इति प्रेमपुराण संपले

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
8 Dec 2011 - 5:28 pm

तिच्यावर त्याचे चॉकोप्रेम
त्याच्यावर तिचे कॅडप्रेम
जागत होता तिच्याचसाठी
जगात होती त्याच्याचसाठी
दु:ख काहीच ठाऊक नव्हते
सुखात दोघे डुंबत होते !
आले कधी जर त्याचे डोळे
तिचेच डोळे पाणी गाळे !
हासत खेळत आनंदाने
मजेत जीवन चालू होते
जिवापाड ते प्रेम तयांचे
तहानभूकही विसरायाचे
त्या प्रेमाला दृष्ट लागली...
सुमुहुर्ताची ओढ लागली !
इति प्रेमपुराण संपले
-त्या दोघांचे 'लग्न' लागले !
लग्नाची ही चूक तयांची
वाताहत जी दोन जिवांची
प्रेम संपुनी घरपण आले
रांधा वाढा सुरू जाहले !
सुरू जाहली जगरहाटी
जीवन वैवाहिक ललाटी
नवरा नवरी जगू लागले
असामान्य सामान्य जाहले !

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Dec 2011 - 6:36 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

घरोघरी मातीच्याच चुली!! :(

प्रभाकर पेठकर's picture

8 Dec 2011 - 7:56 pm | प्रभाकर पेठकर

दु:खात सहभागी आहोत. या एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवून चार अश्रू ढाळूया.

फिझा's picture

9 Dec 2011 - 10:03 am | फिझा

मस्त !!! जमलिये कविता !!!

सुहास झेले's picture

9 Dec 2011 - 10:11 am | सुहास झेले

मस्त ... भापो :) :)

पैसा's picture

9 Dec 2011 - 10:55 am | पैसा

पुण्याला पोचली! अशी शोकांतिका झाली काय!!

पक पक पक's picture

9 Dec 2011 - 11:04 pm | पक पक पक

रडे एक ज्याचा दुजा शोक वाहे..अकस्मात तो हि पुढे चालत आहे....

पक पक पक's picture

9 Dec 2011 - 11:07 pm | पक पक पक

प्रेम हे सुन्दर स्वप्न आहे.........लग्न हेच सत्त्य आहे.... बाबा महाराज पुणेकर....

अन्या दातार's picture

9 Dec 2011 - 11:12 pm | अन्या दातार

प्रत्येक ठिकाणी निदान दोन प्रतिसाद जयाचे
पक पक पक सदस्यनाम जाणावे तयाचे

इति अन्यामहाराज खरगपूरकर महावाक्य!

पक पक पक's picture

10 Dec 2011 - 10:24 am | पक पक पक

आपल्य बौद्धिक क्षमते बाबत आम्हि अजाण आहोत.आकलन होत नसेल तर दुर्लक्ष करावे......

प्रचेतस's picture

10 Dec 2011 - 10:35 am | प्रचेतस

आपल्या की आमच्या?

पक पक पक's picture

10 Dec 2011 - 10:27 am | पक पक पक

कॄपया शुद्धलेखना बद्द्ल आक्षेप घेउ नये..आम्हि येथे नविन आहोत...

आपण १ वर्ष ४० आठवडे इतके जुने सदस्य असूनही स्वतःला नविन म्हणताय हे पाहून अंमळ मौज वाटली.
नवथरपणाची नव्हाळी संपली नाही का काय अजून?

अन्या दातार's picture

10 Dec 2011 - 10:44 am | अन्या दातार

असुदेत हो वल्लीशेठ

ते 'शौकिन' मधले ए.के. हन्गल असतील ;)

पक पक पक, तुम्ही असेच एकाहून अधिक अशुद्धलेखनयुत्त प्रतिसाद देत जा. कुण्णाचीही भीडभाड बाळगू नका

पक पक पक's picture

10 Dec 2011 - 11:04 am | पक पक पक

तुमच्या ? बर तुमच्या देखिल....
१ वर्ष ४० आठवडे इतके जुने असुन देखिल ,एव्हढा वेळ फक्त आपले बौद्धिक वाचण्यात गेला.त्या वर काय प्रतिक्रिया द्यावी तेच समजेना.

एव्हढा वेळ फक्त आपले बौद्धिक वाचण्यात गेला.त्या वर काय प्रतिक्रिया द्यावी तेच समजेना.

तेच ना. म्हणून तर प्रतिसादाला उपप्रतिसाद द्यायच्या ऐवजी तुम्ही थेट विदेशरावांच्या धाग्यालाच प्रतिसाद दिला. तेव्हा बौद्धिके वाचण्यात इतका वेळ उगाच घालवू नका.

अन्या दातार's picture

10 Dec 2011 - 11:11 am | अन्या दातार

तेव्हा बौद्धिके वाचण्यात इतका वेळ उगाच घालवू नका.

अगदी बरोबर. नाहीतरी बौद्धिके वाचून काही उमगलेलं तर दिसत नाहीच; नुसता तुमचा आणि आमचाही वेळ वाया घालवण्यात काय उपयोग?

पक पक पक's picture

10 Dec 2011 - 11:20 am | पक पक पक

अन्या भाइ ,प्रथम आपण माझ्या प्रतिक्रिया नीट वाचा ,त्यात आपणास दुखावण्याचा कोणताही प्रयत्न नाहि.असे असतानाही आपण माझ्या बद्द्ल जे व्यक्तव्य करित आहत ते काहीतरी पुर्वग्रहदूशित वाट्ते.क्रुपया आपला राग काय आहे ते कळवावे....

बौद्धिके वाचून एकच गोश्ट उमगली कोणतेही ठोस कारण नसताना येथे एकमेकाच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात आपली बौद्धिक क्षमता वापरण्यात तुमच्या सारखे काहि लोक वाकबगार आहेत..

वल्लि , आपण येथे माझ्या बरोबर जो सूसंवाद सुरु केला आहे तो वाढवण्या पेक्षा ,मला योग्य मार्गदर्शन केले तर माझा आपणा बद्द्ल आदर वाढेल , कारण जरी माला येथे १ वर्ष ४० आठवडे झाले असले तरी प्रतिक्रिया देण्यास नविनच सुरुवात केलेली आहे.तसेच आपण व अन्या दातार ज्या पद्धतीने हा सूसंवाद वाढवत आहात तो वाढवण्यात मला कोणताही रस नाही.क्रुपया असल्या फुटकळ कुचाळक्या करण्यापेक्षा हे इथेच थांबवा हिच नम्र विनंती.....

माझा तुमच्याबद्दल कुठलाही आकस नाही हो. तुम्हाला राग आला असल्यास मी दिलगीर आहे. येथे आपल्याला दुखावण्याचा वा उखाळ्या पाखाळ्या काढण्याचा कुठलाही उद्देश नाही.
मिपा हे असे जिवंत संस्थळ आहे की येथे अशी थोडीफार मजा चालायचीच, तीही आपण तितकीच मौजेने घ्यावी इतकेच.

बरोबर आहे तुमच .पण अचानक सुरु झालेल्या प्रकाराने थोड दडपण आले.बाकी मि देखिल तुमची आणि अन्या दातारची माफि मागतो..लोभ असावा.....

विदेश's picture

10 Dec 2011 - 3:30 pm | विदेश

मी इथे असताना, मी का माफी मागू नये ?
ग्रहण असताना २१ प्रतिसाद ?
पुराण लांबले गेले आहे.
उगाच वेळेचा अपव्यय झाला असेल तर ...
क्षमस्व !

विदेशराव कवितेची पहिलीच ओळ जाम वादग्रस्त ठरु शकते,

बाकी कविता आवडली, काही दिवसांपुर्वी इथल्या इलिजिबल व एडिटेबल बॅचलरांचा कट्टा झाला त्याला हाच मेन्यु होता त्याची आठवण झाली.