नक्की कोणता मी प्राणी ...!

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
17 Dec 2011 - 11:41 pm

मान हलवता सर मजला
'नंदीबैल' पहा म्हणती -
हुषार नाही म्हणून मजला
मित्र किती 'गाढव' म्हणती !

डबे शोधतो हळू नेहमी
'बोका' म्हणते आई मला ,
नुसता चरतो इकडे तिकडे
'घोडा' म्हणती वडील मला !

दादा म्हणतो 'लबाड कोल्हा'
पुढेपुढे मी करताना -
'माकड' समजे ताई मला
गडबड माझी बघताना !

'गरीब गाय' म्हणते मला
आजी माझी आवडती ,
जवळ घेउन आजोबा तर
माझा 'वाघोबा' म्हणती !

बालगीत

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

18 Dec 2011 - 9:26 am | प्रभाकर पेठकर

'कोहम्' चा शोध अजूनही चालू आहे.

पाषाणभेद's picture

18 Dec 2011 - 11:11 am | पाषाणभेद

अरे! हे विचार सुचलेच नाहीत! मस्त. झकास काव्य.

इन्दुसुता's picture

20 Dec 2011 - 9:15 am | इन्दुसुता

आजी खरच गरीब गाय म्हणते का ससुल्ल्या म्हणते?

तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे

तगडक तगडक घोडोबा
घोड्यावर बसले लाडोबा

आलं का लक्षात? नक्की कोणता मी प्राणी?

ला डो बा....... :)

गणेशा's picture

20 Dec 2011 - 9:46 pm | गणेशा

'गरीब गाय' म्हणते मला
आजी माझी आवडती ,
जवळ घेउन आजोबा तर
माझा 'वाघोबा' म्हणती !

विशेष आवडले.

साध्या सरळ शब्दातुनही अतिसुंदर काव्य निर्मिती होते ह्याचे हे उदाहरण आहे.

प्रास's picture

20 Dec 2011 - 10:10 pm | प्रास

मस्त काव्य! चपखल शब्द!! सुंदर कल्पना!!!

:-)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2011 - 10:42 pm | अत्रुप्त आत्मा

खूप छान काव्य आहे. व्वा...! व्वा...! फार छान.मस्त,मस्त,मस्त. :-)

फिझा's picture

21 Dec 2011 - 4:06 pm | फिझा

मस्त आहे हो तुमचि कविता ....!!!