का?

गोमटेश पाटिल's picture
गोमटेश पाटिल in जे न देखे रवी...
9 Dec 2011 - 1:50 pm

तुझ्या ओटान्वरति आहे पण तु अशी अबोल का?
जणु नदि भरून वाहुन त्याचे पाणि खोल का?
डोळ्याने बोलतेस ओट तुझे बन्द का?
जणु पारिजात खुलुन त्याचा सुगन्ध मन्द का?
तुझ्या मनामध्ये आहे पण मन असे सुन्ध का?
जणु पहिला पऊस मतित पडून त्याचा असा दुर्गध का?
तुझ्या ह्रदयामध्ये आहे पण तुझा हा नकार का?
जणु इतका उजेड असताना अन्धराचा आधार का?

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

9 Dec 2011 - 2:21 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

नाही रे वल्ली!!
"मोकलाया दाहि दिशा" हि उत्तुंग रचना आहे. त्याची सर याला कुठली?
ओ गोमटेश "मोकलाया दाहि दिशा" बघा आणि पुन्हा प्रयत्न करुन बघा.
जमेल जमेल... निराश होऊ नका... प्रयत्न करत रहा.

प्रचेतस's picture

9 Dec 2011 - 2:28 pm | प्रचेतस

हो हो. ती तर आहेच.

'मोकलाया' सारखे एव्हरेस्ट सर करायची ही 'का'ची पहिली पायरी आहे. :)

उदय के'सागर's picture

9 Dec 2011 - 2:25 pm | उदय के'सागर

गोमटेशाssssssssssssss(जी), टंकलेखन सुधारा बुवा :(

उदय के'सागर's picture

9 Dec 2011 - 2:25 pm | उदय के'सागर

गोमटेशाssssssssssssss(जी), टंकलेखन सुधारा बुवा :(

उदय के'सागर's picture

9 Dec 2011 - 2:25 pm | उदय के'सागर

गोमटेशाssssssssssssss(जी), टंकलेखन सुधारा बुवा :(

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

9 Dec 2011 - 2:31 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

तीन तीन वेळा सांगीतल्यावर तरी मनावर घेतील असे वाटते आहे.

उदय के'सागर's picture

9 Dec 2011 - 3:09 pm | उदय के'सागर

हा हा :D

उदय के'सागर's picture

9 Dec 2011 - 3:09 pm | उदय के'सागर

हा हा :D

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

9 Dec 2011 - 3:22 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

फारच आधाशी बुवा!!
हसतांना देखिल दोन दोनदा हसता!!! ;)

उदय के'सागर's picture

9 Dec 2011 - 3:29 pm | उदय के'सागर

:P
अहो काय माहित असं काय होतय, काहि तरी प्रॉब्लेम झालाय.

शुद्धलेखन नसणे हे समजून घेऊन, शुद्ध करुन वाचले. कवितेतलं मला फार काही कळत नाही पण दोन शंका विचारतोच..(हे शब्द शुद्धलेखनातल्या त्रुटींमुळे बनले नसावेत असं समजून..)

-----"तुझ्या मनामध्ये आहे पण मन असे सुन्ध का?"

सुन्न म्हणायचे आहे का? नसावे कारण "दुर्गंध"शी यमक आहे, म्हणजे सुन्ध असाच शब्द असणार.. सुन्ध म्हणजे काय?

------"जणु इतका उजेड असताना अन्धराचा आधार का?"

अन्धराचा आधार म्हणजे काय?

धन्यवाद आणि मिसळपाववर स्वागत..

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2011 - 2:37 pm | परिकथेतील राजकुमार

जणु इतका उजेड असताना अन्धराचा आधार का

ते नक्कीच इतका उजेड असताना 'अधरांचा आधार का' असे असावे ;)

धन्यवाद..

-जे देखे कवी ते न देखे गवि

तुझ्या मनामध्ये आहे पण मन असे सुन्ध का?"

सुन्न नसून ते धुंद असावे. मन हे बर्‍याचवेळा धुंद असते.

नाही वल्लीशेठ,
तसं नाही वाटत, कारण रचनेमधे सर्वच ओळीच्या पूर्वार्धात पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्या उलट म्हणजे निगेटिव्ह सेन्स उत्तरार्धात प्रश्नार्थक स्वरुपात आहे..

म्हणजे.

आहे मनोहर तरी गमते उदास या आकारबंधासारखे..

हो. आता लक्षात आलं.
बरोबर आहे तुमचे.

या कवितेचे संपूर्ण रसग्रहण कोणी करेल काय?

इरसाल's picture

9 Dec 2011 - 2:47 pm | इरसाल

तुझ्या ओठांवरती आहे पण तु अशी अबोल का?
जणु नदी भरून वाहुन त्याचे पाणी खोल का?
डोळ्याने बोलतेस ओठ तुझे बन्द का?
जणु पारिजात खुलुन त्याचा सुगन्ध मंद का?
तुझ्या मनामध्ये आहे पण मन असे सुन्द का?
जणू पहिला पाऊस मातीत पडून त्याचा असा दुर्गंध का?
तुझ्या ह्रदयामध्ये आहे पण तुझा हा नकार का?
जणू इतका उजेड असताना अंधाराचा आधार का?

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2011 - 3:33 pm | परिकथेतील राजकुमार

तो सुन्द बहूदा सुन्दोपसुन्दी मधला सुन्द असावा.

जाणकार अधीक प्रकाश ५५५ टाकतीलच ;)

अहो, सुन्द नसून सुन्न असावा.

मलाही "सुन्न"च असावा असं वाटतं.

मी पुन्हा नीट लिहायचा प्रयत्न करतो. :

ओठांवरती शब्द सारे, तरी अशी तू अबोल का?
नदी वाहते खळखळा, तरी डोह तिचा खोल का?

डोळेच सारे बोलती, तरी ओठ तुझे बंद का?
दारी पारिजात फुलला, तरी सुगंध मंद का?

तुझ्या मनात सर्वकाही, तरी अशी तू सुन्न का?
पहिला पाऊस पडूनही मातीस हा दुर्गध का?

ह्रदयात तुझ्या होय आहे तरी तुझा नकार का?
प्रकाशदिवा उजळला तरी अंधाराचा आधार का?

तुझ्या मनात सर्वकाही, तरी अशी तू सुन्न का?

'सुन्न' हेच जर येथे गृहित धरले आहे तर कवीला हा प्रश्न का बरे पडला असावा?
मनातल्या मनातच सर्व काही असल्यानेच ती सुन्न झाली असावी. जर मनात न ठेवता तिने मनातील गोष्टी बोलण्याद्वारे बाहेर आणल्या असत्या तर ती सुन्न राहिली नसती.

दारी पारिजात फुलला, तरी सुगंध मंद का?

शिवाय दारी पारिजात फुलला त्याचा सुगंध मंद का होईना पण तो सुगंध आहेच पण पहिल्या पावसाचा मातीचा गंध कवीस दुर्गंध का वाटावा? रेल्वेरूळांशेजारील माती तर त्याच्या दृष्टीस पडत नसेल ना?

कविला बरेच प्रश्न पडलेले दिसताय.
मिपावरच्या काही उत्तम रचनांचा गाईड म्हणुन उपयोग करावा.
बरीच कोडी उलगडतील. ;)

सुरवात म्हणुन ह्या घ्या काही.
ये र बालां
वसा ,
मीही कवि होणार,
झोका...
डुडुळगावचा गोलंदाज
खाटिक
दारासमोरचा रस्ता
गंध मायेचे..
मन माझं गोगलगाय !

ढिष्क्लेमरः वरील मला आवडलेल्या काही कविता. यादी बरीच लांब लचक आहे. वेळे अभावी तुर्तास इथेच थांबतो.
यात मुद्दामच विडंबन घेतली नाहीत. चांगला 'माल' मिळाल्यास मिपाकरांच्या काव्यप्रतिभेची त्सुनामी कशी उठते (एका दिवसात एकाच कवितेची २५ - २७ विडंबन आली होती) त्याचा साक्षिदार आहे.

(त्सुनामीग्रस्त) - गणा

गोमटेशभाउ कुठे गेले?

कुणी हलवा, उठवा,चालवा अन् इथे आणा त्यांना.

मैत्र's picture

9 Dec 2011 - 7:57 pm | मैत्र

मागे एकदा कोणी तरी जॅबरवॉकीचं अप्रतिम मराठी रुपांतर केलं होतं.
त्याची खूण मिळेल का... खूपच मस्त प्रकार होता...

जॅबरवॉकीच्या अनुवादाचा दुवा.

प्रभाकर पेठकर's picture

10 Dec 2011 - 7:20 pm | प्रभाकर पेठकर

कवीच्या अशुद्ध लेखनाने थबथबलेल्या कवितेमुळे आणि (कविता) दुर्लक्षित ठेवण्याच्या वृत्तीने प्रेयसी अशी नकारात्मक अवस्थेस पोहोचली असावी.
शुद्धलेखन सुधारल्यास कदाचित प्रेयसीत 'नवचेतना' जागृत होईल असा अंदाज आहे.

विजुभाऊ's picture

10 Dec 2011 - 8:36 pm | विजुभाऊ

तुज्या ऑथन्वर्ति अहे पण तु अशी अबोल का?
जणु नंदि भ्रुन वाहुन त्याचे पणि खोल का?
डोळ्याने बलतस आऊट तुझे बद्द का?
जणु पारिजात खुलुन त्याचा सुगनद मद्द का?
तुज्या मणामध्ये आहे पन मण असे सुन्ध का?
जणु पहिला पऊस मतित पडून त्याचा असा दुर्गध का?
तुज्या ह्रदयामध्ये आहे पण तुझा हा नकार का?
जणु इतका उजेड असताना अन्धरचा आधर का?

हे क्से वततय म्रित्राणो