवकर मुंबईला विसराल याची अपेक्षा नव्हती बदलापुरकर.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Dec 2011 - 9:02 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>एवढ्या लवकर मुंबईला विसराल याची अपेक्षा नव्हती बदलापुरकर.
"बाटलेला फकीर मोठ्याने बांग देतो" अशी म्हण उगाच आहे का ? ;-)

>>"बाटलेला फकीर मोठ्याने बांग देतो" अशी म्हण उगाच आहे का ?
काय की !! सध्या व्हेन यू आर ईन रोम .....काहीसं म्हणतात त्याचं पालन करतोय. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Dec 2011 - 6:53 pm | विश्वनाथ मेहेंदळे

म्हणजे अजून सुंता झाली नाही म्हणायची.. होईल होईल... :-)
पण पुढे मागे जेव्हा परत याल तेव्हा आम्ही तुळशीचे पान तयार ठेऊ.

अवांतर :- रोम चे नाव घेऊ नका, सध्या बदनाम आहे.

सूड's picture

21 Dec 2011 - 9:46 am | सूड

दो आ प्र का टा आ

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2011 - 2:30 pm | अत्रुप्त आत्मा

@-"बाटलेला फकीर मोठ्याने बांग देतो" अशी म्हण उगाच आहे का ?>>> खिक्क... :-D

बाटलेला फकीर मोठ्याने बांग देतो" अशी म्हण उगाच आहे का ?

मी या प्रतिसादाला धर्मनिरपेक्ष करु इच्छितो..

"धर्मबदल केलेला एक साधक मूळ धर्मीयापेक्षा मोठ्या आवाजात धार्मिक आराधनेतील उच्चारण करतो.."

कसे???

( माझ्या लहानपणी रत्नागिरी टाईम्स आणि तत्सम पेपरांत किंवा रेडिओवर दंगलीच्या बातम्या अशा यायच्या "एका धार्मिक गटाच्या मिरवणुकीमुळे दुसर्‍या धार्मिक गटाच्या प्रार्थनास्थळी प्रार्थनेच्या वेळेस शांतताभंग झाल्याने तणाव उत्पन्न झाला.. " इ इ. )

गवि, एखाद्या पोलिसस्टेशनच्या शांतता समितीत आहे का तुम्ही? अशीच प्रगती करत राहिलात तर नोबेलचा शांतता पुरस्कार मिळेल.

मी-सौरभ's picture

20 Dec 2011 - 10:39 am | मी-सौरभ

ऐतिहासिक ठिकाणी ईतिहास जाणून घेण्याऐवजी स्वतःच घडवायची चांगली संधी असते असं जाणकार सांगताना ऐकलय मी ;)

चिगो's picture

20 Dec 2011 - 11:54 am | चिगो

>>..पण शंका उरतेच मित्रा, की सर्वात आवडती, गोड इ. मैत्रीण शेवटच्यांदा भेटण्याची वेळ येईपर्यंत परिस्थिती असताना इतिहास आठवत किल्ले कसले फिरतोस..?

ठार मेलो.. पुरता प्याक करुन टेंपुत बसवला गवि तुम्ही.. आणि तेही तुम्हाला (व्हाया सर्व मिपाकर) "गोड" म्हणत असतांना..

बन्याबापू's picture

20 Dec 2011 - 4:10 pm | बन्याबापू

१) मैत्रिणीला मनभरुन भेटून मग एकटेच फिरणार आहात की मनभरुन भेटण्यासाठीच विविध ठिकाणांचा बॅकड्रॉप हवाय?
-मैत्रिणीला मनभरुन भेटणार मगच एकटा फिरायला जाणार आहे.

२) सर्वात आवडती, गोड इ. मैत्रीण शेवटच्यांदा भेटण्याची वेळ येईपर्यंत परिस्थिती असताना इतिहास आठवत किल्ले कसले फिरतोस..?
- तीचाशी भेटल्यानंतर एकटा काय करू म्हणता मग ?

तीचाशी भेटल्यानंतर एकटा काय करू म्हणता मग ?

एरवडा एक चांगले ठिकाण आहे अशा परिस्थीतीत जायला...........

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Dec 2011 - 12:52 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>मैत्रिणीला मनभरुन भेटणार मगच एकटा फिरायला जाणार आहे.
मित्रा, मग किल्ल्यावर काय, साधा पर्वतीवर पण जाऊ नकोस. नावावर जाऊ नकोस, पर्वती छोटेसे टेंगुळ आहे, पण ते असो. तर मुद्दा असा की उडी मारायचा मोह व्हावा अशी ठिकाणे टाळ.
(सदर सल्ला ५०% मस्करी आणि ५०% गंभीरपणे दिला आहे)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Dec 2011 - 12:52 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>मैत्रिणीला मनभरुन भेटणार मगच एकटा फिरायला जाणार आहे.
मित्रा, मग किल्ल्यावर काय, साधा पर्वतीवर पण जाऊ नकोस. नावावर जाऊ नकोस, पर्वती छोटेसे टेंगुळ आहे, पण ते असो. तर मुद्दा असा की उडी मारायचा मोह व्हावा अशी ठिकाणे टाळ.
(सदर सल्ला ५०% मस्करी आणि ५०% गंभीरपणे दिला आहे)

सुहास..'s picture

20 Dec 2011 - 10:32 am | सुहास..

सिहंगड ला वगैरै जावुन ईतर प्रेक्षणीय बघण्यापेक्षा (अगदी आडबाजुला, प्रेक्षणीय आणि शांत)

१ ) एम्प्रेस बॉटनिकल गार्डन, रेसकोर्स

२ ) कस्तुरबा गांधी हॉल, पूणे - नगर रोड

३ ) महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड

४ ) पाताळेश्वर लेणी , जंगली महाराज रोड

५ ) ओंम नम शिवाय, येरवडा

६ ) एम.जी. रोड , कॅम्प ( तिथेच लाल देऊळ ! )

७ ) नाला पार्क, कोरेगाव पार्क

८ ) ओशो कम्युन सेंटर, कोरेगाव पार्क
जरा दुर जायचे असेल तर

१ ) बनेश्वर , पुणे -बँगलोर हाय वे

२ ) रांजण खळगी , शिरुर

३ ) शिवापुर दर्गा , पुणे बँगलोर हाय वे

४ ) मल्हारगड, सासवड (तिथेच दिवे घाट)

५) बोपदेव घाट, कनिफनाथ

६ ) निळकंठेश्वर , पानशेत

अजुन बरेच आहेत ....

किसन शिंदे's picture

20 Dec 2011 - 10:36 am | किसन शिंदे

रांजण खळगी , शिरुर

रांजण खळगे शिरूरमध्ये नाही निघोजमध्ये आहेत.

सुहास..'s picture

20 Dec 2011 - 10:46 am | सुहास..

हो का ??

माहिती बद्दल धन्यवाद ;)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2011 - 2:46 pm | अत्रुप्त आत्मा

@रांजण खळगे शिरूरमध्ये नाही निघोजमध्ये आहेत.>> असू द्या हो किसनराव....पाण्यात उतरायला मिळाल्याशी मतलब...! ;-)

प्रचेतस's picture

20 Dec 2011 - 3:02 pm | प्रचेतस

पाण्यात का खळग्यात?
का खळग्यातल्या पाण्यात. ;)

मी-सौरभ's picture

20 Dec 2011 - 3:59 pm | मी-सौरभ

तुला आता मंदाकिनी दिसू लागली ?
की
'यमुनाजळी खेळू खेळ कन्हैय्या' हे गाणं पण ऐकू येत आहे?

प्रचेतस's picture

20 Dec 2011 - 4:01 pm | प्रचेतस

नाही नाही, मला सध्या फक्त एशियन मेलॉन्ज दिसतय डोळ्यांसमोर. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Dec 2011 - 1:41 am | विश्वनाथ मेहेंदळे

मी आधी Ménage वाचले चुकुन :-)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2011 - 7:01 pm | अत्रुप्त आत्मा

पाण्यात का खळग्यात?
का खळग्यातल्या पाण्यात
:-D चुकलं चुकलं...वल्ली.. तुमचं बरोब्बर...खळग्यातल्या पाण्यात,तुंम्ही अनुभवी माणसं राव ;-)

बन्याबापू's picture

20 Dec 2011 - 4:16 pm | बन्याबापू

'प्रेक्षणीय' स्थळे सांगितली त्याबद्दल धन्यवाद..सुहास !

मृत्युन्जय's picture

20 Dec 2011 - 10:55 am | मृत्युन्जय

जे २ दिवस मिळाले आहेत खुप मस्ती करायची आहे..

हॉटेल श्रेयस - आपटे रोड
हॉटेल ओकवुड - भांडारकर रोड
होटेल एकांत - लवासा सिटी

वरील सर्व ठिकाणी हुच्च मध्यमवर्गीयांसाठी आहेत. आपले बजेट सांगावे म्हणजे योग्य ती ठिकाणे सांगता येतील.

पुण्यात मस्ती करण्याजोगी अजुनही काही छाण ठिकाणे आहेत पण आपण मैत्रिणीसोबत असल्याकारणाने कदाचित गरज पडणार नाही.

खुप फिरायचे आहे..

झेड ब्रिज (हो हेच नाव आहे आणी हे नाव त्याच्या आकारामुळे पडले आहे. गैरसमज नको)
खडकवासल्याची भिंत
खडकवासल्याच्या पुढील मैदाने
सिंहगड

आणि हि छत्री न्यायला विसरायचे नाही बर का.

सुहास..'s picture

20 Dec 2011 - 11:04 am | सुहास..

खडकवासल्याची भिंत
खडकवासल्याच्या पुढील मैदाने
सिंहगड

आणि हि छत्री न्यायला विसरायचे नाही बर का >>>.

लई अनुभव ब्वा !!

पेपर पण न्या बर का ! (नाय म्हणजे ड्रेस, कपडे मातकटले की बाप ओळखतो की कार्ट/कार्टी कुट गेल होत ते ;) )

अन्या दातार's picture

20 Dec 2011 - 11:27 am | अन्या दातार

>>पेपर पण न्या बर का ! (नाय म्हणजे ड्रेस, कपडे मातकटले की बाप ओळखतो की कार्ट/कार्टी कुट गेल होत ते)

हा तुमचा अनुभव वाटतं ;)

पण मुळात कुठंतरी मातीत लोळत जावेच कशाला? खडकवासल्याच्या आजूबाजूला हाटेलं नाहीत का? ;)

५० फक्त's picture

20 Dec 2011 - 11:34 am | ५० फक्त

अरे तसं नव्हे अन्या, पेपर न्या म्हणजे
१. तिथल्या सिन सिनेरीचे रेखा चित्रे काढुन मिपाचे कलादालन सम रुद्ध करता येईल
२. उगाचच तिथला निसर्ग खराब का करा, त्यापेक्षा कागद वापरलेला चांगला
३. गेला बाजार, विमानं करुन उडवायला येतिल.

आता खडकवासला आणि पेपर यावरुन एक अतिशय सालस सोज्वळ सभ्य (क्रिडारसिकांच्या भाषेत - सचिन टाईप) जोक आठवला आहे, पण जाउ दे. ......

मृत्युन्जय's picture

20 Dec 2011 - 12:13 pm | मृत्युन्जय

आता खडकवासला आणि पेपर यावरुन एक अतिशय सालस सोज्वळ सभ्य (क्रिडारसिकांच्या भाषेत - सचिन टाईप) जोक आठवला आहे, पण जाउ दे. ......

व्यनि करावा अशी नम्र बिनंत्यी.

सोत्रि's picture

20 Dec 2011 - 12:32 pm | सोत्रि

मलाही त्या व्यनित अ‍ॅडवण्याचे करावे :)

- ('जोक'र) सोकाजी

मी-सौरभ's picture

20 Dec 2011 - 1:10 pm | मी-सौरभ

माझ्याही मनावर कोवळे परीणाम करणारा हा व्यनी करावा ;)

चिंतामणी's picture

20 Dec 2011 - 1:20 pm | चिंतामणी

पाठवुन दे.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2011 - 3:01 pm | अत्रुप्त आत्मा

अंssssssssssअसं नै ब्वॉ,मला पण पायजेल जोक व्यनितुन... ;-)

मृत्युन्जय's picture

20 Dec 2011 - 12:12 pm | मृत्युन्जय

पण मुळात कुठंतरी मातीत लोळत जावेच कशाला? खडकवासल्याच्या आजूबाजूला हाटेलं नाहीत का?

असं नाही लेका. मातीत पण मस्ती करता येतेच की. बन्याबापूंना मस्ती करायची आहे ना?

बाकी सुहासराव ते पेपराचं क्लीयर केल म्हणुन बराय बर का नाहीतर आम्हाला वाटले की खडकवासल्याची भेळ खाउन अजीर्ण झाले तर बरे असेल म्हणुन सांगताय की काय. नाही म्हणजे कधीकधी गैरसोय झाली की .......... हॅ हॅ हॅ.

बाकी बन्याबप्पू दिसत नाहीत कुठे, मयतरीण भेटली की काय त्यांना?

आणि हि छत्री न्यायला विसरायचे नाही बर का
मुम्बईत सेन्ट्रल लाईन वर सकाळी बर्‍याच छत्र्या दिसतात. विशेषतः ठाणे कुर्ल्या दरम्यान

इंटरनेटस्नेही's picture

20 Dec 2011 - 12:24 pm | इंटरनेटस्नेही

पुण्यात मस्ती करण्याजोगी अजुनही काही छाण ठिकाणे आहेत पण आपण मैत्रिणीसोबत असल्याकारणाने कदाचित गरज पडणार नाही.

=)) =)) =)) हेच म्हणतो.

खडकवासल्याच्या आजूबाजूला हाटेलं नाहीत का?

हा तुमचा अनुभव वाटत :D

अन्या दातार's picture

20 Dec 2011 - 11:41 am | अन्या दातार

स्पा,
मी आजवर एकदाही खडकवासल्याला गेलेलो नाही. सहज चौकशी केली रे. आता जर गेलो कुणाबरोबर तिथे, तर खायचे वांदे नकोत म्हणून रे :P

____________________________________________________________
अप्रसन्न

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2011 - 3:11 pm | अत्रुप्त आत्मा

आता जर गेलो कुणाबरोबर तिथे, तर खायचे वांदे नकोत म्हणून रे... :-D काय खाणार? ;-)

प्रचेतस's picture

20 Dec 2011 - 3:39 pm | प्रचेतस

खायचे होऊ नयेत वांदे.... म्हणून खा कांदे. ;)

कपिलमुनी's picture

20 Dec 2011 - 4:33 pm | कपिलमुनी

चांदीचे भांडे आनि तुळशीच्या मंजुळा येतात
पळा...............

हो तर!! पुण्यासारखी हिरवळ शोधून सापडणार नाही.

हो तर!! पुण्यासारखी हिरवळ शोधून सापडणार नाही.

इंटरनेटस्नेही's picture

20 Dec 2011 - 12:29 pm | इंटरनेटस्नेही

पुण्यातच आहे. आणि एकदम 'खास' आहे. नवीन पिढीचा स्वातंत्र्याचा उन्मुक्त आविष्कार पाहायचा असेल तर सारसबागेला पर्याय नाही.

चिरोटा's picture

20 Dec 2011 - 11:57 am | चिरोटा

पेशवे पार्क आहे का अजून? असेल तर ते ही पहा. नाहीतर हिंजवडी आय टी पार्क, मगरपट्टा सिटी आहेच.

>>नाहीतर हिंजवडी आय टी पार्क, मगरपट्टा सिटी<<<

चिरोट्या,
अरे त्याला मस्ती करायला आणि मैत्रीणी बरोबर फिरायला या पेक्षा चांगल्या जागा वर दिल्या आहेत... आय टी पार्कात जाण्यापेक्षा राजीव गांधी पार्कात जा..........

>>>.मला सांगा ना 'पुण्यात प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत ? तिथे कसे जायचे ? जवळपास ठिकाणे च सांगा ? किल्ले बघायला..त्यांचा इतिहास जाणून घ्यायला मला खुप आवडते.तर,पुण्यात कोणते किल्ले आहेत जवळपास ?

१)वल्लींनी मार्ग दाखवला आहे.

http://www.misalpav.com/node/20144

२)नाहीतर "राजगड" गाठावा. साखरप्याला उतरून पायी चोरवाटेने गड चढावा. जमल्यास बालेकील्यावर जावे. सगळा गड फिरावा. दोन दिवस लागतील त्यासाठी.

३) गेला बाजार सिंहगड आहेच. तीथल्या गर्दीचे काय करायचे हे मात्र तु बघुन घे. :) :-) :smile:

इंटरनेटस्नेही's picture

20 Dec 2011 - 1:36 pm | इंटरनेटस्नेही

३) गेला बाजार सिंहगड आहेच. तीथल्या गर्दीचे काय करायचे हे मात्र तु बघुन घे.

आँ? बरेच कोपरे आहेत आमच्या सिंहगडावर! अधिक माहितीसाठी व्यनि करावा!

मनराव's picture

20 Dec 2011 - 2:24 pm | मनराव

>>>>आमच्या सिंहगडावर!<<<

ऑ ?? सिंहगड तुमचा कवा पासुन झाला..... आणि सिंहगडावर पण स्टॅमिना टेस्ट झाली काय तुमची......

गणपा's picture

20 Dec 2011 - 1:42 pm | गणपा

गड किल्ले? नको रे बाबा.
तिथल्या ऐतिहासीक वातावरणाची अनुभुती घ्यायची सोडून एखाद्या नाजुक वळणावर स्वतःच ईतिहास रचायला लागले तर आपले "नडगी फोड कार्पोरेटर"* कुठून उपटतील भरवसा नाय. ;)
तेव्हा गड किल्ले टाळलेलेच बरे अस आमच मत हां.

* इच्छुकांनी अधिक माहितीसाठी धम्याला व्यनी करावा.

अरे बाबांनो.. (मैत्रिणीसोबत) "पुणे आणि परिसरात" फिरायला मागताहेत ते माहिती.. तुम्ही त्यांना वर्तुळ विस्तारत विस्तारत साखरपा बिखरप्याला धाडताय...

अशाने हळूहळू वज्रेश्वरी सापुतारा किंवा चिखलदर्‍यालाही पाठवाल..

मृत्युन्जय's picture

20 Dec 2011 - 1:56 pm | मृत्युन्जय

त्यांना वर्तुळ विस्तारत विस्तारत साखरपा बिखरप्याला धाडताय...

गविंशी शमत आहे. वर्तुळं विस्तारु नका हो त्यांची. मज्जा निघुन जाइल भेटीमधली सग्ळी.

परिकथेतील राजकुमार's picture

20 Dec 2011 - 1:51 pm | परिकथेतील राजकुमार

आपले लेखन वाचले. थोड्याश्या लिखाणात खूप काही सांगण्याची आपली हातोटी आवडली. आपल्या लेखावरून बरीच माहिती मिळाली व काही अंदाजही लावले गेले.

काय सांगु यार..गेले चार-पाच वर्ष कुठेच फिरलो नाही.घर ते कॉलेज बाकी वेळच नाही मिळाला कुठे फिरायला.आता कॉलेज सुरू झाले तर कुठेतरी एकटेच फिरायला जायची हुक्की आली.

गेली चार वर्षे आपण ६ वी ते १० वी असे शिक्षण पूर्ण केलेत अथवा फक्त १० वी मधून बाहेर पडण्याचे प्रयत्न केलेत. आपण अथक परिश्रमांवर विश्वास ठेवणार्‍या व्यक्तींपैकी आहात.

लगेच पुण्यात भावाला ला कॉल करुन सांगितले " मी येणार आहे पुण्याला..आपण कुठेतरी मस्त फिरायला जाऊ ! भावाने लगेच 'हो' बोलला.

आपला भाऊ देखील सध्या शिकत असावा किंवा तो रिकामटेकडा असावा. सुशिक्षीत बेकार किंवा आयटीत असल्याने दोन दिवस सुट्टी असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. कदाचित तिर्थरुपांनी बरेच काही करून ठेवले असल्याने त्याला काही करण्याची आवश्यकता देखील नसावी.

तसे एका मैत्रिणीला ही भेटायचे आहे म्हणुन जात आहे.माझी फक्त एकच मैत्रीण आहे

आपल्याला ह्या जगात केवळ एकच मैत्रिण आहे. आपण आजवरच्या आयुष्यात फक्त एकाच मैत्रिणीपर्यंत मजल मारु शकलेला आहात किंवा एकाच मैत्रिणीला टिकवून ठेवण्यात यशस्वी झालेला आहात.

आणि तिला जर मी आता पुण्यात जाऊन नाही भेटलो तर पुन्हा कधी आयुष्यात भेटु नाही शकणार..कारण (आता सांगत नाही..जावू दे ).

सदर मैत्रिण आपला मुखचंद्र पाहून नक्की ग्रहण लावणार ही तुम्हाला खात्री असावी, किंवा एकदा प्रत्यक्ष भेट झाली की मैत्रिण आपला वकूब ओळखून टांग मारणार ह्याची तुम्हाला निश्चिंती असावी. कादाचीत मैत्रिण तुमची किंवा तुम्ही मैत्रिणीची 'बिसलरी बॉटल' करण्याची तयारी ठेवलेली असावी.

)..तर मित्राणो..मला सांगा ना 'पुण्यात प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत ? तिथे कसे जायचे ? जवळपास ठिकाणे च सांगा ? किल्ले बघायला..त्यांचा इतिहास जाणून घ्यायला मला खुप आवडते.तर,पुण्यात कोणते किल्ले आहेत जवळपास ?

पुण्यात कृपया येऊ नये. आणि शनिवार रविवार तर बिलकुल येऊ नये. पुण्यात आधीच परप्रांतीयांचा शनिवार रविवार भयावह धुमाकूळ असतो, त्यात पुण्यातले काही दिडशहाणे मुंबैला जाऊन आणी मुंबैतले काही पुण्यात येऊन उतमात घालत असतातच. तेंव्हा आपल्याच गावात विश्रांती घ्यावी आणि गुगलवरती पुणे व परिसराचे फोटो बघावेत. तसेही पुण्यात एकही गड अथवा किल्ला नाही. काही सरदारांचे व सावकारांचे वाडे तेवढे शिल्लक आहेत. सिंव्हगड वैग्रे प्रकार पुण्याच्या हद्दीत नाहीत. नदी पलीकडे पुणे संपते ह्याचेच ज्ञान नसणार्‍याने तर पुण्यात बिलकुल येउ नये.

मी आता शनिवारी सकाळी पुण्यात येईन.माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीला भेटेन..खुप बोलणार आहे तीचाशी..कारण ती मला पुन्हा कधीच भेटणार नाहीये.मला तुम्ही मदत करा..मला जे २ दिवस मिळाले आहेत खुप मस्ती करायची आहे..खुप फिरायचे आहे..माझ्या गोड मैत्रिणीला पण मनभरून पाहीन ..खुप बोलेन..खुप आनंद देईन तिला.

ह्यासाठी बोंबलत पुण्याला येण्याची गरज नाही. एक वॅबकॅम तुमच्या संगणकाला लावा आणि एक त्या मुलीच्या संगणकाला लावायला सांगा. थोडक्यात आणि स्वस्तात काम होईल. ह्याचा फायदा म्हणजे आयुष्यात पुन्हा हवे तेव्हा हे सर्व अनुभवता येईल. विनाकारण प्रवास करुन पैसा, श्रम, वेळ, तेल ह्यांची बर्बादी करू नका.

तसेच मुख्य म्हणजे पुणे हे सांस्कृतीक शहर आहे. मस्ती वैग्रे करण्यासाठी पनवेल सारखी ठिकाणे उपलब्ध आहेत. तसेच लखनौ सारखी शहरे देखील आहेतच. कृपया पुण्यात येऊन मस्ती, असभ्य वर्तन असले प्रकार करुन पुणेकरांना शरमेनी मान खाली घालण्यास लावू नये.

मी गेले ३ वर्षापासून मिपा चा नियमित वाचक आहे.आज जे मनात आले ते लिहिले..काहीच वाटत नाहीये..असे वाटत आहे "घरातल्यानाच विचारत आहे मी " .आणि हो मित्राणो..मी जरी बाहेर फिरत नसलो तरी मिपा वर खुप काही चांगले बघायला..वाचायला..अनुभव..संस्कार मिळत आहे मला..मी खुप मनापासुन आभार मानतो तुम्हासर्वांचे ! तुम्ही सगळे 'मिपा' कर खरेच खुप चांगले आहात..गोड आहात.

नो कॉमेंटस.

शंभरेक सडेतोड पुणेरी पाट्या वाचल्याचे पुण्य एका वेळी मिळाले.

धन्य हो, स. पराभाऊ..

दिपक's picture

20 Dec 2011 - 2:04 pm | दिपक

वेलकम टु पुणे.
:)

माताय एखाद्या गद्य लेखनाचे 'रस'ग्रहण पराच करु जाणे.
=))

मृगनयनी's picture

20 Dec 2011 - 2:21 pm | मृगनयनी

प्प र्रा.... _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ _/\_ /\_

कुठे फेडशील रे अबोध बालकान्ची दिशाभूल करण्याचं पाप! ;) ;) ;)

=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))

कादाचीत मैत्रिण तुमची किंवा तुम्ही मैत्रिणीची 'बिसलरी बॉटल' करण्याची तयारी ठेवलेली असावी.

हा वाक्प्रचार लई आवडल्या गेल्या आहे.... ;) ;) ;)

सुहास..'s picture

20 Dec 2011 - 2:33 pm | सुहास..

पर्‍या !

_/\_

बालकांना जगु द्या की जरा ;)

स. पराभाऊं ची प्रतिक्रिया वाचून स. पेठेत जाऊन आल्यासारखं वाटलं.

स्मिता.'s picture

20 Dec 2011 - 3:29 pm | स्मिता.

ओऽऽऽ सदाशिवपेठी पुणेकर!
का एका तरूणाच्या नाजूक भावनांची अशी चिरफाड करताय? तुमच्या घरातल्या कोणी असं विचारलं तर अशी उत्तरं देता का तुम्ही? "तुम्ही सगळे 'मिपा' कर खरेच खुप चांगले आहात..गोड आहात" लेखकाच्या या मताचा काहितरी आदर करा.

मेघवेडा's picture

20 Dec 2011 - 3:43 pm | मेघवेडा

अय्या! कित्त्ती गोऽऽड!

अमृत's picture

20 Dec 2011 - 4:24 pm | अमृत

त्या शेवटच्या उतार्‍यावर... त्यानी काय पाप केलं? फक्त 'नो कॉमेंटस ' म्हणून त्याची बोळवण केली ती...

अमृत

मोहनराव's picture

20 Dec 2011 - 5:50 pm | मोहनराव

दे दणाद्ण!! _/\_

पुष्करिणी's picture

20 Dec 2011 - 6:50 pm | पुष्करिणी

फारच गोग्गोssssड प्रतिसाद :)

>>>कादाचीत मैत्रिण तुमची किंवा तुम्ही मैत्रिणीची 'बिसलरी बॉटल' करण्याची तयारी ठेवलेली असावी.

सेंटेंस ऑफ द इयर, कसलं भारी वाक्य आहे

इंटरनेटस्नेही's picture

20 Dec 2011 - 7:49 pm | इंटरनेटस्नेही

सेंटेंस ऑफ द इयर, कसलं भारी वाक्य आहे

बिसलरी बॉटल हा शब्दप्रयोग मनापासुन आवडला गेल्या आहे.
-
(फक्त एकाच बॉटल मधुन पाणी पिणारा) इंट्या.

पुण्यात कृपया येऊ नये. आणि शनिवार रविवार तर बिलकुल येऊ नये. पुण्यात आधीच परप्रांतीयांचा शनिवार रविवार भयावह धुमाकूळ असतो, त्यात पुण्यातले काही दिडशहाणे मुंबैला जाऊन आणी मुंबैतले काही पुण्यात येऊन उतमात घालत असतातच.

सिंव्हगड वैग्रे प्रकार पुण्याच्या हद्दीत नाहीत. नदी पलीकडे पुणे संपते ह्याचेच ज्ञान नसणार्‍याने तर पुण्यात बिलकुल येउ नये.

काळजाला भिडली दोन्ही वाक्यं. :)
शाब्बास, परिकथेतील राजकुमार! शनिवार रवीवार पुण्यात "मस्ती" करायला येणार्यांना आवरणं नितांत गरजेचं आहे.

ते बिसलरी बाटलीचं गमक थोडं उचकटुन सांगा ना परा शेठ...

अर्धवटराव

अमृत's picture

20 Dec 2011 - 4:17 pm | अमृत

आजवर मिपावर वाचलेला सर्वाधिक विनोदी धागा तो हाच..... हापिसात बसून तोंड दाबून हसावं लागतयं... सकाळि वाचल्याबरोबरच याची खात्री झाली होती... लगे रहो..

:-) :-) :-)

अमृत

बन्याबापू's picture

20 Dec 2011 - 4:33 pm | बन्याबापू

@ परा :
हो..माझी या जगात फक्त एकच मैत्रीण आहे.बाकी..तिचाशिवाय दुसरे कुणाशी मैत्री ण म्हणून विचार पण करू शकत नाही. तुम्ही बोलताय "ह्यासाठी बोंबलत पुण्याला येण्याची गरज नाही. एक वॅबकॅम तुमच्या संगणकाला लावा आणि एक त्या मुलीच्या संगणकाला लावायला सांगा. थोडक्यात आणि स्वस्तात काम होईल. ह्याचा फायदा म्हणजे आयुष्यात पुन्हा हवे तेव्हा हे सर्व अनुभवता येईल. विनाकारण प्रवास करुन पैसा, श्रम, वेळ, तेल ह्यांची बर्बादी करू नका."..हा तुमचा नेट-कफे आहे ना..तुम्हाला चांगले वाटत असेल तुमचा मित्र-मैत्रीनसोबत 'वॅबकॅम' वरून बोलायला ! मला नाही चांगले वाटत. तुम्ही बोलता राजकुमार कि, "थोडक्यात आणि स्वस्तात काम होईल."..मी मैत्रीत कधी स्वस्तात..थोडक्यात काम होईल या अशा गोष्टींचा विचार कधीच करत नाही.

राजकुमार म्हणतात, "विनाकारण प्रवास करुन पैसा, श्रम, वेळ, तेल ह्यांची बर्बादी करू नका.".."अरे..यार ! मी मैत्रीत काहीपण करायला तयार आहे..पैसा मोठा नाहीये आमचा मैत्री पेक्षा !
खरी मैत्री केलीये..मी ! तिला वचन दिले आहे " मी नेहमी माझ्या मैत्रीण सोबत असेन..दु:खात पण कधी साथ नाही सोडणार..मरेपर्यंत आपली 'मैत्री' निभावणार मी "..
धन्यवाद..परिकथेतील राजकुमार !

खरी मैत्री केलीये..मी ! तिला वचन दिले आहे " मी नेहमी माझ्या मैत्रीण सोबत असेन..दु:खात पण कधी साथ नाही सोडणार..मरेपर्यंत आपली 'मैत्री' निभावणार मी "..

बोळा काढून पाणी वाहते करण्याची नितांत गरज आहे असं सारखं का वाटतंय? की मलाच वाटतंय?

असं नको रे करु मित्रा.. काय बोलू आता ?

अर्धवटराव's picture

21 Dec 2011 - 1:42 am | अर्धवटराव

पाणि वाहतं करण्याची नितांत गरज तर दिसतेच आहे... पर्याय अनेक आहेत... तुमचे आणि फारएण्डचे चित्रपट परिक्षणे वाचण्यापासून सुरुवात करावी, संजोपरावांचा "पार्टी रे पाटी" वाचावी आणि पुढील मिपा कट्ट्यावर न चुकता हजेरे लावावी असा सल्ला बन्याबापुंना द्यावासा वाटतोय...

(बोळारहीत) अर्धवटराव

चिगो's picture

21 Dec 2011 - 11:38 am | चिगो

>>बोळा काढून पाणी वाहते करण्याची नितांत गरज आहे असं सारखं का वाटतंय? की मलाच वाटतंय?

मला पण बबांच्या प्रतिसादानंतर हेच वाटलं..
बादवे, पियुशाने काय जबरा वकिली मुद्दा मांडलाय.. है, शाब्बास..

बाकी पुढचे काही दिवस मराठी वर्त्मानपत्रांच्या "पुणे आवृत्ती"वर लक्ष ठेवावे असं वाटतयं आता..

पियुशा's picture

20 Dec 2011 - 5:05 pm | पियुशा

@ बन्या
मी नेहमी माझ्या मैत्रीण सोबत असेन..दु:खात पण कधी साथ नाही सोडणार..मरेपर्यंत आपली 'मैत्री' निभावणार मी "..

मग,
तुझी मैत्रीण तुला शेवट्ची भेटणार आहे अस का लिहिल आहेस तु ?

मोहनराव's picture

20 Dec 2011 - 5:52 pm | मोहनराव

आता बोला ;)

पुष्करिणी's picture

20 Dec 2011 - 6:47 pm | पुष्करिणी

मरेपर्यंत मैत्री निभावणार आणि शेवटची भेट????
OMG ...पुण्यात येउन जीव वगैरे देउ / घेउ नका

प्रभाकर पेठकर's picture

21 Dec 2011 - 2:30 pm | प्रभाकर पेठकर

मला वाटते 'भेटणार आहे' हे शब्द महत्वाचे आहेत. पुन्हा 'असे' भेटणे होणार नसेल. 'साथ' आणि 'मैत्री' राहिलंच की.

गोड आहात

कधी ? कुठे तोंड मारला ह्याने ??
असल्या अश्लील विधानाचा तीव्र निषेध

परिकथेतील राजकुमार's picture

20 Dec 2011 - 5:04 pm | परिकथेतील राजकुमार

अरे..यार ! मी मैत्रीत काहीपण करायला तयार आहे..पैसा मोठा नाहीये आमचा मैत्री पेक्षा !
खरी मैत्री केलीये..मी ! तिला वचन दिले आहे " मी नेहमी माझ्या मैत्रीण सोबत असेन..दु:खात पण कधी साथ नाही सोडणार..मरेपर्यंत आपली 'मैत्री' निभावणार मी "..

हे पण तुम्हीच लिहिणार आणि हे पण :-

तसे एका मैत्रिणीला ही भेटायचे आहे म्हणुन जात आहे.माझी फक्त एकच मैत्रीण आहे आणि तिला जर मी आता पुण्यात जाऊन नाही भेटलो तर पुन्हा कधी आयुष्यात भेटु नाही शकणार..कारण (आता सांगत नाही..जावू दे ).

काय दारू खावून लिखाण करता का काय ?

गवि म्हणतात ते खरंच योग्य आहे. आपला तुंबलेला बोळा निघण्याची आणि पाणी वाहते होण्याची नितांत आवश्यकता आहे.

पुढे आपण म्हणता :-

मी मैत्रीत कधी स्वस्तात..थोडक्यात काम होईल या अशा गोष्टींचा विचार कधीच करत नाही.

थोडक्यात काम ?
नाही म्हणजे मग नक्की काय खर्चाची अपेक्षा ठेवता आपण ?

ह्यावेळी पुण्याला याच आणि आम्हाला भेटाच. तुम्हाला 'सज्ञान पुरुष' आणि 'मतदार' बनवूनच रवाना करतो.

मृत्युन्जय's picture

20 Dec 2011 - 5:13 pm | मृत्युन्जय

तुम्हाला 'सज्ञान पुरुष' आणि 'मतदार' बनवूनच रवाना करतो.

'सज्ञान पुरुष' ?????????????

परा नक्की काय करणार आहेस तु? कली से फुल्ल बना दिया इथपर्यंत माहिती होते पण तु त्याला पुरुष बनवणार? अर्रे काय हे. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

20 Dec 2011 - 5:17 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =))

मेल्या पुढे 'मतदार' लिहीले आहे ते पण वाच की.

मी-सौरभ's picture

21 Dec 2011 - 3:32 pm | मी-सौरभ

स.प. रा. शेट अन् त्यांचे शिष्य (मा. बण्या)
या शणिवारी बोटाला निळी शाई लावून,
खिशात हिरवी पत्ती घेऊन,
बिसलरीसह
दगडूशेट जवळ दिसणार तर... ;)

अर्धवटराव's picture

21 Dec 2011 - 1:45 am | अर्धवटराव

स़ज्ञान पुरुष बनवणार म्हणजे "गुलजार नार.." अथ पासुन इती पर्यंत अगदी डिट्टेल मध्ये सांगणार.. हो ना परा??

(सज्ञान) अर्धवटराव

आता कसला येतोय पुण्याला.. एवढ कौतुक केल्यावर!! :)

विजुभाऊ's picture

20 Dec 2011 - 5:22 pm | विजुभाऊ

पुण्यात अन्नेक ठीकाणे आहेत.
महात्मा फुले मंडई, मालधक्का , धोबी घाट , डायस प्लॉट , मंगळवार पेठेतील जुना बाजार ,खडकी बाजार,पर्वती इम्डिस्ट्रीयल इस्टेट
अशी बरीच ठीकाणे आहेत.
येथे पुण्याचे एक आगळेवेगळे रूप पहायला मिळते. इथे श्रमजीवी पहावयास मिळतील
पुण्यात केवळ आयटीतली जीव जगतात असे नाही
( अधीक माहिती श्री रा रा परा यांचे कडे विचारावी)

पुण्यात याल तेव्हा मोठ्ठी गाडी ( चार चाकी) घेऊन या आणि सकाळी हडपसर पासून कोथरूड ( व्हाया स्वारगेट, बाजीराव रोड, मंडई,शनिवार वाडा, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, गणेश पेठ, लक्ष्मी रोड, नळ स्टॉप, पौड फाटा) अशी पुणे दर्शनाला सुरवात करा. दोन दिवस कसे जातील हे समजणार सुद्धा नाही .
स्थळेही बघायला मिळतील आणि इतर प्रबोधन होईल तो बोनस.

शाहिर's picture

20 Dec 2011 - 6:34 pm | शाहिर

वाड्यासमोर पार्क केल्यास फुकट बौद्धिक मिळेल ..

विजुभाऊ's picture

20 Dec 2011 - 6:32 pm | विजुभाऊ

मोठ्ठी गाडी ( चार चाकी) घेऊन या
बरे झाले खुलासा केलात ते. पुण्यात दुचाकीला देखील गाडी असेच संबोधले जाते.
लुना वगैरे वापरत असेल तर त्याच्या उल्लेख मात्र बैलगाडी असा होतो

शाहिर's picture

20 Dec 2011 - 6:40 pm | शाहिर

मा. स. प . रा. यांचे गुलजार नार वाचल्या पासुन अशा वाक्यांचे नाही नाही ते अर्थ ध्यानी येतात..

( हे येशू , पापी लेकराला माफ कर )

मला जे २ दिवस मिळाले आहेत खुप मस्ती करायची आहे..

..खुप फिरायचे आहे..माझ्या गोड मैत्रिणीला पण मनभरून पाहीन .

खुप बोलेन.खुप आनंद देईन तिला

टवाळ कार्टा's picture

20 Dec 2011 - 8:06 pm | टवाळ कार्टा

हिच भावना तुझ्या मैत्रिणीची आहे का? (अर्थातच तुझ्याबद्दल...)
माझ्यामते तरी एखदी एखादी मुलगी कोणा एकाबरोबर खुप चं चांगली वागत असली तरी दुसर्या कोणाबरोबर ठिक-ठाक वागेल याचा काहिच नेम नाही

अन्या दातार's picture

20 Dec 2011 - 8:10 pm | अन्या दातार

कशाला असले नाही ते प्रश्न विचारुन एखाद्या गुणी पोराच्या स्वप्नांचा चक्काचूर करायला निघाला आहेस? पुणे भेटीत काय तो सोक्षमोक्ष लागेलच की. ;)

पुणे भेटीत काय तो सोक्षमोक्ष लागेलच की. >>.

म्हणजे आता ' प्रेमभंगाच्या ' कथा एकाव्या लागणार आहेत असे म्हणावयाचे आहे काय ??

सुधीर१३७'s picture

20 Dec 2011 - 9:17 pm | सुधीर१३७

अभिनंदन बन्या बापू........................ शतकी धागा.................... बाजार उठवून.............

टवाळ कार्टा's picture

20 Dec 2011 - 9:24 pm | टवाळ कार्टा

सखाराम गटणे.....???

मृगनयनी's picture

21 Dec 2011 - 1:46 pm | मृगनयनी

सखाराम गटणे.....???
टवाळ कार्टा'बरोबर अधिकांश सहमत व्हावेसे वाट्टे... कारण बन्या'च्या एकन्दरीत 'लक्षणां'वरुन तो सखाराम गटणे असल्याचा आभास होतोये... ;)

आज टार्याची खूप आठवण येत आहे....... :)

आत्मशून्य's picture

21 Dec 2011 - 1:06 am | आत्मशून्य

No good. Thank you.

स्वातीविशु's picture

21 Dec 2011 - 1:21 pm | स्वातीविशु

आणी अशा प्रकारे सर्व मिपाकरान्नी कोण मुम्बैकर आणी कोण पुणेकर हे सिदध केले आहे. समाप्त. (आता चर्चा सम्पेल अशी आशा आहे.)

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2011 - 2:46 pm | अत्रुप्त आत्मा

आणी अशा प्रकारे सर्व मिपाकरान्नी कोण मुम्बैकर आणी कोण पुणेकर हे सिदध केले आहे. ... व्हय व्हय,ह्ये समदं खरं हाय..पन जाल्ह काय म्हैतिये का..? त्यांनी हे ना,यक कनीस भाजायला आख्खी गंजी प्येटिवली हो...मंग काय हो बाकिच्यांनी बी घ्येतली आपली कनसं भाजुन... ;-)

सुहास झेले's picture

21 Dec 2011 - 1:30 pm | सुहास झेले

कादाचीत मैत्रिण तुमची किंवा तुम्ही मैत्रिणीची 'बिसलरी बॉटल' करण्याची तयारी ठेवलेली असावी.

ह्या वाक्यावर खपल्या गेलो आहे....!!!

पुण्याच्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल माहित नाही... पण ह्या पुढे बिसलरी बॉटल घेताना नक्की हा धागा आठवेल ;) :) :)

स्वातीविशु's picture

21 Dec 2011 - 3:42 pm | स्वातीविशु

@अत्रुप्त आत्मा : त्ये कनसाचे झाले हो..(भाजून), पण हापिसात हसून हसून पुरेवाट लावलिया की सा-यानी, आन त्यामुळे तोन्ड कुठे लपवावे न कुठे नाय आमी, हे बि लिवा म्हन्जे बेस होइल...

बाकी आम्चि ह्या धाग्यासाठी ह्या वर्साचा बेस धागा म्हनुन यक बिस्लेरी बाट्ली सन्मान म्हनुन दयायची तयारी हाय बा. (एव्हडे वोट फुक्कट जावु देनार न्हाय...धाग्याला आलेले)