खूप सुंदर चित्र काढले होते तिने
आजुबाजुला मस्त हिरवळ
भले भरलेले वृक्ष
गिरक्या घेत होती पाखरे
कधिपण चिवचिवाट करतील
ईतकी जिवंत
सुरेखशी पायवाट
नि आजुबाजुला दोन घरे
खूप आवडून गेले
म्हणालो :एक घर माझे
एक घर तुझे
तिने हसून बघितले
नि म्हणाली ओ.के.
मी कल्पनेनेच जायचो त्या घरात
नि डोकावून बघायचो खिडकीतुन
तेव्हा दिसायची समोर वाहणारी नदी
नि तिचा शांत प्रवाह
नि निळे निळे आभाळ
आपलेच रूप बघतय पाण्यात
मी दंग होउन जायचो
तिच्या बोटातली जादू बघून
हरवून जायचो
एके दिवशी मी बघतोय माझ्या घरात ते चित्र
तिनेच आणून ठेवलेय
नि त्ती निघून गेलिय दूर
दूर देशी ..
हे सगळे सोडून ....!
हल्ली कधी कधी मी बघतोय
त्या चित्राकड़े
रंग काहीसे उडून गेलेत
घर रिकामे रिकामे
नि उदास झाले
मनात ढग भरून जातात
नि मी मिटवून घेतो
त्या चित्रातली खिड़की
नि बंद होउन जातो
आत खोल
मनातल्या तळघरात ....!!
प्रतिक्रिया
11 Dec 2011 - 6:08 pm | एक अनामी
सुंदर चित्र... सुंदर आशय... सुंदर कविता...
11 Dec 2011 - 6:12 pm | एक अनामी
पण...
"एक घर माझे
एक घर तुझे
तिने हसून बघितले
नि म्हणाली ओ.के."
... भाव कळ्लेच नाहीत तुम्हाला "ती" च्या मनातले...
11 Dec 2011 - 9:51 pm | पैसा
उदास वाटलं.
12 Dec 2011 - 10:53 am | मिसळलेला काव्यप्रेमी
असेच म्हणतो!
12 Dec 2011 - 10:40 am | दत्ता काळे
कविता आवडली
12 Dec 2011 - 11:29 am | michmadhura
कविता आवडली
12 Dec 2011 - 11:38 am | राघव
आशय प्रकट करण्याची पद्धत आवडली. :)
राघव
13 Dec 2011 - 6:52 am | अत्रुप्त आत्मा
व्वा...! झकास एकदम :-)